लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 04:30 PM2024-05-11T16:30:25+5:302024-05-11T16:31:14+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर बेछूट टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलं्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात पुणे, नशिक, मुंबई या शहरी भागातील बहुतांश मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे केंद्र मुंबईकडे सरकत असताना ठाकरे गट आणि भाजपामधील आरोप प्रत्यारोपांना अधिकच धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर बेछूट टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलं्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे आता बावचळले आहेत. त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीनंतर दोघांनाही अज्ञातवासात जावं लागेल, अशी महाराष्ट्राची जनता त्यांची स्थिती करणार आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचं जनमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आहे. नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा वर्षांत केलेली विकासाची कामं जनतेसमोर मांडली आहेत. महाराष्ट्रामध्ये आमच्या अंदाजानुसार आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतं मिळतील. तसेच मोदी हे पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता महाराष्ट्र पुन्हा एकदा खंबीरपणे त्यांच्यामागे उभा राहील, असा विश्वास चंद्रशेखर बावन कुळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्याा ३० हून अधिक जागा निवडून येतील, असा दावा करणाऱ्या शरद पवार यांनाही बावनकुळे यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, कसं आहे की, शरद पवारांची बारामतीमधील जागाच निवडून येणार नाही आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडून येतील. आता बारामतीच त्यांच्याकडे राहिली नाही तर महाराष्ट्र कसा राहील, हा प्रश्न आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडील तुतारी काही वाजणार नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.