Maharashtra Lok Sabha election results 2024: राज्यातील ४८ खासदारांपैकी २६ खासदार मराठा, तर ९ ओबीसी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 12:15 PM2024-06-06T12:15:16+5:302024-06-06T12:15:56+5:30
Maharashtra Lok Sabha election results 2024 : राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे.
मुंबई : राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारांपैकी २६ खासदार हे मराठा समाजाचे, तर नऊ ओबीसी आहेत. अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले. अनुसूचित जातींचे सहा, तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत. वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या आहेत.
राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. यावेळीही तेच चित्र दिसून येते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला होता.
अनुसूचित जमातींचे खासदार
१) भास्कर भगरे २) डॉ. हेमंत सावरा ३) डॉ. नामदेव किरसान ४) गोवाल पाडवी
अनुसूचित जातींचे खासदार
१) बळवंत वानखेडे २) भाऊसाहेब वाकचौरे ३) प्रणिती शिंदे ४) वर्षा गायकवाड ५) श्यामकुमार बर्वे ६) डॉ. शिवाजी काळगे.
मराठा समाजाचे खासदार
१) स्मिता वाघ, २) शाहू छत्रपती ३) डॉ. शोभा बच्छाव ४) नारायण राणे ५) श्रीकांत शिंदे ६) उदयनराजे भोसले ७) नरेश म्हस्के ८) विशाल पाटील ९) सुप्रिया सुळे १०) मुरलीधर मोहोळ ११) श्रीरंग बारणे १२) धैर्यशील मोहिते १३) धैर्यशील माने १४) संजय देशमुख १५) अरविंद सावंत १६) प्रतापराव जाधव १७) राजाभाऊ वाजे १८) नीलेश लंके १९) ओमप्रकाश राजेनिंबाळकर २०) डॉ. कल्याण काळे २१) संदीपान भुमरे २२) वसंत चव्हाण २३) नागेश आष्टीकर २४) संजय जाधव २५) बजरंग सोनवणे २६) अनुप धोत्रे
ओबीसी खासदार
१) रक्षा खडसे २) प्रतिभा धानोरकर, ३) सुनील तटकरे ४) रवींद्र वायकर ५) डॉ. अमोल कोल्हे ६) डॉ. प्रशांत पडोळे ७) अमर काळे ८) संजय दिना पाटील ९) सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे,
खुला प्रवर्ग - १) नितीन गडकरी- ब्राह्मण २) पीयूष गोयल- अग्रवाल ३) अनिल देसाई- सारस्वत ब्राह्मण.
- मराठा समाजाच्या विजयी खासदारांमध्ये महाविकास आघाडीतर्फे २६ पैकी १४ जण निवडून आले. त्यांची टक्केवारी ५४ इतकी आहे. एक अपक्ष आहेत. महायुतीतर्फे ११ मराठा उमेदवार जिंकले. त्यांची टक्केवारी २३ आहे. ओबीसी समाजाच्या खासदारांची एकूण टक्केवारी १९ इतकी आहे. त्यातील ३ महायुतीचे आहेत. तर ६ जण महाविकास आघाडीचे आहेत. ३ खासदार खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांची टक्केवारी केवळ सहा इतकी आहे.