Maharashtra Lok Sabha election results 2024 : १६ पैकी ९ आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:05 AM2024-06-05T06:05:31+5:302024-06-05T06:06:25+5:30
Maharashtra Lok Sabha election results 2024: खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ९ जण आमदार म्हणून कायम असतील.
Maharashtra Lok Sabha election results 2024: मुंबई : राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या १६ आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढविली, पण त्यातील ७ जण जिंकले आणि ९ जणांना पराभवाचा सामना करावा लागला. खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ९ जण आमदार म्हणून कायम असतील.
राजू पारवे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदेसेनेत प्रवेश केला, पण ते रामटेकमध्ये पराभूत झाले. त्यामुळे आता ते विधानसभेचेही सदस्य नसतील, तसेच नीलेश लंके यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला व विजय मिळविला.
१) सुधीर मुनगंटीवार पराभूत
२) प्रतिभा धानोरकर विजयी
३) राजू पारवे पराभूत
४) विकास ठाकरे पराभूत
५) बळवंत वानखेडे विजयी
६) राजेश पाटील पराभूत
७) महादेव जानकर पराभूत
८) शशिकांत शिंदे पराभूत
९) रवींद्र वायकर विजयी
१०) वर्षा गायकवाड विजयी
११) मिहिर कोटेचा पराभूत
१२) यामिनी जाधव पराभूत
१३) संदीपान भुमरे विजयी
१४) नीलेश लंके विजयी
१५) प्रणिती शिंदे विजयी
१६) राम सातपुते पराभूत