Maharashtra Election Voting Live : संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 61.30 टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:16 AM2019-04-23T07:16:18+5:302019-04-29T19:11:07+5:30
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. ...
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. यात मंत्री गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आदींचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले. या टप्प्यात १९ महिला उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक ४ महिला बारामतीतून भाग्य आजमावत आहेत. पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या होत्या.
08:31 PM
संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 61.30 टक्के मतदान, अशी आहे मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
जळगाव 58, रावेर 58, जालना 63, औरंगाबाद 61.87, रायगड 58.06, पुणे 53, बारामती 59.50, अहमदनगर 63, माढा 63, सांगली 64, सातारा 57.06, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.76, कोल्हापूर 69, हातकणंगले 68.50.
08:13 PM
लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनीही केले सहकुटुंब मतदान
अहमदनगर : ख्वाडा आणि बबन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनीही केले सहकुटुंब मतदान. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
06:02 PM
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 55. 05 टक्के मतदान, अशी आहे मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
जळगाव 52.28, रावेर 56.98, जालना 59.92, औरंगाबाद 58.52, रायगड 56.14, पुणे 43.63, बारामती 55.84, अहमदनगर 57.75, माढा 56.41, सांगली 59.39, सातारा 55.40, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 57.63, कोल्हापूर 65.70, हातकणंगले 64.79.
05:26 PM
अहमदनगरमधील मिरी परिसरात इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान माघारी
अहमदनगर : मिरी परिसरातील बहुतांश ठिकाणी इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदार माघारी परतले.
05:08 PM
राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.80 टक्के मतदान, पाहा मतहारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.61% मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.03 % मतदान
जालना लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 49 टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 47 टक्के मतदान
रायगड लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 47 टक्के मतदान
पुणे लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 37 टक्के मतदान
बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
माढा लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 44 टक्के मतदान
सांगली लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 46 टक्के मतदान
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 54 टक्के मतदान
हातकणंगले - लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 52 टक्के मतदान
04:36 PM
खासदार दिलीप गांधी यांनी कुटुंबीयांसह केले मतदान, सुजय विखेंची उपस्थिती ठरली लक्षवेधी
खासदार दिलीप गांधी यांनी कुटुंबीयांसह केले मतदान, सुजय विखेंची उपस्थिती ठरली लक्षवेधी
04:27 PM
माढा विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४६.५७ टक्के मतदान झाले
माढा विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४६.५७ टक्के मतदान झाले
04:19 PM
राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.80 टक्के मतदान
Estimated voter turnout till now for the 3rd phase of the #LokSabhaElections2019 is 51.15%. Voting for 116 parliamentary constituencies across 13 states and 2 union territories is being held today. pic.twitter.com/mV9g0JmSq1
— ANI (@ANI) April 23, 2019
04:15 PM
108 वर्षांच्या मतदार सुलोचनाबाई गोविंद देशमुख यांचा निवडणूक आयाेगाने केला सत्कार
रायगड लाेकसभा मतदार संघांतर्गत महाड विधानसभा मतदार संघातील देशमुख कांबळे गावांतील 108 वर्षांच्या ज्येष्ठ मतदार सुलाेचनाबाई गाेविंद देशमुख यांनी देशमुख कांबळे मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावल्यावर महाड विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी भारत निवडणुक आयाेगाच्यावतीने आदरपूर्वक गाैरव केला.
04:06 PM
रावेर लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.03 % मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.03 % मतदान
04:06 PM
जळगाव लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.61% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.61% मतदान
04:04 PM
सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
03:50 PM
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान
रत्नागिरी - कोकणात मतदारांचा उत्साह, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.१० टक्के मतदान
03:40 PM
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 46.44 टक्के मतदान
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत 46.44 टक्के मतदान
03:37 PM
रायगड लोकसभा मतदारसंघात दुपारी 2 वाजेपर्यंत अंदाजे 38.46% मतदान
रायगड लोकसभा मतदारसंघातील दुपारी दोन वाजेपर्यंतची विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
पेण 38.5%
अलिबाग 39.38%
श्रीवर्धन 37.10%
महाड 39.7%
दापोली 38.35%
गुहागर 37.40%
02:09 PM
राज्यात 1 वाजेपर्यंत 36 टक्के, तर देशात 38 % मतदान
01:58 PM
110 वर्षांच्या गंगुबाई चव्हाण यांनी केले मतदान; निवडणुक आयाेगाकडून मतदान केंद्रावर विशेष सत्कार
01:54 PM
द.मा. मिरासदार यांनी बजावला मतदानाचा हक्क, केलं आवाहन
द.मा. मिरासदार - वय वर्षं 93. - चार दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून घरी आले. तरीही, आज मतदानासाठी सकाळपासून तयार होऊन बसले होते. त्यांचे विचार ऐका आणि आवर्जून मतदानाचे कर्तव्य पार पाडा.
01:09 PM
सोलापूर - सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जेऊर येथे मतदानाचा हक्क बजावला
12:38 PM
रायगड लोकसभा मतदार संघात 11 वाजेपर्यंत16.43 % मतदान अलिबाग मतदार संघात 19.16% मतदान
11:55 AM
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अकरा वाजेपर्यंत २१.५९ टक्के मतदान झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अकरा वाजेपर्यंत २१.५९ टक्के मतदान झाले.
11:51 AM
माढा लोकसभा मतदार संघ -
करमाळा तालुक्यातील रिद्देवाडी गावातील लोकांनी टाकला मतदानावर बहिष्कार, अद्याप पर्यंत एकही मतदान झाले नाही
11:42 AM
सांगली : जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी : 19.68 टक्के
11:42 AM
मतदानाचा टक्का वाढला
जळगाव लोकसभा मतदार संघात 11 वाजेपर्यंत 17.15% मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 11 वाजेपर्यंत 20 % मतदान
11:31 AM
भाजपच्या पोलिंग एजंटला प्रवेश नाकारला
सोलापूर : राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या गावातील मतदान केंद्रात भाजपच्या पोलिंग एजंटला प्रवेश नाकारला, तांत्रिक कारणे देत पोलिंग एजंटला मतदान केंद्रावरुन हाकललं, भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये दाखल.
11:30 AM
कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावताना खासदार विजयसिंह मोहिते पाटील
मतदानाचा हक्क बजावताना खासदार विजयसिंह मोहिते पाटील, सौ.नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील.
11:14 AM
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मधोजी क्लब येथे मतदानाचा हक्क बजावला.
11:05 AM
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क
Social activist Anna Hazare after casting his vote in Ralegan Siddhi,Ahmednagar District, Maharashtra. #LokSabhaElections2019pic.twitter.com/KAGwbSc1EQ
— ANI (@ANI) April 23, 2019
11:09 AM
सातारा - कोरेगाव मध्ये पिंक बुथ
10:55 AM
अहमदनगर: राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केले नगरमध्ये मतदान
10:49 AM
लग्नापूर्वी बावधन येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
सैन्यदलात कार्यरत असलेल्या बावधन (ता. वाई) येथील शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) यांनी लग्नापूर्वी बावधन येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
10:40 AM
देशात कुठल्याही एका पक्षाची सत्ता येणार नाही - संजय राऊत
Sanjay Raut, Shiv Sena: Jo chitra mere saamne hai, iss desh mein kisi ek party ki satta ab nahi aayegi. satta aayegi NDA ki, hum sab NDA ke allies hain aur NDA ki sarkar banne ja rahi hai. pic.twitter.com/9FPeAumKKD
— ANI (@ANI) April 23, 2019
10:38 AM
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, निर्मलताई दानवे, रेणूताई संतोष दानवे यांनी भोकरदन शहरातील मतदान केंद क्रमांक 181 वर मतदान केले
10:37 AM
सहकार राज्यमंञी गुलाबराव पाटील यांनी रिक्षातून मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
10:36 AM
अहमदनगर : जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी सहकुटुंब कर्जतमध्ये बजावला मतदानाचा हक्क
10:35 AM
औरंगाबाद : पल्लवी तुपे या वधूचे विवाह मुहूर्त पुढे ढकलून मतदान
10:18 AM
पहिल्या दोन तासात जळगाव - ७.२१ टक्के रावेर - ८.४८ टक्के मतदान
रायगड मधील दापोली विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सकाळी 9 वा.पर्यत 5.84 %मतदान
10:07 AM
जळगाव- भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क
10:02 AM
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेेपर्यंत 1 टक्के मतदान
#UPDATE#LokSabhaElections2019 Polling percentage recorded in Uttar Pradesh till 9 am is 10.24% https://t.co/gnNqzjXjER
— ANI (@ANI) April 23, 2019
10:00 AM
लग्नापूर्वी श्रद्धा भगत हिचे मतदान
09:56 AM
मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांनी कोल्हापूर येथे न्यू पॅलेस शाळा नंबर १५ येथे मतदानाचा हक्क बजावला.
09:53 AM
जळगाव - माझी मेजर शस्त्रक्रिया झाली आहे. २० दिवास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. मतदानानंतर पुन्हा उपचारास मुंबई जाणार आहे - आ. एकनाथ खडसे
अहमदनगर: नगर विधानसभा क्षेत्रात सकाळी नऊपर्यंत पाच टक्के मतदान
09:44 AM
पळसावडे, ता. माण येथे मंत्री महादेव जानकर यांनी आईबरोबर जाऊन मतदान केले
09:23 AM
आधी मतदान मग लग्नबजावणीचा हक्क
सुप्रिया संजय गुरव या नववधुने रायगड लाेकसभा मतदार संघातील दापोली 263 विधानसभा मतदारसंघातील जालगाव 266 मतदान केंद्रावर प्रथम मतदानाचा हक्क बजावला व मग लग्न मंडपात रवाना झाली. सुप्रीयाचे वडील संजय गुरुव हे दापोली तालुक्यात मंडल अधिकारी ( सर्कल) म्हणून कार्यरत आहेत.
09:19 AM
जळगाव - जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले सहकुटुंब मतदान
09:16 AM
सांगली : महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी पद्माळे (ता. मिरज) या मूळ गावी मतदान केले.
09:13 AM
अहमदनगर: हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांनी केले मतदान
अहमदनगर: जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील मतदान केंद्र क्रमांक - १४२ मधील मतदान यंत्रांत सकाळी ७ वाजल्यापासुन बिघाड. दुसरे मतदान यंत्र आणले तेही बंद पडले. तिसरे मदान यंत्र आणले ते सकाळी ८-३० वाजता चालु झाले. दीड तास मतदार रांगेत उभे.
09:10 AM
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सह कुटूंब मतदान केले
09:02 AM
अलिबाग विधानसभा मतदार संघात थळ चाळमळा साई मंदिर मतदान केंद्र evm मशीन प्राॅब्लेम.मतदान सुरु हाेवु शकले नव्हते. आता सुरु झाले आहे. अलिबाग वि.स.मतदान केंद्र सहा.निवडणुक निर्णय अधिकारी शारदा पाेवार
09:01 AM
जलगाव : अभोणे ता. चाळीसगाव येथील योगेश म हाले या नवरदेवाने मतदान केले.
08:56 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मतदान केले
08:37 AM
सांगली : विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी चिंचणी या मूळ गावी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
08:36 AM
खासदार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
Maharashtra: Nationalist Congress Party's Supriya Sule along with her family casts her vote a polling station in Baramati; She is sitting MP and NCP MP candidate from Baramati pic.twitter.com/iNVAP3QDAr
— ANI (@ANI) April 23, 2019
08:31 AM
माढा लोकसभा मतदार संघातील सखी मतदान केंद्र
माढा लोकसभा मतदार संघातील सखी मतदान केंद्र, रांगोळ्या काढून मतदारांचेस्वागत
08:29 AM
उशिराने मतदान सुरू
जळगाव - कळमसरे, ता. अमलनेर येथे वोटींग मशिन सेटींग करतांना अडचणी आल्याने तीनही बुथवर २० मिनिटे उशिरा मतदान सुरू झाले.
08:27 AM
अलिबागमधील सरखेल कान्होजी आंग्रे 1 मधील महिलांचे सखी मतदान केंद्र
मतदान केंद्रवार सेल्फी पॉईंट
08:13 AM
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे उमेदवार संजय शिंदे यांनी केले मतदान
08:13 AM
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर माॅकपोल घेण्यात आले. त्यानंतर 7 वाजेपासून मतदानास सर्वत्र शांततेत सुरूवात झाली आहे.
08:08 AM
अजित पवार यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
08:07 AM
सुप्रिया सुळे मतदान केंद्रावर दाखल
बारामती मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे मतदान केंद्रावर दाखल. त्यांच्यासमोर युतीच्या कांचन कुल यांचे आव्हान
08:02 AM
कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन बंदच
कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरूच झालेली नाहीत. मतदारांच्या रांगा. सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लावून मतदान सुरू झाले आहे.
08:01 AM
अहमदनगरमध्ये ईव्हीएम बदलले
अहमदनगर: डोकेवाडी ( ता.श्रीगोंदा ) मतदान केंद्रावर अर्धा तास उशीरा मतदान सुरू. EVM बंद पडले होते. अधिका-यांनी EVM बदलल्यानंतर मतदान सुरु.
08:01 AM
औरंगाबादमध्ये ईव्हीएम बंद असल्याने मतदारांमध्ये संताप
औरंगाबाद : मतदान केंद्र क्रं.222,219 वर अद्याप मशीन सुरू झाले नाही. मतदारांचा संताप.
07:59 AM
माढ्यामध्ये ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर 1 येथील मतदान केंद्र 140 मधील मशीन एक तासापासून बंद, मतदान प्रक्रिया खोळंबली.
07:49 AM
आनंदीबाई देशमुख बालक मंदिराच्या मतदान केंद्रावर शुकशुकाट
जळगाव - आनंदीबाई देशमुख बालक मंदिराच्या मतदान केंद्रावर शुकशुकाट होता
07:49 AM
जालन्यात उन्हापुर्वी मतदान करण्यासाठी मतदार केंद्रावर गर्दी.
जालना : शहरासह लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ; उन्हापुर्वी मतदान करण्यासाठी मतदार केंद्रावर गर्दी.
07:41 AM
माढामध्ये दोन ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 158, 160 वरील मशीन बंद
07:42 AM
जळगाव - जळगावच्या आर.आर.विद्यालय व बाहेती हायस्कूलमध्ये मतदानासाठी रांगा.
जळगाव - जळगावच्या आर.आर.विद्यालय व बाहेती हायस्कूलमध्ये मतदानासाठी रांगा.
07:41 AM
औरंगाबाद मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड
औरंगाबाद: बुथ क्रमांक 211,210 आणि 161 वर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांच्या रांगा लागल्या.
07:40 AM
अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर उशिराने मतदान सुरू.
जळगाव - अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर 20 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले
07:37 AM
पुण्यातील मयूर कॉलनीमध्ये वृद्धांसाठी विशेष सोय
Maharashtra: A senior citizen being helped by security personnel at a booth in Pune's Mayur colony. 14 Parliamentary constituencies of the state are undergoing polling today. #LokSabhaElections2019pic.twitter.com/Su532BdeH9
— ANI (@ANI) April 23, 2019
07:32 AM
बारामतीमध्ये मतदानाला सुरुवात; कांचन कुल यांनी दौंडमध्ये केले मतदान
Maharashtra: Visuals of preparation from polling station number 135 in Baramati Lok Sabha constituency. Voting for the third phase of elections will begin at 7 AM today. #LokSabhaElections2019pic.twitter.com/zbljviQpFY
— ANI (@ANI) April 23, 2019
07:28 AM
जळगाव : शहरातील मतदान केंद्रावर मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी हक्क बजावला.
जळगाव : शहरातील मतदान केंद्रावर मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी हक्क बजावला.
07:19 AM
जळगाव : पाचोरा येथील मतदान केंद्र सजविण्यात आले आहे.
07:17 AM
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात मतदान सुरू
राष्ट्रवादी चे संजय शिंदे व भाजप चे रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत