मी दिल्लीत जानकरांची वाट पाहतोय, फडणवीसांनी दिला मोदींचा सांगावा; परभणीत शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:57 AM2024-04-02T11:57:43+5:302024-04-02T11:58:26+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: मोदी यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकरांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या’, असे मला सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले.
परभणी - आजच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेऊन परभणीकडे निघतेवेळी महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहोत, असे म्हटले. तेव्हा मोदी यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकरांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या’, असे मला सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले.
महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभा पार पडली.
जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हित डोळ्यांसमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. जानकरांसारख्या वंचित व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्यास महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी व परभणीकरांनी लोकसभेवर पाठवावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
विटेकरांना विधान भवनात नेणार : अजित पवार
-राजेश विटेकर यांना तयारी करायला सांगितली होती. मात्र, महादेव
जानकर यांना प्रतिनिधित्व देण्याचे महायुतीमध्ये ठरले.
- तरीही मी विटेकर यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. येणाऱ्या सहा महिन्यांत त्यांना विधानभवनामध्ये घेऊन
जाणार, असे उपमुख्यमंत्री अजितपवार म्हणाले.