Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : पक्षांतर करून महायुतीतर्फे लढलेले एक सोडून बाकी सगळेच पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:37 AM2024-06-05T07:37:33+5:302024-06-05T07:46:49+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पक्ष बदलून लढल्याचा काहींना फायदा तर काहींना तोटा

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: All but one who defected and fought for the Mahayuti fell | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : पक्षांतर करून महायुतीतर्फे लढलेले एक सोडून बाकी सगळेच पडले

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : पक्षांतर करून महायुतीतर्फे लढलेले एक सोडून बाकी सगळेच पडले

Maharashtra Lok Sabha Election Result 2024:  मुंबई : पक्षांतर करून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या नशिबी संमिश्र यश आले. पक्षांतरानंतर महायुतीतर्फे लढलेले सर्व उमेदवार हरले. आ.रवींद्र वायकर यांनी ऐनवेळी उद्धवसेनेतून शिंदेसेनेत उडी घेतली आणि मुंबई उत्तर-पश्चिममधून त्यांचा अटीतटीच्या लढतीत विजय झाला.  ‘गजांआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते, जड अंत:करणानेच मी पक्ष बदलला’ असे विधान ऐन प्रचारकाळात वायकर यांनी केले होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेसेनेत गेले पण लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करून शिरूरची उमेदवारी मिळविली मात्र ते पराभूत झाले. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांची स्थिती ना इकडचे ना तिकडचे अशी झाली. आमदारकी सोडून ते शिंदेसेनेत गेले, रामटेकमधून लढले आणि पराभूत झाले. 

या नेत्यांचे पक्षांतरही निष्फळ
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले पण नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला. माजी मंत्री बसवराज पाटील हेही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले पण त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते अशा लातूर आणि उस्मानाबादमध्ये महायुतीचा पराभव झाला. मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेने काँग्रेसमधून येताच राज्यसभेवर पाठविले पण देवरांच्या दक्षिण मुंबईत शिंदेसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. माजी खा.संजय निरुपम हे शिंदेसेनेत गेले पण या पक्षाला मुंबईत एकही जागा मिळाली नाही. 

पक्ष बदलला, निवडणूक लढविली अन्...
नवनीत राणा यांनी भाजपमध्ये जाऊन अमरावतीची जागा लढविली पण त्यांचा पराभव झाला. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करत अहमदनगरची उमेदवारी मिळविली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजप सोडून उद्धवसेनेकडून जळगावात लढले पण त्यांचा पराभव झाला. माजी आमदार अमर काळे यांना शरद पवार गटाने वर्धेतून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. भाजपमध्ये असलेले धैर्यशील मोहिते शरद पवार गटात गेले आणि त्यांनी दणक्यात विजय मिळविला. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024: All but one who defected and fought for the Mahayuti fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.