बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:18 AM2024-05-14T11:18:14+5:302024-05-14T11:20:35+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून, या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात, यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Bogus voting in Beed, take re-polling in some places, Bajrang Sonawane demanded | बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   

बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात झालेलं जातीय ध्रुवीकरण, भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे अशी झालेली लढत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, सोमवारी बीडमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी गंभीर आरोप केला आहे. बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून, या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात, यावे अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी बीडमधील काही मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे. बीडमधील काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनावणे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूरमध्ये फेरमतदान घेण्यात यावं, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. धर्मपुरी गावामध्ये काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही सोनावणे यांनी केला आहे.

भाजपाने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार गटात असलेल्या बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात जात उमेवारी मिळवली होती. तत्पूर्वी २०१९ मध्येही बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, यावेळी बीडमध्ये जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे येथील निकालाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Bogus voting in Beed, take re-polling in some places, Bajrang Sonawane demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.