Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 07:44 AM2024-06-06T07:44:29+5:302024-06-06T07:44:56+5:30

Maharashtra Lok Sabha election results 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे.

Maharashtra Lok Sabha election results 2024: No campaigning, no gathering, third pass workers lakhs of votes? | Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

नाशिक : इयत्ता तिसरी पास  असलेल्या अन् सालदार म्हणून एका शेतकऱ्याकडे काम करणाऱ्या मजुराने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ना प्रचार केला..., ना कुणाच्या गाठीभेटी घेतल्या. निवडणूक होईपर्यंत हा उमेदवार कुणाला दिसलाही नाही. पण निकालाचे आकडे जाहीर झाले अन्  पठ्ठ्याला मते मिळाली तब्बल १ लाख ३ हजार ५२६. होय या उमेदवाराचे नाव आहे बाबू सदू भगरे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. आडनावातील साधर्म्यामुळे बाबू भगरे यांना १ लाखाहून अधिक मते मिळाली. भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा केलेला पराभव लक्षवेधी ठरला परंतु त्याहून अधिक चर्चेत व प्रकाशझोतात आले ते अपक्ष उमेदवारी करत लाखभर मते मिळविणारे बाबू सदू भगरे. 

चिन्हानेही खेचली मते 
बाबू सदू भगरे हे एकलहरेतील गंगावाडी परिसरात राहणारे असून सालदार म्हणून कामाला आहेत. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी नावापुढे कंसात ‘सर’ ही उपाधी देखील लावली. विशेष म्हणजे त्यांना ट्रम्पेट ही तुतारी सदृश  निशाणी मिळाली. त्यामुळे आडनावासह चिन्हामुळे त्यांना अधिक मते मिळाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2024: No campaigning, no gathering, third pass workers lakhs of votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.