नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:08 PM2024-05-10T15:08:28+5:302024-05-10T15:10:51+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं दोन टप्प्यातील आणि २४ मतदारसंघातील मतदान बाकी असताना महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार गटात असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवळ (Narhari Jhariwal) हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं दोन टप्प्यातील आणि २४ मतदारसंघातील मतदान बाकी असताना महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार गटात असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. नरहरी झिरवळ हे सध्या शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत.
गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्यासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून झिरवळ यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे झिरवळ हे शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत होत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यामध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे.