Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत किंवा ते खोटे बोलतात, नाहीतर दोन्ही करतात - फडणवीस
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:01 PM2024-04-11T17:01:30+5:302024-05-18T09:40:50+5:30
Maharashtra Lok Sabha elections 2024: Seats, schedule Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडेल. या सर्व घडामोडींचे अपडेट्स...
Maharashtra 48 constituency 2024 Lok Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. गेल्या दोन वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राज्याचा कौल महायुतीला मिळेल की महाआघाडीला, हे सांगणं कठीण झालंय. त्यामुळे दोन्हीकडून जोरदार प्रचार, हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत.
LIVE
19 May, 24 : 01:33 PM
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी महाराष्ट्रात १३ मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यांची आपआपसात चर्चा झाली असे शरद पवारांनी म्हटल्यांचे माध्यमांनी म्हटलं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना धक्कादायक खुलासा केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोध होता असा दावा संजय राऊत यांनी केला.
19 May, 24 : 01:32 PM
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस
ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. येथे १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली आहे. त्यामुळे आताची निवडणूक ही करो या मरोची आहे. हा मतदारसंघ जिंकून बालेकिल्ला राखा, मी स्वत: गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
18 May, 24 : 11:20 AM
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध
मुलुंड कथित पैसे वाटप प्रकरण - सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा #MihirKotecha #UddhavThacekray #Shivsena #Loksabha
18 May, 24 : 09:40 AM
उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत किंवा ते खोटे बोलतात, नाहीतर दोन्ही करतात - फडणवीस
उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत किंवा ते खोटे बोलतात, नाहीतर दोन्ही करतात अशी मला शंका आहे. कारण उद्धव ठाकरे आणि मी युतीच्या बोलणी करताना सगळी चर्चा झाल्यानंतर आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद हवं असं ते बोलले. त्यावर हा माझा निर्णय नसेल, वरिष्ठ जे ठरवतील ते मला मान्य असेल हे मी सांगितले. त्यानंतर मी त्यांना कळवलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. रात्री १ वाजता मी अमित शाहांना फोन लावला. त्यांच्या कानावर हे घातले तेव्हा माझ्याशी बोलणं झालेलं नाही. आपण हे देऊ शकत नाहीत. तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि आणखी काही मंत्रिपदे वाढवून हवी असतील तर ते देऊ पण मुख्यमंत्रिपद देता येणार नाही. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना बोललो, माझ्या पक्षाला हे मान्य नाही. आम्ही तुम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊ शकणार नाही असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.
18 May, 24 : 09:06 AM
भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर करते - अंबादास दानवे
मुलुंडमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये झालेल्या राड्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सचिन अहिर, सुनील राऊत यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन सदर घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. भारतीय जनता पार्टी निवडणुकीत पैशाचा वापर करते, शिवसैनिकांनी कोट्यवधी रुपये पकडले आहेत, परंतु ज्यांनी हे पैसे पकडले त्यांच्यावरच कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे पोलीस आणि निवडणूक आयोग हे योग्य कार्यवाही करत आहेत. राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी येऊन गेले याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये वाटले जात आहेत आणि दुर्दैव असे नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील याच मतदारसंघात झाला. रोड शो ने देखील हे लोक जिंकू शकत नाही म्हणून अशाप्रकारे पैसे वाटले जात असल्याचा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला.
18 May, 24 : 08:56 AM
मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर कोटेचा यांनी तुमचे काळे धंदे बंद करणार, असा इशारा दिला आहे. याचे पडसाद आजही उमटण्याची चिन्हे असून महायुतीची सभा संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोटेचा यांच्या कार्यालयाकडे धाव घेत भेट दिली आहे.
17 May, 24 : 08:58 PM
नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
शिवतीर्थावरील सभा आटोपल्यावर नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन
17 May, 24 : 08:44 PM
बाळासाहेबांच्या मुलाला नकली म्हणता, तुमची असलीयत काढावी लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा
बाळासाहेबांच्या मुलाला नकली म्हणता, तुमची असलीयत काढावी लागेल, आम्हाला सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण? उद्धव ठाकरेंचा सवाल
17 May, 24 : 08:34 PM
मोदीकडे १० वर्षांचं रिपोर्ट कार्ड आणि पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅपही आहे - नरेंद्र मोदी
मोदीकडे १० वर्षांचं रिपोर्ट कार्ड आणि पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅपही आहे, दुसरीकडे जितके लोक तितकी मतं आणि जितके लोक तेवढे पंतप्रधान अशी परिस्थिती आहे, नरेंद्र मोदी यांची टीका
17 May, 24 : 08:31 PM
१० वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले - नरेंद्र मोदी
१० वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले, नरेंद्र मोदी यांचा दावा
17 May, 24 : 08:13 PM
मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी, शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी, शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
17 May, 24 : 08:12 PM
...तर देश पाच दशकं पुढे असता - नरेंद्र मोदी
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस भंग केला असता तर देश पाच दशकं पुढे असता, काँग्रेसनं पाच दशकं वाया घालवली, नरेंद्र मोदी यांची टीका
17 May, 24 : 08:08 PM
मुंबईतील बीकेसी येथे होणाऱ्या सभेसाठी उद्धव ठाकरे यांचं आगमन
मुंबईतील बीकेसी येथे होणाऱ्या सभेसाठी उद्धव ठाकरे यांचं आगमन
17 May, 24 : 08:06 PM
संविधानाला धक्का लागणार नाही हे खडसावून सांगा, राज ठाकरेंचं मोदींना आवाहन
संविधानाला धक्का लागणार नाही हे खडसावून सांगा, राज ठाकरेंचं मोदींना आवाहन
17 May, 24 : 07:46 PM
नरेंद्र मोदींचे शिवाजी पार्क येथील सभास्थळी आगमन
नरेंद्र मोदींचे शिवाजी पार्क येथील सभास्थळी आगमन, उपस्थितांनी अभिवादन करून केलं स्वागत
17 May, 24 : 07:44 PM
बाळासाहेब म्हणायचे 'मोदी गया, तो गुजरात गया', ते आज असते तर म्हणाले असते 'मोदी गया तो देश गया'
बाळासाहेब म्हणायचे 'मोदी गया, तो गुजरात गया', ते आज असते तर म्हणाले असते 'मोदी गया तो देश गया', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे गटाला टोला
17 May, 24 : 07:38 PM
उबाठा काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन नाचताहेत, एकनाथ शिंदे यांची बोचरी टीका
उबाठा काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन नाचताहेत, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण उबाठा त्याच गवतात लोळताहेत, एकनाथ शिंदे यांची बोचरी टीका
17 May, 24 : 07:30 PM
पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांना केलं अभिवादन
पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांना केलं अभिवादन
17 May, 24 : 07:22 PM
देवेंद्र फडणवीस यांची शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंवर टीका
बाळासाहेब ठाकरे यांची आज आठवण येते असं सांगत बदललेल्या भाषेवरून देवेंद्र फणडवीस यांनी लगावला टोला
17 May, 24 : 07:16 PM
अजित पवार यांची विरोधी पक्षांवर टीका
आम्ही विकासाबाबत बोलतोय, मात्र विरोधकांकडून नको त्या विषयांचा उल्लेख केला जात आहे, अजित पवार यांची टीका
17 May, 24 : 07:08 PM
बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान धोक्यात नाही, तर महाविकास आघाडी धोक्यात - रामदास आठवले
बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान धोक्यात नाही, तर महाविकास आघाडी धोक्यात आहे, रामदास आठवले यांचं विधान
17 May, 24 : 06:59 PM
शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र
शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
17 May, 24 : 06:47 PM
मुंबईतील बीकेसी येथील मैदानात इंडिया आघाडीची सभा
मुंबईतील बीकेसी येथील मैदानात इंडिया आघाडीची सभा, कांग्रेसचे नेते रमेश चेन्निथला, विश्वजित कदम, नाना पटोले सभास्थळी दाखल
17 May, 24 : 06:38 PM
नरेंद्र मोदींचं मुंबईत आगमन, थोड्याच वेळात शिवतीर्थावर दाखल होणार
शिवतीर्थावर होणाऱ्या सभेपूर्वी नरेंद्र मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देणार
17 May, 24 : 02:40 PM
शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी असे आमचे म्हणणे आहे, मात्र त्यांचे भक्तगण ऐकायला तयार नाही- गिरीश महाजन
प्रचाराला शेवटचे दोन दिवस बाकी राहिली आहे त्या पार्श्वभूमीवर भुजबळांची भेट घेतली. भुजबळ नाराज आहेत या चर्चा निरर्थक. निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्या आहेत. मतदार संघातील अनेकांना फोन करून नियोजन केले. त्यामुळे बैठक जास्त वेळ सुरू होती. भुजबळ आज गडकरींच्या सभेला उपस्थित राहतील. शंतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी अस आमचं म्हणणं मात्र त्यांचे भक्तगण ऐकायला तयार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
17 May, 24 : 02:16 PM
राऊत उत्तर महाराष्ट्रातील संपर्क प्रमुख त्याच्या परवानगीने निर्णय व्हायचे - दादा भुसे
सकाळी एक भोंगा येतो, राज्यातील नागरिकांची दिशाभूल करतो. नाशिकच्या भूसंपादनाचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ते उत्तर महाराष्ट्रातील संपर्क प्रमुख त्यांच्या परवानगीने निर्णय व्हायचे. आम्ही बोललो तर दहा विषय बोलू शकतो, त्यानंतर तोंड दाखवायला जागा नसेल, दादा भुसेंनी दिला संजय राऊतांना इशारा.
17 May, 24 : 01:57 PM
आम्हाला संपणारे बोलणारे ४ जूननंतर स्वत:चं संपणार आहेत. - संदीप देशपांडे
आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना या सभेची उत्सुकता आहे. दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. केवळ राज्यातील नव्हे देशातील जनतेचे लक्ष या सभेवर असेल. सगळ्यांसारखी आम्हालाही उत्सुकता आहे. आम्हाला संपणारे बोलणारे ४ जूननंतर स्वत:चं संपणार आहेत. - संदीप देशपांडे
17 May, 24 : 01:55 PM
आजच्या महायुतीच्या सभेने मुंबई शहरात काही फरक पडणार नाही - विनोद घोसाळकर
मोदींच्या सभेमुळे मुंबई शहरात काही फरक पडेल असे, मला वाटत नाही. महाराष्ट्र हा दिल्ली समोर कधी झुकत नाही. ते आता घाबरलेले आहेत. त्यांनी जो ४०० पार चा नारा दिलेला आहे तो पूर्ण होणार नाही. पैसे देऊन लोकांना बोलावता येते. महायुतीच्या सभेने काहीही होणार नाही, असे विनोद घोसाळकर म्हणाले.
17 May, 24 : 12:14 PM
मोदी यापुढे पंतप्रधान राहणार नाहीत - जयंत पाटील
४ जूनला निकाल आल्यानंतर महायुतीत पळापळ सुरू होईल. महाराष्ट्राचा काय निकाल येतो यानंतर जनता कौल ठरवेल. भारतीय जनता पक्षाला दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही. जेवढे पक्ष घेताय तेवढा जनाधार कमी होणार, असे जयंत पाटील म्हणाले.
17 May, 24 : 12:11 PM
सुनिल तटकरे शरद पवारांना भेटले? आमच्या संपर्कात असल्याचा अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
महाराष्ट्रात चमत्कार घटणार, 400 पारच्या घोषणा देणारे 200 पार सुद्धा होणार नाही असे देशात वातावरण आहे. संपूर्ण देशाला माहिती खरी शिवसेना कुणाची. सगळ्या जगाला माहिती राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली. अजित पवार 4 तारखेला नाराज होतील. जे पाऊल उचलले त्यानुसार तोंड दाखवायची जागा नाही राहिली. सुनिल तटकरे मला भेटले नाहीत. परंतु संपर्कात आहेत. पण त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.
17 May, 24 : 11:46 AM
मी केवळ एक शेतकरी म्हणून सभेला गेलो होतो - किरण सानप
रात्री उशिरा मला सोडण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझे फोन जप्त करून चौकशी केली. मी सभेत कुठेही शरद पवार यांच्या घोषणा दिल्या नाही. मी केवळ एक शेतकरी म्हणून सभेला गेलो होतो, असे मोदींच्या नाशिकमधील सभेत घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या तरुणाने सांगितले.
17 May, 24 : 11:07 AM
या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार - संजय राऊत
या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत. त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत. तीन-चार सुपारी ऑप इन पॉलिटिक्स बंद होणार आहे
- त्यातीलच एक हे दुकान आहे, असे संजय राऊत म्हणाले.
17 May, 24 : 11:04 AM
उद्धव ठाकरे, तुम्हाला काहीच वाटत नाही का, काँग्रेसने आमच्यावर केसेस टाकल्या - गुलाबराव पाटील
पंजाला मतदान देण्यासाठी चालले, पण त्यांच्या विरोधात बाळासाहेब यांनी अख्खे आयुष्य वेचले होते. उद्धव ठाकरे, तुम्हाला काहीच वाटत नाही का, काँग्रेसने आमच्यावर केसेस टाकल्या. त्यांच्या मतदान करणार का, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
17 May, 24 : 09:03 AM
घाटकोपरमध्ये होर्डिंगच्या बेकायदेशीर परवानग्या या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात - फडणवीस
ज्यादिवशी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून दुर्घटना घडली आणि निष्पाप लोकांचे जीव गेले तेव्हाच मी सांगितलं, या होर्डिंगचा मालक कुठल्याही बिळात लपला असेल त्याला माझे पोलीस शोधून काढतील. त्यांचा पदार्फाश झाला आहे. सगळ्या बेकायदेशीर परवानग्या या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दिल्या गेल्या. १४० बाय १२० चं होर्डिंग कुठलेही नियम नाहीत, थेट लावले, त्याला तुम्ही मुभा देता. सगळ्या मान्यता देता
17 May, 24 : 08:33 AM
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
17 May, 24 : 08:29 AM
डोंबिवलीमधून महायुतीला 90% मतदान होईल- श्रीकांत शिंदे
डोंबिवलीमधून महायुतीला 90% मतदान होईल. एवढ्या गर्दीमध्ये माझा विजय पक्का आहे. प्रत्येक नागरिक हा घरातून इमारतीमधून बाहेर पडत या रॅलीत सहभागी झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणालेत मला चिंताच नाही विजय आमचाच, असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला.
16 May, 24 : 10:39 PM
"खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला"; विशाल पाटलांचा दावा
चंद्रहार पाटील यांचा या निवडणुकीत बळी गेला, याचे दु:ख मला आहे. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूनेच त्यांचा घात केला आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
16 May, 24 : 08:59 PM
भाजपा जिंकणार हा सगळ्या जगाला विश्वास- पंतप्रधान मोदी
मी आणि माझे सहकारी भाजपासाठी काम करतच आहोत, पण आमचे विरोधकही काम करत आहेत. आम्ही निवडणूक जिंकणार आणि देशात भाजपचेच सरकार स्थापन होणार आहे. मला सप्टेंबर महिन्यातील बैठकीसाठी पुतीन यांचा फोन आलाय. G7 मध्ये सहभागी होण्यासाठी बोलावणे आले आहे. संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भारतात भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
16 May, 24 : 08:29 PM
महायुतीत आरोप-प्रत्यारोप! छगन भुजबळ-राज ठाकरे यांच्यात जुंपली...
महायुतीचे दोन नेते राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. "बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत कसे बसलात?" असा सवाल एका सभेतून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता. यावर भुजबळांनी उत्तर देताना म्हटले, "माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात. मी एक शिवसैनिक होतो. तुम्ही तर रक्ताचे आहात ना, तुम्ही का सोडून गेलात?"
16 May, 24 : 08:23 PM
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय! अखिलेश, राहुल यांच्याआधीच बैठक
काँग्रेसच्या गांधी-नेहरू घराण्याची परंपरागत जागा मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये पुन्हा एकदा गांधी कुटुंब एकत्र येणार आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी शुक्रवारी रायबरेलीमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करणार आहेत. या जाहीर सभेला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी सोनिया गांधी तेथे पोहोचल्या असून प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. तेथील कार्यकर्त्यांशी त्यांनी बैठक घेतली आहे.
16 May, 24 : 02:30 PM
नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी केली
नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी केली.
16 May, 24 : 01:34 PM
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजितदादा गैरहजर असल्याने विविध चर्चा सुरू आहेत. त्यात अजित पवारांची तब्येत खरचं ठीक नाही असं विधान शरद पवारांनी केले आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्या मते ते आजारी आहेत, त्यांची खरच तब्येत ठीक नाही असं पवारांनी अजितदादांच्या तब्येतीवर भाष्य केले. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारात कुठेही दिसत नसल्याने त्यांची अनुपस्थिती प्रखरतेने दिसून येत आहे. अजित पवार शिरूरच्या ११ मे च्या सभेत अखेरचे दिसले होते. मात्र त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.
16 May, 24 : 12:34 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे ते प्रचारसभांना उपस्थित राहत आहेत. नुकतेच एका सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवात केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर आता शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना दोन वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
ठाण्याचे शिवसेनचे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बोलताना शरद पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं.
16 May, 24 : 11:37 AM
"भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. "भाजपाने निवडणुकीत विजय मिळवला तर अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. भाजपा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन महिन्यांत त्यांच्या पदावरून हटवणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
16 May, 24 : 08:41 AM
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ईशान्य मुंबईतील रोड शोमध्ये सहभागी होत भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला. पंतप्रधान मोदी यांनी या रोड शो दरम्यान वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.
16 May, 24 : 08:40 AM
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा झाल्या, तर मुंबईतील घाटकोपरमध्ये त्यांनी रोड शो केला. नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांच्या तोंडातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल पाच गौरवपर वाक्ये वदवून घ्यावी, असे आव्हान मोदींनी कल्याणमधील सभेत दिले. तर नाशिकच्या सभेत त्यांनी कांदा आणि द्राक्ष पिकांच्या मुद्द्याला हात घालत ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार असल्याची घोषणा केली.
15 May, 24 : 03:29 PM
प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या सगळ्या वादंगानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल मागे घेत यापुढे काळजी घेऊ, असा शब्द शिवप्रेमींना दिला आहे. जिरेटोप वादावर आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ."
15 May, 24 : 01:57 PM
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला ३५० जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी केला आहे. असा मोठा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदाच केला आहे. साहा म्हणाले की, ४०० पार करण्याचा भाजपचा नारा पोकळ आहे. वास्तविक इंडिया आघाडीला ३५० जागा मिळतील आणि आम्ही नवीन सरकार स्थापन करू,असा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून परतणार नाहीत. इंडिया आघाडीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे, असंही आशीष कुमार साहा म्हणाले.
15 May, 24 : 01:40 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एक लाख लोक येतील : कपिल पाटील
-आजच्या सभेसाठी एक लाख लोक येतील. मोदींनी दिलेला संदेश हा गावागावापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम जनता करेल. या सभेची हॅट्रिक, माझी आणि श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक आहे तसेच नरेंद्र मोदींची पण हॅट्रिक होणार आहे. २० मे दिवशी जनता आम्हाला बहुमताने निवडून देतील, असंही कपील पाटील म्हणाले.
15 May, 24 : 12:50 PM
"जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लखनौमध्ये सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्षांनी असं म्हटलं आहे.
15 May, 24 : 11:57 AM
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी सभेत मोठं विधान केलं आहे. "भाजपला ४०० जागा मिळाल्यास वाराणसीमध्ये ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी मंदिरे बांधली जातील, असं विधान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे. यावेळी ४०० ओलांडली म्हणजे ज्ञानवापी येथील शिवालय, मथुरा येथील श्री कृष्ण मंदिर आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येईल, असंही ते म्हणाले.
15 May, 24 : 11:02 AM
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
भाजपा निवडणूक माफिया आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणं हे त्यांना महत्त्वाचे आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी कधी सांभाळणार, रोड शो करणं त्यांचे काम नाही. पराभवाची भीती असल्याने हे सुरू आहे. जिथे जिथे मोदी जातील तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार आहे. १ नव्हे ४ रोड शो करा, जिथे मोदी जातील तिथे आम्ही जिंकू हे सूत्र आहे असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.
15 May, 24 : 10:12 AM
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमध्ये कांदा निर्यात बंदी व कांद्याचे पडलेले दर लोकसभा निवडणुकीचे वातावरण फिरवण्याची शक्यता आहे. हे दोन कळीचे मुद्दे महायुतीची डोकेदुखी वाढवत असताना आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे. या सभेला शेतकरी आणि संघटना आंदेलन करण्याची शक्यता असल्याने तसेच सभेत गोंधळ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा लोकांवर लक्ष ठेवला आहे. यातूनच आज ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवले आहे.
15 May, 24 : 09:34 AM
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
मुंबईतील वाकोल्यात भाजपचा उमेदवार असूनही त्याच्या सभेनंतर शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडल्याने वातावरण तापले होते. मंगळवारी सायंकाळी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना गद्दार गद्दार म्हणत चिडविले. याठिकाणी भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांची सभा होती. या सभेनंतर हा राडा पहायला मिळाला आहे. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमविण्यात आला आहे.
15 May, 24 : 08:38 AM
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
पंतप्रधानांसोबत दिल्लीत वैयक्तिक बैठक झाली, त्यात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचं ठरलं होतं. आमदारांनीही भाजपासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु उद्धव ठाकरेंनी एकदा भाजपाला फसवलं, महायुतीला आणि राज्यातील जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं. त्यानंतर महाविकास आघाडीलाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
15 May, 24 : 08:13 AM
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; CM शिंदेंचा हल्लाबोल
भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. हे कारस्थान करताना माझाही कार्यक्रम करण्याचा विचार सुरू होता. पक्ष गेला शिवसैनिक गेले याबद्दल त्यांना काही घेणे देणे नव्हते, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.
भाजपच्या चार-पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची पूर्ण तयारी तेव्हा करण्यात आली होती. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. मला हे सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
15 May, 24 : 07:58 AM
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेकविध ठिकाणी रोड शो, रॅली करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दिंडोरी आणि कल्याण येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
14 May, 24 : 07:49 PM
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार हे त्यांची ती इच्छाही पूर्ण करणार होते, अशी माझी माहिती आहे - जयंत पाटील
14 May, 24 : 07:35 PM
कल्याण लोकसभेसाठी शिंदे व ठाकरे यांचा समझोता होऊन त्यांची नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी झालेल्या दसरा मैदान येथील सभेत केला. तसेच राजन विचारे यांचे पाठींब्यासाठीचे कोणतेही पत्र आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
14 May, 24 : 07:08 PM
मोदींचे हात बळकट करण्यासाठी रवींद्र वायकर यांना मतदान करा - एकनाथ शिंदे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत, देशाच प्रगतीला मत, महासत्तेला मत आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण दिलेले मत हे मोदींना मिळणार आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी वायकर यांना मतदान करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
14 May, 24 : 06:37 PM
काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण - देवेंद्र फडणवीस
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जातीय ध्रुवीकरण पाहायला मिळालं. हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकला धक्का देणारं हे ध्रुवीकरण आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारची दुफळी निर्माण होणं, समाज एकमेकांसमोर येणं हे चांगलं नाही. अर्थात हे सर्वदूर झालं नसलं तरी तीन-चार मतदारसंघांमध्ये हे चित्र पाहायला मिळालं. मात्र ते योग्य नाही - देवेंद्र फडणवीस
14 May, 24 : 06:20 PM
मी मराठवाड्यातील ८ पैकी ७ मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या आहेत. फक्त मी बीड लोकसभा मतदारसंघात जाऊ शकलो नाही. मला बीडला जायचं होतं, मात्र त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा लागल्या. यातील एका सभेला मी गेल्यामुळे बीडमध्ये जाता आलं नाही. मराठवाड्यातील बीड वगळता इतर एका-एका मतदारसंघात मी ३ ते ४ सभा घेतल्या आहेत - देवेंद्र फडणवीस
14 May, 24 : 06:05 PM
मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल - मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचा कायदा द्यावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे, यासह अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच आमच्या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसेल असेही जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.
14 May, 24 : 05:10 PM
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप - रोहित पवार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह सत्ताधारी गटाच्या पक्षांकडून पैशाचे अमाप वाटप होत असून नेते, गुंड आणि मते विकत घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत २ हजार कोटी खर्च करत आहेत. तर गत अडीच वर्षांत राज्य शासनाने तब्बल २५ हजार कोटींचे घोटाळे केले असून आमची सत्ता आल्यानंतर त्या सगळ्या पैशांची चौकशी करण्यात येणार आहे. पैसे वाटपासाठी सत्ताधाऱ्यांनी हेलिकॉप्टरच नव्हे, वाय आणि झेड सिक्युरिटीतल्या गाड्या, टँकर्स तसेच ॲम्ब्युलन्सचादेखील वापर केला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
14 May, 24 : 04:39 PM
दिव्यांग मंत्रालयामुळे मुख्यमंत्र्यासोबत - आमदार बच्चू कडू
दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केल्याने, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपण पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचं सांगितलं.
14 May, 24 : 04:18 PM
उल्हासनगर : महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन स्वामी शांतीप्रकाश हॉलमध्ये केले होते. कार्यकर्ता मेळाव्याला पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
14 May, 24 : 03:42 PM
उदय सावंत यांची सभा
उल्हासनगर - ठाकरेसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठा सेक्शन येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उदय सामंत यांची जाहीर सभा झाली.
14 May, 24 : 03:17 PM
सर्वप्रथम राष्ट्र तसेच आपण ज्या राज्यात राहतो त्या महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत सामाजिक व राजकीय हीत कोण जपतं? याची जाणीव ठेवून मतदान केलं पाहिजे. कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचं कौतुक आजही समाजात होत असते. आमचे सरकार ज्या पद्धतीने पाडले व महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ घडवली व राजकीय अस्थिरता निर्माण कोणी निर्माण केली? याची जाणीव ठेवून आपण मतदान करावं - आदित्य ठाकरे
14 May, 24 : 03:06 PM
आदित्य ठाकरेंनी साधला समर्थनगर-लोखंडवाला परिसरातील नागरिकांशी संवाद
महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख,माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा सेलिब्रेशन क्लब येथे वर्सोवा लोखंडवाला येथे समर्थनगर- लोखंडवाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधला.
14 May, 24 : 02:47 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचार रॅलीत सहभागी होणार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. गुरुवारी १६ मे रोजी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून यावेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.
14 May, 24 : 02:11 PM
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे; मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत - राऊत
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजपा एकसंध आहे की नाही ते ४ जूनला कळणार आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. ते कुठून एवढ्या जागा आणणार आहेत? आम्ही महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा जिंकत आहोत. शिंदे, पवारांना एकही जागा मिळणार नाहीय, असा दावा संजय राऊत यांनी केला.
14 May, 24 : 12:42 PM
उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरु, राऊतांनी सांगितलेले - तटकरे
महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांची बैठक सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे असे त्या बैठकीत राऊतांनी सांगितलेले - सुनिल तटकरे
14 May, 24 : 12:29 PM
मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या ते भाजपासोबत - संजय राऊत
मुंबई महानगरपालिका ज्यांनी लुटली, मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या ते यशवंत जाधव, रवींद्र वायकर त्याआधी सरवणकर हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली. ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आहेत - संजय राऊत
14 May, 24 : 12:00 PM
पृथ्वीराज चव्हाण यांनी थोडा धीर धरायला काय हरकत आहे? - छगन भुजबळ
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेली आकडेवारी ही ज्योतिषा सारखी आहे. 4 जूनला किती वेळ राहिला आहे, थोडा धीर धरायला काय हरकत आहे? परिणाम व्हावा म्हणून अशी वक्तव्य होत असतील - छगन भुजबळ
14 May, 24 : 10:08 AM
शिंदे सरकारने नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला - संजय राऊत
नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे सरकारने नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी, ईडी,सीबीआय, एसीबीमार्फत चौकशी व्हावी आणि सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
14 May, 24 : 08:37 AM
शिंदेंचे नेतृत्व महाराष्ट्र सरकारमध्ये राहिल की नाही याचीच शाश्वती नाहीय - डी के शिवकुमार
लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंचे नेतृत्व महाराष्ट्र सरकारमध्ये राहिल की नाही याचीच शाश्वती नाहीय. त्यांनी यापूर्वी असे प्रयत्न केले आहेत, परंतु ते फेल झाले आहेत. यामुळे पुन्हा ते असा प्रयत्न करतील का? काँग्रेस इंडिया आघाडीद्वारे ही निवडणूक जिंकणार आहे आणि सत्तेत येणार आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी दिली.
13 May, 24 : 11:44 PM
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचे ठरवले असावे, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे, जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला.
13 May, 24 : 10:49 PM
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा
शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे, जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला.
13 May, 24 : 09:32 PM
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, बारामतीतील ईव्हीएम मशिन्स ज्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आले होते तेथील सीसीटीव्ही कॅमेरे ४५ मिनिटे बंद होते. सुळे यांच्या या आरोपावर निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले असून ते पुण्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केले.
"सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याच्या तक्रारीबाबत असे स्पष्ट केले जात आहे की भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व प्रोटोकॉलचे पालन केल जात आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, सर्व ईव्हीएम योग्यरित्या सीलबंद आणि त्यांची सील अबाधित आहेत. रिटर्निंग ऑफिसर स्ट्राँग रूमला नियमित भेट देतात. याशिवाय कार्यालयीन आदेशानुसार ARO आणि AARO ने भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्ट्राँग रूमला भेट दिली आहे. ईव्हीएम ठेवण्यामध्ये निष्काळजीपणा असल्याचा आरोप नाकारण्यात येत आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. केवळ डिस्प्ले युनिटवरील चित्र दिसू शकत नव्हते हे याद्वारे कळवण्यात येत आहे. सीसीटीव्हीचा डेटा अबाधित आहे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणताही व्यत्यय आलेला नाही. प्रोटोकॉलनुसार बॅकअपबाबत सर्व सूचना एजन्सीला देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून याची पडताळणी करण्यात आली आहे. स्ट्राँग रूम पाहण्याची सुविधा ही एक अतिरिक्त सुविधा आहे. सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये प्रोटोकॉलचे पालन केले जाते आणि त्यात तडजोड केली जात नाही. डिस्प्ले कार्यान्वित असताना आणि मशिन्स उतरवताना तक्रारदाराचे दोन प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सीसीटीव्ही शाबूत असल्याने आणि योग्य प्रोटोकॉल पाळले जात असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण कविता द्विवेदी यांच्या नावाने पोस्ट केलेल्या संदेशात देण्यात आले आहे."
- कविता द्विवेदी, IAS, निवडणूक निर्णय अधिकारी.
13 May, 24 : 07:35 PM
पंतप्रधान मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य - तटकरे
"राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे," असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
13 May, 24 : 07:31 PM
मावळमध्ये मतदारांचा उत्साह! कुणी शिकागो टू पिंपरी तर कुणी लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क
लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. वाघेरे-पाटील यांचा पुतण्या तर उद्योजक हनुमंत वाघेरे यांचा मुलगा कार्तिक शिकागो येथून मतदानासाठी पिंपरीत आला. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदा तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे पुत्र डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आई-वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान केले. डॉ. किरण लंडन येथून मतदानासाठी आले.
13 May, 24 : 07:19 PM
मतदान न करताच बोटाला लावली शाई, मतदान कमी करण्यासाठी नगरच्या मतदान केंद्रावर प्रयत्न
अहमदनगर येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना मतदान केंद्रात जाऊ न देता त्यांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार घडला. या प्रकारावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला. ज्यांच्या बोटाला शाई लावली त्या काही मतदारांना निलेश लंके यांनी पकडले. तसेच त्यांच्याकडे एक शाईची बाटली आढळून आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. नगर शहरातील या मतदान केंद्रावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
13 May, 24 : 07:12 PM
महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे वक्तव्य
महायुतीला अहंकार आहे, त्यांच्या राज्यात 45 प्लस जागा येतील अशी त्यांची मस्ती होती. इस बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला इस बार भाजप तडीपार असा नारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आणि तो आवाज देशात घुमला. महाराष्ट्रात 36 सभा मोदी आणि शाह घेतील, पण महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांनी काल रात्री मालाड पूर्व, कुरार येथे केले.
13 May, 24 : 07:07 PM
जोगेश्वरीत आदित्य ठाकरेंचा रोड शो
महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन उद्या दि,१४ मे रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.
13 May, 24 : 07:04 PM
पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये मतदारांची मतदानाकडे पाठ; तिन्ही मतदारसंघात पन्नास टक्क्यांच्या आत मतदान
आज पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. आजच्या मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसले. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये 46.03% मतदान झाले तर शिरूर मतदारसंघामध्ये 43.89% मतदान झाले आणि पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये 44.9% मतदान झाले. ही आकडेवारी सायंकाळी पाचपर्यंतची आहे.
13 May, 24 : 07:01 PM
दहिसरच्या १०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत यावेळी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला होता. 26- उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील 153- दहिसर मतदारसंघात आज गृहमतदान पार पडले. आयुष्याची शंभरी पार केलेल्या 104 वर्ष वयाच्या लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे आज गृहमतदानाचा हक्क बजावला.
13 May, 24 : 05:14 PM
वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क
वंचित कडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु असे असताना स्वतः वसंत मोरे यांना मात्र पुणे लोकसभेसाठी स्वतःला मतदान करता आले नाही. वसंत मोरे हे कात्रजला वास्तव्यास असल्याने शिरूर मतदार संघात त्यांचे मतदान असल्याने त्यांनी कृष्णाजी मोरे विद्यालयात शिरूर साठी मतदानाचा हक्क बजावला.
13 May, 24 : 05:09 PM
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट दिसत आहे का? असा प्रश्न आज शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान दिलीप वळसे पाटलांना विचारण्यात आला. त्यावर "सहानुभूतीची लाट असणार ना," असं उत्तर वळसे पाटलांनी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
13 May, 24 : 02:19 PM
दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
नंदुरबार -३७.३३
जळगाव-३१.७०
रावेर - ३२.०२
जालना - ३४.४२
औरंगाबाद - ३२.३७
मावळ -२७.१४
पुणे - २६.४८
शिरूर- २६.६२
अहमदनगर- २९.४५
शिर्डी -३०.४९
बीड - ३३.६५
13 May, 24 : 01:51 PM
केसीआर यांनी मतदान केले
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी सिद्धीपेट येथील त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपचा स्वतःचा नियम आहे की वयाच्या ७५ व्या वर्षी कोणीही पद भूषवू शकत नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा.
#WATCH | Former Telangana CM and BRS chief K Chandrashekar Rao casts his vote at a polling booth in Chintamadaka, Siddipet. #LokSabhaElections2024pic.twitter.com/cdgag3ALHr
— ANI (@ANI) May 13, 2024
13 May, 24 : 01:47 PM
तिसरा टप्प्यात ११ ते १ दरम्यान पुण्यात २६.४८ टक्के मतदान
तिसरा टप्प्यात ११ ते १ दरम्यान पुण्यात २६.४८ टक्के मतदान झाले.
पुणे - २६. ४८
शिरूर - २०. ८९
मावळ - २७. १४
13 May, 24 : 12:43 PM
नंदुरबार मतदारसंघात चार तासात २२.७५ टक्के मतदान
नंदुरबार : नंदुुरबार मतदारसंघात पहिल्या चार तासात सरासरी २२.७५ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. दरम्यान, भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावित, कॉंग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी, मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर सकाळी मतदान केले.
13 May, 24 : 11:55 AM
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील सकाळी ११ पर्यंतचे मतदान
नंदुरबार - २२.१२%
जळगाव- १६.८९%
रावेर - १९.०३%
जालना - २१.३५%
औरंगाबाद - १९.५३%
मावळ -१४.८७%
पुणे - १६.१६%
शिरूर- १४.५१%
अहमदनगर- १४.७४%
शिर्डी -१८.९१%
बीड - १६.६२%
13 May, 24 : 11:44 AM
जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघात सकाळी 7 ते 11 पर्यंत मतदान 16.89 टक्के झाले
जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघात सकाळी 7 ते 11 पर्यंत मतदान 16.89 टक्के झाले.
जळगाव -16.89 %
रावेर -19.03 %
13 May, 24 : 11:37 AM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर ती मतदानाचा हक्क बजावला. रोहिणी खडसे या मतदान केंद्रावर येत असता त्या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांची गाडी उभी होती रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांना हस्तांदोलन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या आणि मतदान केंद्रावरती जात पतीसह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
13 May, 24 : 11:35 AM
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकांची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनील विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर विरोधकांवर मुस्लिमांचा मुद्दा आणल्याचा आरोप केला. अमित शहा म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनीच निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला आहे. ते म्हणत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे आम्ही पीओकेबद्दल बोलू नये. अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का?, असा सवालही अमित शाह यांनी केला.
13 May, 24 : 10:40 AM
मलकापूर मतदार संघात पहिल्या दोन तासात ८.४ टक्के मतदान
मलकापूर: रावेर लोकसभेच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघात सकाळच्या पहिल्या दोन तासांच्या सत्रात ८.४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.वातावरण ढगाळ असल्याने मतदारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे येत्या दोन तासात मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
13 May, 24 : 10:26 AM
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.35% मतदान झाले
आंध्र प्रदेश 9.05%
बिहार 10.18%
जम्मू आणि काश्मीर 5.07%
झारखंड 11.78%
मध्य प्रदेश 14.97%
महाराष्ट्र ६.४५%
ओडिशा 9.23%
तेलंगणा 9.51%
उत्तर प्रदेश 11.67%
पश्चिम बंगाल 15.24%
#LokSabhaElections2024 | 10.35% voter turnout recorded till 9 am, in the fourth phase of elections.
— ANI (@ANI) May 13, 2024
Andhra Pradesh 9.05%
Bihar 10.18%
Jammu And Kashmir 5.07%
Jharkhand 11.78%
Madhya Pradesh 14.97%
Maharashtra 6.45%
Odisha 9.23%
Telangana 9.51%
Uttar Pradesh 11.67%
West Bengal… pic.twitter.com/tmtjV4Aluw
13 May, 24 : 10:07 AM
पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत ६.६१ टक्के मतदान
पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले, तर शिरूर लोकसभेत ४.९७ टक्के, मावळ लोकसभा मतदारसंघात ५.३८ टक्के मतदान झाले आहे.
13 May, 24 : 10:05 AM
जालना लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत ७.०४ टक्के मतदान
जालना लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत ७.०४ टक्के मतदान झाले. तर बीड लोकसभेत ८.१६ टक्के मतदान झाले आहे.
13 May, 24 : 09:49 AM
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर
"दर निवडणुकीला मतदानादिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी असंच का घडतं.पुरावा काहीच नसतो तरीही लोकांची दिशाभूल करायची. लोकांनी आता त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे. लोक त्यांना उत्तर देतील, असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना दिले.
13 May, 24 : 09:46 AM
जळगाव लोकसभा मतदार संघात ९ वाजेपर्यंत ६.१४ टक्के मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात ९ वाजेपर्यंत ६.१४ टक्के मतदान झाले तर रावेर लोकसभा मतदारसंघात ७.१४ टक्के मतदान झाले.
13 May, 24 : 09:40 AM
आमदार राम शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
आज महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. 37 अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ मधील श्री क्षेत्र चोंडी ता जामखेड येथे 229 बुथवर आमदार प्रा. राम शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी मतदान करावे आणि आपल्या देशाची लोकशाही समृद्ध व सुदृढ करावे असे आवाहन आमदार राम शिंदे यांनी जनतेला केले आहे.
13 May, 24 : 09:11 AM
मतदार यादीत दुसरेच आडनाव, मतदारांचा उडाला गोंधळ
अहमदनगर नगर शहरातील सावेडी उपनगरातील काही मतदारांची नावे मतदार यादीमध्ये चुकीची आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. आडनाव चुकीचे असल्यामुळे दोघा मतदारांना मतदान करता आले नाही. सावेडी उपनगरातील प्रफुल्ल भौरीलाल खंडेलवाल व त्यांच्या पत्नी या सावेडी उपनगरातील समर्थ विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आले होते.
13 May, 24 : 08:44 AM
महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
शिर्डी लोकसभेसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान पार पडते आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मागील दोन टर्म सदाशिव लोखंडे हे खासदार म्हणून शिर्डी लोकसभेच नेतृत्व करत आहेत. यंदा ते तिसऱ्यांदा देखिल महायुतीचे उमेदवार म्हणुन निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत असा विश्वास महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे .
13 May, 24 : 08:35 AM
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी बजावला मतदानाचा अधिकार
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आपल्या पारनेर तालुक्यातील हंगा या गावी मतदान केले आहे. जेव्हा जनतेने निवडणूक हाती घेतलेली असते तेव्हा परिवर्तन अटळ असते व जनतेच्या आशिर्वादाने मी निश्चित निवडून येईल अशी प्रतिक्रिया यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिली आहे.
13 May, 24 : 08:27 AM
नगरमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा
अहमदनगर: नगर शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. मतदार स्वतःहून येऊन मतदान करत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघामध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे नगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदारांनी हजेरी लावत मतदान केले.
13 May, 24 : 08:17 AM
मावळमध्ये मतदानाला शांततेत सुरवात; कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात सकाळी ७ वाजता शांततेत सुरवात झाली. सकाळी पहिल्यांदा येणाऱ्या मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सकाळच्या पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरीं आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले. तसेच महिला, युवा, दिव्यांग व विशेष मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह दिसून आला.
13 May, 24 : 08:08 AM
ओडिशात लोकसभेच्या ४ जागांसाठी मतदान सुरू
ओडिशातील लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 28 जागांसाठी सोमवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या लोकसभा जागांच्या अखत्यारीतील 28 विधानसभा मतदारसंघात तसेच बेरहामपूर, कोरापुट, नबरंगपूर आणि कालाहंडी लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.
13 May, 24 : 08:00 AM
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; दिग्गजांनी केले मतदान
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी लवकरच दिग्गजांनी मतदान केले आहे. अभिनेतील अल्लू अर्जुन, ज्यु.एनटीआरने यांनी मतदान केले.
13 May, 24 : 07:49 AM
जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी बजावला मतदानाचा हक्क
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आज त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर बु. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळीच सात वाजता गावात पाहिले मतदान करून आपला हक्क बजावला आहे.
13 May, 24 : 07:46 AM
रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात
रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.जवळपास 18 लाख मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील या दोघांमध्ये चुरस पहावयास मिळत आहे.
13 May, 24 : 12:30 AM
'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
राज ठाकरे म्हणाले, "आज कोण-कुणावर बोलतोय आणि कोण कुणावर आरोप करतंय, सगळं सोडून द्या. अरे, तुम्ही म्हणताना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच... मी खरे तर एकदाच बोललो होतो मागच्या सभांमध्ये, लाव रे तो व्हिडीओ, तेव्हा पासून सगळ्यांनी तेचं सुरु केलं. पण आता सांगतोय, लाव रे तो व्हिडीओ...," असे म्हणत राज यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ दाखवला. यानंतर, ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई... '70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यानंतर लटलटणारा हा हात', असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता? तुम्ही तुमच्या पक्षाचा नेता करता आणि तुमच्या वडलांवर प्रेम आहे म्हणून सांगता?" असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
12 May, 24 : 11:52 PM
याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगर सेवक फोडले होते ना?
फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं? आहो मागीतले असते तर दिले असते. पण काय आहे, त्याला म्हणतात ना ढेकनासंगे हीराही भंगला... बरोबर शरद पवार बसले आहेत."
12 May, 24 : 11:50 PM
"महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची जहरी टीका
फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवार यांनी सुरू केली. त्यांनी प्रथम काँग्रेस फोडले आणि नंतर पुलोद स्थापन केले. १९९१ साली याच पवारांनी भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली, त्यांचे आमदार फोडले. नारायण राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेनाना फोडली. या फोडाफोडीबाबत आजचे नेतृत्व याआधी टाहो फोडताना दिसत नव्हते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
12 May, 24 : 07:47 PM
औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणणे हेच आमचे व्हिजन आहे, डेव्हलपमेंट हाच आमचा मुद्दा आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीचा अजेंडा हा विकासाचा आहे. माझ एक प्रामाणित मत आहे, जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले होते, तेव्हा हिंदूत्व हिंदूत्व म्हणणारे शांत बसले होते. त्यांना सावरकर नको आहेत, त्यांना औरंगजेब चालतो हे दुर्देव महाराष्ट्राचे आहे . म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
12 May, 24 : 07:04 PM
पुणे हे गतीने विकसित होणारे शहर; महामार्ग बांधल्यावरच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी
पुणे ते संभाजीनगर अंतर दोन तासात पार करून पोहोचता येईल, असा पुणे - संभाजीनगर महामार्ग येत्या काळात लवकर तयार करण्यात येणार आहे, असे रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोलीतील सभेत सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून व दहा हजार कोटी रुपये खर्च करून पुणे ते शिरूर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बापू पठारे, संदीप सातव, शांताराम कटके, विजय जाचक, रामदास दाभाडे उपस्थित होते.
12 May, 24 : 08:16 AM
अजित पवारांचे नाव न घेता केजरीवालांची बोचरी टीका
जामीनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि म्हणतात मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे, असं केजरीवाल म्हणाले.
11 May, 24 : 10:12 PM
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे आता बावचळले आहेत. त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीनंतर दोघांनाही अज्ञातवासात जावं लागेल, अशी महाराष्ट्राची जनता त्यांची स्थिती करणार आहे.
11 May, 24 : 09:58 PM
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
पवार कुटुंबात फूट पाडून तुम्ही कालचक्र पूर्ण केलं आहे का, असा प्रश्न आज पुण्यातील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "आम्ही घर वगैरे फोडत नाही. आम्ही पवारसाहेबांचंही घर फोडलं नाही. मात्र संधी मिळाली तर ती संधीही आम्ही सोडत नाही आणि जे सोबत येतात त्यांना आम्ही सोबत घेतो. सोबत आला तर का आपण टाळायचं? शिवसेनेची ही परिस्थिती का आली तर ती फॅमिली फर्स्टमुळे आली आणि राष्ट्रवादीची ही परिस्थिती का आली तर फर्स्ट फॅमिली फर्स्ट या धोरणामुळे आली," असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.
11 May, 24 : 09:13 PM
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या 48 तास आधीच, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डीमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. चौथ्या टप्प्यात कुठे काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट), कुठे काँग्रेस आणि भाजप, तर कुठे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवार आमनेसामने असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
11 May, 24 : 03:28 PM
अजित पवारांचे नाव न घेता केजरीवालांची बोचरी टीका
जामीनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ज्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच पक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि म्हणतात मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे, असं केजरीवाल म्हणाले.
11 May, 24 : 03:11 PM
राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसले - संजय राऊत
काही नेते आणि काही पक्ष यांचा फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही. महाराष्ट्रात आणि देशात सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. त्याचवेळी राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील त्याची कल्पना न केलेली बरी, अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली.
11 May, 24 : 01:13 PM
मोदी स्टेजवर येऊन लहान मुलांसारखे रडतात - प्रियांका गांधी
नंदुरबार इथल्या सभेत बोलताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर टाकी केली. मोदी निवडणुकीच्या वेळी मंचावर येताच लहान मुलांसारखे रडायला लागतात. मला शिव्या दिल्या असे मोदी म्हणतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
11 May, 24 : 12:54 PM
मोदींनी पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवावं - उद्धव ठाकरे
निवडणुकीत पंतप्रधान हा काळजीवाहू असला पाहिजे, त्यांना जी सुविधा मिळते ती आम्हालाही मिळाली पाहिजे. मला जनतेपासून भीती नाही, मोदींनी पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवावे असं चॅलेंज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
11 May, 24 : 12:52 PM
आम्ही बांगड्या घालून बसलो नाही; नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
"या लोकांनी जर मंचावर येऊन दम देत असतील तर आम्ही काय बांगड्या घालून बसलेलो नाही. माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ओवेसींवर १०० टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी काही गुन्हा दाखल होण्याला घाबरणारी नाही. ज्या हिंदुस्तानमध्ये आम्ही राहत आहोत तिथे हे लोक आम्हाला उघडपणे धमकी देत आहेत. याच्यासाठी बोलावच लागेल," असं नवनीत राणा म्हणाल्या.
11 May, 24 : 12:50 PM
...म्हणून राज ठाकरे भाजपचा प्रचार करत आहेत - विजय वडेट्टीवार
"राज ठाकरे हे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या यादीत योग्य आहेत हे मराष्ट्राच्या जनतेला माहिती होतं. त्यामुळे मजबुरीने त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितले गेले की प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून राज ठाकरेंना प्रचार करावा लागतोय," अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली
11 May, 24 : 12:49 PM
राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसले - संजय राऊत
काही नेते आणि काही पक्ष यांचा फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही. महाराष्ट्रात आणि देशात सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. त्याचवेळी राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील त्याची कल्पना न केलेली बरी, अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली.
10 May, 24 : 07:19 PM
८५ वर्षांपुढील मतदारांसह दिव्यांगांकडून गृह मतदानास अल्प प्रतिसाद
ठाणे : यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यापैकी ८५ वर्षे व त्या पुढील जेष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या गृहमतदानाला गुरूवारपासून ठाण्यात सुरूवात झाली. या मतदारसंघात २७ हजार ३२५ जेष्ठ नागरिक मतदार आहे. पण त्यापैकी अवघ्या २६२ मतदारांनी गृहमतदानाला पसंती दिली आहे. तर एक हजार ९५२ दिव्यांगांपैकी फक्त ३८ मतदारांनी गृहमतदान केले आहे.
10 May, 24 : 06:28 PM
मतदान जनजागृतीसाठी केडीएमसीची भव्य बाईक रॅली
कल्याण : मागच्या लोकसभा निवडणूकीत कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी राज्यात खालून पहिली होती. मतदानाची
टक्केवारी वाढविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. आज कल्याणमध्ये काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती बाईक रॅली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड सहभागी झाल्या होत्या. बाईक चालविण्याचे काम शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी केले. तर त्यांच्या मागच्या सीटवर आयुक्त बसल्या होत्या.
10 May, 24 : 06:27 PM
शिंदेसेनेच्या प्रचाररथावर भाजपा व कलानी समर्थक भिडले
उल्हासनगर : प्रचार यात्रेतील रथावर खा श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्या उपस्थित भाजप व कलानी समर्थक भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. अखेर आमदार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आहे.
10 May, 24 : 05:14 PM
४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पद्धतीने सरमिसळ
ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या दोन हजार ४५३ मतदान केंद्रांवर मतदानासाठी वापरण्यात येणारे चार हजार ९०६ मतदान यंत्र म्हणजे बॅलेट युनिट प्रमाणेच कंट्रोल युनिट, व व्ही. व्ही पॅट मशीनची ऑनलाईन पद्धतीने सरमिसळ करण्यात आली.
10 May, 24 : 05:06 PM
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे एक जाहीर सभा झाली. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. राज्यात फोडाफोडीचे राजकारण करूनही महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता भाजपासोबत जात नसल्याचे दिसताच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिली. ही ऑफर म्हणजे भाजपा केंद्रात पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
10 May, 24 : 04:23 PM
भास्कर भगरेंचा प्रचार नरहरी झिरवाळ करतील, असे वाटत नाही - छगन भुजबळ
नाशिक : दिंडोरीतील महाआघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार नरहरी झिरवाळ करतील, असे वाटत नाही. त्यातही भगरे आणि झिरवाळ दोघेही दिंडोरीतील आहेत. भगरे हे पूर्वी आमच्यासोबत होते, त्यामुळे त्यांच्या भेटीतून वेगळा अर्थ काढू नये. माझ्याकडेही काही लोक येतात, शांतिगिरी महाराजही मला भेटून गेल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झिरवाळ यांच्या भगरे भेटीबाबत कोणतेही थेट विधान करणे टाळले.
10 May, 24 : 04:21 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला न्याय दिला - रवींद्र वायकर
मुंबई : माझ्यावरचे सर्व आरोप खोटे असताना मला ईडीची नोटीस आली. मी मधल्या काळात ईडीला सामोरे गेलो. उद्धव ठाकरे हे माझ्या मागे उभे राहिले नाही. एक तर जेल मध्ये जा, किंवा पक्ष सोडा हे दोनच पर्याय माझ्या समोर होते. मी टेन्शन -डिप्रेशनमध्ये होतो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू समजावून घेतली, मला पाठिंबा देत न्याय दिला. अडचणीच्या काळात ज्यांनी मला मदत केली. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला अशी स्पष्ट भूमिका मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
10 May, 24 : 03:48 PM
"निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
अहमदनगर: महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तू किस झाड की पत्ती है , असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याबाबत येथे केले. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पारनेर येथील बाजार तळावर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
10 May, 24 : 03:03 PM
पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच याच चिंतेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे. शरद पवारांची एनसीपी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणून टीका करता आणि ठाकरेंबद्दल ममत्व दाखवता आणि शरद पवारांना जाहीर ऑफर देता म्हणजे नरेंद्र मोदी यांनीच पराभवावर शिक्कामोर्तब केले, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
10 May, 24 : 01:05 PM
काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे.
10 May, 24 : 12:12 PM
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यादरम्यान, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांन केलेल्या दोन विधानांमुळे काँग्रेसची कोंडी झाली होती. त्यातच आता वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामुळे प्रचार ऐन रंगात आला असताना पुन्हा एकदा वाद ओढवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
10 May, 24 : 11:22 AM
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
तेलंगणातल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा उल्लेख केल्याने ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे माजी सदस्य सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासोबत भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. "ज्यांनी हल्ले करुन महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही याच मातीत गाडलं आहे. महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवलेला आहे. एवढं त्यांना मिरच्या झोंबायचे कारण काय? मग मोदींच्या बाजूला औरंगजेबाचे फोटो लावा. तुम्ही त्याच वृत्तीचे आहात," असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
10 May, 24 : 10:41 AM
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून महायुतीला धक्का देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी सहा मतदार संघात विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा कोणाला देणार याबाबत दुपारी ते पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. शांतिगिरी महाराज नाशिक मधून अपक्ष उमेदवारी करत आहेत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे यापूर्वी उमेदवारी मागितली होती मात्र ती न मिळाल्याने त्यांनी आधी शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे.
09 May, 24 : 12:08 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्ष लोकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन विधानं करत आहेत. याच दरम्यान देवास-शाजापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सभेला संबोधित केलं. "मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळणार पगार हा गरीब आणि गंगा मातेच्या सेवेसाठी समर्पित केला आहे" असं म्हटलं.
09 May, 24 : 11:20 AM
"हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या अमेठी आणि रायबरेलीच्या निवडणूक प्रचारात सतत व्यस्त असून त्यांच्या आक्रमक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुद्द्यांवर बोलत नाहीत असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. यावर आता अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी पलटवार करत आव्हान दिलं आहे. काँग्रेस स्वतः मुद्द्यांपासून दूर पळत आहे. कोणामध्ये किती हिंमत आहे हे तुम्हाला कळेल असं म्हटलं आहे.
08 May, 24 : 08:03 PM
लातुरात तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये मतदान यंत्रे जमा; सुरक्षा दलाची स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय कडे!
लातूर लोकसभेसाठी झालेल्या मतदानानंतर वोटिंग मशिन्स सुरक्षा बंदोबस्तात बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथील स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आली. या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षाकडे आहे. स्ट्राँगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून सुरक्षेचे तीन स्तर पुढीलप्रमाणे-
पहिला स्तर: केंद्रीय राखीव दल - १ तुकडी - (३० जवान)
दुसरा स्तर: राज्य राखीव दल - १ तुकडी - (३० जवान)
तिसरा स्तर: पोलीस निरीक्षक, ३, सपोनि / पोउपनि - ४
08 May, 24 : 07:58 PM
साताऱ्यातील वाढीव मतदान टक्क्याचा कुणाला फायदा, कुणाला धक्का? चर्चांना जोर
तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडले असून सातारकर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे आता वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फायदा कुणाला आणि धक्का कुणाला, अशी चर्चा सुरु झाली आहे.
08 May, 24 : 07:54 PM
Video: मराठा आरक्षण आंदोलकांची घोषणाबाजी; दानवेंची प्रचार सभा गुंडाळली!
मराठा आरक्षण आंदोलकांनी गोंधळ घातल्याने जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे आयोजित सभा अर्ध्या तासातच गुंडाळावी लागली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.
दानवेंच्या प्रचार सभेत मराठा आरक्षण आंदोलकांचा गोंधळ, सभा अर्ध्या तासातच गुंडाळण्याच्या नामुष्की, सिल्लोड तालुक्यातील घटना #LokSabhaElections2024#JalanaLoksabhapic.twitter.com/DszHObdiyV
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 8, 2024
08 May, 24 : 07:49 PM
"दुकानात नाही माल अन् म्हणे सर्व छान", नारायण राणे यांची उद्धवसेनेवर टीका
सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विजयाचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नारायण राणेंनी समाचार घेतला. "उद्धवसेनेकडून दोन-तीन लाखांच्या मताधिक्याचा दावा केला जात आहे. हे म्हणजे दुकानात माल नाही आणि तरी सर्व छान अशी उद्धवसेनेची अवस्था आहे. माणसेच नाहीत तरी ते दावे मात्र मोठमाठे करत आहेत," अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली.
08 May, 24 : 01:48 PM
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल
या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसर मोदींनी निशाणा साधला आहे. निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अचानक अदानी-अंबानींचं नाव घेणं कसं काय बंद केलंत? त्यांच्याकडून किती माल उचललात? असा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन काँग्रेसला विचारला.
08 May, 24 : 12:33 PM
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
मुंबई - Sanjay Nirupam on Sharad Pawar (Marathi News) येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी एका मुलाखतीत केले. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच आता नुकतेच काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या संजय निरुपमांनी एक ट्विट करत शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे.
08 May, 24 : 11:37 AM
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे संवाद, कारण कुठल्याही हिंसक कृत्याचे पडसाद जम्मू काश्मीरच्या लोकांवर होतील. पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हे म्हटलं आहे.
07 May, 24 : 08:28 PM
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात ५४.०९ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.
07 May, 24 : 08:08 PM
सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान, आता निकालाची उत्सुकता
सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सुमारे ५८ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतीम आकडेवारी ६१ टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील यांच्यासह २० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. निकाल ४ जून रोजी लागणार असला तरी आतापासून निकालाची उत्सुकता दिसून येत आहे.
07 May, 24 : 06:55 PM
कल्याण लोकसभा मतदार संघातील २८ उमेदवारांना चिन्हांचे वाटप
कल्याण- कल्याण लोकसभा मतदार संघातील २८ उमेदवारांना केंद्रीय निवडणूक निरिक्षक मनोज जैन यांच्या उपस्थितीत निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
07 May, 24 : 06:53 PM
राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.
07 May, 24 : 06:50 PM
मतदारांच्या ‘व्होटर स्लीप’चा बोजवारा
सांगली : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या. मात्र मंगळवार, दि. ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदानावेळी मतदारांच्या व्होटर स्लिपांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मतदारांना व्होटर स्लिपा मिळाल्या नाहीत. याशिवाय मतपत्रिकेतील घोळही दिसून आला. विविध पक्षांनीही मतदारापर्यंत व्होटर स्लिपा देण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
07 May, 24 : 06:49 PM
मतदारांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी मतदान केंद्रात सेल्फी पॉईंट!
अलिबाग : मतदारांमध्ये उत्साह वाढावा म्हणून एक सखी मतदान केंद्र, चार आदर्श मतदान केंद्रे, एक युवा मतदान केंद्र, नऊ महिला संचलित मतदान केंद्रे, तीन युवा संचलित मतदान केंद्रे व तीन दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट व रंगसंगती केली होती. तसेच मतदारांमध्ये उत्साह वाढावा म्हणून सेल्फी पाॅईंट उभारण्यात आला होता. त्यामुळे मतदान केंद्रावर नवमतदारांसह ज्येष्ठांचा उत्साह दिसून आला.
07 May, 24 : 06:49 PM
मोंदीच्या सभेत केजरीवालांचा फोटो झळकावला, आपचे कार्यकर्ते ताब्यात
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी अहमदनगर येथे झालेल्या सभेत आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो झळकविला. त्यामुळे सभेत काही क्षणासाठी गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी तातडीने संबंधितांना ताब्यात घेतले.
07 May, 24 : 04:06 PM
दुपारी तीन वाजेपर्यंत ४३.०८ टक्के मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघात ४३.०८ टक्के मतदान
सोलापूर लोकसभा मतदारसंघात ४०.१८ टक्के मतदान
सांगली लोकसभा मतदारसंघात ४१.३० टक्के मतदान
रायगड लोकसभा मतदारसंघात ४१.४३ टक्के मतदान
07 May, 24 : 03:07 PM
सांगोल्यात मतदाराकडून ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात मतदाराकडून पेट्रोल टाकून ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.
07 May, 24 : 03:04 PM
शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील महुद या गावात दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात जोरदार राडा झाला. या तुंबळ हाणामारीत शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण होते.
07 May, 24 : 02:40 PM
संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना सवाल
मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्रीची भेट घेतली. या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अशातच संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का असा सवाल अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळेंना केला आहे.
07 May, 24 : 02:04 PM
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.
लातूर - ३२.७१ टक्के
सांगली - २९.६५ टक्के
बारामती - २७.५५ टक्के
हातकणंगले - ३६.१७ टक्के
कोल्हापूर - ३८.४२ टक्के
माढा - २६.६१ टक्के
उस्मानाबाद - ३०.५४ टक्के
रायगड - ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा - ३२.७८ टक्के
सोलापूर - २९.३२ टक्के
07 May, 24 : 02:02 PM
सांगलीत चीनमधून येऊन तसनीमने बजावला मतदानाचा हक्क
अडीच महिन्याच्या जुळ्या मुलांसह तसनीम कालेकर (शांघाय, चीन) येथून खास मतदान करण्यासाठी आल्या आहेत. त्यांनी पलुस येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसनीमचा आदर्श घेऊन शहरातील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील का? अशी मतदान केंद्रावर चर्चा होती.
07 May, 24 : 12:49 PM
जयंत पाटील यांनी केले मतदान
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदार संघात जाऊन मतदान केलं.
आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले. लोकशाही वाचवण्यासाठी देशातील मतदारांना फार मोठी संधी आहे. सर्व देशवासीयांना माझे आवाहन आहे की, सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावावे. मतदानाच्या पवित्र… pic.twitter.com/QQ3SE1EC7M
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 7, 2024
07 May, 24 : 11:48 AM
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत राज्यात एकूण १८.१८ टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.
लातूर - २०.७४ टक्के
सांगली - १६.६१ टक्के
बारामती - १४.६४ टक्के
हातकणंगले - २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के
07 May, 24 : 11:34 AM
सोलापुरात दोन गावांचा मतदानावर बहिष्कार
वीज, पाणी व रस्ता नसल्याने मोहोळ तालुक्यातील भैरववाडी आणि मनगोळी येथील ग्रामस्थांनी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळपासून आतापर्यंत दोन्ही गावांत एकही मतदान झाले नाही.
07 May, 24 : 11:30 AM
सुप्रिया सुळेंनी सांगितले अजित पवारांच्या घरी जाण्याचं कारण
बारामतीत मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या काठेवाडीतील निवासस्थानी पोहोचल्या होत्या. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार देखील तिथे उपस्थित होत्या. दरम्यान, आशाकाकींची भेट घेण्यासाठी इथे आले होते. त्यांचा आशीर्वाद घेतला. हे माझ्या काका काकींचे घर आहे. माझे लहानपण काकींकडेच गेले, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.
07 May, 24 : 11:16 AM
मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी थेट गाठलं अजित पवारांचे घर
बारातमतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे या काठेवाडीतील अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. मात्र या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्तातच आहे.
07 May, 24 : 11:05 AM
सुनेत्रा पवारांविषयी वाईट वाटतं, त्यांना बळीचा बकरा बनवलं - संजय राऊत
"बारामती आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे जिंकणार हे निश्चित आहे. पण सुनेत्रा पवार यांची मला दया येते. मला त्यांच्याविषयी वाईट वाटतंय. त्यांच्या पतीराजांनी त्यांना एका गृहिणीला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर नारायण राणे पराभवाचा चौकार मारणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
07 May, 24 : 10:33 AM
रायगडमध्ये मतदानासाठी गेलेल्या मतदाराचा केंद्राबाहेरच मृत्यू
रायगड लोकसभा निवडणुकीसाठी महाड विधानसभा मतदार संघातील प्रकाश चीनकुटे हे मतदार दाबेकर कोडं चीजळोली येथील मतदान केंद्रावर मतदान साठी गेले होते. यावेळी त्यांना चक्कर आल्याने ते माघारी फिरले होते. मात्र मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांना चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाला आहे. प्रकाश याचा नक्की मृत्यू कशाने झाला याबाबत माहिती कळलेली नाही आहे.
07 May, 24 : 10:10 AM
वडगाव खुर्द येथील महापालिकेच्या नवले शाळेत मतदार व अधिकाऱ्यांत वाद
डीजी लॉकर मधील आयडी/ आधार कार्ड (सॉफ्ट कॉपी) चालत नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना सांगितले. हार्ड कॉपी घेऊन आले तरच मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मतदारांना सांगितले. मात्र शासनाने डीजी लॉकर ला मान्यता दिली आहे, मग मतदान केंद्रात सॉफ्ट कॉपी का चालत नाही? असा सवाल मतदारांनी केला.
07 May, 24 : 09:57 AM
पहिल्या दोन तासातील मतदानाची आकडेवारी आली समोर
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यासाठी ११ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
लातूर - ७.९१
सांगली - ५.८१
बारामती - ५.७७
हातकणंगले - ७.५५
कोल्हापूर - ८.०४
माढा - ४.९९
धाराशिव - ५.७९
रायगड - ६.८४
रत्नागिरी - ८.१७
सातारा - ७
सोलापूर - ५.९२
07 May, 24 : 09:52 AM
लातूरमध्ये देशमुख कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील मतदान केंद्रावर अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, धीरज देशमुख आणि दीपशिखा देशमुख यांनी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
07 May, 24 : 09:29 AM
"इंडिया आघाडीची लाट रायगडात नाही"; तटकरे कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क
बाहेर इंडिया आघाडीची लाट असली तरी यावेळी रायगड लोकसभा मतदार संघात लाखाच्या फरकाने मी निवडून येईल असा विश्वास महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला आहे. तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ही तटकरे यांनी केले आहे.
07 May, 24 : 09:17 AM
साताऱ्यात अधिकारी जोडप्याने सकाळीच बजावला मतदानाचा हक्क
साताऱ्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील आपल्या पत्नी अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्यासह सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.
07 May, 24 : 09:16 AM
बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना वेगळाच संशय
बारामती मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे १५७ मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडण्याची भीती महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून, खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अधिक वाचा
07 May, 24 : 09:14 AM
सोलापुरात शिंदे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर त्यांच्यासह माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
07 May, 24 : 09:08 AM
रोहित पवारांनी कुटुंबासह बारामतीत केलं मतदान
रोहित पवार यांनी पिंपळी (बारामती) इथे आई, वडील, पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी रोहित पवार यांनी तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा, असं म्हटलं आहे.
पिंपळी (बारामती) इथं आई, बाबा, पत्नी आणि ताई यांच्यासमवेत सहकुटुंब लोकशाहीतील सर्वांत पवित्र मतदानाचा हक्क बजावला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा.. pic.twitter.com/u8X0wmH0mB
07 May, 24 : 09:08 AM
अजित पवारांना मिशा काढायला वस्तरा तयार ठेवावा लागेल - रोहित पवार
"अजितदादा तुम्ही खोटे बोलू नका, तुम्ही धनशक्तीचा किती मोठ्या प्रमाणात वापर केलाय हे लोकांनी पाहिले. माझे उमेदवार निवडून आले नाही तर मिशा काढेन असं अजितदादा म्हणाले होते, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. ४ जूनला सुप्रिया सुळे निवडून येणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना मिशा काढण्यासाठी वस्तारा तयार ठेवावा लागेल," अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली. अधिक वाचा
07 May, 24 : 09:05 AM
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
बारामतीमध्येही आज अटीतटीची लढाई पाहायला मिळतेय.यासाठी शरद पवार आणि त्यांच्या कन्या तसेच महाविकास आघाडीच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळेंनीही मतदानाचा हक्क बजावला.महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी शरद पवारांनी मुंबईऐवजी बारामतीमध्ये मतदान केलं.
07 May, 24 : 08:46 AM
साताऱ्यात अधिकारी जोडप्याने सकाळीच बजावला मतदानाचा हक्क
साताऱ्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील आपल्या पत्नी अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्यासह सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.
07 May, 24 : 08:06 AM
सातारा लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात.
सातारा लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात. मतदारांसह खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळीच मतदान केले .
सातारा लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात. मतदारांसह खासदार उदयनराजे भोसले यांनी केले सकाळीच मतदान.#LokSabhaElection2024#satarapic.twitter.com/q14iApEpPm
— Lokmat (@lokmat) May 7, 2024
07 May, 24 : 07:49 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
गुजरातच्या अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्रावर जात लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावला.
Prime Minister Narendra Modi casts his vote for #LokSabhaElections2024 at Nishan Higher Secondary School in Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/5r6Hsm1AZ3
— ANI (@ANI) May 7, 2024
07 May, 24 : 07:23 AM
विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला, माझी आई माझ्यासोबत - अजित पवार
आज माझी आई माझ्यासोबत आहे. सहकुटुंब बारामतीच्या काटेवाडीत आम्ही मतदान केले. आम्ही आमच्या परीने महायुतीच्या वतीने प्रचार केलेला आहे. प्रचारात अनेकांनी माझ्यावर आरोपांचा धुरळा उडवला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे. बारामतीच्या सांगता सभेतही बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पुरंदर, दौंड, खडकवासला या सर्व भागात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला - अजित पवार, उपमुख्यमंत्री
06 May, 24 : 11:36 PM
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर
लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यत संभाजी जगन्नाथ जाधव या एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 24 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. उमेदवारांना चिन्हाचे वाटपही करण्यात आले आहे.
06 May, 24 : 10:15 PM
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
"एकनाथ शिंदेंना कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते. शिवाजी मैदानात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता. पण उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून मी नरेश म्हस्केंना त्यांच्या घरी जाऊन समजावले. शिंदे आणि तुमचं जे असेल ते असेल पण शिवसेनेसाठी सोबत राहा. त्यावेळी नरेश म्हस्के राहिले," असा खुलासा राजन विचारे यांनी केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
06 May, 24 : 09:46 PM
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे ( Hemant Karkare ) यांच्याबाबत एक विधान केले होते. करकरे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या नाहीत, तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केले, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. हा दावा निराधार व तथ्यहीन असून यामार्फत मतदारांची दिशाभूल करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. या तक्रारीसोबतच या विषयीची सर्व कागदपत्रेही जोडण्यात आली असल्याचे भाजपाने माहिती दिली.
06 May, 24 : 06:33 PM
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचा (बीजेडी) 'अस्त' आहे, विरोधी पक्ष काँग्रेस 'पस्त' आहे. तर जनता भाजपप्रति 'आश्वस्त' आहे. नवीन पटनायक यांच्या बीजेडी सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून आहे. पटनायक सरकारने सर्व आघाड्यांवर काम केले नाही. हे सरकार गेल्यानंतर, भाजपच्या नव्या सरकारचा 10 जूनला शपथविधी होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओडिशातील आपल्या पहिल्याच निवडणूक प्रचार सभेदरम्यान, स्वत:ला भगवान जगन्नाथाचा पुत्र म्हणत केला.
06 May, 24 : 04:12 PM
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,'मी एक रुपया पाठवला तरी तो खायला देणार नाही. जो खाईल तो तुरुंगात जाईल आणि तुरुंगाची भाकरी खाईळ. आज तुम्ही घरी गेलात तर टीव्हीवर पहा आज शेजारच्या तुम्हाला नोटांचे डोंगर दिसत आहेत. मोदींनी माल पकडला आहे. चोरी तिथेच थांबली आहे. त्यांची लूटमार थांबवली. आता मोदींना शिव्या देणार की नाही? शिवीगाळ झाल्यानंतर मी काम करावे की नाही? तुमचा हक्काचा पैसा वाचला पाहिजे की नाही?, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
06 May, 24 : 04:08 PM
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,'मी एक रुपया पाठवला तरी तो खायला देणार नाही. जो खाईल तो तुरुंगात जाईल आणि तुरुंगाची भाकरी खाईळ. आज तुम्ही घरी गेलात तर टीव्हीवर पहा आज शेजारच्या तुम्हाला नोटांचे डोंगर दिसत आहेत. मोदींनी माल पकडला आहे. चोरी तिथेच थांबली आहे. त्यांची लूटमार थांबवली. आता मोदींना शिव्या देणार की नाही? शिवीगाळ झाल्यानंतर मी काम करावे की नाही? तुमचा हक्काचा पैसा वाचला पाहिजे की नाही?, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
06 May, 24 : 03:44 PM
धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदे
"धर्मवीर चित्रपटात राजन विचारे यांच्याबाबत दाखवलेले सर्व खोटं आहे, दुसऱ्या चित्रपटाच आम्ही सर्व खरं दाखवणार आहे. त्यांना दिघे साहेबांनी राजीनामा द्यायला सांगितलं होतं पण, त्यांनी दिला नाही. ते रघुनाथ मोरे यांच्याकडे गेले मोरे साहेबांनी त्यांना समजावून ,सांगितलं. पण, त्यावेळी ते दिघे साहेबांनाही काहीही बोलले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
06 May, 24 : 03:07 PM
नकली हिंदुत्ववादी गप्प का? मुख्यमंत्र्यांचा संतप्त सवाल
विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ असा घणाघात केला.
05 May, 24 : 10:39 PM
प्रकृती बिघडल्याने शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द!
शरद पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांनी तब्येतीच्या कारणास्तव सोमवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले जात आहे. बारामतीत आज दिवसभर त्यांच्या सभा होत्या. उद्यादेखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या अनेक सभा आणि अनेक नियोजित कार्यक्रम होणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे शरद पवार यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द झाले. बारामतीतील सभेत त्यांचा घसा बसला होता. त्यामुळे अवघ्या सात मिनिटांतच त्यांनी भाषण आटोपले होते.
05 May, 24 : 10:37 PM
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
राष्ट्रवादीत फूट पडून जवळपास वर्षभराचा कालावधी होत आला आहे. दरम्यानच्या काळात, बंडखोरीची भूमिका का घेतली, हे अजित पवार हे लोकांना सांगत होते. त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. शरद पवार यांची साथ सोडण्यामागे नक्की कोणती कारणे होती, बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन का गरजेचं आहे आणि परिवर्तन झाल्यानंतर जनतेला कोणता फायदा होऊ शकेल, हे अजित पवार आपल्या सभांमधून सविस्तरपणे मांडले. त्यामुळे अजितदादांना वेळ मिळाल्याने वातावरण बदलण्यास संधी मिळाल्याची चर्चा मतदारसंघात असल्याचे दिसत आहे.
05 May, 24 : 07:27 PM
रोहित पवार रडले, अजित पवारांनी दिलं खोचक उत्तर!
बारामतीच्या सभेत रोहित पवार यांना रडू कोसळले. त्याचा दाखला देत अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली. "आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवले मग मी पण दाखवतो... द्या मत. अरे काय, ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा... हा रडीचा डाव आहे... असल्या गोष्टी इथे चालत नाहीत", अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
05 May, 24 : 07:25 PM
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचारसभेत अजितदादांचा व्हिडीओ, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली. त्यानंतर आज अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी शरद पवारांच्या-सुप्रिया सुळेंच्या सभेत अजित पवारांचा जुना व्हिडिओ दाखवण्यात आला. अजित पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारा हा जुना व्हिडिओ होता. या व्हिडीओच्या माध्यमातून अजितदादांची राजकीय कोंडी करण्याचा शरद पवार गटाने प्रयत्न केला.
05 May, 24 : 07:22 PM
भाजपा, महायुतीच्या नेत्यांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; प्रकरण काय?
पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाल्याची जाणीव झाल्याने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपाने आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपाने दिलेल्या जाहिराती विरोधात तक्रार केली.
05 May, 24 : 07:16 PM
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार ढसाढसा रडले!
बारामतीच्या सभेत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बोलताना रोहित पवार यांनी अश्रू अनावर झाले. रोहित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवर बऱ्याच बातम्या सुरू होत्या. तेव्हा शरद पवारांप्रमाणे आम्ही देखील सर्वकाही पाहत होतो. पण शरद पवारांच्या भावना सर्वकाही सांगत होत्या. परिस्थिती तशी असताना देखील त्यांनी काळजी करू नका असे आम्हाला सांगितले. जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोवर मी डोळे मिटणार नाही असे त्यांनी आम्हाला त्यावेळी ठणकावून सांगितले", हा किस्सा सांगताना रोहित पवार भरसभेत ढसाढसा रडल्याचा प्रकार बारामतीकरांना पाहायला मिळाला.
05 May, 24 : 04:59 PM
जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदार संघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल: एकनाथ खडसे
रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा तिकीट दिल्याने मतदार संघामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये प्रचार सुरू आहे. आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. त्या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की मी प्रचारामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे. प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितल्यानुसार आदिवासी भाग व दलित वस्तीमध्ये बैठका घेतो आहे. महाराष्ट्र भाजपाचा हातातून जात असल्याने मोदी, शहा यांची सभांची संख्या वाढली आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते असं म्हणतील का भाजपचे सरकार येईल ते असेच म्हणतील महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार नाही आमचे सरकार येईल त्यांना त्यांची प्रचाराची दिशा ठरवावी लागते तसेच 2024 च्या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदार संघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल अशी प्रतिक्रिया यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
05 May, 24 : 03:58 PM
ही लढाई केवळ मतदानपूर्ती नाही, लोकशाही वाचवण्यासाठी आहे: प्रणिती शिंदे
प्रचाराचा शेवटचा दिवस, प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. या सर्वांच्या प्रति माझ्या मनात कृतज्ञता आहे, ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थीविहारात होतेय, कारण ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. संविधान, गोरगरीब, कामगार, गृहिणी धोक्यात आहे, आरक्षण धोक्यात आहे आणि सोलापूर देखील धोक्यात आहे. त्यामुळे ही लढाई माझ्या एकटीची नाही. आपल्या सर्वांची, सोलापूर वाचवण्याची आहे. मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे. ही निवडणूक नेत्यांची नाही, लोकांनी पूर्णपणे ताब्यात घेतली आहे. लोकांना आता भाजप नकोय, त्यांच्या इच्छा आकांशा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना मी करतेय. लोकांनी खूप त्रास सहन करावा लागला, महागाई आणि जीएसटी मुळे दोन वेळेचे जेवण कसबस केलं जातंय. ही लढाई केवळ मतदानपूर्ती नाही, त्यामुळे लोकांचा विजय व्हावा हीच अपेक्षा. प्रचंड ऊन सोलापुरात आहे, या उन्हात देखील लोकांनी मला साथ दिली, हीच लोकशाही आहे. आजची रात्र वैऱ्याची आहे, मतदानाला केवळ दोन दिवस राहिलेत, मतदानचा उत्सव आपण साजरा करूयात, असे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
05 May, 24 : 03:40 PM
काँग्रेस सरकार आल्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवू: नाना पटोले
काँग्रेस सरकार आल्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवू. हे सरकार म्हणजे अग्निवीर सरकार आहे. मोदी सरकार पडल्यानंतर हेही सरकार काही दिवसात पडेल. राज्यात महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विदर्भात 10 पैकी 10 जागा महाविकास आघाडी जिंकेल. नांदेड आणि नागपूर सुद्धा काँग्रेसचा विजय होईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सर्वसमण्य, महिला बेरोजगारासाठी गॅरंटी आहे. मुख्यमंत्री कोल्हापुरात तळ ठोकून आहेत मात्र त्याचा फरक पडणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
05 May, 24 : 03:10 PM
चोपडा तालुक्यामधील 1 नंबरच्या मतदान केंद्राची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये असलेले आदिवासी भागातील मोरचिडा येथील एक नंबरच्या मतदान केंद्राला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सुविधांसंदर्भात पाहणी केली व नागरिकांना मतदान करण्याच्या आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चोपडा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या कामकाजाबद्दल पाहणी केली तसेच स्ट्रॉंग रूमची निरीक्षण केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार चोपडा मतदारसंघांमध्ये व्यवस्थित काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले त्यानंतर ते सातपुडा पर्वतरांगा मधील उमर्टी या गावी जाऊन त्या ठिकाणी देखील चेक पोस्ट आरोग्य केंद्र, मतदान केंद्र असे अनेक ठिकाणी भेटी देऊन त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, गटविकास अधिकारी आर.ओ वाघ, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर देखील होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या मोरचिडा या गावी एक नंबर मतदान केंद्र असल्याने त्या ठिकाणी पहिला जिल्हाधिकारी म्हणून मला भेट देण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच 13 तारीखला जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
05 May, 24 : 02:47 PM
अमोल कीर्तिकरांच्या प्रचार फेऱ्यांवर भर
महाविकास आघाडीचे व उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार संघात शाखा शाखांच्या भेटीत त्यांची उमेदवारी जाहिर केली.त्यांना प्रचाराला मोठा अवधी मिळाल्याने त्यांनी प्रचाराचा दुसरा टप्पा पूर्ण करून घरोघरी प्रचार केला.आता तिसऱ्या टप्यात त्यांनी सकाळ-संध्याकाळी रथ प्रचार फेऱ्यांवर भर दिला आहे.
05 May, 24 : 02:46 PM
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रचार करत केले शक्तिप्रदर्शन
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज प्रचार करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी हजारो कामगार ढोल-ताशा व वाद्ये घेऊन उपस्थित होते.या रॅलीत 400 हून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
05 May, 24 : 02:14 PM
बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने
बारामतीत आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांना दंड थोपट होत उचकवण्याचे काम शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे,काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे हा वाद संपुष्टात आला.
05 May, 24 : 01:33 PM
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली, मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभाग
बाईक रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सहभाग. मोठ्या संख्येने शिवसैनिक वाहने घेऊन रॅलीत सहभागी. ऐतिहासिक दसरा चौकातून रॅलीला सुरुवात. तिसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानासाठी प्रचार यंत्रणा आज थंडावणार. सायंकाळी पाच वाजता प्रचार होणार बंद.
05 May, 24 : 01:31 PM
विविध सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची उपस्थिती
ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचाराचे काही दिवस उरले असताना त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. आज ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर त्याचप्रमाणे नगरसेवक भूषण भोईर यांच्या प्रभागामधील विविध सोसायटी यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला नरेश म्हस्के हे उपस्थित होते. जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी नागरिकांना बुथवर येण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारे भाड्याने माणसे आणावी लागत नसून प्रत्येक कार्यकर्ता स्वतः प्रचारामध्ये भाग घेत आहे. नरेंद्र मोदी यांच्या कामाला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला पाहून लोकं मतदान करतील व जास्तीत जास्त संख्येने अर्थात सर्वाधिक मताधिक्याने ठाण्याची सीट निवडून येईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
05 May, 24 : 01:30 PM
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी प्रचार चालू आहे: संदीप देशपांडे
राज ठाकरे यांनी 9 तारखेला बिनशर्त पाठिंबा जाहिर केला त्यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण प्रचारामध्ये उतरलेलो आहोत. घरोघरी प्रचार चाललेला आहे , झालेली विकास कामे लोकापर्यंत पोहचवत आहोत, होणाऱ्या पुढील योजना पोहोचवत आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी हा प्रचार चालु आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
05 May, 24 : 01:27 PM
शिंदे, फडणवीसांच्या काळात उद्योग राज्याबाहेर गेले आहेत: विनायक राऊत
राज ठाकरेंनी नेहमी सारखी उद्धव ठाकरेंचा द्वेष करण्यासाठी सभा घेतली. राज ठाकरेंनी काल जी टीका केली त्यांनी रिफायनरी संदर्भात जर थोडी माहीती घेतली असती तर ती टिका केली नसती. राज ठाकरे ज्यांच्या बुडता जहाजाला पाठींबा द्यायला आलात ते राणे रिफायनरीला समर्थन देणारे राणे खरे की विरोध करणारे खरे. विनायक राऊत यांचे आव्हान आहे आम्ही जर रीफायनरीच्या बाजूची एक इंच जरी जागा घेतली असेल तर ते राज ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर त्या गावात येऊन लोकांची माफी मागावी. रिफायनरी होणार त्या परीसरात 14 हजार वर्षांपुर्वीची कातळ शिल्प आहेत, ती राज ठाकरेंनी येऊन पाहावी. कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीला समर्थन करणारे राज ठाकरे खरे. राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली मोठ मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले ते देवेंद्र फडणवीस व शिंदेच्या कारकिर्दीत गेले, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांनी केली.
05 May, 24 : 01:17 PM
आमच्या सरकार मध्ये केलेल्या विकास कामांवर आम्हाला लोक मतदान करणार आहेत: राहुल शेवाळे
विरोधक आंधळे आहेत त्यांना विकास दिसत नाहीये, गेल्या दहा वर्ष विरोधक आरोप करत आहेत. त्यांना शिवसेना प्रमुखांचे नाव घेताना लाज वाटायला पाहिजे. अयोध्यामधील भव्य राम मंदिर त्यांना दिसत नाहीये. स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान त्यांना दिसत नाहीये. देशात एयरपोर्ट झालेलं दिसत नाहीये, मेट्रोचं झालेलं काम, नॅशनल हायवे झालेले दिसत नाहीये. देशाची अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरुन पाचव्या स्थानावर आली आहे त्यामुळे विरोधक आंधळे झाले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची त्यांना जाणीव नाही. अटल सेतु , कोस्टल रोड किती मुंबई विकासाची काम झाली आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये विकास काम झालेली आहेत. त्यांच मुद्यावर लोक आम्हाला मतदान करणार आहेत. हाराष्ट्रात आम्ही 45 प्लस जागा जिंकणार आहोत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात री- डेवलपमेंट चा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या पाच वर्षात तो विषय आम्ही पुर्ण करणार आहोत, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
05 May, 24 : 01:15 PM
भाजपा काम करो अथवा न करो, आम्ही इमानदारीने काम करणार आहोत: गुलाबराव पाटील
एका बापाची औलाद आहोत हे भाजपा काम करो अथवा न करो, आम्ही इमानदारीने काम करणार आहोत. जो होगा हमारा नशीब, आमचे काम हे आग विझविणाऱ्या चिमणी सारखा आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे. कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. इमानदारीओंके लिए लहर हैं मोदी बेईमानीओंके लिए जहर है मोदी, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
05 May, 24 : 12:50 PM
उद्धव ठाकरे शरद पवारांच्या नादी लागुन रावण राज्य आणायला चालले आहेत: सदाभाऊ खोत
निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती बघली तर २०२४ च्या पूर्वी संपूर्ण राज्याचा विकास ठप्प झाला होता, परंतु नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यासाठी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिलेला आहे. या देशात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत इंडिया आघाडीच्या लुटारुंची टोळी आणि दुसऱ्या बाजुला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशातील जनता एकवटलेली आहे. उद्धव ठाकरेंनी भाषण करताना म्हणाले की, आम्हाला राम राज्य आणायचे आहे, परंतु उद्धव ठाकरे देवाच्या आळंदीला जायचे सोडून चोरांच्या आळंदीला चाललेत. शरद पवारांच्या नादी लागुन रावण राज्य आणायला चालले आहेत, अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली.
05 May, 24 : 12:40 PM
अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
अंतरवाली सराटी येथे अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट
05 May, 24 : 12:00 PM
विखेंच्या काँग्रेस संपर्कावरून नगरमध्ये आरोप-प्रत्यारोप
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता-पुत्र काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय खळबळ उडाली असून विखे व थोरात यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
05 May, 24 : 11:58 AM
सोलापूर लोकसभा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आज भव्य पदयात्रा. सोलापुरातील कन्ना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा असेल पदयात्रेचा मार्ग. या पदयात्रेत उमेदवार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होणार सहभागी.
05 May, 24 : 11:22 AM
प्रणिती महिला असुनही विदाऊट सेक्युरिटी जनतेत फिरते: सुशीलकुमार शिंदे
प्रणितीने संपूर्ण मतदारसंघात रात्रदिवस फिरत आहे. ती महिला असून विदाउट सेक्युरिटी ती कुठेही जाते. मी तिला सेक्युरिटी घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र तिला जनतेत राहायचंय त्यामुळे ती कुठलीही सेक्युरिटी घेत नाहीये. त्याचंच हे चिन्ह आहे की या पदयात्रेत मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत. विरोधक कितीही असले तरी ती एकटी फाइट करू शकते त्याचंच हे उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे. ती फक्त फाइटच करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
05 May, 24 : 11:14 AM
संदिपान भुमरे यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी साधला संवाद
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मंत्री अतुल सावे मैदानात उतरले आहेत. मंत्री अतुल सावे व महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला आहे.
05 May, 24 : 10:31 AM
एकमेकांवर टीका करणारे मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवत बसतात: प्रकाश आंबेडकर
१३ तारखेला जी निवडणूक होत आहे मराठवाड्यामध्ये तीन उमेदवार आहे. या निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलं उमेदवार काँग्रेस शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पार्टी, शरद पवार गट,अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार आपण बघितले तर एकाच समाजाचा आहे. आपण सर्व लक्षात घ्या हे सर्व मराठा समाजाचे आहेत पण तीही श्रीमंत मराठा समाजाचे जरांगे पाटील यांनी जमा केलेला वर्ग आहे त्याच्या मधला एकही उमेदवार दिलेला नाही सत्ता ही मराठा समाजाच्या नावाने पण प्रत्यक्षात ही असणारी सत्ता घराणे शाहीच्या हातामध्ये आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही आपण बोंबलतो मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे रेल्वेसाठी येथे लढा द्यावा लागला. ब्रॉडगेज झाला सिंगल लाईन झाली डबल लाईन झालेली नाही डबल लाईन करायची झाली असती तर मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ जो आहे तो अर्धा कमी झाला असता अशी परिस्थिती आहे वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात आले असते ज्या काही सोयी सवलती दिल्या पाहिजे त्या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाही मराठवाडा हा मागासलेला भाग आहे आणि तो मागासलेला राहिला पाहिजे अशा दृष्टीने महाराष्ट्र शासन बघत आहे अशी परिस्थिती आहे हे बदलायचं असेल तर इथली सत्ता परिवर्तन बदल झाला पाहिजे आणि सत्ता बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी नाचवण्यात येत निवडणुकीच्या वेळेस हे दोघं कोंबड्यासारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं याची झुंज खरी यांची झुंज ही नौटंकीची झुंज असते हे आपण लक्षात घ्या हा फक्त देखावा असतो मतदानांपुरताच मतदान झालं की दुसऱ्या दिवशी दोघं एका हॉटेलमध्ये खाताना आपल्याला दिसतात, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.
05 May, 24 : 10:26 AM
सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेची तयारी पूर्ण
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता शरद पवार गटाची प्रचार सांगता सभा मोरगाव रोड येथे लेंडी पट्टीच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे या सभेला माजी कृषिमंत्री शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.
05 May, 24 : 12:31 AM
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
"आम्ही निवडणूक लढवत आहोत, म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांना माळशिरस तालुका असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्हे समजायला लागले. आम्ही ऐकायचो, कधीतरी वर्षातून, दहा वर्षातून एकदा नेहरूंची सभा ही सोलापूरला असायची. आता प्रधानमंत्री आठवड्याला येत आहेत. हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो, देशाचा प्रधानमंत्री असतो, पण आम्ही बघतो हल्ली ज्यावेळेस त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरण्याचा निकाल घेतल्यानंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री झाले. दर आठवड्याला येत आहेत," असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
05 May, 24 : 12:27 AM
साडेसात वर्षे सत्तेत असताना प्रकल्प बाहेर कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
भाजपाने अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले असते तर त्यांच्या विरोधात ते बोलले असते काय? त्यांच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून त्यांच्या बुडाला आग लागली. भाजपवाले म्हणे गुजरातला उद्योग नेत आहेत. मात्र, साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. तेव्हा त्यांनी भाजपला विरोध का केला नाही? कोकणात उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी उद्योग का आणले नाहीत, असा हल्लाबोल ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचारसभेत केला. ‘महायुती’चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
04 May, 24 : 10:07 PM
मतदारांनो भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
मतदारांनी भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करावे. मी भावनिक होऊन मते मागत नाही. विकासकामे पूर्ण करण्यासाठी मदत मागत आहे, विकास डोळ्यांपुढे ठेवून मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.ते डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
04 May, 24 : 07:29 PM
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
कणकवलीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शुभ बोल रे नाऱ्या, अशी एक म्हण आहे. आता मी येतो म्हटल्यावर कसे येतात बघतो, अशी धमकी दिली होती. पण बघा मी येऊन उभा आहे. परत कसे जातात ते बघतो, अशीही धमकी दिली होती. पण तुम्ही आडवे याच. तुम्हाला गाडूनच पुढे जातो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्या टीकेला नारायण राणे यांनी आता प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची काय औकात आहे? मी मनात आणलं तर बरंच काही करू शकतो. उद्धव ठाकरे यांनी समोर यावं, त्यांना अंग हलवायला दिलं तर काहीही हरेन मी. उद्धव ठाकरे यांनी उभं आडवं करण्याची भाषा वापरू नये. तसेच माझ्या रस्त्यातही येऊ नये. पोलीस संरक्षण घेऊन मला धमक्या देऊ नका. तुमची इच्छा असली तर एक फोन करा, मी येईन, असे आव्हान नारायण राणे यांनी यावेळी दिले.
04 May, 24 : 06:09 PM
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
तटकरे यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिघांची एकत्रित चर्चा झाल्यानंतर, हे दोघेही बाहेर आले आणि पंतप्रधान-उद्धवजी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर, उद्धवजी मुंबईला आल्यानंतर, सात-आठ दिवसांनी संजय राऊतांचा मला फोन आला की, कीही करून मला अजित दादांना भेटायचे आहे. एक दिवस अजित दादांनी वेळ दिली होती. मात्र ती होऊ शकली नाही. संजय राऊत नाराज झाले. मी पुन्हा दादांची समजूत घातली. यानंतर, मुंबईच्याच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती बैठक झाली. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही तेथे होते. संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया. उद्धवजींनी संजय राउतासोबत तीन-चार वेळा चर्चा केली, असं संजय राऊत सांगत आले.
04 May, 24 : 06:05 PM
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उदयनराज भोसले यांच्या प्रचारासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना मी जूनमध्ये खासदार करणार असल्याची घोषणा केली आहे. "यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला वाई-महाबळेश्वर-खंडाळा या भागातून एक लाखांचं मताधिक्य द्या, जूनमध्ये मी नितीन पाटील यांना खासदार करतो. त्यांना खासदार नाही केलं तर मी पवारांची औलाद सांगणार नाही," असं अजित पवार म्हणाले.
04 May, 24 : 01:28 PM
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली, फडणवीसांनी मानले आभार Primary tabs
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली, ४० टक्के निर्यात शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार, देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
04 May, 24 : 12:31 AM
सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत! उद्धव ठाकरे यांची मोदी, शाह यांच्यावर टीका
आमच्या शिवसेनेच्या घराणेशाहीवर अमित शाह बोलत आहेत. मला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरून मते मागत आहे. मोदी, शाह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या वडिलांचे नाव वापरून मते मागावित. भाजप हा बेअकली पक्ष आहे. मोदी-शहा यांनी मागील १० वर्षांत देश लुटला आहे. सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मोदी-शहा यांनी लुटलेले सर्व वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
03 May, 24 : 11:10 PM
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
४०० पार हा नरेंद्र मोदी यांचा जुमला आहे. ते २०० पारही जाणार नाहीत. महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकू म्हणणारे दर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात येत आहेत. मोदींची हवा संपल्याचा हा असर असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश अंबेडकर यांनी केला.
03 May, 24 : 10:26 PM
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल
राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होत आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
03 May, 24 : 09:55 PM
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे; काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे. भारतात कोणते सरकार येणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. त्यामुळे जनतेनेही त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे. नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. पण जाऊन सांगतात काय? या मोदींनी सांगावे दहा वर्षात काय केले? मोदी म्हणाले होते की, मला सत्ता द्या मी भाव देतो. मात्र काही झाले नाही. जवाहरलाल नेहरू व गांधींची टिंगल टवाळी करायची. आमची टिंगल करायची. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची, असा पलटवार शरद पवारांनी केला. दरम्यान, अमित शाह म्हणतात, अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेलो नाही. आम्हालाही राम मंदिराचा आदर आहे. राम मंदिराचे काम पूर्ण झाले की,आम्ही नक्की जाऊ, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
03 May, 24 : 09:02 PM
शक्ति प्रदर्शन करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रविंद्र वायकर यांनी भरला उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी शक्ति प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी निवडणुक कार्यालयात दाखल केला. यावेळी म्हाडा गेट नंबर दोन येथून भव्य रॅली काढण्यात आली होती. महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक (शिंदे गट) व महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या जनसागरात ही रॅली पार पडली...
03 May, 24 : 07:38 PM
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार - राहुल गांधी
नरेंद्र मोदी आणि आरएसएस देशाचे संविधान संपवू पाहत आहेत. देशातील अनेक सकारात्मक बदल संविधानामुळे झाले आहे. ज्या दिवशी भाजप संविधान संपवेल त्या दिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. जे संविधान बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि इतर महान लोकांनी तयार केले त्याचे आम्ही सरंक्षण करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
03 May, 24 : 07:05 PM
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
उद्धव ठाकरेंची व्होट बँकही काँग्रेसप्रमाणे झाली आहे. जे राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करू शकतात का? हिंमत नसेल तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात, खरी शिवसेना शिंदेंकडेच आहे, या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल करत आव्हान दिले.
03 May, 24 : 05:43 PM
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
माढ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मागील आठवड्यात शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा सुरू असतानाच अभिजीत पाटील यांच्या कानावर कडू बातमी येऊन आदळली. पाटील यांच्या कारखान्याच्या गोदामांना शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सील ठोकण्यात आलं. त्यानंतर पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना निवडणुकीत राजकीय मदत करण्याचं आश्वासन दिलं. हे आश्वासन दिलं गेल्यानंतर आज अखेर पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला बँकेकडून ठोकण्यात आलेलं सील काढलं गेलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला सहकार्य करण्याची अभिजीत पाटील यांनी भूमिका घेणे आणि नंतर लगेच कर्ज वसुली लवादाने बँकेच्या कारवाईला स्थगिती देणे, हा योगायोग कसा जुळून आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच कारखान्याच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांची कोंडी करून त्यांना भाजपच्या प्रचारात सक्रिय केलं गेल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.
03 May, 24 : 03:38 PM
मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानेही उमेदवाराची घोषणा केली आहे. रमजान चौधरी हे आमचे उमेदवार असतील, अशी माहिती एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी दिली आहे.
03 May, 24 : 03:34 PM
ठाणे हा धर्मवीरांचा जिल्हा, बाळासाहेबांचा बालेकिल्ला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, ठाणे जिल्हा हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे. बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत असून ते विकासाच्या सोबत आहेत. या ठिकाणी कितीही सभा झाल्या तरी बुथवर काम करायचे आहे, बुथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे आहेत. मागील निवडणुकीत उमेदवाराला लीड कोणी दिला, मेहनत कोणी केली, मोदी सांगतात बुथची लढाई जिंका, मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो, धर्मवीरांना साजेसे असे काम करायचे असून नरेश म्हस्के यांना निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
03 May, 24 : 03:14 PM
उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील - प्रकाश आंबेडकर
पाचोरा (जि. जळगाव) : महाविकास आघाडीतील नेते जातीयवादी आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील, असेही ते म्हणाले.
03 May, 24 : 01:15 PM
नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंब ठाण्यात
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक हे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी नवी मुंबईतील एकही भाजपा पदाधिकारी गणेश नाईका यांच्यासोबत दिसून आला नाही.
03 May, 24 : 01:12 PM
विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाकरे गटाने विजय करंजकर यांना उमेदवारी डावलून राजाभाऊ वाजे यांना दिल्यानं त्यांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
03 May, 24 : 12:00 PM
अनंत गीतेच्या प्रचार सभेसाठी आदित्य ठाकरे राहणार उपस्थित
अलिबाग : रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात नेत्याची प्रचार सभेला धावपळ सुरू आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे आज इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी रायगडात दाखल झाले आहेत.
03 May, 24 : 11:59 AM
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा दावा
सोलापूर : निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही केसेसचा त्यात समावेश नाही. काही प्रॉपर्टीजचा समावेशही त्यात केला नाही. वास्ताविक पाहता निवडणूक आयोगाने त्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता मात्र तो झाला नाही. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आ. प्रणिती शिंदे या भाजपात गेल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला.
03 May, 24 : 11:37 AM
राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी
सोलापूर : महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि भाजपाविरोधात मिम्स व्हायरल करून बदनामी केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
03 May, 24 : 11:35 AM
ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
ठाण्यात आज नरेश म्हस्के उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपा आमदार गणेश नाईक हे नरेश म्हस्के यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान, काल काही भाजपा पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
03 May, 24 : 10:48 AM
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश
अलिबाग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना महाडमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात पायलट सुखरूप आहेत.
03 May, 24 : 01:02 AM
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
संजय निरुपम यांचे अखेर ठरले. ते शुक्रवारी ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
03 May, 24 : 01:01 AM
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल
शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा, मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणारा महत्व देत नाही तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांची हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या. अस आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे.
02 May, 24 : 11:50 PM
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल
शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा, मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणारा महत्व देत नाही तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांची हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या. अस आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे.
02 May, 24 : 11:49 PM
...ताईंनी हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
गाडीमध्ये कोणाला तरी बसवायचं, लगेच रिल्स तयार करायची, ती सोशल मिडियावर पोस्ट करायची, आणि त्याला कॅप्शन द्यायचे ताई माझ्या हक्काची. हे एकच हक्काचं काम त्यांनी केले. मोठ्या ताईंचा एकेक व्हिडीओ पाहून मला हसूही येते अन् वाईटही वाटतं. सध्या त्यांची वाढलेली धावपळ आणि मानसिक संतुलन ढासळलेले पाहत आहे, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली.
02 May, 24 : 11:40 PM
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल
शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा, मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणारा महत्व देत नाही तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांची हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या. अस आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे.
02 May, 24 : 09:18 PM
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे आजारी असताना, रश्मी ठाकरे यांना फोन करून प्रकृतीची चौकशी करत होतो. त्यांनी मदत मागितली, तरी ती करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर मी असेन, असे म्हटले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुलाखत पाहिली नाही. परंतु, हे सत्य आहे. राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात. अडचणीच्या काळात, आजारपणामध्ये विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाळतात. त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की, त्या काळात मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे. काही लागले किंवा काही आवश्यकता असेल, तर विचारायचे.
02 May, 24 : 09:18 PM
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
आजचे पंतप्रधान देशात हिंडतात. महाराष्ट्रामध्ये येतात. त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षाने होते. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. त्यांना आमच्यावर टिकाटिप्पणी केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. मोदी साहेब, तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, महाराष्ट्रात टिकाटिप्पणी कितीदाही केली, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर हा महाराष्ट्र बोलणार नाही. पण ज्यावेळी संधी मिळेल, त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही आम्हा लोकांची तयारी आहे, या शब्दांत शरद पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
02 May, 24 : 09:14 PM
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा, शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
सांगली लोकसभेची निवडणूक काँग्रेसमधील बंडखोरीने चुरशीची झाली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांची, तसेच महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिग्गज नेते प्रचार सभेत उतरविले आहेत. प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरल्याने दिग्गज नेत्यांच्या सभांचा धुराळा उडणार आहे.
02 May, 24 : 07:24 PM
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार - CM एकनाथ शिंदे
मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. ही रॅली ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील. पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होईल. विजयाच्या हॅटट्रिकनंतर पुढची पाच वर्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तुमची सेवा करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
02 May, 24 : 06:14 PM
उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा ३ मे रोजी तर राज यांची सभा ४ मे रोजी होत आहे. उद्धव ठाकरेंची सभा आधीच ठरलेली होती. राज यांच्या पाठिंब्यानंतर राणे यांनी राज यांची सभा ४ मे रोजी कणकवलीतीलच दुसऱ्या मैदानावर ठेवली आहे. उद्धव ठाकरेंची सभा उद्या म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानात होत आहे. आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आदींनी या सभास्थळाची पाहणी केली आहे. तर राज ठाकरे यांची सभा शनिवारी नगरपंचायत मैदानावर होत आहे.
02 May, 24 : 06:14 PM
“...तर अशी वेळ येईल की फडणवीसांना कुणी नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
आजवर महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांच्या कामाची उजळणी केली जाते. देवेंद्र फडणवीस ज्यादिवशी राजकारण सोडतील, त्यादिवशी नमस्कार करायलाही कुणी जाणार नाही. सत्ता असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केले जात आहेत. सत्ता नसताना त्यांचे काय होते, हे बघा, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.
02 May, 24 : 04:54 PM
उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा ३ मे रोजी तर राज यांची सभा ४ मे रोजी होत आहे. उद्धव ठाकरेंची सभा आधीच ठरलेली होती. राज यांच्या पाठिंब्यानंतर राणे यांनी राज यांची सभा ४ मे रोजी कणकवलीतीलच दुसऱ्या मैदानावर ठेवली आहे. उद्धव ठाकरेंची सभा उद्या म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानात होत आहे. आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आदींनी या सभास्थळाची पाहणी केली आहे. तर राज ठाकरे यांची सभा शनिवारी नगरपंचायत मैदानावर होत आहे.
02 May, 24 : 03:36 PM
ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
कोल्हापूर : मी शिवसेनेकडून राज्यसभेचा खासदार झालो तर ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा प्रचार करेन असा ड्राफ्ट उध्दव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याकडून लिहून घेतला होता असा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ठाकरे यांनीच कोल्हापूरच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
02 May, 24 : 03:35 PM
नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजप नाराज? पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे भाजपा नाराज असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे म्हटले जात आहे.
02 May, 24 : 02:55 PM
संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील
सातारा : संभाजीराजे छत्रपती हे अभ्यासू आहेत. त्यांच्याकडून अयोग्य विधानाची अपेक्षा नव्हती. घटना बदलता येत नाही. घटनेत वेळोवेळी दुरुस्ती होते. यापूर्वी सर्वाधिक दुरुस्त्या ह्या 96 वेळा काँग्रेसने केल्या आहेत. त्यामुळे भाजपा घटना बदलणार हा कांगावा असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, भाजपाला 400 पार बहुमत हे घटना बदलण्यासाठी हवं असल्याचे विधान संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत केले होते.
02 May, 24 : 02:18 PM
जयंत पाटील यांचे २ मोठे दावे
लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? येत्या विधानसभा निवडणुकीत काय घडणार? जयंत पाटील यांचे २ मोठे दावे
लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? येत्या विधानसभा निवडणुकीत काय घडणार? जयंत पाटील यांचे २ मोठे दावे #LokSabhaElection2024#Sangli#MaharashtraLokSabhaElection#JayantPatil#chandraharpatilhttps://t.co/0xkbRscAUB
— Lokmat (@lokmat) May 2, 2024
02 May, 24 : 02:14 PM
शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटलांचा भाजपाला पाठिंबा जाहीर
सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी आता भाजपाचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांसाठी हा धक्का मानला जात आहे.
02 May, 24 : 01:50 PM
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी जनतेला दिलं पाहिजे,असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. #chitrawagh#LokSabhaElections2024https://t.co/7wPrK3FwCQ
— Lokmat (@lokmat) May 2, 2024
02 May, 24 : 12:56 PM
श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल
महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केला जाणार आहे.
02 May, 24 : 12:54 PM
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी केली असून दिंडोरीमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.
01 May, 24 : 05:27 PM
किरण सामंत यांनी भाऊ उदय सामंतांचे फोटो, बॅनर हटविले
कोकणात रत्नागिरी-सिंधुदूर्गमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले किरण सामंत यांनी आज मोठे पाऊल उचलले आहे. भाऊ उदय सामंत यांचे फोटो, बॅनर कार्यालयावरून हटविण्यास सुरुवात केली आहे.
01 May, 24 : 05:25 PM
पवार साहेबांच्या सूनबाईंना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे - चित्रा वाघ
आयेगा तो मोदी ही हे लक्षात ठेवा प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका. कुठेही कमी पडू नका. सुनेत्रा पवार या मतदारसंघात नवीन नाहीत. त्यांनी या बारामतीत स्वतःचा सामाजिक कामाच्या माध्यमातून अस्तित्व दाखवून दिले आहे. त्या स्वतःला अजित पवार यांची सावली म्हणून वावरल्या नाहीत तर स्वतःची आयडेन्टिटी आहे. यामुळे बारामतीत बदल अटळ आहे हे लक्षात घ्या. या वेळेला पवार साहेबांच्या सूनबाईंना आपल्याला दिल्लीला पाठवायची आहे, असे भाजपच्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्या बारामतीत महिला मेळाव्यात बोलत होत्या.
01 May, 24 : 04:46 PM
संजय निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
संजय निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला बाळासाहेब भवनात दाखल झाले आहेत.
01 May, 24 : 04:42 PM
अन्य 7 लोकसभा मतदारसंघात चाचपणी; शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम
भक्त परिवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही लढणार आणि जिंकणार, तिकीट नाही मिळाले तरी निवडणूक लढणार आहे. अन्य 7 लोकसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक लढणार का, यावर बैठकीत निर्णय घेणार आहे. - शांतिगिरी महाराज
01 May, 24 : 03:56 PM
कल्याण, ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या सभा होणार : श्रीकांत शिंदे
आज ठाणे मधून नरेश म्हस्के व कल्याण मधून माझी उमेदवारी जाहीर झाली. राज ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहोत. राज ठाकरे यांनी आम्हाला भरभरुन आशिर्वाद दिला आहे. कल्याण, ठाण्यामध्ये येणाऱ्या काळात राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत, असे श्रीकांत शिंदे यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.
01 May, 24 : 03:29 PM
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकं उत्सुक आहेत- संदीपान भुमरे
खैरे भोंदू माणूस आहेत. या अगोदरही माझ्या खिशात पुडी आहे ती दिली तर लोकांचे प्राण वाचता खैरेंच संतुलन बिघडलं आहे. मुस्लिम लोकं मला मतदान करतील. मी कधीच जातीभेद केला नाही. खैरे ६ वेळेस नमाज पठण केलं तरी मतदान पडणार नाही, असे संदीपान भुमरे म्हणाले.
01 May, 24 : 03:28 PM
शिंदे, म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवतीर्थावर घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट
शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के शिवतीर्थावर, राज ठाकरेंचे घेतले आशीर्वाद #RajThackeray#MNS#Shivsena#LokasabhaElection2024pic.twitter.com/GgRRafaLxl
— Lokmat (@lokmat) May 1, 2024
01 May, 24 : 02:55 PM
उदय सामंताचा मोठा दावा, 'त्या' ड्राफ्टचा केला खुलासा
ज्या लोकांनी छत्रपतींच्या गादीचा, वंशजांचा अपमान केलेला आहे. त्या सर्वांचा विचार कोल्हापूरकरांनी करायला हवा. ज्यांना पुळका आलाय त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही, नोटरी का करून घेत होते याची उत्तरे द्यावी अशी मागणी उदय सामंत यांनी उबाठा गटाकडे केली आहे.
संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी का नाकारली, पडद्यामागे काय काय घडलं? ड्राफ्टमधून छत्रपतींना कुणाचे आदेश पाळण्यास सांगितले होते? उदय सामंतांचा मोठा दावा #UdaySamant#UddhavThackerayhttps://t.co/vxdyuWvBwK
— Lokmat (@lokmat) May 1, 2024
01 May, 24 : 01:35 PM
"मनसेच्या मतांवर नरेश म्हस्के जिंकून येतील"
ठाणे मतदारसंघात नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे. भाजपाचे नगरसेवक, मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेला हा भाग आहे. मागील १० वर्षाचा राजन विचारेंचा कार्यकाळ पाहिला तर मागच्या २ वर्षात ते दिसायला लागले, पहिले ८ वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते. त्यामुळे ही लढाई कठीण असेल असं वाटत नाही. मनसेची २ लाख मते या मतदारसंघात आहेत. मागच्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर २ लाखाच्या आसपास मनसेचं मतदान आहे. त्यामुळे मनसेच्या मतांवर नरेश म्हस्के ठाण्यातून निवडून येतील - अविनाश जाधव, मनसे नेते
01 May, 24 : 12:13 PM
दिल्लीत काँग्रेसला धक्का, आता २ माजी आमदारांचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. माजी आमदार नीरज बसोया आणि नसीब सिंह यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. आम आदमी पार्टी (आप) सोबतच्या युतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
01 May, 24 : 10:52 AM
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे, कल्याणचे उमेदवार जाहीर
गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण, ठाणे मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. त्यात ठाणे मतदारसंघावर भाजपाने दावा सांगितला होता. त्यामुळे ही जागा कुणाच्या वाट्याला येणार याची उत्सुकता होती. परंतु कल्याण, ठाणे हे दोन्हीही मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले. शिंदे यांनी या कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
01 May, 24 : 10:30 AM
शिव्या, शाप आरोप या पलीकडे विरोधकांकडे काहीच नाही; मुख्यमंत्र्यांचा टोला
निवडणुका येतात-जातात. पण राज्यकर्ते कोण-काय करतं, हे मागे राहतं. दुर्देवाने राजकारणाची पातळी खालावली आहे. रोज शिव्या, शाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला-पाहायला मिळत नाही. विरोधकांकडे मुद्देच नसल्याने अशाप्रकारची भाषा बोलली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती केली. त्यामुळे आम्हीही विरोधकांना आमच्या कामातून उत्तर देतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01 May, 24 : 09:07 AM
मतदानाचा हक्क बजावण्याचं राज्यपालांकडून आवाहन
संसदीय लोकशाहीमध्ये नियमितपणे होणाऱ्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा - राज्यपाल रमेश बैस
01 May, 24 : 08:44 AM
शरद पवारांनी केलं राहुल गांधींचं कौतुक
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधानांनी शहजादे म्हणून त्यांचा उल्लेख केला की शहजादे क्या करेंगे? कैसा करेंगे? प्रधानमंत्री यांना काहीतरी वाटलं पाहिजे त्यांच्या तीन पिढ्यांनी देशाची सेवा केली. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी १३ वर्षे तुरुंगात होते. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचे राज्य येण्याची खबरदारी घेतली. विविध क्षेत्रांमध्ये देश पुढे जाईल यासाठी पाऊलं त्यांनी टाकली. या राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरीबी घालवण्यासाठी आणि देशातील गरीब माणसासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली, त्यांची हत्या झाली, संसार उध्वस्त होईल अशी स्थिती झाली. त्यांच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी यांनी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे न्यावा यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली. एक दिवशी दक्षिणेत गेल्यानंतर बॉम्बस्फोट मध्ये त्यांच्या शरिराच्या चिंधड्या केल्या, ते मारले गेले. इतका अत्याचार केला वडील, आजोबा, आई, आजी या सगळ्यांनी देशासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींना हे विचारतात शहजादा क्या करेंगे आप? या शाहजाद्याने देशाचे दुखणे समजण्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत पायी सबंध देशाचा दौरा केला, ऊन व पाऊस काही बघितलं नाही. जाताना रस्त्याने शेतकऱ्यांना भेट, तरुणांना भेट, आया-बहिणींना भेट, त्यांचं दुखणं समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत, याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला. त्याचे कौतुक करणे सोडा तर त्याला शहजादा म्हणून त्याची टिंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात - शरद पवार
01 May, 24 : 08:38 AM
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावलं तर आम्ही ‘मशाल’ होऊन लढू
आमचा महाराष्ट्र हा कणखर आणि स्वाभिमानी बाण्याचा आहे. त्या स्वाभिमानाला कुणी नखं लावलं तर आम्ही ‘मशाल’ होऊन लढू, ह्या विचाराची साक्ष देणारा ‘हुतात्मा चौक’. हे स्मारक म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रवर नजर रोखून बसलेल्या परकीयांना रोखण्यासाठी बळ देणारं एक शक्तीपीठ आहे - उद्धव ठाकरे
स्मरण वीर सपुतांच्या शौर्याचे, स्मरण महाराष्ट्रनिर्मितीच्या लढ्याचे!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 30, 2024
आमचा महाराष्ट्र हा कणखर आणि स्वाभिमानी बाण्याचा आहे. त्या स्वाभिमानाला कुणी नखं लावलं तर आम्ही ‘मशाल’ होऊन लढू, ह्या विचाराची साक्ष देणारा ‘हुतात्मा चौक’.
हे स्मारक म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रवर नजर रोखून… pic.twitter.com/UsJCKkv3Pw
29 Apr, 24 : 11:00 PM
मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर दगडफेक
मुंबई : मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक झाल्याची घटना घढली आहे. ही तिसरी घटना आहे. कोटेचा आणि कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी देवनार पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, ज्या रथावर उमेदवार मिहीर कोटेचा होते त्या रथावर दगडफेक करण्यात आली आहे.
29 Apr, 24 : 06:22 PM
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघातील सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले
छत्रपती संभाजी नगर लोकसभा १९ मतदार संघातील सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. छाननी झाल्यावर ४४ जण रिंगणात होते आता ३७ उमेदवार रिंगणात आहेत चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली. सर्व उमेदवार किंवा त्यांचे सदस्य उपस्थितीत होते. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला ए बी फॉर्म दिलेल्या नुसार चिन्ह मिळाले. तर काही जणांना समान चिन्ह हवे होते तिथे लकी ड्रॉ पद्धतीने चिन्ह देण्यात आले. निवडणूकीचा पहिला टप्पा पार पडला तीन युनिट लागणार आहेत. ७३४४ बॅलेट युनिट लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत त्यांची घोषणा नोंदवून प्रक्रिया पारदर्शक पणाने प्रक्रिया पार पडली प्रत्येकाचे समाधान करूनच कामकाज झाले. आयोगाच्या सूचनांनुसार प्रक्रिया पार पडली. रिक्षा आणि रोड रोलर कपाट या चिन्हांसाठी लकी ड्रॉ झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप स्वामींनी दिली.
29 Apr, 24 : 05:43 PM
आयटकचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा
कल्याण लोकसभेसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. १ मे या कामगार दिनाचे औचित्य साधत कामगार वर्गाने असे ठरवले आहे की कामगार वर्गाचा जाहीरनामा प्रकाशित करावा. आयटकचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, असे आयटक राज्य उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी सांगितले.
29 Apr, 24 : 05:09 PM
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू; गिरीश महाजनांचा टोला
भाषणाच्या सुरुवातीला गिरीष महाजन यांनी भारत माता की जय जय जय श्रीरामचा नारा देत ' वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ना. महाजन म्हणाले की, धुळ्यातआज उमेदवारी भरताना गर्दीचे सारे रेकॉर्ड तुटले आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफाट कार्य केले. म्हणूनच तिसऱ्यांदा देश त्यांच्या पाठिशी उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अस्मितेचे प्रश्न मार्गी लावले. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, सध्या काँग्रेस तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू आहे. महिलांना १ लाख देवू, असे करू, तसे करू अशा घोषणा ते देताहेत. परंतु, त्यांनी दहा उमेदवार उभे केल्यावर दोन जणही निवडून येणार नाहीत; असा टोलाही ना. गिरीष महाजन यांनी लगावला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
29 Apr, 24 : 04:24 PM
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा जोर
हतनूर ग्रामस्थांशी संवाद साधून धनुष्यबाणाला मतदान करण्याचे शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी केले आवाहन. शिवसेना - भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस - मनसे - आर पी आय आठवले गट, रासप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (क)- प्रहार संघटना महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघांचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी करण्यासाठी शिवसेना महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हतनूर, ता. कन्नड येथील जाहीर सभेत येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबानालाच मतदान करण्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त मताधिक्य कन्नड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा सर्वच नेत्यांनी निर्धार केला.
29 Apr, 24 : 04:20 PM
स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या अपमानाचा बदला मतदार २० तारखेच्या निवडणुकीत घेतील: राहुल शेवाळे
बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायची संधी तिसऱ्यांदा मला याठिकाणी मिळाली. महायुतीतील घटक पक्षांचे मी याठिकाणी आभार मानतो. आशिर्वादरुपी महाशक्ती दर्शन तुम्हाला या रॅलीच्या माध्यमातून घडले असेलच. स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या अपमानाचा बदला मतदार 20 तारखेच्या निवडणुकीत त्याचा बदला घेतील, असे दक्षिण मध्य मुंबई महायुती उमेदवार राहुल शेवाळे म्हणाले.
29 Apr, 24 : 04:09 PM
ओबीसी बहुजन पार्टीकडून मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
ओबीसी बहुजन पार्टीकडून मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे व कल्याण-डोंबिवली हा ओबीसीचा जिल्हे म्हणून ओळखले जातात त्यामुळे माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी दिली आहे.
29 Apr, 24 : 03:49 PM
मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार
मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता समाजाच्या भावनेचा आदर करत तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार माघार घेत असल्याचे गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे. गंगाधर काळकुटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीड लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एकच खळबळ उडाली होती. परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाज भावनेचा आदर करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
29 Apr, 24 : 03:24 PM
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव
शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेत खासदार श्रीकांत शिंदे आले असता बाहेरच असलेला शिव वडापावचा आनंद घेतला आहे. श्रीकांत शिंदेंसोबत कार्यकर्त्यांनी देखील वडापाव खाल्ला आहे.
29 Apr, 24 : 03:04 PM
कल्याणमधून राईट टू रिकॉल पार्टीच्या वतीने अमित उपाध्याय यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कल्याण लोकसभा मतदारसंघातून राईट टू रिकॉल पार्टीच्या वतीने अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुदत संपण्याआधी बडतर्फ करण्याचा मतदारांना अधिकार असतो तसेच वोट देणारा वोट वापसी पासबुक कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे मतदारांना त्यांचे अधिकार आणि त्यांचा आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढत असल्याचे उमेदवार अमित उपाध्याय यांनी सांगितले आहे.
29 Apr, 24 : 02:51 PM
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभेचे आयोजन
ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजन विचारे म्हणाले की गेली १० वर्ष काम करण्याची संधी दिली. मी अनेक विकासकामे केली. काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर आजची रॅली विजयाची रॅली वाटत होती असे यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच यंदा निष्ठावान वाघाची आणि गद्दारांची लढाई आहे, सर्वांत जास्त लीड घेतल्या शिवाय राहणार नाही असे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.
29 Apr, 24 : 02:28 PM
ठाकरे गटाकडे १३ आमदार आहेत त्यातील ५-६ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत: उदय सामंत
रत्नागिरी शहरामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा सभा प्रभागनिहाय झाल्या आहेत. प्रत्येक सभेला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचे मताधिक्य रत्नागिरी जिल्हा नक्की देईल. नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू. भारताच्या जनतेने ठरवले आहे की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. ठाकरे गटाकडे १३ आमदार आहेत त्यातील ५-६ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, २-३ खासदार आहेत ते पण संपर्कात आहेत. काही वर्षांपूर्वी हेच लोकं सांगत होते की जगातील नेते नरेंद्र मोदींसारखा असला पाहिजे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
29 Apr, 24 : 01:45 PM
कोल्हापूरच्या सभास्थळी एक लाख लोक होते: उदय सामंत
कोल्हापूरच्या सभास्थळी एक लाख लोक होते. त्यामध्ये युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. साळवी स्टॉपच्या कॉर्नरला उभाठा गटाला सभा घ्यावी लागते. उद्धव ठाकरे गटाकडे युवकांची ताकद नाही. फसलेली टिम कॉर्नर सभेला, फक्त शिव्या घालण्याचा कार्यक्रम होता, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली.
29 Apr, 24 : 01:43 PM
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला: शांतिगिरी महाराज
आमच्या लोकसभेच्या मंडळींना निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक निवडणूक जनताजनार्दन कमिटीच्या मार्फत होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला. हा निर्णय आमच्या कमिटीने घेतला. मुख्यमंत्र्यांनी आमचे सगळे मुद्दे शांततेने ऐकून घेतले. ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो. प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील. आम्ही महायुती चे उमेदवार या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. भक्त परिवाराने विडा उचलला या वेळेला लढायचे आणि जिंकायचे. आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असे शांतिगिरी महाराज म्हणाले.
29 Apr, 24 : 01:21 PM
महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरुवात
महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरुवात,उबाठा चे नाशिक उमेदवार राजाभाऊ वाजे, तर दिंडोरी चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.
29 Apr, 24 : 01:10 PM
महायुती अडचणीत आहे, जनतेत प्रचंड रोष आहे: बाळासाहेब थोरात
महायुती अडचणीत आहे, जनतेत प्रचंड रोष आहे. उमेदवारीचा निर्णयच ते घेऊ शकत नाहीत. देशातच परिस्थिती बदलली आहे, भाजप विरोधी लाट आहे. महाराष्ट्रात ४० च्या आसपास महाविकास आघाडी जाऊन पोहोचेल. जनतेचा रोष देशभरात आहे. मोदी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, बेरोजगारी, महागाई, लोकांच्या समस्या यावर मोदी बोलत नाहीत. या देशाचे दुर्देव असे आहे की पंतप्रधान धर्मावर बोलतात, त्यांना वाटते की, धर्मावर बोलले की मत मिळतील. पंतप्रधान देशाचे आहेत. आतापर्यंत काय काम केले पुढे काय करू यावर बोलले पाहिजे. धार्मिक मुद्द्यावर ते बोलतात, मुस्लिम विरोधात बोलले कि हिंदू गठीत होतील असे त्यांना वाटते. गावाच्या पारावरच्या सारखे ते बोलतात, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
29 Apr, 24 : 01:02 PM
तुम्ही आम्हला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू असा फडणवीस यांनी शब्द दिला आहे: अभिजित पाटील
कारखान्याची साखर जप्त झाली आहे, हा विषय मी त्यांच्या फडणवीस यांच्या कानावर घातला. त्यामुळे कारखान्यासाठी मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. फडणवीस यांनी कारखान्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि ते आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे. भाजप प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केलेली नाही. तुम्ही आम्हला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू असा फडणवीस यांनी शब्द दिला आहे. ते आम्हाला मदत करत असतील तर लोकसभेला आम्ही देखील त्यांना मदत करू. अभिजित पाटील यांनी अप्रत्यक्षपने लोकसभा निवडणुकीत भाजपाला मदत करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
29 Apr, 24 : 01:00 PM
आम्ही राम राम करणारच: देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट
आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरे गटाला का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, असा सवाल करत, आम्ही राम राम करणारच. राम रामचे नारे आम्ही देणारच. ठाकरे यांनी या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे की, ते म्हणजे महाराष्ट्र आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
29 Apr, 24 : 12:59 PM
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ युवा मेळाव्याचे आयोजन
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे अत्यंत जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरातील सर्व प्रभाग स्तरांवर आणि गावागावांत घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. याच प्रचाराचा एक भाग म्हणून युवा आणि नवमतदारांना संबोधित करण्यासाठी या युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विशेषतः नारायण राणे यांच्या अखत्यारीतील एमएसएमई मंत्रालयाने युवकांसाठी आणलेल्या योजना आणि यापुढील प्रस्तावित योजना याविषयी युवकांना संबोधित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. काही वेळातच महायुतीचे उमेदवार नारायण राणे मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
29 Apr, 24 : 11:30 AM
PM मोदींच्या महाराष्ट्रात तीन सभा
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात... पुणे, सोलापूर आणि कराडमध्ये जाहीर सभा...
29 Apr, 24 : 11:29 AM
नाशिकमध्ये मविआचे शक्तिप्रदर्शन
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार... संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करणार...
29 Apr, 24 : 11:26 AM
शिंदे सेना - उद्धव सेना येणार आमनेसामने
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन उमेदवार - अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) आणि अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई) आज अर्ज भरणार... आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत निघणार रॅली... त्याचवेळी शिवसेना - शिंदे गटाचे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळेही अर्ज दाखल करणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन...
28 Apr, 24 : 08:13 PM
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप रविवारी झाला. यावेळी बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते, असे विधान केले होते. त्यावर जरांगे यांनी माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला होता. त्यावर पंकजा यांनी याचा खुलासाही केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच रविवारी दुपारी हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले.
26 Apr, 24 : 10:56 PM
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला भारत बळकट करायचा आहे: रामदास आठवले
ही विकासाची निवडणूक आहे एकीकडे देशाचा विकास रोखणारे लोक आहेत तर दुसरीकडे देश विकासाकडे नेणारे लोक आहेत. यांच्यात होणारी ही निवडणूक ही महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, पुन्हा एकदा देशाला बळकटी देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी आपण निवडून दिले पाहिजे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आमदार आठवले यांनी केले आहे. राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रा करतात तर दुसरीकडे हाच भारत देश तोडायची भाषा देखील करतात. त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन करायचे असून, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना, भरघोस मतांनी विजयी करून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
26 Apr, 24 : 10:04 PM
विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीत मशाल रॅली
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी शहरामध्ये मशाल रॅलीचे आयोजन केले गेले होते. या रॅलीमध्ये युवा सेना सचिव वरून सरदेसाई हे सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मशाल रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये विनायक राऊत यांचे पोस्टर्स व मशालीच्या प्रतिकृती चे पोस्टर्स आणि मशाली घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
26 Apr, 24 : 09:37 PM
कोल्हापुरातील महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील: एकनाथ शिंदे
कोल्हापुरातील महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. लाखोंच्या संख्येने लोक या सभेला उपस्थित राहतील. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे. महायुतीला मोठा प्रतिसाद मतदारांनी दिला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
26 Apr, 24 : 09:15 PM
देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय; संजय राऊतांचा सवाल
देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुःख मोदी-शाहांना कळणार नाही. मोदी आणि शाह महाराष्ट्राबद्दल सुडाचे राजकारण करतात. मोदी आणि शाहांना महाराष्ट्राचा राग आहे. देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो. म्हणून मोदी-शाह महाराष्ट्राला घाबरतात. यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. एकदा ठिणगी पडली की वणवा भडकतो. महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातला चालले. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरु आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
26 Apr, 24 : 08:55 PM
उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा
महायुतीने मुंबईत अजूनही तीन ठिकाणी उमेदवार दिला नसला त्याने काही फरक पडत नाही. मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी पाहून मतदान करतात, असा विश्वास उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी ते कांदिवलीत आले होते. मतदारसंघातील उत्तर भारतीय बहुल भागात त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, मुंबईतील उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने भाजपला मतदान करण्याकरिता रस्त्यावर उतरेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) भाजपाला मनापासून साथ देत आहे. त्यांची साथ भाजपला लाभल्याने आमचा उत्तर भारतीय मतदार दुखावण्याची शक्यता नाही, असा विश्वास शर्मा यांनी वर्तवला.
26 Apr, 24 : 08:31 PM
गोदामातील साहित्याचा लोकसभा निवडणूक प्रक्रियेशी संबंध नाही: अशोक शिनगारे
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक साहित्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. या गोदामातील साहित्याचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
26 Apr, 24 : 08:31 PM
उल्हासनगर शहरात महिला महामेळाव्याचे आयोजन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्हा व महायुतीच्यावतीने, उल्हासनगर खेमानी येथील एस.ई.एस शाळेच्या मैदानात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा महामेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला व पुरुष नागरिक उपस्थित आहेत.
26 Apr, 24 : 08:21 PM
काँग्रेसचे नसीम खान यांचा राजीनामा
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून माजी मंत्री नसीम खान यांचा राजीनामा. वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने नाराज.
26 Apr, 24 : 07:48 PM
ही निवडणूक भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी लढाई : वर्षा गायकवाड
काँग्रेस पक्षाचे खूप आभार व्यक्त करते त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली. देशाच्या संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष असणार आहे. भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई आहे. यावेळी जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये आणि आम्हाला खात्री आहे जनता सुज्ञ आहे. जनता जशी सरकार बनवते तसेच जनता सरकार खाली देखील खेचू शकते हे यावेळी दिसेल. - वर्षा गायकवाड
26 Apr, 24 : 06:42 PM
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान
वर्धा- ५६.६६ टक्के
अकोला- ५२.४९ टक्के
अमरावती- ५४.५० टक्के
बुलढाणा- ५२.२४ टक्के
हिंगोली- ५२.०३ टक्के
नांदेड- ५२.४७ टक्के
परभणी- ५३.७९ टक्के
यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के
26 Apr, 24 : 05:53 PM
वर्ध्यात ५ वाजेपर्यंत झालेले मतदान,...
वर्ध्यात ५ वाजेपर्यंत झालेले मतदान,...
धामनगाव - ५३.५८
मोर्शी - ५७.६०
आर्वी - ६०.५८
देवळी - ५७.११
हिंगनघाट - ५५.४८
वर्धा - ५६.०६
26 Apr, 24 : 05:51 PM
बुलढाणा लोकसभा : दुपारी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
बुलढाणा : ४२.६७
चिखली: ५३.२१
जळगाव जामोद: ४९.५५
खामगाव: ५५.८३
मेहकर: ५८.७२
सि. राजा: ५३.३१
एकूण:- ५२.२४
26 Apr, 24 : 05:50 PM
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान झाले.
यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी
दिग्रस : 57.06 टक्के
कारंजा : 50.41 टक्के
पुसद : 53.18 टक्के
राळेगाव : 61.50 टक्के
वाशिम : 53.81 टक्के
यवतमाळ : 49.46 टक्के
26 Apr, 24 : 05:14 PM
400 खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे देखील असतील हा शब्द देतो- उदय सामंत
राणे साहेबांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. 400 खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे देखील असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे असं समजून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे - उदय सामंत
26 Apr, 24 : 04:37 PM
नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर साभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभास्थळी आगमन
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा राजापूर येथील राजीव गांधी क्रीडांगणावर होत आहे. सभास्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उपस्थित आहेत.
26 Apr, 24 : 04:34 PM
चिन्ह कुठलं असलं तरी महायुती म्हणून मतदान होतं त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील- दिपक केसरकर
चिन्ह कुठलं असलं तरी महायुती म्हणून मतदान होत असतं त्यामुळे नारायण राणे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस साहेबांचा राहिलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे साहेबानी काम केलेलं आहे - केसरकर
26 Apr, 24 : 04:33 PM
नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी महाराजांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाचा पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणे झाले आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे असे यावेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.
26 Apr, 24 : 03:12 PM
भावना गवळींनी बजावला मतदानाचा अधिकार
खासदार भावना गवळी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. वाशिमच्या राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर परिसरातील शाळेत असलेल्या मतदान केंद्रात जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
26 Apr, 24 : 02:58 PM
ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांची अडचण
वर्धा : लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाटमधील रामनगर वॉर्डातील मतदान केंद्र क्रमांक २३१ येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने तब्बल दीड तास मतदारांना रांगेत उभे राहावे लागले.
26 Apr, 24 : 02:32 PM
बुलढाण्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०७ टक्के मतदान
खामगाव : ३१.६४
जळगाव जामोद : २१.३५
बुलढाणा : २५.४३
चिखली : २७.८६
मेहकर : ३६.४९
सिंदखेडराजा : ३१.४०
एकुण : २९.०७
26 Apr, 24 : 02:12 PM
राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजता पर्यंत ३१.७७टक्के मतदान
अकोला: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून सकाळी दुपारी १ वाजता पर्यंत राज्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या वाढणाऱ्या उन्हाचा अंदाज बघता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली . ११ वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती. त्यामुळे अकरा वाजता पर्यंत १८ .८३ टक्के मतदान झाले होते .दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ -वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
26 Apr, 24 : 02:05 PM
यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदाना न करण्यासाठी पैसे वाटप
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात होते. विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला.
26 Apr, 24 : 01:43 PM
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 1 वाजतापर्यंत 31.47 टक्के मतदान
सकाळी 7 ते 1 वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
दिग्रस : 34.45
कारंजा : 31.00
पुसद : 31.43
राळेगाव : 35.85
वाशिम : 33.30
यवतमाळ : 23.86
26 Apr, 24 : 01:30 PM
मतदान यादीत नाव नसल्याने अनेकांचा भ्रमनिराश!
सिंदखेडराजा: स्थानिक मतदार यादीत नाव मिळून येत नसल्याने अनेक मतदारांचा भ्रमनिराश झाल्याचे चित्र आज सकाळ पासून पाहायला मिळाले.आपल्याला मतदान करता येत नसल्याने अनेकांनी प्रशासनावर आपला राग व्यक्त केला. दरम्यान,अनेकांनी मोबाईल अप वर देखील आपले नाव आहे का याची शहानिशा केली मात्र अनेकांना नावे मिळाली नाही. दरम्यान,प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
26 Apr, 24 : 01:28 PM
अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रावर घोळ
अकोल्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. मात्र, अनेकांची मतदार यादीत नाव नसल्यानं मतदारांना आल्या पावली माघारी जावं लागलं. अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रांवर हा घोळ दिसून आला.
26 Apr, 24 : 12:26 PM
वाशिम जिल्ह्यात ११ वाजतापर्यंत १९ टक्के मतदान
वाशिम : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रियेला थाटात सुरूवात झाली. ११ वाजतापर्यंत तीन विधानसभा मतदारसंघातील १९ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. ऊन्ह तापताच मात्र मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
26 Apr, 24 : 12:24 PM
अमरावतीत सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान
अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढण्याची शक्यता आहे.
26 Apr, 24 : 12:11 PM
मतदानासाठी सिंगापूरहून गाठले अकोला
अकोला : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असतानाही अनेक जण मतदानाच्या दिवशी सुटीचा आनंद उपभोगत मतदानाकडे पाठ करतात. अकोला येथील एका युवकाने मात्र राष्ट्रीय कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत थेट सिंगापूर येथून अकोल्याला येत मतदानाचा हक्क बजावला. येथील युवा मतदार परिमल असनारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले.
26 Apr, 24 : 12:02 PM
राज्यात आठ जागांसाठी ११ वाजेपर्यंत १८.३३टक्के मतदान
राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.३३टक्के मतदान झाले आहे. तर परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१.७७ टक्के मतदान झाले आहे.
26 Apr, 24 : 11:49 AM
अकोल्यात 11 वाजेपर्यंत 17.37 टक्के मतदान
अकोला पूर्व - 14.25 टक्के
अकोला पश्चिम - 16.07
अकोट - 16.27
बाळापुर : 19.50
मूर्तिजापुर- 19.47
रिसोड- 19.14 टक्के
26 Apr, 24 : 11:48 AM
बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के मतदान
बुलढाणा : लाेकसभेच्या बुलढाणा मतदार संघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. सकाळी मतदानात वाढ झाली आहे. बुलढाणा सहा विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले हाेते. त्यानंतर आता मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के मतदान झाले आहे.
26 Apr, 24 : 11:46 AM
यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान खालील प्रमाणे...
दिग्रस : 20.22
कारंजा : 27.22
पुसद : 18.69
राळेगाव : 20.85
वाशिम : 20.26
यवतमाळ : 11.56
26 Apr, 24 : 11:27 AM
उमेदवार दिनेश बुब यांनी केलं मतदान
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी आज अमरावतीच्या नेहरू शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
26 Apr, 24 : 10:49 AM
सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची 7.45 टक्केवारी
वर्धा 7.18 टक्के मतदान
अकोला 7.17 टक्के मतदान
अमरावती 6.34 टक्के मतदान
बुलढाणा 6.61 टक्के मतदान
हिंगोली 7.23 टक्के मतदान
नांदेड 7.73 टक्के मतदान
परभणी 9.72 टक्के मतदान
यवतमाळ-वाशिम 7.23 टक्के मतदान .
26 Apr, 24 : 10:46 AM
वर्ध्यात अमर काळेंनी बजावला मतदानाचा हक्क
वर्धा लोकसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आर्वी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असल्याने सर्वांनी मतदान करावे. ही लोकशाही वाचविण्याची निवडणूक आहे, असं अमर काळे यांनी म्हटलं आहे.
26 Apr, 24 : 10:39 AM
आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क
खामगाव: लोकशाहीचा लोकोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शुक्रवारी स्वतःच्या लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावून एका नवरदेवाने आधी लग्न लोकशाहीचे असा असा प्रत्यात मतदानाचा हक्क बजावला. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे लग्न पूर्वी नवरदेवाने मतदान केले.
26 Apr, 24 : 10:22 AM
अकोटमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड
अकोला : अकोट विधानसभा मतदारसंघातील तीन ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदान केंद्र ३३३ वरील ईव्हीएममध्ये मध्ये बिघाड झाला तर अकोट शहरातील मतदान केंद्र क्रमांक १५१, १५२ वर मॉक पोल घेताना मशीनमध्ये बिघाड दिसून आला. त्यामुळे वरील तिन्ही ठिकाणी दुसऱ्या मशीन नव्याने लावण्यात आल्या.
26 Apr, 24 : 10:19 AM
खामगाव विधानसभा मतदारसंघात सकाळच्या टप्प्यात ५.७९ टक्के मतदान
खामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ५.७९ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग लागली होती. खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २८९९९२ आहेत. त्यापैकी पुरूष मतदार १५२९६८ असून महिला मतदार १३७०२० आहेत. यापैकी १२२१० पुरूष व ४५८६ महिला मतदारांनी पहिल्या टप्प्यात मतदान केले. पहिल्या टप्प्यात ५.७९ टक्के मतदान झाले.
26 Apr, 24 : 10:19 AM
वरवट बकाल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन ३० मिनिटे बंद!
वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील १७३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजून १० मिनिटाच्या सुमारास जवळपास ३० मिनिटे ईव्हीएम मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद होती. केंद्रावरील नेमणूक अधिकारी यांनी प्रयत्न करून जवळपास ३० मिनिटांनी मशीन दुरूस्त केली. ३० मिनिटांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यास सुरूवात झाली.
26 Apr, 24 : 10:09 AM
अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात
अमरावती : लोकसभा मतदारसंघातील १९७५ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७ पासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. रात्रीपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी होती. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यत ६.३४ टक्के मतदान झाले.
26 Apr, 24 : 10:09 AM
अकोल्यात नऊ वाजेपर्यंत 7.17 टक्के मतदान
अकोला मतदार संघात पहिल्या दोन तासात सकाळी नऊ वाजेपर्यंत 7.17 टक्के मतदान
26 Apr, 24 : 10:08 AM
यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजतापर्यंत 7.23 टक्के मतदान झाले.
26 Apr, 24 : 10:07 AM
नांदेडमध्ये ऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान
नांदेड मतदारसंघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान
26 Apr, 24 : 10:05 AM
वेब कास्टिंगद्वारे मतदान केंद्रांवर प्रशासनाची नजर !
वाशिम : वाशिम जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली असून येथील सर्व मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनातील अधिकारी वेब कास्टिंगच्या माध्यमातून निरीक्षण व नियंत्रण करत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अपूर्वा बासुर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके वेब कास्टिंग रूम मध्ये उपस्थित आहेत.
26 Apr, 24 : 09:56 AM
वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बजावला मतदानाचा हक्क
वाशिम : वाशिम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी २६ एप्रिल रोजी सिविल लाईन्स येथील लॉयन्स विद्या निकेतन शाळा या मतदान केंद्र क्रमांक २२६ येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी करण्यात आलेली सजावट आणि स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी बूथ ऑफिसर यांचे कौतुक केले.
26 Apr, 24 : 09:55 AM
बुलढाण्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६. ६१ टक्के मतदान
बुलढाणा लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६. ६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये खामगाव विधानसभा मतदार संघात ५. ७९ टक्के, चिखली ९. ७० टक्के, जळगाव जामोद ३. १९ टक्के, बुलढाणा ४. ४२ टक्के, मेहकर ९.०७ टक्के आणि सिंदखेड राजामध्ये ७. ४० टक्के मतदान झाले आहे.
26 Apr, 24 : 09:48 AM
अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी नऊ वाजता पर्यंत ७.१७ टक्के मतदान
अकोला : अकोला मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात उत्साहात मतदान सुरू झाले असून सकाळी नऊ वाजता पर्यंत ७ १७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे .
दुपारी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे बघावयास मिळत आहे.
26 Apr, 24 : 09:21 AM
प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्यासह अकोल्यात मतदानाचा हक्क बजावला.
26 Apr, 24 : 09:19 AM
नवरदेव मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर
महाराष्ट्रातील अमरावती येथील नवरदेव मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाला. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.
#WATCH | A groom arrives at his designated polling station in Amravati to cast his vote in the Lok Sabha elections in Maharashtra
— ANI (@ANI) April 26, 2024
8 parliamentary constituencies are voting in the second phase of Lok Sabha polls in the state.#LokSabhaElections2024pic.twitter.com/egZLpMtt9g
26 Apr, 24 : 09:07 AM
अमरावतीमध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड
अमरावतीच्या रुक्मिणी नगरमध्ये मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड, एक तास मतदार रांगेत
26 Apr, 24 : 08:59 AM
महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी पळसो मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
अकोला: अकोला लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार पुत्र अनुप धोत्रे यांनी त्यांच्या पळसो येथील गावी जाऊन सकाळी ७ वाजता सपत्नीक मतदान केले.
26 Apr, 24 : 08:34 AM
नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
अकोला मतदारसंघ तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नवरदेव राहुल महादेवराव सोळंके रा.दहिगाव यांचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले.
26 Apr, 24 : 08:31 AM
ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले
देवळी (वर्धा): वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला पोहोचले. अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. सकाळी सव्वापाच वाजता संबंधित केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मशीन दुरुस्त करण्यात आले होते.
25 Apr, 24 : 09:33 PM
“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; फडणवीसांचा टोला
विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातात द्यायचा त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकीकडे पर्याय नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबरोबर महायुतीमधील सर्व पक्ष आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्यामागे २६ पक्षांची खिचडी आहे, या शब्दांत भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
25 Apr, 24 : 08:39 PM
मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर
लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे.
25 Apr, 24 : 05:17 PM
'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मत असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ
सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, अखेर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी बंडखोरी केली. यामुळेआता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे, आज काँग्रेसने सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेश दिले, तर आमदार विश्वजीत कदम यांनी या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील म्हणाले.
25 Apr, 24 : 04:16 PM
'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी(दि.26) उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. संविधान धोक्यात असल्याच्या INDIA आघाडीच्या आरोपांना पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पदोपदी अपमान करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.
25 Apr, 24 : 01:43 PM
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. आयोगाने २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.
25 Apr, 24 : 11:00 AM
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल- विनायक राऊत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष माझ्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरी सभा होईल. 3 मे रोजी कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील. या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
25 Apr, 24 : 10:52 AM
मुख्यमंत्री यांना अडचण होती, त्यांनी मला गुडफेथमध्ये शिरुरमधून लढता का विचारले होते. - छगन भुजबळ
शिरुरमध्ये ओबीसी आणि माळी समाज जास्त आहे तुम्ही तिथून लढता का ? असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारले होते. त्यांचा हेतू हा होता की मी तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. एक चांगला हेतू होता ते प्रयत्न करणारच. - मी सांगितले की ओबीसी समाज महाराष्ट्रात आहे. माझा संबंध नाशिकला, सगळे पालकमंत्री, आमदार नाशिकला. मी काही मागितलं नाही, नाशिक सोडून मला पाहिजे म्हणून मी कुठेही उभा राहणार ही माझी वृत्ती नाही. त्यामुळे शिरूर ला लढण्याचा प्रश्नच येत नाही, असे छगन भुजबळ यांनी अमोल कोल्हेंच्या दाव्यावर स्पष्ट केले.
25 Apr, 24 : 10:35 AM
गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपयांपर्यंत आणणार, सबसिडी देणार; शरद पवारांकडून जाहीरनामा प्रकाशित
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करणार.
केंद्र सरकारमध्ये रिक्त असलेल्या 30 लाख जागा भरण्याचा आग्रह करणार.
महिलांना शासकीय नोकरीत 50 टक्के आरक्षण देणार.
डिग्री आणि डिप्लोमा पास झाल्यावर विद्यार्थ्याला साडेआठ हजार शिष्यवृत्ती देणार
शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू
अग्निवीर योजना आम्ही बंद करू, प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ
25 Apr, 24 : 10:00 AM
शरद पवार आज जाहीरनामा प्रकाशित करणार
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत. यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
24 Apr, 24 : 05:42 PM
सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, केंद्रीय अमित शाह यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"हे स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले होते, पण त्यांनी तब्येतीचे कारण सांगत आले नाहीत. पण आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत, असंही अमित शाह म्हणाले.
23 Apr, 24 : 11:05 PM
शरद पवारांच्या उपस्थितीतील प्रचार सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले: अनंत गीते
सभा प्रचाराची सभा नाही तर विजयाची सभा आहे. शरद पवार यांच्या उपस्थिती मधील प्रचार सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष माझ्या निवडणूक प्रचारात आघाडीवर आहेत. ही निवडणूक एकतर्फी होईल, असा दावा ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी केला.
23 Apr, 24 : 10:55 PM
या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल: नारायण राणे
या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल. लोकसभा निवडणूक झाली की 16 पैकी दहा आमदार शिंदेंच्या गटात जातील. विनायक राऊत खासदार झाले तर त्यांना काय मिळणार? मी खासदार झालो तर मला कॅबिनेट मिळेल केंद्रात चारशे खासदार निवडून नेणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, असे नारायण राणेंनी म्हटले आहे.
23 Apr, 24 : 09:11 PM
भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले
महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मात्र, उद्धव ठाकरे यांचे संबोधन सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. मात्र, भर पावसात उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. मोदी-शाह यांचा नोकर असलेला निवडणूक आयोग आहे, त्यांनी आपल्या प्रचारगीतातील जय भवानी शब्द काढायाला सांगितला आहे. तुमचा जो महाराष्ट्राबाबत आकस आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे ना, पाहा प्रयत्न करून, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिले. आम्हीही जय श्रीराम असा जयघोष करतो. पण जय भवानी याबाबत तुमच्या मनात द्वेष आणि आकस का आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.
23 Apr, 24 : 07:57 PM
मला व उमेदवार दिनेश बुब ला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा कट होता: बच्चू कडू
आम्हाला परवानगी देऊन प्रशासनाने नाकारली. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करू. कायदा तोडण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. न्यायालयात जाणार पण न्यायालयावर पण शंका आहे. आचार संहिताचा भंग अमरावती पोलिसांनी केला आता जनतेने याला उत्तर द्यावं. 5 तास पोलीस आयुक्तांनी आमचा प्रचार थांबवला. दूध का दूध पाणी का पाणी करू. मला व उमेदवार दिनेश बुब ला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा प्लँन होता राणा दाम्पत्य पोलीसावर दबाव टाकत आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
23 Apr, 24 : 07:27 PM
स्वतःच्या पक्षातील नेते आपल्याला काय म्हणत आहेत याचा नाना पटोलेंनी विचार करावा: अरुण सावंत
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करीत आहेत. स्वतःच्या पक्षातील नेतेच तुम्हाला काय म्हणत आहेत याचा नानांनी विचार करावा. काँग्रेसच्या मागील 50- 60 वर्षांबद्दल काय सांगता? मोदींच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आणि मुख्यमंत्र्यांच्या गेल्या दोन वर्षात सर्व जाती धर्माची लोक त्यांच्या कार्यावर खुश आहेत, गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तेव्हा आता खोट्या थापा मारु नका, असा पलटवार शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी केला.
23 Apr, 24 : 07:00 PM
सांगलीमधील बंडखोरी ही पक्षाच्या हाताबाहेरील, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सांगली मधील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आज अपक्ष निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रचाराचा नारळ फोडला असून, यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात प्रतिक्रिया देताना काही बंडखोऱ्या या पक्षाच्या हातात राहत नाही, त्याला काही इलाज नाही असं म्हणत आता ही निवडणूक जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने होणार असं म्हणत, सांगलीतील बंडखोरी ही आमच्या हाताबाहेर असल्याचं मत व्यक्त केल आहे.
23 Apr, 24 : 06:59 PM
कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही
कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून साडे सहाशेहे एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले.
23 Apr, 24 : 06:57 PM
खासदारकीसाठी इच्छुक उमेदवार नेमके गेले कुठे?
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेकांनी खिंड लढविण्याची तयारी केलेली. पण, पक्षाकडून उमेदवारी न मिळणे, मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे जाणे यामुळे अनेकजण नाराज झाले. तरीही काहींनी पक्ष, आघाडी-युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. तर काहीजण अजूनही प्रचारात पूर्णपणे सक्रिय नसल्याचे दिसत आहे.
23 Apr, 24 : 06:43 PM
लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडेंकडे पहिलं जातं: डॉ. राजेंद्र शिंगणे
पंकजा मुंडे आल्याने प्रतापराव जाधव यांचे विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडे आपल्याकडे पहिल्या जाते. देशाची प्रतिमा नरेंद्र मोदींमुळे झाली. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास होत आहे. कोण प्रगती करू शकतो, याची जाण ठेवणे गरजेचे आहे, असे डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.
23 Apr, 24 : 06:42 PM
बारामतीत पराभवाची भीती; अमोल कोल्हेंची महायुतीवर टीका
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार शरद पवार आणि अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना तुतारी हे चिन्ह देऊन सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सांगत बारामतीत पराभवाची भिती दिसून येते, या शब्दांत टीका शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
23 Apr, 24 : 06:40 PM
अशोक चव्हाण यांना गल्लीत पण किंमत नाही: नाना पटोले
अशोक चव्हाण यांनी मर्यादेत बोलावे. त्यांच्या खूप गोष्टी मला माहिती आहेत, त्या बाहेर काढू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. अशोक चव्हाणांना राज्याच्या राजकारणात नाही तर गल्लीच्या राजकारणातही किंमत नाही, असा टोला नाना पटोलेंनी लगावला.
23 Apr, 24 : 06:39 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नखांची बरोबरी विरोधकांना येणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिल्ली अब दूर नही दिल्ली मे शिट्टी बजेगी, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी परभणीत विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीत एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पडायचे काम सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नखांची सुद्धा बरोबरी विरोधकांना येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
23 Apr, 24 : 06:20 PM
विचार करुन मतदान करावे, कारण हे आपलं शेवटचं मतदान असणार, असं माझं आवाहन: प्रियंका चतुर्वेदी
पुतिन शैलीची लोकशाही देशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात पाठवा किंवा त्यांना आपल्या बाजूने घ्या. आधी चंदीगड, मग रामटेक, मग खजुराहो याठिकाणच्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले. आता सुरत जिथं भाजपचा उमेदवार बिनविरोध आणि निवडणुकीशिवाय निवडून आला. ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे. मतदारांना आवाहन करते की, विचार करुन मतदान करावे, कारण हे आपलं शेवटचं मतदान असणार, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
23 Apr, 24 : 05:56 PM
गृहमंत्र्यांची कायदा तोडून सभा होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही: बच्चू कडू
बच्चू कडू मैदान ताब्यात घेण्याकरिता सायन्स कोर मैदानात दाखल झाले होते .कडू यांनी सभा घेण्याकरिता प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन आवश्यक त्या पैशांचा भरणा केला होता. परंतू ज्यावेळी बच्चू कडू मैदानात दाखल झाले त्यावेळी मैदानात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा मंडप टाकलेला होता. परवानगी असताना राणा यांचा मंडप काढला नाही उलट पोलिसांनी मैदानात येण्यास बच्चू कडूंना मनाई केली. मैदानाची परवानगी असताना बच्चू कडूंना पोलिसांनी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस सुरक्षेचा कारण सांगतात भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ही न पटणारी गोष्ट आहे भाजपा संस्कार आणि शिस्त प्रिय पक्ष आहे. शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही रवी राणा मात्र भाजपला बदनाम करत आहेत. गृहमंत्र्यांची कायदा तोडून सभा होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला जात आहे बच्चू कडू उद्याला दोन लाख लोक घेऊन सायन्स कोर मैदानात दाखल होणार राणांच्या मंडप उभा असताना सुसाट्याचा वारा आला आणि मंडप चा काही भाग खाली कोसळला बच्चू कडूंनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना हनुमानांनी प्रसाद दिला असं वक्तव्य बच्चू कडूंनी केले.
23 Apr, 24 : 05:54 PM
वंचित हा लढाऊ बाण्याचा पक्ष, वंचित थांबणार नाही: सिद्धार्थ मोकळे
वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्याने अर्ज मागे घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराला धमकावून, अर्ज मागे घ्यायला लावून गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की, वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ बाण्याचा पक्ष आहे, प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे अशा कितीही धमक्या दिल्या, धमकावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही, असे खडेबोल मोकळे यांनी सुनावले आहेत.
23 Apr, 24 : 05:49 PM
भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये: नाना पटोले
राहुल गांधी कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान हास्यास्पद आहे. राहुल गांधींनी ठरवले असते तर २००४ ते २०१४ या दहा वर्षात ते केव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? लोकसभा निवडणुकीनंतर तुमची अवस्था काय असेल त्याची चिंता एकनाथ शिंदे यांनी करावी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची चिंता करु नये. भाजपाने सांगितले तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये, या शब्दांत नाना पटोलेंनी निशाणा साधला.
23 Apr, 24 : 05:41 PM
विरोधक जितक्या शिव्या देतील, पंतप्रधान मोदींना तितकाच मोठा विजय मिळेल: देवेंद्र फडणवीस
विरोधक निराश झाले आहेत. पराभवाच्या भीतीने विरोधकांनी आता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली जाते, तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा विजय मोठा होतो. विरोधक मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढेच लोकांचे मोदींप्रति असलेले प्रेम वाढेल. बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात. आपल्या राज्यावर आणि देशावर संकटे येतात, ते दूर करण्याकरिता शक्ती मागितली आहे. तसेच आमच्यासाठी बुद्धी, तर विरोधकांकरिता सुबुद्धी मागितली आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी केलेले एक काम दाखवावे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद होते. पंचवीस वर्ष महानगरपालिका होती. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही. यांची भाषणेही ठरलेली आहेत. उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे बोलून दाखवू शकतो, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
23 Apr, 24 : 05:18 PM
सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा
महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एका कार्यक्रमातील सभेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. "मी सुद्धा २५ वर्ष इथं कसलेला पैलवान आहे. कोणाला कधी चितपट करायचं, हे मला माहीत आहे. येथील कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनो माझ्या नादाला लागू नये, अशा शब्दात सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
23 Apr, 24 : 05:00 PM
संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
23 Apr, 24 : 04:48 PM
महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले
"माझे मित्र महादेव जानकर यांची शिट्टी ही खूण आहे. संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आपण सर्वांनी त्यांना शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून निवडून द्यावं" असं आवाहन उदयनराजेंनी केलं आहे.
23 Apr, 24 : 04:31 PM
अपक्ष उमेदवारालाही दिले तुतारी चिन्ह
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आहे.
23 Apr, 24 : 04:08 PM
लातूरमध्ये खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर लोकसभेसाठी २८ उमेदवार मतपत्रिकेवर आहेत. ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस उमेदवारांत लढत होणार हे स्पष्ट झाले असले तरी वंचित फॅक्टरही चर्चेत राहणार आहे.
23 Apr, 24 : 03:53 PM
भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल - आदित्य ठाकरे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
23 Apr, 24 : 03:20 PM
नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट!
आमचा नाशिकच्या जागेवर अजूनही दावा कायम आहे, आमच्याकडे महिला उमेदवारही आहेत. आमच्याकडील लोक सतत काम करत असतात. फक्त निवडणुकीसाठी काम करत नाहीत, भाजपामध्येही उमेदवारी खूप आहेत. शिवसेनेकडेही उमेदवार आहेत, महायुतीचा कोण उमेदवार असेल त्यांचा प्रचार करणार आहे असं छगन भुजबळ म्हणाले.
23 Apr, 24 : 02:58 PM
मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!
"अजितदादा हे पवारसाहेबांना वडील म्हणतात. मात्र स्वत:चं व्यावसायिक साम्राज्य वाचवण्यासाठी ते आता वडिलांना सोडून भाजपसोबत गेले आहेत. २०१९ ला पार्थ पवार हे श्रीरंग बारणे यांच्याविरोधात निवडणुकीत उभा होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. अजितदादा वडील म्हणून मुलाच्या पराभवाचा बदला घेणार नसतील, पण हा भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इथं प्रचार करण्यासाठी आला आहे" असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
23 Apr, 24 : 02:21 PM
सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंवर - एकनाथ शिंदे
शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत मेहनत घ्यावी लागेल असे महसूल मंत्री विखे पाटील आपल्याला म्हणाले. मात्र लोखंडेना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विखे पाटील यांच्यावर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी राहता येथे पार पडलेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
23 Apr, 24 : 01:48 PM
चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का असे प्रश्न विचारले आहेत.
23 Apr, 24 : 01:27 PM
शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा हजारवेळा झाली असेल, राजकारणात चर्चा होत असतात. वेगवेगळ्या निर्णयावर होत असतात, वेगवेगळ्या धोरणावर होतात. प्रश्न आहे की अंतिम निर्णय काय? अंतिम निर्णय आहे की, भाजपाबरोबर नाही हा आहे. भाजपाबरोबर जाण्यासाठी आमच्यातील काही लोकांनी चर्चा केली. काही लोक त्यांच्यासोबत गेले. त्यांना वाटतं जाण हिताच आहे, आम्हाला वाटतं जाण हिताच नाही. राजकारणात सुसंवाद ठेवला पाहिजे, सुसंवाद ठेऊन त्याच्यातून निष्कर्ष वेगवेगळे निघत असेल तर त्या निष्कर्षाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, भाजपा आणि आमची विचारधारा वेगळी आहे हाच आमचा निष्कर्ष होता. त्यामुळे चर्चा झाली आणि त्या चर्चेत दोन मत झाली - शरद पवार
23 Apr, 24 : 01:12 PM
उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सोळा जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. निवडणुकीचे चित्र यापूर्वीच स्पष्ट झाले असून, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, चिन्हांचेही वाटप अपक्ष उमेदवारांना करण्यात आले.
23 Apr, 24 : 12:54 PM
"उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "उद्धवजी…. तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीये…देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घातलंय. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता. स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
23 Apr, 24 : 12:37 PM
वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन
मुंबई दक्षिण मतदारसंघात यंदा मविआ-महायुतीची लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते. निवडणूक जाहीर होताच मविआतील उद्धवसेनेने या मतदारसंघात पुन्हा एकदा अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीच्या उमेदवारीचा प्रश्न सुटलेला नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी पक्षही उमेदवार देणार असे बोलले जात आहे. यापूर्वी मनसेचा महायुतीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि वंचितच्या उमेदवारामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतांच्या विभाजनाची शक्यता नाकारता येत नाही.
23 Apr, 24 : 12:19 PM
उमेदवारांचा पदयात्रांवर भर
उत्तर पूर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दुसऱ्या फेरीतील प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांनी पहिल्या फेरीत जवळपास सगळा मतदारसंघ पिंजून काढला आहे. दोन्ही उमेदवारांनी पदयात्रांवर भर दिला होता.
23 Apr, 24 : 12:08 PM
गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
"जे चांगलं आहे आणि योग्य आहे त्यांचं नाव सर्वजण घेतील. जगभरात मोदींचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही जर पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं नाही तर जग घेईल. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आणि गेल्या 10 वर्षांत देशात जे काही घडलं, ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं" असं गोविंदाने म्हटलं आहे.
23 Apr, 24 : 11:53 AM
महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची पुण्यात सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे दाैऱ्यावर येणार आहेत. २९ एप्रिल रोजी त्यांचा पुणे दाैरा असणार आहे. पंतप्रधानांची सभा आणि रोड शो होणार आहे. तसेच ते एकदिवसीय मुक्कामासाठी राजभवन येथे असणार आहेत. या कालावधीत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
22 Apr, 24 : 11:36 PM
ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, कोण असली कोण नकली लवकरच करेल: राजू पाटील
ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. कोण असली कोण नकली वाघ हे लवकरच करेल. राजकारण करा परंतु नेरिटीव्ह सेट करू नका. एक नरेटिव्ह केले जात आहे. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार बघतोय एवढ्या घटना राजकीय घडल्या असता काय उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करून साधे विचारणा सुद्धा केली नाही. त्यांच्या घराशेजारी शपथविधी होता. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले नाही. आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे. राज ठाकरेंनी आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी हा निर्णय आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या निवडणुका राज्यसभा, विधानसभा आमचे समर्थन मागितले. त्यामुळे मी हे बोललो होतो, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
22 Apr, 24 : 10:54 PM
विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही: अनिल देसाई
काँग्रेस नेते चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वात इंडिया अलायन्स आणि सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला सर्व नेते आणि पदाधिकारी हे उपस्थित होते. उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या बैठकीला मिळाला. जिथे जिथे जात आहोत तिथे उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. आम्ही सर्व ठिकाणी प्रचार करतोय सर्व जाती धर्मातले लोक मला भेटतात माझ्यासोबत आहेत, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
22 Apr, 24 : 10:22 PM
माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना दिल्या शुभेच्छा
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत उभा असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह शिवसेनेचे श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर शिसेनेच्या फूट पडल्या नंतर ठाकरे गटात राहणे पसंत केले होते .कल्याण लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते .मात्र गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त झाले आहेत. आगरी सामुहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून माध्यमांसमोर बोलतांना त्यांनी टीका टिपणी करणे टाळत कल्याण लोकसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या दोन्ही उमेदवाराना शुभेच्छा दिल्या आहेत.
22 Apr, 24 : 09:40 PM
गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, जीवन राष्ट्राला समर्पित केले: CM एकनाथ शिंदे
दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केले आहे. दुसरीकडे राहुल गांधी थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिथे भारताची बदनामी करतात. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांपासून आपण लांब राहिले पाहिजे. मराठा आरक्षण देण्याची मी शपथ घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता १० टक्के आरक्षण दिले. काहीजण न्यायालयात आरक्षण रद्द करण्यासाठी गेले. संधी असताना राजकारण दिले नाही. मराठा समाजाचा केवळ राजकारण करण्यासाठी वापर केला. परंतु काही विघ्नसंतोषी लोक राज्यात फिरत असून त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. ते काही देणारे नाहीत. पण जर तुम्हाला मिळणारे असेल ते हिसकावून घेणारे आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
22 Apr, 24 : 09:31 PM
दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा; उद्धव ठाकरे कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. दुसरीकडे विदर्भात बेकारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात एकही उद्योग येथे आला नाही. जगाचा पोशिंदा संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. तरीही ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ असे नरेंद्र मोदी म्हणत आहे. त्यांनी गुजरातला सर्व उद्योग नेल्याने आता मोदी यांनाही गुजरातला परत जा म्हणण्याची वेळ आली आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
22 Apr, 24 : 08:53 PM
खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील भाजपा नगरसेवकांसह, काँग्रेस नगरसेवकांची घेतली भेट
खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील प्रतिष्ठित लोकांची भेट घेतली. आज सकाळपासूनच कल्याण ग्रामीण डोंबिवली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक संस्था व मंडळांच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. सायंकाळी डोंबिवली पश्चिमेकडील माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, काँग्रेसचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, जितू भोईर यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्तींची सदिच्छा भेट घेत आहेत.
22 Apr, 24 : 08:28 PM
महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधात प्रचारासाठी आणावे लागतात: रविकांत तुपकर
महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधात प्रचारासाठी आणावे लागतात. राष्ट्रीय अध्यक्षांपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे येऊन माझ्यावरच तुटून पडतात. याचा अर्थ समजून घ्या, जनतेने ठरवलेले आहे. शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला सभागृहात पाठवायचे, हा निर्णय जनतेचा झालेला आहे. हा सर्वे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे, त्याच्यामुळेच त्यांनी धास्ती खाल्लेली आहे. मोठमोठे कॅबिनेट मंत्र्यांना आणतायत. त्यांना कितीही नेते आणू द्या, नेते तिकडं जनता आमच्यासोबत राहणार आहे. विजय हा सत्याचाच होणार, असे बुलढाण्याचे उमेदवार रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
22 Apr, 24 : 08:09 PM
माढा लोकसभेसाठी माणमधील सर्वाधिक मतदार
सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या माढा लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार आपला हक्क बजावणार आहे. या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. तसेच मतदारांची आकडेवारीही समोर येत आहे. त्यानुसार माढा मतदारसंघात १५ मार्चपर्यंत नोंदणी असलेले १९ लाख ८० हजार ८५९ मतदार आहेत. तरीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दहा दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यामुळे आणखी काही मतदारांचा आकडा वाढलेला आहे. या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदार हे माण विधानसभा मतदारसंघातील आहेत. माणध्ये ३ लाख ४८ हजार २०५ मतदारांची नोंद झालेली आहे. त्यानंतर माळशिरसमध्ये ३ लाख ३५ हजार ८२३ मतदार आपला हक्क बजावणार आोत. तर माढा विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४५०, फलटण ३ लाख ३४ हजार ८५५, करमाळा ३ लाख १६ हजार ७४५ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात ३ लाख १० हजार ५१ मतदार हे १५ मार्चपर्यंत नोंद झालेले आहेत. यावरुन माढा लोकसभेसाठी ६ लाख ८२ हजार मतदार हे सातारा जिल्ह्यातील असणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे.
22 Apr, 24 : 08:08 PM
लातूर लोकसभेच्या मैदानात २८ उमेदवार, दोन मतदान यंत्रे लागणार
लातूर लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात तीन जणांनी माघार घेतली आहे. दरम्यान, लोकसभेसाठी एकुण ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यात छाननीत पाच जणांचे अर्ज बाद झाले होते. आता तिघांनी माघार घेतल्याने २८ जण उमेदवार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
22 Apr, 24 : 07:43 PM
अकृतीशील प्रीतम मुंडेंमुळेच बीड मागास: जयंत पाटील
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या अकृतीशील असून गेल्या पाच वर्षात मतदारसंघात त्यांनी काय कामं केली हे लोकांसमोर आणणार असून, प्रीतम मुंडे यांच्यामुळेच बीड जिल्हा मागास राहिल्याचा आरोप करत, बीडची निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
22 Apr, 24 : 07:36 PM
वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभेचे वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राहुल गायकवाड हे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आहेत.
22 Apr, 24 : 07:15 PM
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जनतेने ठरवले आहे की, अब की बार ४०० पार. देशात कोण आहे त्यांच्यासमोर? राहुल गांधी गरम झाले की, परदेशात थंड हवा खायला जातात, इथे उन्हाळा, पावसाळा, दिवस रात्र या देशाची सेवा करणारा पंतप्रधान हा नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळाला. देशाची बदनामी करणाऱ्याला की देशाची उन्नती करणाऱ्याला लोक निवडून देणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
22 Apr, 24 : 07:13 PM
तुम्ही आगरी आणि कोळी समाजाची माफी मागितली पाहिजे: वर्षा गायकवाड
पियुष गोयल यांना कोळीवाड्यातून फिरताना माशांचा वास सहन झाला नाही. आगरी आणि कोळी नागरिकांनी मोर्चा काढला. कोळीवाड्यातून फिरताना नाकाला रुमाल लावला, याबद्दल त्यांनी निश्चित करण्यासाठी चालते त्या ठिकाणी गेले होते आमचे काही कार्यकर्ते होते. निदर्शन संपल्यानंतर सिग्नलवर गाडी थांबली असता भाजपचा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. महिला आणि मुले यांच्यावर हल्ला केला त्याची तक्रार करण्यासाठी आलो आहोत. त्यांच्यावर केस घेतली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा सुव्यवस्था पाळणे हे पोलिसांचे काम आहे आम्ही अपेक्षा करतो त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांना माशांचा वास सहन होत नाही त्यांची तुम्ही बाजू घेता. मला त्यांना विचारायचे आहे की, तुम्ही निवडणूक का लढत आहात, अशी टीका काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केली.
22 Apr, 24 : 07:10 PM
जालन्यात शिवसेना दलित आघाडीचे ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज
न्यायालयीन लढाई लढणारे ॲड. भास्कर मगरे यांनी लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मगरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जामुळे जालन्यासह राज्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. कारण ॲड .भास्कर मगरे हे शिवसेना शिंदे गटाचे दलित आघाडीचे प्रमुख असून एकीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे महायुतीकडून जालना लोकसभेसाठी उमेदवार आहेत. यावेळी बोलताना ॲड. भास्कर मगरे म्हणाले की मी माझ्या या जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये गोरगरीब कष्टकरी व गायरान धारक यांच्या अडीअडचणी न्यायालयीन मार्गाने सोडवल्या आहेत त्यामुळे माझ्या मागे मोठा जनसमुदाय उभा राहिलेला आहे आणि या जनसमुदायाने सुचवले आहे की तुम्ही आमच्यासाठी संसदेत आवाज उठवणारे एकमेव व्यक्ती आहे, एक अभ्यासू व सुशिक्षित आहात त्यामुळे या जालना जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर मी उभा रहावे अशी इच्छा संपूर्ण जालना जिल्ह्यातून व्यक्त करण्यात आली होती आणि त्यावरूनच मी आज हा माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये मी महायुती कडूनही फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष ही फॉर्म भरलेला आहे. आता २६ तारखेपर्यंत बघू पक्ष व पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात ते आणि तसे नाही झाले तर मी अपक्ष म्हणून लढेल अशी प्रतिक्रिया ॲड. भास्कर मगरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
22 Apr, 24 : 07:08 PM
भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांचीही इच्छा होती: रवी राणा
नवणीत राणा यांना तिकीट देऊन माझी चूक झाली, मी अमरावती करांची माफी मागतो, असे वक्तव्य शरद पवार यांनी अमरावती येथील सभेमध्ये केले. यावर रवी राणा प्रतिक्रिया देत म्हणाले की, २०१९ मध्ये शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता. आज नवनीत राणा यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली. आज नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या, तेव्हा नवनीत राणा यांनी त्यांना सांगितले होते, त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या, त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवार यांना त्यांनी भाजपसोबत पाठवले. अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई त्यांना थांबावे लागले. शरद पवार यांच्या मनात भाजप आहे, फक्त ओठावर विरोध आहे, त्यांचा मनामधल्या भाजपमध्ये नवनीत राणा आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील, असे रवी राणा म्हणाले.
22 Apr, 24 : 07:06 PM
जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो: विशाल पाटील
ही लढाई जनतेची, अस्तित्वाची, स्वाभीमानाची आहे. माझ्या उमेदवारीला अनेक अडथळे आणायचा प्रयत्न. कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँगेसचा मी विशाल पाटील बंड केलेला उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाचा विचाराचा उमेदवार आहे. मी सर्व पक्षीय उमेदवार आहे. पदाची अपेक्षा केली हा काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचा लढा आहे. मी स्वार्थ पाहिला नाही. जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो. मला चिन्ह मिळू नये, माझे बॅलेट मशिनवर नाव सर्वांत खाली यावे असेपर्यंत झाले. हे सगळे कोण करतय याचा लवकर खुलासा करू, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. माघार न घेण्याच्या निर्णयाबाबत ठाम असलेले विशाल पाटील माध्यमांशी बोलत होते.
22 Apr, 24 : 04:03 PM
लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार!
Lok Sabha Elections 2024: सर्वत्र लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे वाहत असताना गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. सुरतची जागा बिनविरोध जिंकण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले असून, भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली जाईल. सुरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.
22 Apr, 24 : 03:51 PM
लोकसभेच्या मैदानात विशाल पाटील यांची माघार नाहीच; कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीची सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
22 Apr, 24 : 02:27 PM
अमित शाह यांचा २४ तारखेचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौरा रद्द: रविंद्र चव्हाण
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार होते. पण, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेरे रविंद्र चव्हाण यांनी दिली.अमित शाह २४ तारखेला येणार होते. पण, वातावरणातील बदलामुळे हा दौरा रद्द झाला आहे. लवकरच दोऱ्याची पुढील तारीख जाहीर केली जाईल, असंही चव्हाण म्हणाले.
22 Apr, 24 : 11:50 AM
...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
महाविकास आघाडी सरकार काळात माझा प्रत्येकवेळी अपमान होत होता, माझ्या खात्यामध्ये १०० टक्के हस्तक्षेप केला जात होता, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात प्रचारसभा सुरू आहेत.
22 Apr, 24 : 09:55 AM
माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा
महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ उद्धव सेनेच्या वाट्याला गेल्याने बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. सांगलीत तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, इथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची मुदत आहे.
21 Apr, 24 : 11:45 AM
'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत, १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. भाजपाने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपा या निवडणुकीत किती जागा जिंकणार यावर अनेकांनी दावे केले आहेत. आता आणखी एका प्रसिद्ध अर्थतज्ञांनी दावा केला आहे. अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी भाजप स्वबळावर ३३० ते ३५० जागा जिंकू शकेल, असा दावा त्यांनी केला. तामिळनाडू सारख्या राज्यात ५ जागा जिंकू शकतात असंही त्यांनी म्हटले आहे.
20 Apr, 24 : 06:01 PM
अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेने आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमधील रस्सीखेच संपली. तसेच पक्षांतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या विविध नावाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
20 Apr, 24 : 04:51 PM
बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला
बारामतीत केव्हा काय होईल याचा कोणीच नेम सांगू शकत नाही. कारण पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होऊ घातली आहे. गेल्यावेळी सुप्रिया सुळेंविरोधात लाखो मते पडली होती. आता पवारांच्या घरातील मुलगी आणि सून अशा दोन्ही एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. सुळेंविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले आहे. त्यांच्या अर्जात काही दोष निघाला आणि अपात्र ठरला तर आपला दावा असावा म्हणून खुद्द अजित पवारांनी डमी अर्ज दाखल केला होता. यावरून रोहित पवारांनीही टीका केली होती. आता हा अर्जच बाद ठरला आहे.
20 Apr, 24 : 01:59 PM
"जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसच्या राजकुमारांना वायनाडमध्ये संकट दिसत आहे. त्यांना जसं अमेठीतून पळून जावं लागलं तसंच वायनाड सोडावं लागेल" असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.
20 Apr, 24 : 12:10 PM
'इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले, निवडणुकीच्या आधीच हार मानली'; पीएम मोदींचा नांदेडमधून हल्लाबोल
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. 'देशात इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, मतदाता मत द्यायला जातात तेव्हा बोलतात की , या इंडिया आघाडीवाल्याकडे चेहराच नाही. एवढा मोठा देश आम्ही कोणाकडे द्यायचा. इंडिया आघाडीवाल्यांना हे सांगताच येत नाही. या लोकांनी दावे काहीही केले तरी त्यांनी निवडणुकीआधीच हार मानली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली.
20 Apr, 24 : 11:46 AM
'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल' : शरद पवार
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. 'पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, यावेळी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, ऐनवेळी शरद पवार यांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला, यामुळे पहाटेचा शपथविधी झाला',असा दावा अजित पवार यांनी काल केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. या दाव्याला आता खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.'भाजपासोबत जायला आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि राहणार नाही', असं सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला.
19 Apr, 24 : 08:17 PM
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान
सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून 77.57% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून 76.10% मतदान झाले आहे. मेघालय 69.91%, मध्य प्रदेश 63.25%, तामिळनाडु 62.08%, यूपी 57.54%, बिहार 46.32%, उत्तराखंड 53.56%, जम्मू-कश्मीर 65.08%, राजस्थान 50.27%, छत्तीसगढ़ 63.41%, असम 70.77%, पाँडिचेरी 72.84%, अरुणाचल 64.07%, नागालैंड 56.18%, मिजोरम 53.96%, सिक्किम 68.06%, मणिपुर 68.62%, अंडमान निकोबार 56.87%, लक्षद्वीप 59.02%, महाराष्ट्र 54.85% एवढे मतदान झाले आहे.
19 Apr, 24 : 06:49 PM
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राणे कुटुंबीय आमची अशीच लढत - विनायक राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राणे कुटुंबीय आमची अशीच लढत आहे. त्यामुळे ही ब्याद भाजपला देखील परवडणारी नाहीय. शिवसैनिक तर पेटून उठलाय. शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला ही निवडणूक वन साईड होणार. निकाल ज्यावेळी येईल विनायक राऊत यांचा विजय हा अडीच लाखांनी होईल. आजचे शक्ती प्रदर्शन म्हणजे केविलवाणा प्रयत्न - विनायक राऊत - खासदार
19 Apr, 24 : 06:30 PM
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 56.87% मतदान
सकाळी 7 ते सायंकाळी 05 पर्यंत
गोंदिया जिल्हा
63- अर्जुनी मोरगाव- 53.20
64- तिरोडा - 56.69
65- गोंदिया - 56.11
66- आमगाव -64.60
भंडारा जिल्हा :
भंडारा - 56.79
साकोली - 58.79
तुमसर - 58.94
19 Apr, 24 : 06:07 PM
भंडारा जिल्हा : विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
भंडारा जिल्हा : विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
दुपारी 5 वाजेपर्यंत
अर्जुनी मो. - 53.20
भंडारा - 56.79
गोंदिया - 56.11
साकोली - 58.79
तिरोडा - 56.69
तुमसर - 58.94
19 Apr, 24 : 05:18 PM
जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा - भरत गोगावले
नाशिकच्या जागेसाठी भुजबळ यांनी माघार घेतली असेल तर त्यांचे स्वागत आहे. याचबरोबर जर मोदींना चारशे पार करून पंतप्रधान करायचे असेल आणि महाराष्ट्रामध्ये 45 प्लस खासदार निवडून आणायचे असतील तर एकमेकांच्या जागेवर आग्रह धरण्यापेक्षा जिथे ज्याला गरज आहे तिथे त्यांनी समोरच्याला मदत करावी. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्याचप्रमाणे जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा, असे आवाहन भरत गोगावले केले.
19 Apr, 24 : 03:58 PM
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी दाखल करताना किरण सामंत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवींद्र चव्हाण तसेच शिवसेना नेते दिपक केसरकर उपस्थित होते.
19 Apr, 24 : 03:57 PM
रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं - किरण सामंत
महाराष्ट्रामध्ये 45 प्लस करण्या करीता तसेच कुटुंबाशी चर्चा करून माघार घेतली नाराज नाही. या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असतं तर भरपूर मतदान मिळालं असतं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहाणाराच ते सहाजिकच आहे. भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याने सांगितले म्हणून मी उमेदवारी मागे घेतल्याचे ट्विट डिलिट केले होते, असे किरण सामंत म्हणाले.
19 Apr, 24 : 03:56 PM
प्रियंका गांधींचे निकटवर्तीय कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात, बाजीराव खाडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले नेते बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाजीराव खाडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी तयारी केली होती. आपला माणूस मातीतला माणूस ही टॅगलाईन वापरत शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजीही केली होती. प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी देण्यात आली होती यामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या टीम मध्ये बाजीराव खाडे यांचाही समावेश होता.
2019 ला माझ्या उमेदवारीचा विचार होता मात्र तो डावलला गेला. वरिष्टांचा निर्णय राज्य पातळीवर मानला जाणार नसेल तर वरिष्टांचा अपमान कशाला करायचा असं म्हणत खाडे यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला.
19 Apr, 24 : 03:54 PM
दुपारी 3.00 वाजेपर्यंतचे मतदान...
भंडारा गोंदिया : 45.88
चंद्रपूर : 43.48
गडचिरोली-चिमुर : 55.97
नागपूर : 38.43
रामटेक : 40.10
19 Apr, 24 : 03:51 PM
कुरखेडा तालुक्याच्या पाच बूथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; दोन तासांनी उशिरा सुरू झाले मतदान
गडचिरोली कुरखेडा तालुक्यातील पाच बुथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदान उशिरा सुरू झाले. बुथ परिसरात मतदानासाठी नागरिकांची रांग लागली असतानाच काही काही मतदारांना ताटकळत राहावे लागले.
19 Apr, 24 : 03:16 PM
नाशिकच्या उमेदवारी संदर्भात माघार घेतो: छगन भुजबळ
महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून अद्यापही तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गेल्या काही दिवसांत काय काय घडामोडी घडल्या, याची माहिती देत, छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारी संदर्भात माघार घेतो, अशी मोठी घोषणा केली.
19 Apr, 24 : 03:13 PM
मतदाररथात बसवून नवमतदारांची बुथपर्यंत वाजत-गाजत मिरवणूक
लाेकशाहीच्या उत्सवात सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवारी गडचिराेली शहरात नव मतदार, दिव्यांग, वृध्दांची मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मतदान केंद्रापर्यंत पाेहाेचल्यानंतर मतदारांनी हक्क बजावला.
19 Apr, 24 : 03:12 PM
गडचिरोलीत दुपारी १ वाजतापर्यंत ४० टक्के मतदान
नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात गडचिराेली-चिमुर लाेकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल राेजी शुक्रवारला मतदानाची प्रक्रिया घेण्यात येत आहे. तीन जिल्हयातील ६ विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या या लाेकसभा क्षेत्रात सकाळी ७ पासून दुपारी १ वाजतापर्यंत एकुण ४०.३१ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यापेक्षाही गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात दुपारी १ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी अधिक हाेती.
19 Apr, 24 : 01:40 PM
दुपारी १ वाजेपर्यंत किती मतदान झाले?
भंडारा गोंदिया : ३४.५६%
चंद्रपूर : ३०.९६ %
गडचिरोली-चिमुर : ४१.०१ %
नागपूर : २८.७५ %
रामटेक : २८.७३ %
19 Apr, 24 : 01:39 PM
भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क
पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान घेण्यात येत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत वणी आणि आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघात मतदार मतदान करण्यासाठी केंद्रांवर येत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रतिभा धानोरकर तर महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार अशी लढत होत आहे. भाजपचे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील कुटुंबासहीत मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर नाही आहे कारण प्रतिभा धानोरकर यांची सुधीर मुनगंटीवार यांच्याशी विकासाच्या बाबतीत तुलनाच होत नाही, प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात केलेले काम शून्य आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आहे.
19 Apr, 24 : 01:27 PM
वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू; तुळशी येथील वराने सहकुटुंब केले मतदान
लाेकशाहीच्या उत्सवात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ याचा प्रत्यय तुळशी येथे आला. देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील रहिवासी सुरेश अवसरे यांचे चिरंजीव प्रफुल यांचा विवाह मु. सोनी (चप्राड) ता. लाखांदूर जि. भंडारा येथील रहिवासी आनंदराव भावे यांची कन्या शिल्पा हिच्या सोबत शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११: ३० वाजता नियाेजित हाेता. हा विवाह साेहळा वधुमंडपी सोनी (चप्राड) येथे पार पडणार हाेता. विवाह संमारंभाला जाण्यापूर्वी वराने आई-वडील, आजी, काका यांच्यासह तुळशी येथील बुथ क्रमांक १३३ वर सहकुटूंब मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.
19 Apr, 24 : 12:10 PM
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी १९.१७ टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.
19 Apr, 24 : 11:55 AM
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी लागले रांगेत, सर्वसामान्यांप्रमाणे मतदान
एरवी मतदान करताना व्हीआयपी किंवा मोठे अधिकारी थेट मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावताना दिसतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत लागून मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या साधेपणामुळे सर्वसामान्यांकडूनदेखील कौतुकोद्गार काढण्यात येत होते.
19 Apr, 24 : 11:46 AM
तीन ठिकाणी तांत्रिक अडचण; हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम
तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचात मतदान प्रक्रिया सुरु असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आले व प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.
19 Apr, 24 : 11:45 AM
सकाळी ११ वाजेपर्यंत किती झाले मतदान?
भंडारा गोंदिया : १९.७२ %
चंद्रपूर : १८.९४ %
गडचिरोली-चिमुर : २४.८८ %
नागपूर : १७.५३ %
रामटेक : १६.१४ %
19 Apr, 24 : 11:43 AM
नाना पटोले यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.
19 Apr, 24 : 11:26 AM
सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या उमेदवारांचेही मतदान
काही किरकोळ घटना वगळता चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान सुरू आहे. चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथे एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर शहरातील सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर वरोरा येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
19 Apr, 24 : 11:24 AM
आधी लोकशाहीचे 'कर्तव्य', नंतर नवरदेव बोहल्यावर; लग्नाची वरात, मतदान केंद्रात
भावनेपेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे असते, असे म्हणतात. या उक्तीला साजेसे काम शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील एका कुटुंबाने केले. लग्नाची वरात कर्नाटकला निघण्यापूर्वी नवरदेवाने कुटुंबासह मतदान केंद्र गाठले व लगीनघाईतही मतदानाचा अधिकार बजावत नंतर बोहल्यावर चढणे पसंत केले. हरिश शिंदे असे नवरदेवाचे नाव आहे. त्यांचे सिरोंचात पुस्तकांचे दुकान आहे. १९ एप्रिलला कर्नाटकात त्यांचा विवाह होणार आहे. याच दिवशी मतदान असल्याने शिंदे कुटुंबापुढे पेच निर्माण झाला होता. घरात पै-पाहुणे, लग्नाची घाई असतानाही हरिश शिंदे यांनी मतदान करुनच बोहल्यावर चढण्याचे ठरवले.
19 Apr, 24 : 11:14 AM
देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री आणि पत्नीसह केले मतदान
19 Apr, 24 : 11:11 AM
किशोर जोरगेवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. आपल्या एका मताने आपण लोकशाहीच्या मंदिरात आपला प्रतिनिधी पाठवतो. मी माझे कर्तव्य बजावले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठीचे माझे कर्तव्य पार पाडले आहे. मी चंद्रपूरकरांना विनंती करतो की, लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.
19 Apr, 24 : 11:10 AM
ईव्हीएम मशिन बंद पडल्याने तासभरापासून मतदान ठप्प
गोंदियातील गोरगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील मतदान केंद्र क. ४८ वर ईव्हीएम मशिन बंद पडल्याने तासभरापासून मतदान ठप्प.
19 Apr, 24 : 11:00 AM
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत
आमच्या एनडीएच्या सर्वच कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपला ही जागा मिळाली आहे मला खात्री आहे इथे कमळ फुलेल नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील. संकल्प पत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने केलेला आहे. आम्ही मागचे दोन संकल्प 99 टक्के पूर्ण केलेले आहेत मोठे निर्णय मोदीजी तिसऱ्या टर्ममध्ये घेतील. तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश पुढे येईल मोदीजी, शहाजी, नड्डाजी यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपला ही जागा दिली अडीच लाखांच्या मताधिक्याने विनायक राऊत पडतील. 48 पैकी 40 पैकी जास्त भाजप जिंकेल. गोव्यातील आम्ही दोन्ही जागा जिंकू. उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला याचा परिणाम अजिबात होणार नाही, नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
19 Apr, 24 : 10:54 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आईसह नागपूर येथे मतदान केले. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.
19 Apr, 24 : 10:38 AM
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परिवारासह ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथील देलनवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी, या देशाचे मूलभूत अधिकार जनतेला मिळावे म्हणून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
19 Apr, 24 : 10:32 AM
नागपूर विभागात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान
नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान पार पडले.
19 Apr, 24 : 10:31 AM
भंडारा -गोंदियात सकाळी ९ पर्यंत ७.२२ टक्के मतदान
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्यात मतदान सुरू झाले. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तिव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचत आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मतदारसंघात ७.२२ टक्के मतदान झाले होते.
19 Apr, 24 : 10:12 AM
लालबहादूर शास्त्री मतदान केंद्रावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे मतदान
भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री केंद्रावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सपत्नीक येऊन मतदानाचा हक्क बजावला.
19 Apr, 24 : 09:54 AM
भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत
भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही सकाळीच मतदानासाठी गर्दी उसळलेली पाहण्यात आली.
19 Apr, 24 : 09:48 AM
नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा; गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी
माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती.
19 Apr, 24 : 09:47 AM
१०१ टक्के मोठ्या मार्जिनने जिंकणार: नितीन गडकरी
भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना १०० नाही तर १०१ टक्के जिंकणार. यावेळेस मार्जिन वाढेल. भाजपाचा ४०० पारचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
19 Apr, 24 : 09:45 AM
नागपुरात मतदानाचा उत्साह
लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. नागपुरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुकुशीला मुकुंद चितळे या ८३ वर्षीय आज्जींनी तसेच शितल लोहकरे या १८ वर्षाच्या मुलीने मतदानाचा हक्क बजावला.
19 Apr, 24 : 09:26 AM
महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान होत आहे. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.
19 Apr, 24 : 09:24 AM
मतदानाला तासभर उशीर
नागपूर लोकसभा मतदारसंघात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहावं लागलं. दिघोरी येथील जयमाता शाळा मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान ७ वाजता सुरू होणार होतं, परंतु इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ती बदलावी लागली आणि सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी मतदान सुरू झालं.
18 Apr, 24 : 07:55 PM
छ.संभाजीनगर लोकसभेसाठी हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा मी आज फॉर्म भरला आहे. हा फॉर्म फक्त धर्म पाळण्यासाठी भरला असून सर्वसामान्य लोकांचे हाल मी पाहत आहे. पिण्याचे पाणी लोकांच्या हक्काचं आहे, पिक विमा, वीजबिल, मोफत आरोग्य मिळणे या सर्व गोष्टी हक्काच्या असताना सुद्धा त्यांना मिळत नाहीत. हे पाहून मला वेदना होतात. सर्वसामान्य नागरिकांचे काम करणे हा माझा उद्देश आहे. - हर्षवर्धन जाधव, माजी आमदार
18 Apr, 24 : 05:06 PM
सरकारचीच भाकरी फिरण्याची आली आहे वेळ: रोहिणी खडसे
बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे. बारामतीची जनता ही शरद पवारांच्या पाठीशी आहे. सरकारचीच आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
18 Apr, 24 : 05:05 PM
संजयकाका पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काढलेल्या रॅलीत भाजपा आणि महायुतीचे नेते तसेच कार्यकर्ते सहभागी झाले.
18 Apr, 24 : 05:00 PM
सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलेय ५५ लाखांचे कर्ज
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी थेट टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसने घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचे एकूण ५५ लाखांचे कर्ज आहे, अशी माहिती समोर येत आहे.
18 Apr, 24 : 03:49 PM
विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाला: वैभव नाईक
नारायण राणे हे त्यांच्या दोन मुलांसाठी भांडत होते. अखेर स्वतःसाठी उमेदवारी घेतली. त्यामुळे विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाला आहे. खरेतर नारायण राणे पहिल्या बाकावरील नेते आहेत. पण किरण सामंत सारख्या व्यक्तीमुळे राणेंची ऊमेदवारी १३ व्या यादीत जाहीर त्यामुळे ते १३ व्या बाकावरचे नेते झालेत. केवळ आपल्या दोन मुलांचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी राणेंनी ऊमेदवारी घेतली. पण त्यांची गुंडगिरी आत्ता चालणार नाही. कोकणातील जनता राणेंना हरवणार आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली.
18 Apr, 24 : 03:46 PM
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी डमी अर्ज भरला
खबरदारी म्हणून अजित पवारांनी डमी उमेदवारी अर्ज भरला आहे. छाननी पूर्ण झाल्यावर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर होईल. तेव्हा अजित पवार आपला डमी अर्ज मागे घेणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
18 Apr, 24 : 03:45 PM
मोदींना भीती आहे की आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील: पृथ्वीराज चव्हाण
मोदी सांगत आहेत की, देशाची अर्थव्यवस्था पाचवी क्रमांक झाली आहे, याचा मला अभिमान आहे. मात्र मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असती, भाजपाच्या जाहीरनामावर मोदींचे ४२ फोटो आहेत.अनेक ठिकाणी मोदी आपला फोटो वापरत आहेत. मोदींना भीती आहे की आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
18 Apr, 24 : 03:42 PM
विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार: नारायण राणे
कुठलेही काम सूरु करायचे असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर ग्रामदेवतच दर्शन घेतो. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात जागा वाटपाबाबत महायुतीत कोणताही तिढा नव्हता. उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहिती होते. प्रचारालाही सुरुवात केली होती. विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ४०० पार करायचे आहे. विकसित देश बनावा, आत्मनिर्भर बनावा, हे आपले प्रचाराचे मुद्दे असतील, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.
18 Apr, 24 : 02:52 PM
७० हजार कोटींचा घोटाळा केलाय, त्यांना उपमुख्यमंत्री करणे हीच मोदी गॅरंटी: सुषमा अंधारे
जाहिराती खोट्या गोष्टींची केल्या जातात. आता मोदींची गॅरंटी खरी असेल का मग? मोदी साहेब मी ७० हजार कोटींचा घोटाळा केलाय, ते म्हणाले, या या मी तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवतो. हीच ती मोदींची गॅरंटी, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
18 Apr, 24 : 02:07 PM
गावागावातील म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार घड्याळ सोडून का वाजवत आहेत तुतारी?: रामदास आठवले
अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे... कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.... अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला... सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण..., अशा चारोळ्या करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या सभेत सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन केले.
18 Apr, 24 : 01:54 PM
जाहीर आव्हान देतोय, माझ्यासोबत पॉडकास्ट करा: आदित्य ठाकरे
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पॉडकास्टना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्यासाठी सांगत आहे. मीच त्यांच्यासाठी एक आव्हान देतोय, त्यांनी माझ्यासोबत पॉडकास्ट करावे आणि महाराष्ट्रातील सर्व मुद्द्यांवर आणि गुजरातला पाठवलेल्या सर्व उद्योगांवर बोलूया, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले. एक्सवर आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
18 Apr, 24 : 01:49 PM
मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा; पंकजा मुंडेंचे आवाहन
ही निवडणूक जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वांनी मिळून योगदान द्या. लोकसभेवर गेल्यावर मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन. त्यानंतर पुढच्या ५ वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू. परंतु, जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा. ही पाच वर्षे जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत, असे बीडमधील भाजपा उमेदवारी पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
18 Apr, 24 : 01:41 PM
आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
18 Apr, 24 : 01:40 PM
राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य; भाजपाला विश्वास
महायुतीत कुठेही रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप होऊनही सांगलीत बंडखोरी झाली. त्यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात महायुतीत मात्र तसे होणार नाही, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
18 Apr, 24 : 01:39 PM
बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: देवेंद्र फडणवीस
बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा उमेदवारीसाठी अर्ज भरताना घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
18 Apr, 24 : 12:53 PM
अजित पवारांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाचे भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. अब की बार, बारामतीत सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांचे वक्तृत्व आणि कर्तृत्व दोन्ही चांगले आहे. सुनेत्रा पवारांना मत म्हणजे विकासाला मत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यात महायुतीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.
18 Apr, 24 : 12:45 PM
सुनेत्रा पवारांकडून अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव
बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला. घडाळ्याला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला. बारामती लोकसभा मतदार संघातून माहयुतीकडून सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या.
18 Apr, 24 : 12:41 PM
ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका: अजित पवार
कारण नसताना लोकसभेची निवडणूक भावनिक केली जात आहे. घराघरात जाऊन भेटीगाठी घेतल्या जात आहेत. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहूल गांधी अशी आहे. ही निवडणूक गावकी-भावकीची नाही. हलक्या कानाने मतदान करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यात आली यावेळी पवार बोलत होते.
18 Apr, 24 : 12:10 PM
सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तरी अजितदाद मलाच मत देतील: सुप्रिया सुळे
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीनंतरही अजित पवार आपल्याला मतदान करतील. कदाचित माझा मराठीतला कार्य अहवाल वाचला नसावा. मी आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देईन. त्यांनी यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर ते मेरीटवर मलाच मतदान करतील, असा अजब दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
18 Apr, 24 : 12:08 PM
माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे: सुप्रिया सुळे
माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे. आत्तापर्यंत लोकसभेत जे बोलले ती भाषणे ऐका. मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत आले, यापुढेही बोलत राहीन. सातत्याने चंद्रकांत पाटील म्हणतात की, आम्हाला शरद पवारांना संपवायचे आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. भाजपच्या पोटात होते ते ओठांवर आले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
18 Apr, 24 : 11:56 AM
भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार
अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर लवकरच शरद पवार गटात जाणार आहेत. होळकर यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
18 Apr, 24 : 11:54 AM
काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार
सोलापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रणिती शिंदे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रोड शो करत प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
18 Apr, 24 : 11:19 AM
साताऱ्यात उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार
भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे अगदी थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
18 Apr, 24 : 11:18 AM
उद्या उमेदवारी अर्ज भरणार: नारायण राणे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर आता उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
18 Apr, 24 : 11:17 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा असल्याचे चित्र होते. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. अखेरीस शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडला आणि भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली.
17 Apr, 24 : 08:23 PM
निधी देतो मतदान द्या, याचा अर्थ अजित पवार यांना खात्री आहे मत मिळणार नाहीत - सतेज पाटील
कोल्हापुरात 11 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे. तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. लोक अजित पवारांना मतदान करणार नाहीत, निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री मतदान मिळणार नाही. दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतेय, अशी टीका सतेज पाटलांनी केली.
17 Apr, 24 : 07:24 PM
द्रौपदीचा अर्थ काय? हे त्यांनी समजवून सांगावे, डोक्यातले विष बाहेर आले आहे - जितेंद्र आव्हाड
अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं आहे. ज्या काकांनी ५०% महिलांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला, ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले, ज्या संविधानाच्या माध्यामातून न्याय दिला आंबेडकरांनी त्याचं महाराष्ट्रात माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असे म्हणतात. त्यांनी सर्व महिला वर्गाची माफी मागावी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
17 Apr, 24 : 07:14 PM
प्रत्येकाचा वेळ काळ असतो, मला नाही वाटतं कुणी सहा वेळा उपमुख्यमंत्री होईल - अजित पवार
तुम्हाला वाईट वाटेल चार वेळा मुख्यमंत्री झाले असताना विकासकामे किती झाली आणि चार वेळा मी उपमुख्यमंत्री असतानाची विकासकामे ही तुमच्या डोळ्यादेखत कुणी केली हे तुम्हाला माहित आहे. त्याकाळामध्ये फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची मात्र आता माझे सर्व भावंड पायला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आता तर काकी (प्रतिभा पवार) प्रचार करताना मला सांगण्यात आले, मी तर डोक्यालाचा हात लावला, असे अजित पवार म्हणाले.
17 Apr, 24 : 07:13 PM
मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. - अमित ठाकरे
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करणार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि मविआला एकही जागा मिळणार नाही. त्यांच्या विरोधात वातावरण आहे. तसेच राज आणि नरेंद्र मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याची माहितीही अमित ठाकरे यांनी दिली.
17 Apr, 24 : 06:02 PM
महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान
१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात आता प्रचार शेवटच्या टप्प्यावर आला असून आज सायंकाळी प्रचारसभा आणि प्रचार थांबणार असून शुक्रवारी या मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य मतपेटीत असणार आहे.
17 Apr, 24 : 05:43 PM
"विशाल पाटलांनी हे पाऊल का उचललं, याचा विचार होणं गरजेचे"
विशालदादा, ऑल द बेस्ट! विशाल पाटील यांच्यावर काय अन्याय झाला आहे, हे फक्त त्यांचा संघर्ष माहिती असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे असं म्हणत आमदार सत्यजित तांबे यांनी सांगलीतील विशाल पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
17 Apr, 24 : 05:37 PM
पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकणार: अजित पवार
तो सर्व्हे आहे, रिझल्ट काय लागतो ते बघा. पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ओपिनियन पोल समोर येत आहे. पैकी एका ओपिनियन पोलमधून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
17 Apr, 24 : 04:23 PM
रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल: रोहिणी खडसे
प्रत्येकाला आपआपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल मत व्यक्त करणे काही गैर नाही. मात्र आम्ही हवेत गोळीबार करत नाही. थोड्या दिवसांत तुम्हाला सगळे लक्षात येईल आणि आम्ही लाखांच्या लीडने निवडून येऊ, असा आम्हाला विश्वास आहे. फक्त आता आकडेवारी सांगण्यापेक्षा आम्ही कामावर भर देतोय, आमचे उमेदवार श्रीराम पाटील हे तळागाळापर्यंत पोहोचत आहेत, संपर्क करत आहेत. रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा दावा एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केला.
17 Apr, 24 : 04:21 PM
महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुढी पाडवा मेळाव्यादिवशी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना दिली.
17 Apr, 24 : 04:10 PM
देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात: सुशीलकुमार शिंदे
सोलापूर जिल्हा पारंपारिक दुष्काळी आहे. ४५ वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारले गेले. सोलापूर जिल्ह्यास उजनी धरणाचे पाणी पुरत नाही. असे असले तरी सोलापूरचे चित्र बदलत आहे. ऊस, फळबागा अशा नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर मात झाली आहे. एकापेक्षा जास्त लहानमोठी धरणे असायला, सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही. देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्याचा त्यांना विसर पडला असावा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, असा पलटवार सुशीलकुमार शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर केला.
17 Apr, 24 : 03:27 PM
अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार
एकच गोष्ट सांगतो की, १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावे अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचे आत्मपरिक्षण उदयनराजेंनी केले पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. शक्तिप्रदर्शन काय असते? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे, असे अभिजित बिचुकले यांनी म्हटले आहे.
17 Apr, 24 : 03:18 PM
लोकशाही वाचविण्यासाठी भाजपाला धडा शिकवा, पंजाला मतदान करा: विजय वडेट्टीवार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली चामोर्शी शहरात झाली. या रॅलीचे नेतृत्व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. प्रचार संपत आहे आता जबाबदारी मतदारांची आहे. देशातील सत्ताधारी भाजपचे जुमलेबाज सरकार हे गेले दहा वर्ष तुमच्याशी खोटे बोलले, नुसती आश्वासन दिली.यावेळी मात्र कमळाला धडा शिकवला पाहिजे. पंजाला मतदान करा, असे आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
17 Apr, 24 : 03:16 PM
ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराकडे काँग्रेसची पाठ?
दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते पदाधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
17 Apr, 24 : 02:36 PM
विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू: CM एकनाथ शिंदे
विरोधी पक्षांची आघाडी मोदी व्देषाने पीडित आहे. मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकड़े ना बॉलर आहेत ना बॅट्समन जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली.
17 Apr, 24 : 02:31 PM
छगन भुजबळांचा महायुतीला अल्टिमेटम
नाशिकसाठी ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण २० मेच्या आधी निर्णय घ्या. कारण, २० मेचा मुहुर्त आहे, त्यामुळे त्या आधी निर्णय झाला तर बरे होईल. कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण २० मेच्या आधी सोडा, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीला अल्टिमेटम दिला आहे.
17 Apr, 24 : 02:02 PM
नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल: हेमंत गोडसे
नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल. एक सकारात्मक निर्णय होईल. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. विद्यमान खासदार म्हणून जनसंपर्क ठेवला आहे. गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. संघटनात्मक बांधणी उत्कृष्ट पद्धतीने झाली आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण निवडून येईल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.
17 Apr, 24 : 02:02 PM
लोकसभेसाठी उमेदवारीची संधी मिळो अन् विजय प्राप्त होवो: हेमंत गोडसे
रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात दर्शन घेतले. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवारां निवडून यावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे देशाची मोठी प्रगती होत आहे. पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्याची संधी मिळू दे. आपल्यालाही उमेदवारीची संधी मिळू दे आणि विजय प्राप्त होऊ दे. यश मिळू दे, असे साकडे काळाराम मंदिरात दर्शन घेताना घातले, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.
17 Apr, 24 : 01:31 PM
राजू पारवेंचा विजय पक्का: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजू पारवे यांचा विजय पक्का आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
17 Apr, 24 : 01:29 PM
भाजपाचे उमेदवार सुभाष भामरेच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे.
17 Apr, 24 : 11:57 AM
पक्षातील माणूस बंडखोरी करत असेल तर काँग्रेसने कारवाई केली पाहिजे: संजय राऊत
सांगतील काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक जागा आहे, असे म्हणता. पण तिथे भाजपाचा आमदार आणि खासदार आहे. पक्षातील माणूस बंडखोरी करत असेल तर , काँग्रेसने कारवाई करायला हवी, असे स्पष्ट मत संजय राऊतांनी व्यक्त केले.
17 Apr, 24 : 11:46 AM
पंतप्रधान मोदींना स्वतःची निवडून यायची गॅरंटी नाही: संजय राऊत
इंडिया आघाडी देशभरात ३०५ जागा जिंकणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. पंतप्रधान मोदींना स्वतःची निवडून यायची गॅरंटी नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.
17 Apr, 24 : 11:44 AM
एकनाथ खडसेंना धमकी, तक्रार दाखल
परवापासून मला धमकीचे कॉल येत आहेत. त्यात दाऊद आणि छोटा शकीलचा उल्लेख करण्यात येतो. आपकी कोई खैर नहीं, आपको मार देंगे. आपको मारना है, अशी धमकी मला दिली. कोणी खोडसाळपणा करत असेल असे मला आधी वाटले होते. पण नंतर पोलिसांना कळवले तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
17 Apr, 24 : 11:42 AM
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही: अजित पवार
लोकसभा ही १४० कोटी जनतेची निवडणूक आहे. गावकीची निवडणूक नाही. कुणाचा फायदा होईल यापेक्षा कुणी फायदा केला याचा विचार करा. राहुल गांधी यांचे नाव नाईलाजाने घ्यावे लागते. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
16 Apr, 24 : 06:23 PM
मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, संविधान बदलाच्या टीकेवरून प्रत्युत्तर
संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पूर्णिया येथे एका प्रचार सभेला संबोधित केले.
16 Apr, 24 : 05:03 PM
"सासूचे ४ दिवस संपले आणि सुनेचे ४ दिवस येऊ द्या"
जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा, सासूचे ४ दिवस संपले आणि सुनेचे ४ दिवस येऊ द्या, सुन बाहेरची असते का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्ष झाली तरी बाहेरची...आयाबहिणींनो सांगा. या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही मला ३०-३५ वर्ष खूप प्रेम दिलंय. तसेच प्रेम द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामती येथील प्रचारसभेत केले.
16 Apr, 24 : 04:12 PM
मला राजकारणापेक्षा समाजकारणाचा अनुभव - सुनेत्रा पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नक्कीच चांगले मताधिक्य मिळणार आहे. गेल्या २५ वर्षापासून मी सामाजिक कार्य करतेय. ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेवर मी काम केले. मी संसदेत लोकांचे प्रश्न मांडू शकते. ही निवडणूक असल्यानं आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. मला राजकारणापेक्षा समाजकारणाचा अनुभव आहे - सुनेत्रा पवार, महायुतीच्या उमेदवार, बारामती
16 Apr, 24 : 02:07 PM
मुस्लीम लीग आणि भाजपाचे जुने संबंध - उद्धव ठाकरे
मुस्लीम लीगचा जास्त अनुभव भाजपाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या काळात काँग्रेस येऊ नये यासाठी मुस्लीम लीगसोबत युती करून प.बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. ज्या मुस्लीम लीगनं देशाच्या फाळणीची भाषा केली होती. त्यामुळे ती आठवण असेल. मोहन भागवत जामा मशीदला गेले होते. नरेंद्र मोदीही गेले होते - उद्धव ठाकरे
16 Apr, 24 : 02:01 PM
आघाडी धर्म पाळा, काँग्रेस वरिष्ठांच्या सूचना
सांगलीच्या जागेवरील तिढा पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना वरिष्ठांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला यांच्यासोबतही कदम यांची फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली.
16 Apr, 24 : 01:33 PM
उमेदवारी मिळताच उदयनराजेंचं शरद पवारांना खुलं चॅलेंज
उमेदवारी मिळाल्याचा आनंद असून येत्या १८ तारखेला मोठ्या ताकदीनं अर्ज दाखल करायला जाणार आहे. मविआनं ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यावर कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे शरद पवारांनी नैतिकता सांगू नये. शरद पवारांना खुलं आव्हान देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी १८ तारखेला फॉर्म भरणार नाही आणि फॉर्म भरल्यानंतरही दाखवला तरी फॉर्म मागे घेईन असं खुलं आव्हान उदयनराजेंनी शरद पवारांना दिले आहे.
16 Apr, 24 : 01:29 PM
आघाडी धर्म पाळा, काँग्रेस वरिष्ठांच्या सूचना
सांगलीच्या जागेवरील तिढा पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना वरिष्ठांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला यांच्यासोबतही कदम यांची फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली.
15 Apr, 24 : 11:44 AM
"संविधान बदलणार नाही"
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान होते, म्हणून चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेतली, तेव्हा भारताच्या संविधानासमोर हात जोडून ते स्वीकारले. संविधान बदलण्याचा विचार आजपर्यंत कुणी केला नाही - देवेंद्र फडणवीस
15 Apr, 24 : 11:41 AM
साताऱ्यात 'तुतारी' निनादली
सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्याआधी मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन
15 Apr, 24 : 11:39 AM
कोल्हापूरमध्ये महायुतीचं शक्तिप्रदर्शन
कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार.. हातकणंगलेत धैर्यशील मानेही अर्ज भरणार...
12 Apr, 24 : 05:02 PM
"उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला"
मुख्यमंत्रिपदाच्या मोहात उद्धव ठाकरे अडकले त्यामुळे शिवसेना फुटली. आम्ही उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण विश्वास ठेवला, मित्राने धोका दिला त्यापेक्षा आपलेच चुकले असं आम्ही म्हणू. शरद पवारांनी याआधी २ वेळा आमच्याशी चर्चा करून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर भरवसा ठेवणं कठीण आहे. २०१७-१८ मध्ये स्वत: शरद पवार अमित शाहांना भेटले, शिवसेनेला सोडून माझ्यासोबत सरकार बनवा हा त्यांचा आग्रह होता. परंतु आम्ही उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला होता - आशिष शेलार, भाजपा नेते
12 Apr, 24 : 01:04 PM
राजू शेट्टींची 'स्वाभिमानी'ही सांगलीच्या आखाड्यात
सांगली मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रिंगणात; पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर
11 Apr, 24 : 09:32 PM
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उत्तरमधून बीना रामकुमार सिंग यांना तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
11 Apr, 24 : 08:13 PM
"बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल"
सुनेत्रा पवारांच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल. बारामतीपेक्षा जास्त लीड पुरंदरमधून मिळेल. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असून आम्ही प्रचंड ताकदीने दौरे एकत्रित करत, लोकांना समजावत अजित पवारांना १९९१ साली बारामतीपेक्षा जास्त लीड दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला यंदाच्या निवडणुकीत करायची आहे. बारामतीत समसमान मते होतील, पण पुरंदरमध्ये बारामतीपेक्षा जास्त लीड आम्ही देऊ - विजय शिवतारे, शिवसेना नेते
11 Apr, 24 : 06:20 PM
"...ते राज ठाकरेच सांगू शकतील!"
"गेल्या १० ते १५ वर्षांत राज ठाकरेंचे तीन-चार निर्णय मी बघितले आहेत. कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं, हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसांत काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करू शकतील" - शरद पवार
11 Apr, 24 : 06:17 PM
शाहू छत्रपती दत्तक; मंडलिकांच्या विधानाने खळबळ
"आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे" - संजय मंडलिक
11 Apr, 24 : 06:15 PM
लोकशाहीत विरोधकांना महत्त्व!
एकही विरोधी पक्षाची जागा निवडून देऊ नका, असं नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र, लोकशाहीत विरोधकांना महत्त्व आहे. मोदी वगळता इतर सर्व पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचा सन्मान केलाः शरद पवार
11 Apr, 24 : 06:09 PM
मविआचा माढ्याचा उमेदवार ठरला!
शरद पवारांचा महायुतीला धक्का! धैर्यशील मोहिते-पाटील १४ एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार... १६ एप्रिलला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार...