मी पळणारी व्यक्ती नव्हे, लढणारा आहे, देवेंद्र फडणवीस यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 07:12 AM2024-06-09T07:12:30+5:302024-06-09T07:13:23+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मला सत्तेतून मोकळे करून काम करण्याची संधी द्या, असे मी म्हटले ते निराशेतून किंवा भावनेच्या भरात नव्हे. डोक्यात स्ट्रॅटेजी होती. अमित शाहांना भेटलो तेव्हा त्यांना ती सांगितली. त्यांनी सध्या ही वेळ नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करूयात, असेही ते म्हणाले.
मुंबई - मला सत्तेतून मोकळे करून काम करण्याची संधी द्या, असे मी म्हटले ते निराशेतून किंवा भावनेच्या भरात नव्हे. डोक्यात स्ट्रॅटेजी होती. अमित शाहांना भेटलो तेव्हा त्यांना ती सांगितली. त्यांनी सध्या ही वेळ नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करूयात, असेही ते म्हणाले. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी करू, असे सांगत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे शनिवारी संकेत दिले.
देवेंद्र फडणवीस ही पळणारी व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत, असेही ते म्हणाले. भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत आमदारांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच पक्षाचे काम करावे, असा ठराव केला. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, यशाचे बाप अनेक असतात; पण, अपयश ताकदीने अंगावर घ्यायचे असते. भाजपचे नेतृत्व मी करीत होतो. म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितले.
मराठी माणूस उद्धव ठाकरेंसोबत गेला नाही
उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे, असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. पण, ठाण्यापासून कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांची एकही जागा निवडून आली नाही. मुंबईत मराठी माणसाने मते दिली नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.