Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:11 AM2024-06-04T11:11:55+5:302024-06-04T11:13:04+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचं दिसत आहेत. तसेच शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला १० जागा आल्या होत्या. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवत असलेले अमोल कोल्हे, भास्कर भगरे, बजरंग सोनावणे, नीलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे, अमर काळे, सुप्रिया सुळे, धैर्यशिल मोहिते पाटील आदी उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी २७ आणि महायुती २० जागांवर आघाडीवर आहे. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील पक्षनिहाय आघाडी पाहायची झाल्यास भाजपा १२, शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी १०, शिंदे गट आणि ठाकरे गट प्रत्येकी ७ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.