Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 07:22 AM2019-04-29T07:22:03+5:302019-04-29T20:18:04+5:30
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्या ईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.
LIVE
08:48 PM
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सुमारे 57 टक्के मतदान
07:38 PM
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ६ वाजेपर्यंत 54.50 % मतदान
मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ६ वाजेपर्यंत 54.50 % मतदान
07:06 PM
अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल यांनी विलेपार्ले येथे बजावला मतदानाचा हक्क
Mumbai: Actors Sunny Deol and Bobby Deol cast their votes at a polling booth in Vile Parle. #LokSabhaElections2019pic.twitter.com/IZI6jdNO3K
— ANI (@ANI) April 29, 2019
06:51 PM
नितिन शेट्टी आणि सविता शेट्टी या दुबईस्थित दाम्पत्याने मुलुंडच्या मतदान केंद्रात केले मतदान
मुंबई - नितिन शेट्टी आणि सविता शेट्टी या दुबईस्थित दाम्पत्याने मुलुंडच्या मतदान केंद्रात केले मतदान, २० वर्षांपासून दुबईत राहण्यास, मतदानासाठी गाठली मुंबई, रात्रीच्या फलाईट्सने दुबईला होणार रवाना
06:45 PM
मतदान केंद्रातील टेबलावर काँग्रेसची जाहिरात असलेला पेपर लावल्याने निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार
डोंबिवली - मतदान केंद्रातील टेबलावर काँग्रेसची जाहिरात असलेला पेपर लावल्याने निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार
06:25 PM
मतदानाची वेळ संपल्यानंतरही नाशिकमधील अनेक मतदान केंद्रांवर गर्दी
नाशिक : सायंकाळी 6 वाजल्यानंतरही बी डी भालेकर शाळेच्या काही केंद्रांवर अशी गर्दी आहे
06:15 PM
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61 टक्के मतदान
नंदुरबार- सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61 टक्के मतदान झाले. साधारण 68 ते 70 % मतदानाचा अंदाज
06:10 PM
पालघर लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत सुमारे 56.96 टक्के मतदान
पालघर - पालघर मतदार संघात 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 56.96 टक्के मतदान झाले आहे
06:04 PM
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क
Mumbai: Reliance Industries Chairman Mukesh Ambani and his family after casting their votes at a polling booth at Villa Theresa High School on Peddar Road. #LokSabhaElections2019pic.twitter.com/jAsCfSQ3cB
— ANI (@ANI) April 29, 2019
06:03 PM
महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.07 टक्के मतदान, पाहा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
05:36 PM
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55.60 टक्के मतदान
अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55 . 60 टक्के मतदान
05:13 PM
मावळ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत सुमारे ५२.४० % मतदान
मावळ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत सुमारे ५२.४० % मतदान
05:11 PM
बहिष्कार झुगारत श्रमजीवी संघटनेच्या चौदा सभसदांनी केले मतदान
भिवंडी - भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी तालुक्यातील वारेट गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. तो बहिष्कार झुगारून तेथील श्रमजीवी संघटनेच्या सभासद चौदा मतदारांनी मतदानांचा आपला हक्क बजावला
04:59 PM
स्वातंत्रसैनि नवनीतभाई शहा यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
पालघर स्वातंत्र्य सैनिक तथा पालघरचे माजी आमदार असलेले नवनीतभाई शहा(वय 96 वर्षे) व त्यांच्या पत्नी हिरालक्ष्मी शहा(वय 92 वर्षे)ह्यांनी पालघरमध्ये केले मतदान. महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी घेतली नवनीतभाईंची भेट.
04:48 PM
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांनी मुंबईतील वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क
Mumbai: Shah Rukh Khan and his wife Gauri Khan leave after casting their votes at a polling booth in Bandra. #LokSabhaElections2019pic.twitter.com/h85W4vzCxL
— ANI (@ANI) April 29, 2019
04:43 PM
आईला मुखाग्नी देऊन मुलांनी बजावला मतदानाचा हक्क
डहाणू - विधानसभा मतदारसंघातील चिखले गावात गजरुबाई विठ्ठल आगरी या नव्वदवर्षीय महिलेचा मृत्यू रविवारच्या मध्यरात्री झाला. मात्र हे दुःख कुढत बसण्याऐवजी तिच्या तीन मुलांनी सोमवारी आईचा अंत्यविधी आटोपून तत्काळ दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चिखले प्राथमिक केंद्र शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 87 गाठून गजानन आगरी(57), उत्तम आगरी(49) दोन मुलं तसेच शकुंतला कोंढारी(51) आणि मंजू आगरी(64) या दोन मुलींनी येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक सर्वचस्तरातून होत आहे.
04:39 PM
कुर्ला बुद्धनगर येथे एका तरुण मतदारांने घेतली रामदास आठवले यांची भेट
मुंबई - कुर्ला बुद्धनगर येथे एका तरुण मतदारांने रामदास आठवले यांची भेट घेतली. आठवले यांनी विचारले तू कोणाचा फॅन आहे तो म्हणाला मी तुमचा फॅन आहे.
04:37 PM
प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी बजावल मतदानाचा हक्क
मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी आज दुपारी गोरेगाव पूर्व,नागरी निवारा शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला
04:35 PM
मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथे नवविवाहित दाम्पत्याने केले मतदान
मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथे नवविवाहित दाम्पत्याने विवाहानंतर केले मतदान
04:23 PM
नरेंद्र मोदींना कांदाविक्रीतून मिळालेल्या पैशाची मनिऑर्डर पाठवणारे शेतकरी संजय साठे यांनी केले मतदान
नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा विक्रीतून आलेल्या पैशांची मनिऑर्डर करणारे नैताळे, दिंडोरी लोकसभा मतदार संघातील (जि. नाशिक) शेतकरी संजय साठे यांनी आज सहकुटुंब मतदान केले
04:20 PM
शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागात अत्यन्त उत्स्फूर्तपणे मतदार बाहेर पडत आहे, मात्र शहरी भागात मतदारांमध्ये निरुत्साह दिसत आहे.
04:18 PM
ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 36.07 टक्के मतदान
ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 36.07 टक्के मतदान
04:17 PM
कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ 33.07 टक्के मतदान
ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ 33.07 टक्के मतदान
04:17 PM
भिवंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 39.35 टक्के मतदान
ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 39.35 टक्के मतदान
04:15 PM
पालघर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत सुमारे 46.44 टक्के मतदान
पालघर - पालघर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 46.44 टक्के मतदान झाले आहे
04:11 PM
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.03 टक्के मतदान
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.03 टक्के मतदान, पाहा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
03:53 PM
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी सावरपाडा येथे केले मतदान
नाशिक : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील मतदान केंद्रावर मतदान केले
03:47 PM
शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 46.59 % मतदान
अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 46.59 % मतदान झाले आहे
03:45 PM
वांद्रे पूर्व मध्ये मतदारांचा निरुत्साह, कडक उन्हामुऴे मतदान केंद्रांमध्ये तुरळक गर्दी
मुंबई - वांद्रे पूर्व मध्ये मतदारांचा निरुत्साह, तडक उन्हामुऴे मतदान केंद्रांमध्ये तुरळक गर्दी
03:38 PM
शिर्डी मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान
अहमदनगर - शिर्डी मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान
03:33 PM
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 49.39 टक्के मतदान
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 49.39 टक्के मतदान
03:05 PM
नागापूरला प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांनी साजरा केला लोकशाहीचा उत्सव
मनमाड (नाशिक)-: येथून जवळच असलेल्या नागापूर ता: नांदगाव येथे प्रथमच मतदान करणाऱ्या तब्बल 40 युवकांनी ढोल ताशाच्या गजरात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागापूर प्राथमिक शाळेच्या या माजी विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती केली.गावच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत निघालेल्या या जनजागृती रॅली चे ग्रामस्थांनी स्वागत केले.गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली.
03:04 PM
मुलुंड पूर्वेकडील पुरंदरे स्कूलमधील १४९ येथील केंद्रात ईव्हीएम मशीनमध्येही भाजपच्या चिन्हासमोर शाई
मुंबई - मुलुंड पूर्वेकडील पुरंदरे स्कूलमधील १४९ येथील केंद्रात ईव्हीएम मशीनमध्येही भाजपच्या चिन्हासमोर शाई, मतदान थांबवले
02:47 PM
राज्यातील १७ मतदारसंघातून ईव्हीएमसंदर्भात तक्रारी
मुंबई - राज्यातील १७ मतदारसंघातून ईव्हीएमसंदर्भात एकूण ३० तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी धुळे, नंदूरबार मतदार संघातून, ईव्हीएम बिघाड झाल्याच्या तक्रारी, निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी व संबंधित यंत्रणांकडे काँग्रेस पक्षाकडून तक्रारींची माहिती ई मेल करून देण्यात आली.
02:36 PM
नाशिकमधील काही मतदान केंद्रात मोबाईल फोनचा वापर
नाशिक - नाशिकमधील मतदान केंद्रात मोबाईल फोनचा वापर करत मतदाराने मतदान करताना केले शूटिंग, निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित मतदाराला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, वाडीव्हरे गावातील घटना
02:33 PM
धुळे शहरातील श्री संस्कार अनाथ मुलींच्या बालगृहातील तरुणींनी पहिल्यांदाच केले मतदान
धुळे - शहरातील श्री संस्कार अनाथ मुलींचे बालगृह येथील मुलींनी आज पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला
02:30 PM
पालघर लोकसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 35.52 टक्के मतदान
पालघर - पालघर लोकसभा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 35.52 टक्के मतदान झाले आहे.
02:28 PM
नाशिक शहर व परिसरात कर्मचाऱ्यांनी काही मतदान केंद्रावर घेतला लंच ब्रेक
नाशिक : शहर व परिसरात कर्मचाऱ्यांनी काही मतदान केंद्रावर लंच ब्रेक घेत 20 ते 30 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद केल्याचा प्रकार.
02:26 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पंचम कलानी व ओमी कलानी यांनी बजावला मतदानाचा हक्क
उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका महापौर पंचम कलानी व ओमी कलानी यांनी केले मतदान
02:06 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पंचम कलानी व ओमी कलानी यांनी बजावला मतदानाचा हक्क
उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका महापौर पंचम कलानी व ओमी कलानी यांनी केले मतदान
01:56 PM
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहकुुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Mumbai: Sachin Tendulkar, his wife Anjali Tendulkar, daughter Sara Tendulkar, and son Arjun Tendulkar after casting their vote at polling center number 203 in Bandra. Sara Tendulkar and Arjun Tendulkar are first time voters. #LokSabhaElections2019pic.twitter.com/0dNVhNR8mg
— ANI (@ANI) April 29, 2019
01:47 PM
अभिनेता सलमान खान याने मुंबईतील वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क
Maharashtra: Actor Salman Khan casts his vote at polling booth number 283 in Bandra, Mumbai. #LokSabhaElections2019pic.twitter.com/dg7TvYsyQL
— ANI (@ANI) April 29, 2019
01:46 PM
अभिनेत्री करिना कपूर हिने मुंबईत बजावला मतदानाचा हक्क
Mumbai: Kareena Kapoor Khan casts her vote in the fourth phase of #LokSabhaElections2019pic.twitter.com/xT0scKGigI
— ANI (@ANI) April 29, 2019
01:44 PM
नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क
नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क
01:43 PM
धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 29.75% मतदान
धुळे - धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 29.75% मतदान झाले आहे
01:42 PM
शिरूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 24 टक्के मतदान
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 24 टक्के मतदान झाले. शिरूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 30.10 टक्के तर खेड़ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 18.35 टक्के मतदान झाले आहे.
01:41 PM
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २८ % मतदान
मुंबई - उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २८ % मतदान
01:40 PM
शिर्डी लोकसभा मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत३१.५६ % मतदान
अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत३१.५६ % मतदान
01:38 PM
नगरमधील श्रीरामपूर येथे तृतियपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकासमोरील 103 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 42 तृतीपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
01:36 PM
मुख्य सचिव यूपीएस मदान यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
मुख्य सचिव यूपीएस मदान यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
01:35 PM
साक्री तालुक्यातील चारणकुडी येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
धुळे - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात साक्री तालुक्यातील चारणकुडी येथील ग्रामस्थांनी गावाचा पेसा मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
01:30 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार
01:14 PM
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार
Maharashtra: Shiv Sena Chief Uddhav Thackeray, his wife Rashmi Thackeray and son Aditya Thackeray after casting their vote at a polling booth in Gandhi Nagar, Mumbai. Poonam Mahajan BJP's candidate from Mumbai North Central LS seat also present. #LokSabhaElections2019pic.twitter.com/vgsQjca0a1
— ANI (@ANI) April 29, 2019
01:13 PM
नंदुरबार- उमरदा, ता. नवापूर येथे मतदान केंद्रात अंधार पडत असल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात मतदार याद्या पहाव्या लागत आहे..
01:04 PM
नाशिकमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी 17.52% इतके मतदान
01:01 PM
नंदुरबार- काँग्रेस उमेदवार ऍड. के.सी. पाडवी यांनी मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केले.
12:45 PM
चित्रपट निर्माता मधुर भांडारकर आणि त्याची पत्नी रेणू यांनी बजावला मतदानाचा अधिकार
Mumbai: Filmmaker Madhur Bhandarkar and his wife Renu Namboodiri after casting their vote at polling booth number 167 at M.M.K. College in Bandra. #LokSabhaElections2019pic.twitter.com/H8189p5exf
— ANI (@ANI) April 29, 2019
12:35 PM
ठाण्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. पण ईवीएम यंत्रणा अत्यंत सथ गतीने सुरू असल्याच्या मतदारांच्या तक्रारी
12:15 PM
ठाणे जिल्ह्यातील सकाळी 11वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
23 भिवंडी
134 भिवंडी ग्रामिण-16.18
135 शहापूर-12
136 भिवंडी पश्चिम-12.7
137 भिवंडी पूर्व-13.75
138 कल्याण पश्चिम-13.75
139 मुरबाड-15.5
एकूण सरासरी -14.09
24 कल्याण
140 अंबरनाथ-7.53
141 उल्हासनगर-4.78
142 कल्याण ग्रामिण-6.56
143 डोंबिवली-6.62
144 कल्याण ग़्रामिण -7.08
149 मुंब्रा कळवा-5.36
*एकूण सरासरी-6.42
25 ठाणे
145 मिरा भाईंदर-12.65
146 ओवळा माजीवाडा-12.8
147 कोपरी पाचपाखडी-13.4
148 ठाणे-13.95
150 ऐरोली-11.8
151 बेलापूर-13.45
एकूण सरासरी-12.94
12:08 PM
ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
11:59 AM
पालघर मतदारसंघ 11 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 20.22 टक्के मतदान झाले आहे.
11:43 AM
धुळे मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 17.75टक्के मतदान
11:42 AM
नाशिक लोकसभा मतदारसंघात 14 तर दिंडोरीत 18 टक्के मतदान (सकाळी 11 वाजेपर्यंत)
11:41 AM
नंदुरबार- 11 वाजेपर्यंत 21.32 टक्के मतदान
11:41 AM
मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 मतदानाची टक्केवारी
30- मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 11.00 % मतदान
31- मुंबई दक्षिण मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 15.60 % मतदान
11:38 AM
आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
रविवारी रात्रभर नालासोपाऱ्यात राडा, 1500 कार्यकर्ते रस्त्यावर, पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात, आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, 64 हजारांसह गाडी केली पोलिसांनी जप्त, बविआच्या महापौरांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा दाखल तर शिवसेनेच्या आमदार, उपजिल्हाप्रमुख 5 पदाधिकाऱ्यांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
11:35 AM
शिर्डी लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 18.68% मतदान
11:32 AM
लोणी येथे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा ना. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजयदादा विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील, आणासाहेब म्हस्के पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला
11:25 AM
पुणे भाजप अध्यक्ष आमदार बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची मतदान केंद्रावर एकत्रित भेट
11:18 AM
धुळे- भाजपाचे बंडखोर उमेदवार अनिल गोटे यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजाविला
11:17 AM
माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब बजावला निरगुडसर येथे मतदानाचा हक्क, समवेत पत्नी किरण वळसे पाटील व मुलगी पूर्वा वळसे पाटील
10:42 AM
राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
10:38 AM
शिर्डीत माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि सरपंच हेमलता पिचड यांनी सकाळी आठ वाजता मतदान केले.
10:10 AM
अभिनेत्री माधुरी दीक्षितनं जुहूमध्ये केलं मतदान
#Mumbai: Actor Madhuri Dixit casts her vote at a polling booth in Juhu. #LokSabhaElections2019pic.twitter.com/6OraiSkWVZ
— ANI (@ANI) April 29, 2019
10:08 AM
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी सपत्नीक वर्सोवा, चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदान केले.
10:04 AM
मुंबईतल्या ताडदेवमध्ये शरद पवारांनी केलं मतदान
#Mumbai: NCP Chief Sharad Pawar after casting his vote at polling booth 31 in Tardeo. #LokSabhaElections2019pic.twitter.com/G8VNrNwESd
— ANI (@ANI) April 29, 2019
09:58 AM
महाराष्ट्रातील 17 मतदारसंघातील सकाळी 9 वाजेपर्यंतची टक्केवारी
09:57 AM
महाराष्ट्रातल्या 17 जागांवर आतापर्यंत 6.82 टक्के मतदान
Polling percentage recorded till 9 am in #Phase4 of #LokSabhaElections2019 : 6.82% in Maharashtra (17 seats), 11.11% in Madhya Pradesh (6 seats) and 9% in Odisha (6) and 16.90% in West Bengal (8 seats) pic.twitter.com/aIcQ8pfDxZ
— ANI (@ANI) April 29, 2019
09:48 AM
मुंबईसह महाराष्ट्रातील 17 मतदारसंघातील सकाळी 9 वाजेपर्यंतचे मतदान
नंदुरबार-7.13 धुळे- 6.07 दिंडोरी-5.69 नाशिक-5.21 पालघर-7.21 भिवंडी-5.92 कल्याण-4.28 ठाणे-5.98 मावळ-5.69 शिरुर-6.33 शिर्डी-7.43%, मुंबईतील सहा मतदारसंघातील उत्तर मुंबई- 4.44 % वायव्य मुंबई- 6.19, ईशान्य मुंबई- 4.28, उत्तर मध्य मुंबई- 5.51, दक्षिण मध्य मुंबई-6.44, दक्षिण मुंबई- 5.89 मतदानाची नोंद झाली आहे.
09:38 AM
नाशिकमध्ये पहिल्या 2 तासांत 9 ते 10 टक्क्यांपर्यंत मतदान
09:37 AM
मुंबई शहर जिल्हा सकाळी सात ते नऊ मतदानाची टक्केवारी
30- मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात 6.77 टक्के मतदान, 31- मुंबई दक्षिण मतदारसंघात 5.55 टक्के मतदान
09:19 AM
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनी सकाळी 8.30 च्या सुमारास मानखुर्द येथे बजावला मतदानाचा हक्क
09:18 AM
भाजप उमेदवार खासदार डाॅ. हिना गावीत यांनी नंदुरबार मतदान केंद्रावर मतदान केले.
09:15 AM
Lok Sabha Election 2019 : नाशिकमध्ये मतदारांचा उत्साह; मतदार चिठ्ठी व याद्यांमध्ये घोळhttps://t.co/DIuiahR6AZ#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2019
08:56 AM
मुंबईतल्या मालाड पश्चिमेला ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ
#LokSabhaElections2019 : Voting is yet to begin at booth number 162 of Malad West in Mumbai after a glitch in EVM was detected. #Maharashtra
— ANI (@ANI) April 29, 2019
08:47 AM
मुलुंड पूर्वेकडील लक्ष्मीबाई स्कूल येथील केंद्रात वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले..
08:38 AM
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रांगेत उभे राहून आपल्या कुटुंबासह जिमखाना येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
08:30 AM
मुलुंड पूर्वेकडील आयआयटी येथील सखी केंद्रात महिला मतदारांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप pic.twitter.com/QpGcB4boeQ
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2019
08:25 AM
शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुटुंबीयांनी केलं मतदान
08:18 AM
भाजपाचे विद्यमान खासदार परेश रावल यांनी विलेपार्लेत सपत्नीक केले मतदान
#Mumbai : BJP sitting MP Paresh Rawal & his wife Swaroop Sampat cast their vote at polling booth number 250-256 at Jamna Bai School in Vile Parle. pic.twitter.com/V4iXvzhD9D
— ANI (@ANI) April 29, 2019
08:16 AM
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय खजिनदार आमदार हेमंत टकले व आशा टकले यांनी मतदानाचा हक्क बजावला
08:13 AM
अनिल अंबानींनी बजावला मतदानाचा अधिकार
08:13 AM
कल्याण : भारती आणि सुरेश येवले या दाम्पत्याने गावी (जळगाव) येथे जाण्याआधी आपला मतदानाचा हक्क बजावला....
08:09 AM
आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पेडर रोड येथे केलं मतदान
#Mumbai: Reserve Bank of India (RBI) Governor Shaktikanta Das casts his vote at polling booth number 40 & 41 at Peddar Road. #LokSabhaElections2019pic.twitter.com/i2TFjtuJxP
— ANI (@ANI) April 29, 2019
08:06 AM
कोपरखैरणे येथे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले मतदान
07:56 AM
नंदुरबार- मतदार संघात सात ठिकाणी सखी मतदान केंद्र व सेल्फी पाॅईन्टस तयार करण्यात आले आहेत. सेल्फी पाॅईन्टस वर सेल्फी घेण्यासाठी मतदारांची गर्दी होत आहे.
07:55 AM
कल्याण पश्चिमेतील शारदा मंदिर शाळेत सकाळीच मतदान करण्यासाठी मोठी गर्दी, मतदारांसाठी अंथरण्यात आल्या आहेत फुलांच्या पायघड्या...
07:52 AM
नवी मुंबईत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सपत्नीक केले मतदान
07:47 AM
कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील सपत्नीक मतदान करण्यासाठी रवाना, तत्पूर्वी त्यांनी घेतले खिडकाळी मंदिरात जाऊन खिडकाळेश्वराचे दर्शन
07:43 AM
शिर्डीतल्या साईनगरीत भल्या सकाळी नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. साईनाथ हायस्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक 52 मधील यंत्रात बिघाड झाल्याने अद्याप या केंद्रावर मतदान सुरू झालेले नाही,
07:35 AM
भाजपाच्या खासदार आणि उमेदवार पूनम महाजनांनी बजावला मतदानाचा अधिकार
#Mumbai: BJP MP Candidate from Mumbai North Central, Poonam Mahajan casts her vote at polling booth number 48 in Worli. pic.twitter.com/muecE30tIC
— ANI (@ANI) April 29, 2019