Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live :एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं
LIVE
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2024 07:01 AM2024-06-04T07:01:36+5:302024-06-04T21:44:26+5:30
Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Live Updates : सत्ताधारी महायुतीसाठी तसेच महायुतीला धक्के देण्यासाठी सज्ज असलेल्या मविआसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.
Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Live Updates : कमळावर लढणारा भाजप, धनुष्य हातात घेतलेली शिंदे सेना आणि चार जागांवर घड्याळावर टिकटिक करत सोबत असलेला अजित पवार गट अशी महायुती एकीकडे आणि दुसरीकडे पंजा दाखवत असलेली १३९ वर्षांची काँग्रेस आणि फाटाफुटीचे धक्के बसलेली उद्धव सेना (मशाल) आणि शरद पवार गट (तुतारी) यांची महाविकास आघाडी यांच्यातील निवडणूक युद्धाचा फैसला आज होत आहे. सत्ताधारी महायुतीसाठी तसेच महायुतीला धक्के देण्यासाठी सज्ज असलेल्या मविआसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.
LIVE
04 Jun, 24 : 08:56 PM
एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं
एनडीएच्या विजयानंतर दिल्लीत भाजपाने दिल्लीत विजयी सभा घेतली. एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानले.
04 Jun, 24 : 08:37 PM
उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेत भाजपाच्या हाती गेला. तेव्हा विजयी उमेदवार पूनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ एवढे अधिकचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येथे ४ लाख मतांचा आकडा पार करणे काँग्रेससाठी मोठे आव्हान होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले.
04 Jun, 24 : 08:36 PM
शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी
शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी झाले आहेत. बाळ्या मामा यांना एकूण मते ४ लाख ९८ हजार १९९ झाली असून कपिल पाटील यांना एकूण मते ४ लाख ३१ हजार ९०७ आहेत. निलेश सांबरे एकूण मते २ लाख ३० हजार २५४ आहेत.
04 Jun, 24 : 08:19 PM
गडकरींची नागपुरातून हॅटट्रीक,१.३७ लाखांचे मताधिक्य
नागपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला दबदबा कायम राखत विजय मिळविला आहे. त्यांची ही हॅटट्रीक ठरली आहे. एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात आली आहेत. मागील वेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य १.५६ टक्क्यांनी घटले आहे.
04 Jun, 24 : 08:12 PM
फेर मोजणीत रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी
एकूण मतमोजणी ९५४९३९ मतदान मोजणी झाली.यात शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर-४५२६४४ मते मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल -कीर्तिकर यांना ४५२५९६
मते मिळाली. फेर मत मोजणीत वायकर हे ४८ मतांनी विजयी झाल्याचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी घोषित केले.
04 Jun, 24 : 07:59 PM
नेस्को ग्राउंड बाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती
मुंबई: गोरेगाव नेस्को ग्राउंडच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची गर्दी जमू लागली आहे. त्यानी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करायला ही सुरुवात केली आहे. या ठिकाणची गर्दी वाढीस लागल्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मतमोजणीच्या वेळी झालेल्या गोंधळा बाबत जसजसे दोन्ही गटाच्या कार्यकर्ते यांना समजत आहे, तसतसं त्यांनी नेस्को ग्राउंडच्या जवळ त्यांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त अधिक बंदोबस्त कडक केला आहे. परिमंडळ १२ मधील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिसही गर्दीला पांगवण्याचा तसेच त्यांचे संबंध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
04 Jun, 24 : 07:53 PM
उत्तर पश्चिम मध्ये सावळा गोंधळ; अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यात तिढा वाढला
उत्तर पश्चिम मध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यत तिढा वाढला आहे. रेकॉऊंटिंग नंतर अमोल कीर्तिकरं याना ४८ मतांनी पराभूत दाखवलं आहे, नियमानुसार रिजेक्ट झालेल्या बॅलेट ची संख्या पराभवाच्या मार्गीन पेक्षा जास्त असेल तरं रिजेक्ट झालेल्या पोस्टल बॅलेटची पुन्हा कॉऊंटिंग केली जाते. सध्या १११ पोस्टल बॅलेटची मत बाद झाली असून त्याची रेकॉऊंटिंग सुरु आहे.
04 Jun, 24 : 07:25 PM
अकाेल्यात भाजपाने गड राखला; अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेचून आणला. अंत्यत चुरशिच्या झालेल्या या लढतीत धाेत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार डाॅ. अभय पाटील यांचा ४०,६२६ मतांनी पराभव केला. डाॅ़ अभय पाटील यांनी तगडी लढत दिली. अॅड प्रकाश आंबेडकरांच्या साेशल इंजिनिअरींगचा करिष्मा यावेळीही चालला नसल्याने त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.
04 Jun, 24 : 07:15 PM
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे १ लाख १३ हजार मतांनी विजयी
दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार गट) भास्कर भगरे 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी झाल्या आहेत.
04 Jun, 24 : 06:59 PM
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंची आघाडी
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंची आघाडी घेतली आहे. 30 वी फेरी झाली आहे. यात राजाभाऊ वाजे- 6,14,517 तर हेमंत गोडसे- 4,53,414 यांना एवढी मतं मिळाली आहे.
शांतिगिरीजी महाराज यांना- 44,415 एवढी मतं मिळाली आहेत. राजाभाऊ वाजे यांनी 1,61,103 इतक्या मतांची आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 06:33 PM
धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमदेवार धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयी झाले आहेत. विजयानंतर सोलापूरसह माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, अकलूज येथे विजयी जल्लोष सुरू आहे. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
04 Jun, 24 : 05:48 PM
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा मोठा विजय
बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती, यात आता सुप्रिया सुळे यांचा १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजय झाला आहे. सुप्रिया सुळे यांना ७ लाख २८०६८ मते मिळाली आहेत. तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७४ हजार ५३८ मते मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 05:34 PM
यवतमाळमध्ये संजय देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मतमोजणीच्या २३ फेऱ्या झाल्या असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे महायुतीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजश्री पाटील यांच्यापेक्षा ७६ हजार ४११ मताधिक्याने पुढे आहेत. आता मतमोजणीच्या सात फेऱ्या बाकी असून महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
04 Jun, 24 : 05:33 PM
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवार- अॅड. गोवाल पाडवी यांना 7,45,998 एवढी मतं मिळाली आहेत, तर डाॅ.हिना गावित (भाजप) यांना 5,86,878 एवढी मतं मिळाली आहेत. पाडवी यांना 1,59,120 एवढ्या मतांचं मताधिक्य मिळालं आहे.
04 Jun, 24 : 05:20 PM
ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड
सोलापूर : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. २४ व्या फेरीअखेर ते अडीच लाखांच्या मताधिक्क्याने आघाडीवर आहेत. अंतिम निकाल हाती येणे बाकी असून विजयी घोषित अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून ओमराजे निंबाळकरांना ५५ हजाराचा लीड मिळाला आहे.
04 Jun, 24 : 05:14 PM
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ अखेरची फेरी; संजय दिना पाटील २९ हजार १५ मतांनी विजयी
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ अखेरची फेरी झाली आहे, संजय दिना पाटील २९ हजार १५ मतांनी विजयी झाले आहे. मिहीर कोटेचा यांना ४ लाख १९ हजार ५८९ मतं मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 05:04 PM
जालन्यात भाजपाच्या गडाला हादरा; कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत
जालन्यात भाजपाच्या गडाला हादराला बसला आहे, रावसाहेब दानवे पिछाडीवर आहेत, तर कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत आहेत.
04 Jun, 24 : 05:01 PM
गडकरी यांच्या घरी कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागपूर : भारतीय जनता पार्टीचा विजय असो..., नितीनजी गडकरी आगे बढो..., अशा घोषणा देत, ढोलताशांचा गजरात, गुलाल उधळीत, पेढे भरवित कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या घरी दुपारी जल्लोष करायला सुरुवात केली. भाजपाचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते दुचाकीवरस्वार होऊन त्यांच्या निवासस्थानी येत होते. त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. येथे मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी केली होती.
04 Jun, 24 : 05:01 PM
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० व्या फेरीत संजय दिना पाटील २९ हजार मतांनी आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० व्या फेरीत संजय दिना पाटील ४ लाख ३३ हजार ९२८ मत मिळाली आहेत, तर मिहीर कोटेचा यांना ४ लाख ०४ हजार ०४४ मतम मिळाली असून संजय दिना पाटील २९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 04:44 PM
अकोला लोकसभा मतदारसंघ २१ व्या फेरीत अनुप धोत्रेंची २३,३२८ मतांनी आघाडीवर
अकोला लोकसभा मतदारसंघ २१ व्या फेरीत अनुप धोत्रेंची २३,३२८ मतांनी आघाडीवर आहेत. अभय पाटील यांना २१ फेरीत १६ हजार ७२३ मते तर एकूण मते ३६६ हजार ५५९ मत आहेत. प्रकाश आंबेडकर यांना २१ व्या फेरीत १०८८४ मते तर एकूण मतं दोन लाख ३२ हजार १६२ आहेत.
04 Jun, 24 : 04:34 PM
रामटेक लोकसभा मतदारसंघातून तेराव्या फेरीनंतर श्यामकुमार बर्वे आघाडीवर
रामटेक लोकसभा मतदारसंघातून तेराव्या फेरीनंतर श्यामकुमार बर्वे ५३,०६३ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 04:02 PM
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके ५१ हजार मतांनी पुढे
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात १९ व्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे निलेश लंके ५१ हजार मतांनी पुढे आहेत.
04 Jun, 24 : 03:52 PM
उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची आघाडी
उत्तर मध्य मुंबईत मतमोजणीच्या चौदाव्या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांना मागे टाकून 793 मतानी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 03:50 PM
यवतमाळ वाशिम लोकसभा अठराव्या फेरीत संजय देशमुख ६५,२८० मतांनी आघाडीवर
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अठराव्या फेरीत संजय देशमुख ६५,२८० मतांनी आघाडीवर आहेत. राजश्री पाटील (महायुती) - ३,३१,३७४ मतं आहेत तर संजय देशमुख-(महाविकास आघाडी) ३,९६,६५४ मत मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 03:41 PM
उज्वल निकम यांच मताधिक्य घटले!
मतमोजणीच्या तेराव्या फेरीत वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेत 3 लाख 82 हजार 174 मते मिळाली आहेत तर उज्वल निकम यांना 3 लाख 85 हजार 695 मते आहेत.
04 Jun, 24 : 03:39 PM
साताऱ्यात उदयनराजे ३१,२१७ मतांनी विजयी
सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे ३१,२१७ मतांनी विजयी झाले आहेत.
04 Jun, 24 : 03:26 PM
धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना ११ व्या फेरीअखेर ३८ हजार २१५ मताची आघाडी मिळाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा मार्ग विजयाच्या दिशेने जात असून अकलूज शहरात खासदारकीचे बॅनर दुपारपासूनच झळकू लागले आहेत.
04 Jun, 24 : 03:26 PM
जळगावच्या दोन्ही जागा भाजपकडे, मतमोजणी अंतिम टप्यात
जळगाव : जळगाव व रावेर मतदारसंघांची मतमोजणी अंतिम टप्यात असून या दोन्ही जागांवर स्मिता वाघ व रक्षा खडसे यांचा विजय निश्चित झाला आहे. स्मिता वाघ यांचा दोन ते अडीच लाखांनी तर रावेर मधून रक्षा खडसे या दोन लाखांच्या मताधिक्यांनी निवडणून येत असल्याचे दिसून येत आहे.
04 Jun, 24 : 03:11 PM
मुंबई उत्तर पूर्व - १४ वी फेरीत संजय पाटील आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात संजय दिना पाटील यांना ३२७२१६ एवढा मतं आहेत तर मिहिर कोटेचा यांना ३०२४५५ एवढी णत असून संजय पाटील यांची २४ हजार ७६१ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 02:54 PM
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर आघाडीवर
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिककर ३,६४९ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 02:50 PM
नाशिक : १४ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे १ लाख २३ हजार २३ मतांनी आघाडीवर
नाशिक : १४ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे १ लाख २३ हजार २३ मतांनी आघाडीवर आहेत. वाजे यांना ३,८९,९७८ मते तर हेमंत गोडसे यांना २,६६,९५५ मतं आहेत.
04 Jun, 24 : 02:37 PM
सांगली लोकसभेत विशाल पाटील यांचा विजय
सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या संजयकाका पाटील यांचा पराभव झाला आहे.
04 Jun, 24 : 02:33 PM
१४ व्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
बुलढाणा : लोकसभा मतदारसंघाच्या मोजणीदरम्यान १४ व्या फेरीपासूनच शिंदेसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी १३ हजारांपेक्षाही अधिक आघाडी घेत १७ फेरीनंतरही ती कायमच असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोषाला सुरूवात केली.
04 Jun, 24 : 02:27 PM
संजय दिना पाटील हे ८८ हजारांनी आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्व, संजय दिना पाटील हे ८८ हजारांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 02:24 PM
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात काँग्रेसची जोरदार मुसंडी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात काँग्रेसची जोरदार मुसंडी
04 Jun, 24 : 02:23 PM
नारायण राणे ४५१३२ मतांनी आघाडीवर
अठराव्या फेरीनंतर नारायण राणे ४५१३२ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 02:22 PM
शिंदे गटाकडून ढोल ताशांच्या गजरात मतदारसंघाबाहेर जल्लोष
कल्याण: कल्याण मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य लाखांच्या आसपास पोहोचताच शिंदे गटाकडून ढोल ताशांच्या गजरात मतदारसंघाबाहेर जल्लोष सुरु करण्यात आला. याला ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला. अद्याप पूर्ण निकाल लागला नसताना पोलिसांनी जल्लोष करायला परवानगी कशी दिली असा सवाल ठाकरे गटाकडून पोलिसांना करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. ठाकरे गटाकडून निषेधार्थ घोषणाबाजी सुरु झाली. यावर पोलिसांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना जल्लोष थांबवायला सांगितला. यादरम्यान काहीसे तणावपूर्ण वातावरण मतमोजणी केंद्र परिसराच्या बाहेर निर्माण झाले होते.
04 Jun, 24 : 02:20 PM
शिर्डी - सातव्या फेरीअखेर उबाठाचे भाऊसाहेब वाकचौरे 19465 मतांनी आघाडीवर....
शिर्डी - UBT चे भाऊसाहेब वाकचौरेंना एकूण 2 लाख 10 हजार 300 मते तर
शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण 1 लाख 90 हजार 835 मते
सातव्या फेरीअखेर UBT चे भाऊसाहेब वाकचौरे 19465 मतांनी आघाडीवर....
04 Jun, 24 : 02:19 PM
नितीन गडकरी ६०१४३ मतांनी आघाडीवर
९ फेरीनंतर भाजप नेते नितीन गडकरी ६०१४३ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 02:05 PM
प्रतापराव जाधव १५ हजार ९६८ मतांनी आघाडीवर
बुलढाणा लोकसभा मतदार १६ व्या फेरी अखरे शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव १५ हजार ९६८ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 02:04 PM
अकरावी फेरीत उज्वल निकम यांना धक्का, वर्षा गायकवाड यांची १७६३ मताने आघाडी
चुरशीची लढत सुरू असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात अकराव्या फेरीत महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांना धक्का बसला. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी १७६३ मतांनी आघाडी घेत मतदार संघातील चित्र बदलले आहे.
04 Jun, 24 : 01:57 PM
सुनील तटकरे यांना 62 हजार 732 मतांची आघाडी
रायगड - 23 व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 62 हजार 732 मतांची आघाडी
04 Jun, 24 : 01:52 PM
बुलढाण्यात मतमोजणी निर्णायक वळणावर, शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव आघाडी टिकवून
बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मध्यमगतीने सुरू असून ती आता निर्णायक टप्प्यात आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मतमोजणीच्या २५ पैकी १४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुरुवातीपासूनच शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे. त्यांना उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर हे चांगली टक्कर देत असून उर्वरीत दहा फेऱ्यामध्ये काय उलटफेर होतो याकडे लक्ष लागून रहाले आहे.
04 Jun, 24 : 01:48 PM
नंदुरबार: काॅग्रेसचे गोवाल पाडवी 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर
नंदुरबार: 22 व्या फेरीत काॅग्रेसचे गोवाल पाडवी 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 01:47 PM
रावेरमध्ये रक्षा खडसे यांना आघाडी
रक्षा खडसे ३६९२९३
श्रीराम पाटील २२३४१०
मताधिक्य-१४५८८३
04 Jun, 24 : 01:45 PM
भिवंडी लोकसभा - आठव्या फेरीत बाळ्या मामा 26850 मतांनी आघाडीवर
आठवी फेरी
कपिल पाटील - 139655
बाळ्या मामा - 166505
निलेश सांबरे - 85722
आठव्या फेरीत बाळ्या मामा 26850 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 01:43 PM
कल्याण लोकसभा मतदारसंघ - श्रीकांत शिंदे ८२३१५ मतांनी आघाडीवर
सातव्या फेरी अंती मिळालेली मते
श्रीकांत शिंदे- १८३६३४
वैशाली दरेकर-१०१३१९
श्रीकांत शिंदे -८२३१५ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 01:38 PM
मुंबई उत्तर मध्य, उज्ज्वल निकम आघाडीवर
दहावी फेरी - मुंबई उत्तर मध्य. उज्ज्वल निकम आघाडीवर
04 Jun, 24 : 01:37 PM
भाजपची पुन्हा बाले किल्ल्यावर सरशी, पीयूष गोयल यांनी केला तीन लाख मतांचा आकडा पार
मुंबई उत्तर हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला म्हणून समजला जातो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यावर सरशी केली आहे. मतदानाच्या आतापर्यंतच्या सहा फेऱ्यांमध्ये पीयूष गोयल यांना तीन लाख तीन हजार 583 मते मिळाली आहेत. दुसरीकडे भूषण पाटील यांना एक लाख 57 हजार 479 मते मिळाली आहेत. पीयूष गोयल हे एक लाख 46 हजार 104 मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 01:33 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे ३४,७९५ मतांनी आघाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - पंधराव्या फेरीनंतर नारायण राणे ३४,७९५ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 01:32 PM
चंद्रपूर - काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर
काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर. भाजपचे सुधीर मुनगंटीवार 82084 मतांनी पिछाडीवर.
04 Jun, 24 : 01:25 PM
यवतमाळ - वाशीम मतदासंघ,देशमुख 46,945 मतांनी आघाडीवर
यवतमाळ - वाशीम मतदासंघ
14 वी फेरी
राजश्री पाटिल (महायुती) - 2,59,867
संजय देशमुख ( महाविकास आघाडी ) - 3,06812
देशमुख - 46,945 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 01:23 PM
मुंबई उत्तर पूर्व -संजय दिना पाटील आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्व - २७६३३ मतांनी संजय दिना पाटील आघाडीवर
04 Jun, 24 : 01:20 PM
डाॅ. नामदेव किरसान यांना ३२,६८३ मतांची लीड
गडचिराेली : गडचिराेली- चिमूर लाेकसभा मतदार संघात पहिल्या राऊंडपासूनच काॅंग्रेसचे डाॅ. नामदेव किरसान हे आघाडीवर आहेत. यात डाॅ. नामदेव किरसान यांना ३२,६८३ मतांची लीड मिळाली आहे.
04 Jun, 24 : 01:19 PM
चौदाव्या फेरीनंतर नारायण राणे २७२६९ मतांनी आघाडीवर
चौदाव्या फेरीनंतर नारायण राणे २७२६९ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 01:16 PM
भिवंडी लोकसभा - सातव्या फेरीत बाळ्या मामा 29145 मतांनी आघाडीवर
सातवी फेरी
कपिल पाटील - 119562
बाळ्या मामा - 148707
निलेश सांबरे - 76835
सातव्या फेरीत बाळ्या मामा 29145 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 01:11 PM
उत्तर मध्य मुंबई - उज्ज्वल निकम आघाडीवर
आठवी फेरी
उज्वल निकम - 26,843
वर्षा गायकवाड - 19,565
एकूण मतदान
उज्वल निकम - 2,03,303
वर्षा गायकवाड - 1,48,304
04 Jun, 24 : 01:10 PM
अमरावती जिल्हा, नवनीत राणा आघाडीवर
नवनीत राणा ( भारतीय जनता पाटी) : 146467
बळवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) : 135295
दिनेश बूब (प्रहार जनशक्ती पार्टी) : 24289
आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) : 3415
04 Jun, 24 : 01:04 PM
बुलढाणा लाेकसभा मतदार संघ बाराव्या फेरीअखेर 13144 मतांनी प्रतापराव जाधव यांना आघाडी
प्रतापराव जाधव (शिंदेंसेना) 184475
प्रा नरेंद्र खेडेकर (उद्धवसेना) 171331
रविकांत तुपकर (अपक्ष) 121959
13144 मतांनी प्रतापराव जाधव यांना आघाडी
04 Jun, 24 : 01:03 PM
वर्धा : चौथ्या फेरीतही काळे यांची आघाडी कायम
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात चार फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे ९ हजार ४१३ मतांनी आघाडीवर आहे. चार फेऱ्यांअंती त्यांना एकूण ८६ हजार ४४४, तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना ७७ हजार ३१ मते मिळाली.
04 Jun, 24 : 01:01 PM
ठाणे लोकसभा म्हस्के 104698 मतांनी आघाडीवर
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 301668
राजन विचारे - 196970
म्हस्के आघाडी -104698
04 Jun, 24 : 01:01 PM
कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे -४६०४२ मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरी अंती मिळालेली मते
श्रीकांत शिंदे- १०५२३४
वैशाली दरेकर-५९१९२
श्रीकांत शिंदे -४६०४२ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:58 PM
भंडारा गोंदिया अपडेट - काँग्रेस उमेदवार 942 मतांनी भाजपाच्या पुढे
भाजपा : सुनील मेंढे - 1,54,933
काँग्रेस : प्रशांत पडोळे - 1,55,875
बसपा : संजय कुंभलकर - 7,066
काँग्रेस उमेदवार 942 मतांनी भाजपाच्या पुढे
04 Jun, 24 : 12:57 PM
मुंबई उत्तर पूर्व संजय पाटील २० हजार ४८२ मतांनी आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्व -
संजय पाटील - २२६८५४
मिहिर कोटेचा - २०६३७२
संजय पाटील २० हजार ४८२ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:56 PM
कल्याण लोकसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरीअंती श्रीकांत शिंदे ३४६०६ मतांनी आघाडीवर
तिसऱ्या फेरी अंती मिळालेली मते
श्रीकांत शिंदे- ७९२९१
वैशाली दरेकर-४५१८५
श्रीकांत शिंदे -३४६०६ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:51 PM
उत्तर मध्य मुंबई उज्ज्वल निकम आघाडीवर
उत्तर मध्य मुंबई
सातवी फेरी
उज्वल निकम - 27,757
वर्षा गायकवाड - 18,906
एकूण मतदान
उज्वल निकम - 1,76,460
वर्षा गायकवाड -1,28,739
04 Jun, 24 : 12:49 PM
नेस्को मतदार मोजणी कक्षात तांत्रिक बिघाड
नेस्को मतदार मोजणी कक्षात तांत्रिक बिघाड झाल्याने अपडेट्स मिळण्यास उशीर होत आहे.
04 Jun, 24 : 12:44 PM
भंडारा गोंदिया - काँग्रेस उमेदवार 317 मतांनी पहिल्यांदाच भाजपाच्या पुढे
भंडारा गोंदिया अपडेट
भाजपा : सुनील मेंढे - 1,41,209
काँग्रेस : प्रशांत पडोळे - 1,41,526
बसपा : संजय कुंभलकर - 6,471
काँग्रेस उमेदवार 317 मतांनी पहिल्यांदाच भाजपाच्या पुढे
04 Jun, 24 : 12:43 PM
ठाणे लोकसभा म्हस्के ९९ हजार मतांनी आघाडीवर
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 281127
राजन विचारे - 181760
म्हस्के आघाडी - 99367
04 Jun, 24 : 12:41 PM
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा वायकर यांची 3502 मतांची आघाडी
सहाव्या फेरीचा निकाल
अमोल कीर्तिकर उद्धव सेना 19454
रवींद्र वायकर शिंदे सेना 22956
वायकर यांची मतांची आघाडी- 3502
04 Jun, 24 : 12:40 PM
सुनील तटकरे 44 हजार 429 मतांनी आघाडीवर
रायगड लोकसभा मतमोजणी 15 वी फेरी: सुनील तटकरे 44 हजार 429 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:34 PM
दिंडोरी लोकसभा भास्कर भगरे आघाडीवर
नववी फेरी अखेर
भास्कर भगरे २,१९, ४९९
भारती पवार १,९०,७७६
भास्कर भगरे यांची
२८,७२३ मतांनी आघाडी
04 Jun, 24 : 12:28 PM
रामटेक - काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 35,632 मतांनी आघाडीवर
रामटेक - सहाव्या फेरीनंतर
काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 35,632 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:28 PM
मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई आघाडीवर
अकरावी फेरी
अनिल देसाई - 231157
राहुल सावंत - 206374
---
आघाडी - 24783
04 Jun, 24 : 12:25 PM
नितीन गडकरी ४७३९८ मतांनी आघाडीवर
५ फेरीनंतर भाजप नेते नितीन गडकरी ४७३९८ मतांनी आघाडीवर.
नितीन गडकरी (भाजप) : १९१८४८
विकास ठाकरे (काँग्रेस) : १४४४५०
04 Jun, 24 : 12:20 PM
मिहिर कोटेचा ३१९० मतांनी आघाडीवर
* मुंबई उत्तर पूर्व -
संजय दिना पाटील - १ लाख ७८ हजार २८३
मिहीर कोटेचा - १ लाख ८१ हजार ४७३
मिहिर कोटेचा ३१९० मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:19 PM
रायगड - सुनील तटकरे आगाडीवर
रायगड १४ वी फेरी
सुनील तटकरे ४० हजार ८२८ ची आघाडी
04 Jun, 24 : 12:18 PM
प्रतिभा धानोरकर 61,760 मतांनी आघाडीवर
चंद्रपूर - चौथ्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा 61,760 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:17 PM
नाशिक- उद्धव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर
सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट होत चालली असून नवव्या फेरी अखेरीस उद्धव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १ लाख ३ हजार मतांची आघाडी घेतल्याने
त्यांच्या पक्षात जल्लोष सुरू झाला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादीचेच समीर भुजबळ यांना अनुक्रमे १ लाख ८७ हजार आणि २ लाख ९२ हजार मतांनी हेमंत गोडसे यांनी पराभूत करून ते जायंट
किलर ठरले होते.
04 Jun, 24 : 12:16 PM
साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर
सातारा : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाचा निकाल फेरीनिहाय समोर येत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. पाचव्या फेरीअखेर शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ तर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना १ लाख २८ हजार ३७५ मते मिळाली. शशिकांत शिंदे १२ हजार ७०७ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 12:06 PM
मुंबई उत्तर पूर्व - दुपारी बारा वाजेपर्यंत
संजय दिना पाटील - १ लाख ७१ हजार ७२८
मिहीर कोटेचा - १ लाख ६२ हजार ३६१
संजय दिना पाटील ९४२१ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:05 PM
चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०२४
काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा 47739 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:04 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नारायण राणे आघाडीवर...
दहाव्या फेरीनंतर नारायण राणे १८९४९ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 12:03 PM
अकोला - डॉक्टर अभय पाटील हे 13 हजार 750 मतांनी आघाडीवर
आठव्या फेरी अखेर मतमोजणी
भाजपचे अनुप धोत्रे यांना आठव्या फेरीत 18 449 मध्ये तर ऐकून मते एक लाख 31 हजार 741
महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांना 17 हजार 998 ऐकून मते एक लाख 45 हजार 491
वंचित चे प्रकाश आंबेडकर यांना आठव्या फेरीत 13 हजार 95 तर ऐकून मते 94 281 प्राप्त झाली आहेत.
डॉक्टर अभय पाटील हे 13 हजार 750 मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 12:01 PM
कल्याण लोकसभा मतदारसंघ
दुसऱ्या फेरी अंती मिळालेली मते
श्रीकांत शिंदे- ५२६७५
वैशाली दरेकर-३०९६५
श्रीकांत शिंदे -२१७१० मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 12:00 PM
मुंबई दक्षिण मध्य
नववी फेरी
अनिल देसाई - 190005
राहुल शेवाळे - 168502
अनिल देसाई 21 हजार 503 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:59 AM
सातव्या फेरी अखेर राम सातपुतेंना 15 हजारांची आघाडी; प्रणिती शिंदे पिछाडीवर
सोलापूर : तिसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांनी एकूण 10 हजार 256 मतांनी आघाडी घेतली होती. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सातव्या फेरी अखेर 15000 मतांनी पिछाडीवर आहेत. शिंदे यांची लीड तोडून सध्या राम सातपुतेंनी 15 हजारांची आघाडी घेतली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. सध्या आठव्या फेरीची मतमोजणी सुरू आहे.
04 Jun, 24 : 11:57 AM
बुलढाणा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव आघाडीवर
बुलढाणा : महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर 11034 मतांची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर हे दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना 79388 मते पडली आहेत.
04 Jun, 24 : 11:56 AM
रावेर
रक्षा खडसे २१३७९४
श्रीराम पाटील १३६२२५
मताधिक्य-७७५६९
04 Jun, 24 : 11:51 AM
२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा
चौथ्या फेरीचा निकाल
अमोल कीर्तिकर उद्धव सेना 21111
रवींद्र वायकर शिंदे सेना 18231
मतांची आघाडी- 2880
04 Jun, 24 : 11:47 AM
बुलढाणा लाेकसभा मतदार संघ
सहाव्या फेरी अखेर
प्रतापराव जाधव (शिवसेना) 90422
प्रा नरेंद्र खेडेकर (शिवसेना- उबाठा) 79388
रविकांत तुपकर (अपक्ष) 62170
04 Jun, 24 : 11:46 AM
जळगावात भाजपाच्या स्मिता वाघ एक लाख मतांनी पुढे
जळगाव - जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील एफसीआय गोदामात सकाळपासून मतमोजणी सुरू झालेली असून, जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून करण पवार रिंगणात आहेत. स्मिता वाघ यांना २, ४०, ७२१, तर करण पवार यांना १, ३३, ७७२ मते आतापर्यंत मिळालेली आहेत.
04 Jun, 24 : 11:45 AM
पालघर लोकसभा सहाव्या फेरी अखेर भाजपचे डॉ. हेमंत सवरा ४० हजार ७८० मतांनी पुढे
पालघर :- पालघर लोकसभा सहाव्या फेरी अखेर भाजपचे डॉ. हेमंत सवरा ( १ लाख ४६ हजार ७०७) ४० हजार ७८० मतांनी पुढे आहेत. दोन नंबरवर महाविकास आघाडीच्या भारती कामडी (१लाख ५ हजार ९२७) ह्या दोन नंबर वर आहेत
04 Jun, 24 : 11:42 AM
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ
फेरी : 2
1. बसपा : संजय कुंभलकर - 1,788
2. काँग्रेस : प्रशांत पडोळे :- 43,289
3. भाजपा : सुनील मेंढे - 46,385
4. अभा परिवार पार्टी : अजय कुमार भारती - 381
5. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया : देवीलाल नेपाळे - 182
6. लोक स्वराज्य पार्टी : विलास लेंडे - 123
7. वंचित बहुजन आघाडी : संजय केवट - 1,241
8. अपक्ष : डॉ आकाश जिभकाटे - 177
9. अपक्ष : शरद इटवाले - 51
10. अपक्ष : चैत्राम कोकासे - 75
11. अपक्ष : तुळशीराम गेडाम - 87
12. अपक्ष : प्रदीप ढोबळे - 101
13. अपक्ष : बेनिराम फुलबांधे - 134
14. अपक्ष : वीरेंद्र कुमार जयस्वाल - 238
15. अपक्ष : विलास राऊत - 125
16. अपक्ष : सुमित पांडे - 314
17. अपक्ष : सूर्यकिरण नंदागवळी - 119
18. अपक्ष : सेवक वाघाये- 1,094
04 Jun, 24 : 11:40 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
सातव्या फेरीनंतर नारायण राणे ९८७९ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 11:39 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 194449
राजन विचारे - 132203
म्हस्के आघाडी - 62246
04 Jun, 24 : 11:37 AM
मुंबई दक्षिण मध्य
आठवी फेरी
अनिल देसाई - 169840
राहुल शेवाळे - 146919
अनिल देसाई 22 हजार 900 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:36 AM
मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील - १ लाख ४० हजार ७४९
मिहीर कोटेचा - १ लाख ३६ हजार ९५६
संजय दिना पाटील ३७९३ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:36 AM
सोलापूर लोकसभा मतमोजणी
1)प्रणिती शिंदे(काँग्रेस) 1,62,945
2)राम सातपुते(भाजप) 1,70,730
मताधिक्य-7785(भाजप)
04 Jun, 24 : 11:35 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघ
सहावी फेरी अखेर
डॉ़ अभय पाटील (काँग्रेस) १०३,३६४
अनुप धोत्रे-(भाजप)९७,६७१
प्रकाश आंबेडकर-(वंचित)७२,४३७
५,६९३ मतांची डाॅ. पाटील आघाडीवर
अकाेला लाेकसभा मतदार संघात ११ लाख ६८ हजार ३६६ एवढे मतदान झाले़ सहाव्या फेरी अखेर २ लाख ८०,४८ मतांची माेजणी झाली आहे.
04 Jun, 24 : 11:34 AM
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर
भाऊसाहेब वाकचौरे -२३१५१
सदाशिव लोखंडे -२२४६०
उत्कर्ष रुपवते -५४४४
लीड ४३२४ (वाकचौरे यांना)
04 Jun, 24 : 11:34 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघ
सहावी फेरी अखेर
डॉ़ अभय पाटील (काँग्रेस) १०३,३६४
अनुप धोत्रे-(भाजप)९७,६७१
प्रकाश आंबेडकर-(वंचित)७२,४३७
५,६९३ मतांची डाॅ. पाटील आघाडीवर
04 Jun, 24 : 11:33 AM
रायगड - सुनील तटकरे 39 हजार 511 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:33 AM
सहावी फेरी (लीड, ओमराजे)
उस्मानाबाद : 1781
परांडा : 2940
उमरगा : 3228
बार्शी : 1575
तुळजापूर : 2294
औसा : 2345
टोटल : 13713
04 Jun, 24 : 11:33 AM
उत्तर मुंबईतून पीयूष गोयल 70 हजार 071 मतांनी आघाडीवर
पीयूष गोयल - 1,37,248 (+ 70071)
भूषण पाटील - 67177(- 70071)
सोनल गोंदने - 1331(- 135970)
04 Jun, 24 : 11:32 AM
धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेगाने चालू आहे. अकरा वाजेपर्यंत पाचव्या फेऱ्याचे निकाल हाती लागले असून पाचव्या फेरीअखेर शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील 19,552 मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 11:32 AM
भंडारा गोंदिया
भाजपा : सुनील मेंढे - 85039
काँग्रेस : प्रशांत पडोळे - 78216
बसपा : संजय कुंभलकर - 3447
04 Jun, 24 : 11:31 AM
मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील - १ लाख २६ हजार ६१२
मिहीर कोटेचा - १ लाख १८ हजार २६३
संजय दिना पाटील ८३४९ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:31 AM
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 5 व्या फेरी अखेर प्रतापराव जाधव 14 497 मतांनी आघाडीवर.
प्रतापराव जाधव 77556
नरेंद्र खेडेकर 63059
रविकांत तुपकर 51956
04 Jun, 24 : 11:30 AM
सातवी फेरी ( दिंडोरी जि. नाशिक)
भारती पवार : 150437
भास्कर भगरे : 168929
बाबू भगरे : 31124
नोटा : 2475
( महाविकास आघाडीचे भास्कर भगरे 18,492 मतांनी पुढे)
04 Jun, 24 : 11:30 AM
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
सुनील मेंढे
भाजपा - 85039
डॉ. प्रशांत पडोळे
काँग्रेस - 78216
6823 मतांनी भाजप आघाडीवर
04 Jun, 24 : 11:29 AM
चंद्रपूरमध्ये पहिल्यापासून काँग्रेसच्या धानोरकर आघाडीवर
चंद्रपूर - चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहे. पहिल्या राऊंडमध्ये प्रतिभा धानोरकर यांना ३० हजार, दुसऱ्या राऊंडमध्ये ६१ हजार ३२० तर तिसऱ्या राऊनंडमध्ये ८९ हजार ६०५ मते पडली. तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्या राऊंडमध्ये १९ हजार १९७, दुसरा ३७ हजार २५७ तर तिसऱ्या राऊनंडमध्ये ५४ हजार ९४० मते पडली. तिसऱ्या फेरीअंती काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या ३४,६६५ मतांनी आघाडीवर आहे.
04 Jun, 24 : 11:28 AM
मुंबई दक्षिण मध्य
सातवी फेरी
अनिल देसाई - 148368
राहुल शेवाळे - 128875
04 Jun, 24 : 11:28 AM
रायगड लोकसभा मतमोजणी
नववी फेरी
सुनील तटकरे 33 हजार 255 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:24 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 158437
राजन विचारे - 112133
म्हस्के आघाडी - 46304
04 Jun, 24 : 11:23 AM
राजाभाऊ वाजे 81425 मतांनी आघाडीवर
राजाभाऊ वाजे 251734
हेमंत गोडसे 170309
नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 81425 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:22 AM
भंडारा गोंदिया लोकसभा
सुनील मेंढे भाजपा - 72192
प्रशांत पडोळे काँग्रेस - 67261
सुनिल मेंढे भाजपा - 4931 मतांनी पुढे
04 Jun, 24 : 11:22 AM
भंडारा गोंदिया
भाजपा : सुनील मेंढे - 81493
काँग्रेस : प्रशांत पडोळे - 73903
बसपा : संजय कुंभलकर - 3318
04 Jun, 24 : 11:22 AM
बुलढाणा लोकसभा
आतापर्यंत १ लाख ८५ हजार ३८३ मतांची मोजणी पूर्ण.
प्रतापराव जाधव (शिंदेसेना) - ६१८४६
नरेंद्र खेडेकर (उध्दवसेना) - ५०४५७
रविकांत तुपकर (अपक्ष) - ४०५५४
संदिप शेळके (अपक्ष) - २७३७
वसंत मगर (वंबआ) -१५००६
04 Jun, 24 : 11:22 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 149795
राजन विचारे - 104907
म्हस्के आघाडी - 44888
04 Jun, 24 : 11:21 AM
जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट
जळगाव - जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील एफसीआय गोदामात सकाळपासून मतमोजणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत सात राऊंड झाले असून, जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अनुक्रमे स्मिता वाघ व रक्षा खडसे यांनी आघाडी घेतलेली आहे. मतदान केंद्राच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असला तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते समर्थक यांची मात्र अजून फारशी गर्दी झालेली नाही. साडेअकरा वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर तुरळक कार्यकर्ते होते.
04 Jun, 24 : 11:21 AM
सुजय विखे पाटील यांना राहुरी पारनेर आणि अहमदनगर मतदारसंघाने तारले. या तिन्ही मतदारसंघात विखे पाटील यांनी चांगली आघाडी घेतली आहे. निलेश लंके यांना होम ग्राउंड असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित मतदान झाले नाही असे चार फेऱ्यांमध्ये दिसून आले आहे.
04 Jun, 24 : 11:21 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
सहाव्या फेरीनंतर नारायण राणे ७८१८ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 11:20 AM
नाशिकमध्ये आठव्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे एकूण 71 हजार हून अधिक मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:20 AM
कल्याण लोकसभा मतदारसंघ
श्रीकांत शिंदे- २५८६१
वैशाली दरेकर-१४५८३
श्रीकांत शिंदे -११२७८ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:19 AM
हीव्हीपॅड यंत्रावर संशय
जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघात मतमोजणी दरम्यान व्हीव्हीपॅड यंत्रावर संशय व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली.
04 Jun, 24 : 11:19 AM
सोलापुरातून राम सातपुतेंनी घेतली आघाडी; प्रणिती शिंदे 1500 मतांनी पिछाडीवर
सोलापूर : पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांनी एकूण 10 हजार 256 मतांनी आघाडी घेतली होती. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या चौथ्या फेरी अखेर 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. शिंदे यांची लीड तोडून सध्या राम सातपुतेंनी 1500 मतांनी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 11:18 AM
चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024
राऊंड 1-2- 3
1. प्रतिभा धानोरकर - काँग्रेस- 30,000- 61,320 - 89,605
2. सुधीर मुनगंटीवार - भाजप - 19,197 - 37,257 -54,940
3. राजेंद्र रामटेके - बसप - 487 - 836 -1258
4. अवचित सयाम - जगोंपा - 106 - 198 -266
5. अशोक राठोड - जविपा - 127 - 193 - 294
6. नामदेव शेडमाके - गोंगपा - 155 - 245 - 345
7. पूर्णिमा घोनमोडे - बरिसोपा- 39 - 71 - 2230
8. राजेश बेले - वंबआ - 638 - 1349 - 2164
9. वनिता राऊत - अभामाप - 47 - 102 - 154
10. विकास लसंते - सराप- 41 - 158 - 213
11. विद्यासागर कोसर्लावार - भिसे - 61 - 134 - 204
12. सेवकदास बरके - पिपाइं(डे.) - 103 - 198 - 293
13. दिवाकर उराडे - अपक्ष - 126 - 287 - 436
14. मिलिंद दहिवले - अपक्ष - 70 - 159 - 219
15. संजय गावंडे - अपक्ष - 217 - 465 - 701
16. नोटा - 419 - 865 - 1356
काँग्रेस - 10,803 - 24,063 - 34,665 ने आघाडीवर
04 Jun, 24 : 11:16 AM
मुंबई: पोलिस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी विक्रोळीतील मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला
04 Jun, 24 : 11:16 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघ
पाचव्या फेरी अखेर
डॉ़ अभय पाटील (काँग्रेस) ८४,२८०
अनुप धोत्रे-(भाजप)८२,१६५
प्रकाश आंबेडकर-(वंचित)५९,६३९
04 Jun, 24 : 11:16 AM
यवतमाळ वाशिम लोकसभा
संजय देशमुख - 1,56,253
राजश्री पाटील - 1,24,040
देशमुख यांचा लीड 32,213
04 Jun, 24 : 11:15 AM
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरी अखेर अधिकृत व्यक्ती मिळालेल्या आकडेवारीनुसार महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे 44 हजार 512 मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 11:15 AM
जळगाव
1.स्मिता वाघ...२०२०१७
2.करण पवार..१०७८१४
मताधिक्य-९४२०३
04 Jun, 24 : 11:14 AM
मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील - १ लाख ११हजार ९७७
मिहीर कोटेचा - ९३ हजार ८९९
संजय दिना पाटील १८०७८ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:14 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
पाचव्या फेरीनंतर नारायण राणे ४२३९ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 11:13 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 141151
राजन विचारे - 99576
म्हस्के आघाडी - 41575
04 Jun, 24 : 11:13 AM
भंडारा गोंदिया
भाजपा : सुनील मेंढे - 68,634
काँग्रेस : प्रशांत पडोळे - 63,144
बसपा : संजय कुंभलकर - 2775
04 Jun, 24 : 11:13 AM
नाशिक : मतमोजणी केंद्राबाहेर दीड किलोमीटर अंतरावर चारही बाजूने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात. पोलिसांनी वाढवला बंदोबस्त.
04 Jun, 24 : 11:12 AM
हातकणंगलेत सत्यजीत पाटील आघाडीवर
कोल्हापूर : हातकणंगले मतदार संघात इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांनी चौथ्या फेरीअखेर ५७६२ मतांची आघाडी मिळवली. पहिल्या फेरीपासून आघाडी घेत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पिछाडीवर ढकलले.
04 Jun, 24 : 11:11 AM
प्रतापराव जाधव १० हजार १६२ मतांनी आघाडीवर
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव १० हजार १६२ मतांनी आघाडीवर. आतापर्यंत झालेल्या १२८२८८ मतांपैकी ४५ हजार १६७ मते जाधवांनी घेतली असून महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांना ३५ हजार २६५ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना २६५९८ मते मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 11:10 AM
मुंबई दक्षिण मध्य
सहावी फेरी
अनिल देसाई - 123741
राहुल शेवाळे - 112893
04 Jun, 24 : 11:10 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 132390
राजन विचारे - 92065
म्हस्के आघाडी - 40325
04 Jun, 24 : 11:10 AM
चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024
राऊंड 1-2
1. प्रतिभा धानोरकर - काँग्रेस- 30,000- 61,320
2. सुधीर मुनगंटीवार - भाजप - 19,197 - 37,257
3. राजेंद्र रामटेके - बसप - 487 - 836
4. अवचित सयाम - जगोंपा - 106 - 198
5. अशोक राठोड - जविपा - 127 - 193
6. नामदेव शेडमाके - गोंगपा - 155 - 245
7. पूर्णिमा घोनमोडे - बरिसोपा- 39 - 71
8. राजेश बेले - वंबआ - 638 - 1349
9. वनिता राऊत - अभामाप - 47 - 102
10. विकास लसंते - सराप- 41 - 158
11. विद्यासागर कोसर्लावार - भिसे - 61 - 134
12. सेवकदास बरके - पिपाइं(डे.) - 103 - 198
13. दिवाकर उराडे - अपक्ष - 126 - 287
14. मिलिंद दहिवले - अपक्ष - 70 - 159
15. संजय गावंडे - अपक्ष - 217 - 465
16. नोटा - 419 - 865
काँग्रेस - 10,803 - 24,063 ने आघाडीवर
04 Jun, 24 : 11:09 AM
रामटेक लोकसभा
काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे हे ५ फेरीनंतर सुमारे १८ हजार मतांनी पुढे.
04 Jun, 24 : 11:09 AM
श्रीपाद नाईक यांची ‘डबल हॅट्रिक’
पणजी : लोकसभेची सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेले केंद्रीय पर्यटनराज्यमंत्री श्रीपाद नाईक डबल हॅट्रिक करणार आहेत. मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार नजीकचे प्रतिस्पर्धी कॉग्रेसचे उमेदचार माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्यापेक्षा त्यांनी तब्बल ४५,२६० मतांची आघाडी घेतली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात मात्र भाजप उमेदवार पल्लवी धेंपे पिछाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 11:08 AM
अकोला लोकसभा मतदारसंघ
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील 2095 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 11:02 AM
सातारा लोकसभा मतदारसंघ तिसरी फेरी जाहीर, उदयनराजे भोसले 74310 आणि शशिकांत शिंदे यांची ८२९४३
04 Jun, 24 : 11:02 AM
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भाजपा - 61989
काँग्रेस - 56406
5583 मतांनी भाजप आघाडीवर
04 Jun, 24 : 11:01 AM
दिंडोरी लोकसभा
भास्करराव भगरे 120763
भारतीताई पवार 107462
फेरी 5 पर्यंत एकुण मतदान
04 Jun, 24 : 11:01 AM
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ
पहिली फेरी
1. बसपा : संजय कुंभलकर - 765
2. काँग्रेस : प्रशांत पडोळे :- 21,900
3. भाजपा : सुनील मेंढे - 22,990
4. अभा परिवार पार्टी : अजय कुमार भारती - 188
5. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया : देवीलाल नेपाळे - 86
6. लोक स्वराज्य पार्टी : विलास लेंडे - 45
7. वंचित बहुजन आघाडी : संजय केवट - 600
8. अपक्ष : डॉ आकाश जिभकाटे - 74
9. अपक्ष : शरद इटवाले - 23
10. अपक्ष : चैत्राम कोकासे - 35
11. अपक्ष : तुळशीराम गेडाम - 40
12. अपक्ष : प्रदीप ढोबळे - 44
13. अपक्ष : बेनिराम फुलबांधे - 69
14. अपक्ष : वीरेंद्र कुमार जयस्वाल - 108
15. अपक्ष : विलास राऊत - 62
16. अपक्ष : सुमित पांडे - 170
17. अपक्ष : सूर्यकिरण नंदागवळी - 55
18. अपक्ष : सेवक वाघाये- 438
नोटा - 349
पहिल्या फेरीत मोजलेली मते - 48,031
04 Jun, 24 : 11:01 AM
जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थांबवली. मतदान यंत्र एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी 99% कशी आहे अशी शंका उपस्थित केली. ज्या मतदान यंत्राचे बॅटरी 99% आहे त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे
04 Jun, 24 : 10:59 AM
अहमदनगर: चौथ्या फेरीअखेर डॉ. सुजय विखे पाटील 10 हजार 190 मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 10:59 AM
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीचे उमेदवार एड. उज्ज्वल निकम आघाडीवर
04 Jun, 24 : 10:58 AM
रामटेकमध्ये तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16, 200 मतांनी पुढे.
04 Jun, 24 : 10:58 AM
रावेर
रक्षा खडसे १८०८०५
श्रीराम पाटील १०५४७८
मताधिक्य-७५३२७
04 Jun, 24 : 10:56 AM
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पिछाडीवर
नाशिक - लोकसभेच्या नाशिकच्या जागेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे चौथ्या फेरीअखेर ६९८९ मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीच्या उमेदवार व केंद्रीय कुटूंब कल्याण आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार पिछाडीवर आहे. चौथ्या फेरीअखेर भारती पवार यांना ८७१९५ तर भास्कर भगरे यांना ९४१८४ मते पडली आहेत. भाजपने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. कारण भारती पवार यांच्या प्रचारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत या आंतरराष्ट्रीय कांदा बाजारपेठेत सभा घेतली होती.
04 Jun, 24 : 10:55 AM
यवतमाळ वाशिम लोकसभा
संजय देशमुख - 1,36,015
राजश्री पाटील - 1,04,732
देशमुख यांचा लीड 31,283
04 Jun, 24 : 10:55 AM
रक्षा खडसे ७४ हजार मतांनी आघाडीवर
जळगाव : रावेर मतदार संघात तिसऱ्या फेरीमध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांना १ लाख ७० हजार ७५१ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांना ९६ हजार २९३ मते मिळाली असून खडसे यांना ७४ हजार ४५८ मतांची आघाडी मिळाली आहे.
04 Jun, 24 : 10:54 AM
प्रतिभा धानोरकर 50,788 हजार मतांनी आघाडीवर
चंद्रपूर : काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 50,788 हजार मतांनी आघाडीवर. धानोरकर यांना 1,18,774 मते तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 67,986 मते मिळाली.
04 Jun, 24 : 10:54 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
चौथ्या फेरीनंतर नारायण राणे १७२४ मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 10:53 AM
प्रतापराव जाधव ६८१४ मतांनी आघाडीवर
बुलढाणा: दुसऱ्या फेरी अखेर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे ६८१४ मतांनी आघाडीवर आहेत. प्रतापराव जाधव यांना दुसऱ्या फेरीअखेर एकूण ३० हजार ७८० मते मिळाली असून मविआचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना २३ हजार ९६६ मते मिळाली आहेत. शेतकरी नेते तथा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना १९ हजार ७३९ मते मिळाली आहे.
04 Jun, 24 : 10:51 AM
वर्धा
रामदास तडस- 53095
अमर काळे- 61329
आघाडी- 8234
04 Jun, 24 : 10:51 AM
सोलापुरातील काँग्रेस भवनमध्ये निकालाआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस उमेदवार यांच्या वाढत चाललेल्या आघाडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.
04 Jun, 24 : 10:50 AM
मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील - ८८४४५
मिहीर कोटेचा - ७३०९७
संजय दिना पाटील १५३४८ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:47 AM
रावेर
रक्षा खडसे 170751
श्रीराम पाटील 96293
04 Jun, 24 : 10:46 AM
चौथी फेरी (लीड, ओमराजे)
उस्मानाबाद : 1948
परांडा : 2965
उमरगा : 2865
बार्शी : 1716
तुळजापूर : 1532
औसा : 5055
टोटल : 16081
04 Jun, 24 : 10:45 AM
पालघर:- पालघर लोकसभेत भाजपचे डॉक्टर हेमंत सवरा 17537 मतांनी आघाडीवर आहेत
04 Jun, 24 : 10:45 AM
चिमूरमध्ये पहिल्या फेरीअखेर नामदेव किरसान आघाडीवर
गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी आघाडी घेतली आहे. किरसान हे सरासरी तीन हजार इतक्या मतांनी पुढे आहेत.
या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी लढत आहे.
04 Jun, 24 : 10:43 AM
जळगाव
स्मिता वाघ...१४८८९१
करण पवार..७८४००
मताधिक्य-७०४९१
04 Jun, 24 : 10:43 AM
राजाभाऊ वाजे ३० हजार मतांनी आघाडीवर
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे ३०,५९९ मतांनी आघाडीवर आहेत. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे ५८२१५ तर राजाभाऊ वाजे यांना ८८८१७ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यापेक्षा १९,४५३ मतांनी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 10:42 AM
कल्याण लोकसभा मतदारसंघ
कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ
श्रीकांत शिंदे- ३३५८
वैशाली दरेकर-२८९४
04 Jun, 24 : 10:42 AM
कल्याण लोकसभा मतदारसंघ
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ
श्रीकांत शिंदे- ४३७९
वैशाली दरेकर-१०१७
04 Jun, 24 : 10:41 AM
रायगड लोकसभा मतमोजणी
पहिली फेरी.. सुनील तटकरे आघाडीवर , 750 मतांनी पुढे...
दुसरी फेरी... सुनील तटकरे 5 हजार 400 मतांनी आघाडीवर...
तिसरी फेरी ...अनंत गीते 10700 मतांनी आघाडीवर ..
चौथी फेरी..... सुनील तटकरे 12 हजार मतांनी आघाडीवर ..
पाचवी फेरी .....सुनील तटकरे १६ हजार ३०० मताने पुढे
सहाव्या फेरी ....सुनील तटकरे २१ हजाराने पुढे
04 Jun, 24 : 10:41 AM
साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर
सातारा लोकसभा मतदार संघाच्या चौथ्या फेरीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या फेरीत शशिकांत शिंदे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 10:38 AM
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर महायुतीचे प्रतापराव जाधव 6814 मतांनी आघाडी वर आहेत.
प्रतापराव जाधव 30780
नरेंद्र खेडेकर 23966
राविकांत तुपकर 19739
एकूण 89690
04 Jun, 24 : 10:37 AM
मुंबई उत्तर पूर्व
संजय पाटील - ७५५५५
मिहिर कोटेचा - ६२५७४
- संजय पाटील - १२ हजार ९८१ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:36 AM
मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम आघाडीवर
04 Jun, 24 : 10:36 AM
रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!
रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असलेला शिंदेसेनेला धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी 28064 मते घेत शिंदेसेनेचे राजू पारवे यांना 3361 मतांनी मागे टाकले आहे. पारवे यांना 24403 मते मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 10:34 AM
लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या लाखलगावी देखील शुकशुकाट... अन्य फेरीत नेमके काय होणार तरीदेखील याची भक्त परिवाराला उत्सुकता कायम... दुपारपर्यंत शांतिगिरी महाराज नाशिक मध्ये होणार दाखल
04 Jun, 24 : 10:33 AM
बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर
04 Jun, 24 : 10:32 AM
रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे हे दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे. रक्षा खडसे यांना दुसऱ्या फेरीमध्ये ३६ हजार ३३२ मतांनी पुढे तर स्मिता वाघ ४३,४९६ मतांनी पुढे आहे.
04 Jun, 24 : 10:32 AM
रावेरमध्ये रक्षा खडसे ६७५३३ मतांनी पुढे
04 Jun, 24 : 10:32 AM
अहमदनगर : तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील ७०९३ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:31 AM
चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानाेरकरांची आघाडी
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काॅंग्रेसच्या प्रतिभा धानाेरकर यांनी भाजपाचे दिग्गज उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 10,803 मतांनी पिछाडीवर टाकत पहिल्याच फेरीत माेठी आघाडी घेतली आहे. चंद्रपूर मध्येसहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहे. यासह वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले यांनीही निवडणूक लढविली आहे.
04 Jun, 24 : 10:30 AM
एड. उज्वल निकम यांना आघाडी
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार ऍड. उज्वल निकम यांना मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्व येथे आघाडी घेतली आहे. निकम यांना वांद्रे पूर्व मधून ४ हजार ०१९ एवढी मतं मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 10:29 AM
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी यांनी 19,543 मतांची आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 10:29 AM
काँग्रेसचे बळवंत वानखेडे 3322 मतांनी आघाडीवर
अमरावती :लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या फेरी अखेर महाआघाडीमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे 3322 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 26117 मते मिळाली तर महायुतीमधील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 22795 मतं मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 10:28 AM
डॉक्टर अभय पाटील 44 88 मतांनी आघाडीवर
अकोला- अकोला लोकसभा मतदार संघातील मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी 44 88 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अनुप संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर आघाडी मिळवली आहे.
04 Jun, 24 : 10:27 AM
जळगावमध्ये स्मिता वाघ ५३७२३ मतांनी पुढे
04 Jun, 24 : 10:27 AM
मुंबई उत्तर पूर्व
संजय पाटील - ५६०३२
मिहिर कोटेचा - ४३७४४
संजय पाटील - १२ हजार २८८ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:27 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के : 74442
राजन विचारे : 55080
लीड : 19362
04 Jun, 24 : 10:26 AM
चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024
1. प्रतिभा धानोरकर - काँग्रेस- 30,000
2. सुधीर मुनगंटीवार - भाजप - 19,197
3. राजेंद्र रामटेके - बसप - 487
4. अवचित सयाम - जगोंपा - 106
5. अशोक राठोड - जविपा - 127
6. नामदेव शेडमाके - गोंगपा - 155
7. पूर्णिमा घोनमोडे - बरिसोपा- 39
8. राजेश बेले - वंबआ - 638
9. वनिता राऊत - अभामाप - 47
10. विकास लसंते - सराप- 41
11. विद्यासागर कोसर्लावार - भिसे - 61
12. सेवकदास बरके - पिपाइं(डे.) - 103
13. दिवाकर उराडे - अपक्ष - 126
14. मिलिंद दहिवले - अपक्ष - 70
15. संजय गावंडे - अपक्ष - 217
16. नोटा - 419
04 Jun, 24 : 10:26 AM
सातारा लोकसभा निकाल 2024
उदयनराजे भोसले -27 हजार 647
शशिकांत शिंदे -36 हजार 579 मते
शिंदे यांना 8932 मतांची आघाडी
04 Jun, 24 : 10:25 AM
यवतमाळ-वाशिम लोकसभा
पाचवी फेरी
संजय देशमुख - महाविकास आघाडी : ८८,५६५
राजश्री पाटील - महायुती : ६६,५४०
04 Jun, 24 : 10:22 AM
जळगाव
स्मिता वाघ...११११०३
करण पवार..६०८५३
मताधिक्य-५०२५०
04 Jun, 24 : 10:21 AM
भंडारा गोंदिया
भाजपा सुनील मेंढे - 33997
काँग्रेस प्रशांत पडोळे - 33585
04 Jun, 24 : 10:21 AM
नागपूर लोकसभा
दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुमारे 17000 मतांची आघाडी मिळाली आहे.
04 Jun, 24 : 10:19 AM
भिवंडी लोकसभा मतदारसंघात वीजपुरवठा खंडित होत असल्याने मतमोजणीला उशिरा सुरुवात
मतमोजणी केंद्रावर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने मतमोजणीला उशिरा सुरुवात झाली.
04 Jun, 24 : 10:19 AM
विशाल पाटील यांना आघाडी मिळाली, समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात
सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांना आघाडी मिळाल्यानंतर काँग्रेस कमिटी जवळ विशाल पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
04 Jun, 24 : 10:18 AM
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी यांनी 19,543 मतांची आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 10:18 AM
जळगाव
स्मिता वाघ...१०४८४०
करण पवार..५८४२०
मताधिक्य-४६४२०
04 Jun, 24 : 10:16 AM
वर्धा
फेरी- तिसरी
रामदास तडस- 46506
अमर काळे- 53235
आघाडी-6,729 काळे
04 Jun, 24 : 10:15 AM
२७-मुंबई उत्तर पश्चिममधून शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे 208 मतांनी आता आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 10:12 AM
रावेर : रक्षा खडसे 53589 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:12 AM
भंडारा गोंदिया
भाजपा सुनील मेंढे - 30488
काँग्रेस प्रशांत पडोळे - 29210
04 Jun, 24 : 10:12 AM
यवतमाळ वाशिम लोकसभा
संजय देशमुख - 88,565
राजश्री पाटील - 66,540
देशमुख यांचा लीड 22,025
04 Jun, 24 : 10:11 AM
काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 27 हजारांनी आघाडीवर
चंद्रपूर : तिसरी फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 27 हजारांनी आघाडीवर. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वणी या चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेस प्रत्येक फेरीत आघाडीवर. राजुरा व वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची घोडदौड. वरोरा व आर्णीत काँग्रेस आणि भाजपात काट्याची लढत. चौथी फेरी सुरू. अद्यापही फेऱ्यांची घोषणा झालेली नाही.
04 Jun, 24 : 10:11 AM
अकोला लोकसभा मतदारसंघ
भाजपचे अनुप धोत्रे 15556
काँग्रेसचे डॉ. अभय पाटील 18567
वंचितचे प्रकाश आंबेडकर 10397
04 Jun, 24 : 10:10 AM
सातारा लोकसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले :-१५९८३
शशिकांत शिंदे:-२३१८५
04 Jun, 24 : 10:09 AM
मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील १६१८९ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:09 AM
जळगाव
स्मिता वाघ...८७०९४
करण पवार...४५८७३
04 Jun, 24 : 10:08 AM
यवतमाळ-वाशिम मतदारसंघ
संजय देशमुख - महाविकास आघाडी : ६८,१९३
राजश्री पाटील - महायुती : ४८,९५३
04 Jun, 24 : 10:08 AM
हेमंत गोडसे यांच्या नाशिकरोड येथील घरासमोर शुकशुकाट
04 Jun, 24 : 10:07 AM
माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले
सोलापूर : माढा लोकसभेसाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मतपेट्या बंद पडल्याने निकाल थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
04 Jun, 24 : 10:07 AM
चंद्रकांत खैरे ११४२९
संदीपान भुमरे १६४०७
इम्तियाज जलील १९७४५
04 Jun, 24 : 10:06 AM
छत्रपती संभाजीनगर - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार इम्तियाज जलील हे आघाडीवर.
04 Jun, 24 : 10:03 AM
देशमुख यांची ६ हजार ८७८ मतांची आघाडी
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून महाविकास आघाडीची घौडदौड सुरू आहे. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीतही आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी सहा हजार ८७८ मतांनी आघाडी घेतली आहे. देशमुख यांना या फेरीत २४ हजार ८०५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना १७ हजार ९२७ मते मिळाली आहेत. या फेरीत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून राजश्री पाटील यांना ४९१ मतांची आघाडी मिळाली आहे.
04 Jun, 24 : 10:02 AM
नितीन गडकरी भारतीय जनता पार्टी 40856
विकास ठाकरे इंडियन नॅशनल काँग्रेस 29181
11675 मतांनी नितीन गडकरी आघाडीवर
04 Jun, 24 : 10:02 AM
रायगड
सुनील तटकरे ४८१४६
अनंत गीते ४४५६७
३५९७ मतांनी तटकरे आघाडीवर
04 Jun, 24 : 10:01 AM
सातारा लोकसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले :-९९८३
शशिकांत शिंदे:-१२६२६
04 Jun, 24 : 10:01 AM
भंडारा-गोंदिया लोकसभा अपडेट
भाजपा सुनील मेंढे - 18857
काँग्रेस प्रशांत पडोळे 17846
04 Jun, 24 : 10:00 AM
सत्यजीत पाटील यांची १४४८ मतांची आघाडी
कोल्हापूर : हातकणंगले मतदार संघाच्या मतमोजणीत कमालीची चुरस दिसत आहे. प्रत्येक फेरीत इंडिया आघाडीचे सत्यजीत पाटील आणि महायुतीचे धैर्यशील माने यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. तिरंगी लढतीत राजू शेट्टी हे मात्र मागे पडल्याचे दिसत आहे. दुस-या फेरीनंतर सत्यजीत पाटील यांनी १४४८ मतांची आघाडी घेतली. पोस्टल मतांमध्ये धैर्यशील माने यांनी काहीशी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत या दोन्ही उमेदवारांमध्ये कमालीची चुरस दिसली.
04 Jun, 24 : 09:59 AM
तिसऱ्या फेरी अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तीस हजार 480 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 09:59 AM
रावेरमध्ये रक्षा खडसे ३६३३२ मतांनी पुढे
04 Jun, 24 : 09:57 AM
मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील १०९७४ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 09:57 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 52488
राजन विचारे - 42315
म्हस्के आघाडी - 10173
04 Jun, 24 : 09:56 AM
अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत डॉक्टर पाटील 6370 मतांनी पुढे
अकोला - अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणीची पहिल्या फेरीची मतमोजणी आटोपली असून या मतमोजणीमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी 6370 मतांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे अनुप संजय धोत्रे पिछाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:56 AM
माढा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटलांना ७५२२ मतांचा लीड
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत. माढा मतदारसंघातील पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. माळशिरस सांगोला व करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाली असून धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:54 AM
२७-मुंबई उत्तर पश्चिम मधून उद्धव सेनेचे अमोल कीर्तिकर ११६२ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:54 AM
दिंडोरीत भास्कर भगरे दुसऱ्या फेरी अखेर 5200 मतांनी पुढे
04 Jun, 24 : 09:54 AM
लातूर लोकसभा
पहिली फेरी काँग्रेस आघाडीवर
डॉ शिवाजी काळगे 22976
सुधाकर शृंगारे 2167
1301 मतांनी काँग्रेसचे डॉ. काळगे आघाडी
04 Jun, 24 : 09:54 AM
अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील आघाडीवर
अहमदनगर: दुसऱ्या फेरी अखेर 4729 मतांनी भाजपचे डॉक्टर विखे पाटील आघाडीवर, विखे पाटील यांनी पहिल्या फेरीत 3149 तर दुसऱ्या फेरीमध्ये 1580 मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 09:53 AM
नाशिक : आतापर्यंतच्या मतमोजणीत चौथ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे 34 हजारांहून 460 मतांनी पुढे आहेत.
04 Jun, 24 : 09:53 AM
भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघ
महायुतीचे खासदार सुनील मेंढे 16008
महाआघाडीचे प्रशांत पडोळे 14359
सुनील मेंढे 1649 मतांनी समोर
04 Jun, 24 : 09:52 AM
प्रणिती शिंदे 17 हजार मतांनी आघाडीवर
सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण 17 हजार 256 मतांनी आघाडीवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. साडेनऊ पर्यंत दुसरी फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी 6 हजार 661 तर दुसऱ्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी 11 हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 09:52 AM
रावेर
रक्षा खडसे 73513
श्रीराम पाटील 48113
04 Jun, 24 : 09:51 AM
अमर काळे ५,९९१ मतांनी आघाडीवर
वर्धा : वर्धा लाेकसभा मतदार संघातून दुसऱ्या फेरीनंतर शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे ५,९९१ मतांनी आघाडीवर आहे.
04 Jun, 24 : 09:51 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 47999
राजन विचारे - 40362
म्हस्के आघाडी - 7637
04 Jun, 24 : 09:51 AM
सोलापूर लोकसभा मतमोजणी
प्रणिती शिंदे (काँग्रेस) - 64,389
राम सातपुते (भाजप) - 47,133
मताधिक्य-17256(काँग्रेस)
04 Jun, 24 : 09:50 AM
शिर्डी
भाऊसाहेब वाकचौरे :- 30,960 आघाडीवर
सदाशिव लोखंडे :- 28,666 पिछाडीवर
उत्कर्ष रूपवते :- 6,893 पिछाडीवर
04 Jun, 24 : 09:49 AM
प्रणिती शिंदे ५ हजार मतांनी आघाडीवर
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण ५ हजार १७१ मतांनी आघाडीवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली साडेनऊ पर्यंत दुसरी फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी 2200 तर दुसऱ्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी 2800 पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 09:47 AM
उदयनराजे भोसले -२५०३
शशिकांत शिंदे -२७४२
04 Jun, 24 : 09:47 AM
मुंबई उत्तर पूर्व - पहिली फेरी
संजय दिना पाटील - २४३७७
मिहीर कोटेचा - १४०३३
ठाकरे गटाचे उमेदावार संजय दिना पाटील १०३०४ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 09:47 AM
नांदेड लोकसभा मतदारसंघ
महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना ११२० मतांची आघाडी
मिळालेली मते - ३८१४
दुसऱ्या क्रमांकावर वसंतराव चव्हाण
मिळालेली मते - २६९४
वंचित बहुजन आघाडी - २५३
पहिल्या फेरीतील मताधिक्य ११२०
04 Jun, 24 : 09:46 AM
रावेरमध्ये रक्षा खडसे २५८९८ मतांनी पुढे
जळगावमध्ये स्मिता वाघ २७६४६ मतांनी पुढे
04 Jun, 24 : 09:46 AM
बुलढाणा लोकसभा मतदार संघात महायुतीचे प्रतापराव जाधव 3 हजार 258 मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 09:46 AM
काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर
अमरावती - लोकसभा मतदारसंघात सध्या पहिल्या फेरीतील मतांची मोजणी सहा विधानसभा मतदारसंघातील 108 टेबलवर सुरू आहे तसेच दहा टेबलवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये अचलपूर व बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अमरावती तिवसा, अमरावती, दर्यापूर व धारणी मतदार संघात आघाडी घेऊन आहेत अद्याप पहिल्या फेरीची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी जाहीर केलेली नाही.
04 Jun, 24 : 09:45 AM
चंद्रपूर - दोन फेऱ्या झाल्या. तिसरी फेरी सुरू आहे. पण अद्याप घोषणा केलेली नाही. काँग्रेस 16 हजारांनी पुढे असल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारांना मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या परिसरात जाण्यास बंदी केलेली आहे
04 Jun, 24 : 09:44 AM
वर्धा फेरी- दुसरी
रामदास तडस- 30100
अमर काळे- 35600
04 Jun, 24 : 09:43 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 38699
राजन विचारे - 31174
म्हस्के आघाडी - 7525
04 Jun, 24 : 09:42 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघ
डॉ़ अभय पाटील (काँग्रेस) ३५,६०३
अनुप धोत्रे (भाजप) ३०,६७७
प्रकाश आंबेडकर (वंचित) २३,५९३
04 Jun, 24 : 09:41 AM
मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील ७९२१ मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 09:40 AM
वर्धा मतदारसंघात पहिल्या फेरीत शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर
पहिल्या फेरीत शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांना १७,८३५, तर भाजपचे रामदास तडस यांना १७,४०४ मते मिळाली. काळे ४३१ मतांनी आघाडीवर आहे.
04 Jun, 24 : 09:39 AM
संजय देशमुख १२ हजार ३५८ मताने आघाडीवर
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे १२ हजार ३५८ मताने आघाडीवर आहे. पहिल्या फेरीत संजय देशमुख यांना २१ हजार १६७ मते मिळाली होती. तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना १४ हजार ९६९ मते मिळाली होती. आता दुसऱ्या फेरीत यवतमाळ मतदारसंघात राजश्री पाटील यांना ५४३ मतांची आघाडी मिळाली असली तरी उर्वरित राळेगाव, दिग्रस, पुसद, वाशिम तसेच कारंजा मतदारसंघातून संजय देशमुख पुढे असल्याचे चित्र आहे.
04 Jun, 24 : 09:38 AM
उत्तर मुंबईतून पीयूष गोयल हे 9 हजार 835 मतांनी आघाडीवर
पीयूष गोयल - 17781 (+ 9835)
भूषण पाटील - 7946(- 9835)
सोनल गोंदने - 301(- 17480)
04 Jun, 24 : 09:38 AM
जळगाव
स्मिता वाघ - ४२३७५
करण पवार - २१८७२
04 Jun, 24 : 09:37 AM
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे पहिल्या फेरीत 200 मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 09:36 AM
नांदेडमध्ये पहिल्या फेरीत प्रतापराव आघाडीवर
नांदेड : नांदेड लोकसभेच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती आला असून पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर २११२ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:35 AM
सोलापूर : माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे दुसरी फेरी अखेर 9 हजार 868 मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 09:35 AM
कल्याण लोकसभा मतदार संघ
डॉ. श्रीकांत शिंदे-१४८०१
वैशाली दरेकर-८२२९
श्रीकांत शिंदे - ६५७२ मतांची आघाडी
04 Jun, 24 : 09:35 AM
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आघाडीवर, तर महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे पिछाडीवर.
लोखंडे ३९३७
वाकचौरे ३५८४
04 Jun, 24 : 09:34 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे पहिल्या फेरी 200 मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 09:34 AM
पालघर :- पहिल्या फेरी अखेर भाजप उमेदवार डॉ. हेमंत सवरा २५१ मतांनी पुढे.
04 Jun, 24 : 09:34 AM
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना टपाली मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 23,443 मतं तर भाजपच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार 22183 मतं
04 Jun, 24 : 09:32 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - २००४२
राजन विचारे - १८५९४
म्हस्के आघाडी -१४४८
04 Jun, 24 : 09:29 AM
जळगाव
स्मिता वाघ - ३१०३२
करण पवार - १५१६२
04 Jun, 24 : 09:26 AM
रावेर
रक्षा खडसे ५१६८८
श्रीराम पाटील २९१८१
04 Jun, 24 : 09:26 AM
भाजपचे नितीन गडकरी पहिल्या फेरीनंतर अकरा हजार सहाशे मतांनी पुढे आहेत.
04 Jun, 24 : 09:25 AM
बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची आघाडी आली २८६ मतांवर
प्रतापराव जाधव ४२८१
रविकांत तुपकर ३९५५
नरेंद्र खेडेकर ३२२७
वसंतराव मगर १५१४
04 Jun, 24 : 09:25 AM
माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सोलापुरातील रामवाडी गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली व पहिल्या फेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे पाच हजार मताधिक्याने आघाडीवर असल्याची माहिती समोर आली.
04 Jun, 24 : 09:25 AM
वर्धा
फेरी- पहिली
रामदास तडस- 17404
अमर काळे- 17835
04 Jun, 24 : 09:24 AM
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे पाटील आघाडीवर
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील हे 833 मतांनी आघाडीवर आहेत. डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 20638 तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 19 हजार 805 मतं पहिल्या फेरी अखेर मिळाली आहेत.
04 Jun, 24 : 09:22 AM
नाशिक - टपाली मतदान मोजणीत राजाभाऊ वाजे १० हजार ७५२ मतांनी आघाडीवर असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर.
04 Jun, 24 : 09:22 AM
चंद्रपूर : चंद्रपुरात पोस्टल मतमोजणी सुरू.
04 Jun, 24 : 09:21 AM
कोकणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत आघाडीवर, भाजपाचे नारायण राणे पिछाडीवर
04 Jun, 24 : 09:21 AM
कल्याण लोकसभा मतदारसंघ - डॉ. श्रीकांत शिंदे 2 हजार 93 मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 09:18 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघ
भाजप १५,११५
काँग्रेस १६ हजार ९०५
वंचित १२,४७४
04 Jun, 24 : 09:15 AM
रावेर
रक्षा खडसे ३७५५६
श्रीराम पाटील २१६१३
04 Jun, 24 : 09:15 AM
यवतमाळ - पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे संजय देशमुख 6188 मतांनी पुढे.
04 Jun, 24 : 09:14 AM
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 8142
राजन विचारे - 4318
म्हस्के आघाडी -3824
04 Jun, 24 : 09:14 AM
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ : पहिल्या फेरी अखेर ओमराजे निंबाळकर यांना लीड, सर्वच सहाही मतदारसंघात आघाडी
04 Jun, 24 : 09:13 AM
परभणी
पहिल्या फेरी अखेर संजय जाधव आघाडीवर
संजय जाधव यांना 20,786
महादेव जानकर 17612
04 Jun, 24 : 09:12 AM
रावेर
रक्षा खडसे - २९२७९
श्रीराम पाटील - १८०१५
04 Jun, 24 : 09:12 AM
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे संजय देशमुख 6188 मतांनी पुढे आहे
04 Jun, 24 : 09:11 AM
पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील 4 हजार मतांनी आघाडीवर
04 Jun, 24 : 09:11 AM
रायगड - सुनील तटकरे पहिल्या फेरीत 800 मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:09 AM
मुंबई उत्तर पूर्व - संजय पाटील ६३८ मतांनी पुढे
04 Jun, 24 : 09:09 AM
सुप्रिया सुळे पहिल्या फेरी अखेर 6941 मतांनी आघाडीवर, इंदापूर वगळता सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर
04 Jun, 24 : 09:08 AM
बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची ५२८ मतांची आघाडी
04 Jun, 24 : 09:07 AM
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर.
04 Jun, 24 : 09:07 AM
नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या प्रारंभिक टप्प्यात सिन्नर आणि इगतपुरी येथील केंद्रांवर महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने पुढे असून महानगरातील मतकेंद्रांवर देखील वाजे गोडसे यांच्यापेक्षा 50 ते 100 मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:06 AM
नाशिक : पोस्टल मतमोजणीच्या प्रारंभिक टप्प्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 : 09:06 AM
धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर 12774 मतांनी लीडवर (पहिली फेरी)
04 Jun, 24 : 09:06 AM
अकोला पश्चिममध्ये डॉक्टर अभय पाटील यांनी घेतली आघाडी
महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी 3996 मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवारावर जवळपास दोन हजार मतांची आघाडी मिळवली असल्याचे दिसत आहे.
04 Jun, 24 : 09:04 AM
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ संजय देशमुख 4314 मतांनी पुढे
04 Jun, 24 : 09:03 AM
रायगड - सुनील तटकरे आघाडीवर, ८०० मतांची आघाडी
04 Jun, 24 : 09:03 AM
नागपूर - नितीन गडकरी पहिल्या फेरीत सुमारे दहा हजार पेक्षा जास्त मतांनी पुढे.
04 Jun, 24 : 09:03 AM
ठाणे : ठाणे लोकसभेत पहिली फेरी नरेश म्हस्के आघाडीवर
04 Jun, 24 : 09:02 AM
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पहिल्या फेरीत आघाडीवर
04 Jun, 24 : 09:02 AM
गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोस्टल बॅलेटच्या मोजणीला प्रारंभ
भंडारा-गोंदिया लोकसभा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता शांततेत प्रारंभ झाला. निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम खुल्या करण्यात आल्या. त्यानंतर पोस्टल बॅलेट मोजणीला सुरुवात झाली आहे. या लोकसभा मतदारसंघातून एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 12 लाख 24 हजार 927 मतदारांनी मतदान केले. मतदानाची ही टक्केवारी 67. 04 आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे आणि महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातच खरी लढत आहे.
04 Jun, 24 : 08:56 AM
टपाली मतदानामध्ये संजय देशमुख आघाडीवर
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ टेबलवर मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. प्रभारी टपाली मतदान मोजण्यात येत आहे. यामध्ये चुरशीची लढत असल्याचे पुढे येत असून महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना तीन हजार ६२५ तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना तीन हजार ५४१ मते मिळाली आहे. ८४ मतांनी संजय देशमुख पुढे आहेत.
04 Jun, 24 : 08:52 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर
एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर मतमाेजणी सुरू आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर रिंगणात उभे आहेत. यंदाची लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याची शक्यता निकालाच्या आधीपासूनच वर्तविण्यात येत हाेती. मात्र भाजपाने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 : 08:50 AM
नागपूर मतदारसंघाच्या पोस्टल बॅलेट मोजणीत भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर
04 Jun, 24 : 08:50 AM
29- उत्तर मध्य मुंबईत टपाली मतदानामध्ये वर्षा गायकवाड आघाडीवर
04 Jun, 24 : 08:49 AM
सांगली लोकसभा पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील सहा विधानसभा मतदारसंघात आघाडीवर
04 Jun, 24 : 08:47 AM
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्व्हिस मतदार पोस्टल बॅलेट मतदार संख्या 5308. मोजणी सुरू
04 Jun, 24 : 08:47 AM
'बारामती'त सुनेत्रा पवारांनी घेतली आघाडी, सुप्रिया सुळे पिछाडीवर
04 Jun, 24 : 08:44 AM
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या सूचनेनुसार पोस्टल मतमोजणी व कंट्रोल यूनिट (CU) मतमोजणीस प्रारंभ.
04 Jun, 24 : 08:39 AM
कोल्हापुर मतदार संघातून पोस्टल मतदानात शाहू छत्रपती आघाडीवर तर हातकणंगले मतदारसंघ पोस्टल मतदानात सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर
04 Jun, 24 : 08:39 AM
अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर
04 Jun, 24 : 08:38 AM
नागपूर, रामटेक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात
नागपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नागपूरसह रामटेक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अगोदर पोस्टल बॅलटची मोजणी करण्यात येणार असून त्यानंतर ईव्हीएमच्या मोजणीला सुरुवात होईल.
04 Jun, 24 : 08:37 AM
वर्धा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात
वर्धा : तब्बल एक महिना आणि ९ दिवसानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता वर्धा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम ईटीपीएस व पोस्टल बॅलेट दहा आणण्यात आले. प्रत्यक्ष टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. केंद्रामध्ये आयोगाचे दोन ऑब्झर्वर उपस्थित आहेत. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी उच्चांकी ६४.८५ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत राजकीय पक्षांचे १३ व अपक्ष ११ असे २४ उमेदवार रिंगणात आहे.
04 Jun, 24 : 08:35 AM
नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर, विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर
04 Jun, 24 : 08:30 AM
रावेरमध्ये रक्षा खडसे आघाडीवर
रावेरमध्ये रक्षा खडसे आघाडीवर
बुलढाण्यात प्रतापराव जाधव आघाडीवर
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आघाडीवर
04 Jun, 24 : 08:29 AM
मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेच्या आघाडीवर
04 Jun, 24 : 08:28 AM
गोरेगाव नेस्को मतमोजणी केंद्रावर मोजणी सुरू
मुंबई : उपनगरातील तीन मोठ्या मतदारसंघाची मोजणी गोरेगाव, नेस्को येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता सुरू झाली. सुरुवातीला टपाली मतदान आणि यंदा प्रथमच विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या गृह मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे.
04 Jun, 24 : 08:27 AM
नाशिक - २० दिंडोरी लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी उपस्थितांना गोपनीयतेची शपथ दिली.
04 Jun, 24 : 08:25 AM
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली असून पोस्टल मताची मोजणी सुरू झाली आहे.
04 Jun, 24 : 08:22 AM
दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दाखल.
04 Jun, 24 : 08:22 AM
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उद्धवसेनेचे उमेदवार सत्याजित पाटील यांच्या मतदान प्रतिनिधी यांनी एकसारखे शर्ट घातले आहेत. आपलेच कार्यकर्ते अशी तात्काळ ओळख व्हावी हा हेतू आहे. सर्वांचे लक्ष त्यांनी वेधून घेतलं आहे.
04 Jun, 24 : 08:21 AM
नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात पोस्टल व होम बॅलेट मतांची मोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवारांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी.
04 Jun, 24 : 08:18 AM
छ.संभाजीनगर मतदान केंद्रावर उशीरा आल्याने पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पोलिसांनी मतदान केंद्रात जाण्यास अडवले आहे. आत जाण्यासाठीची वेळ संपली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काउंटीग एजंटलाही पोलिसांनी अडवले आहे. उशिरा आलेले कार्यकर्ते व पोलीस यांच्यामध्ये वाद झाला आहे.
04 Jun, 24 : 08:17 AM
मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत, अमोल किर्तीकर आघाडीवर
04 Jun, 24 : 08:17 AM
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील टपाली मतमोजणीला सुरुवात
04 Jun, 24 : 08:16 AM
मुंबई उत्तर पूर्व - पोस्टल मतमोजणीला सुरुवात
04 Jun, 24 : 08:16 AM
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे (उबाठा) राजाभाऊ वाजे विजयी व्हावेत. तसेच शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत म्हणून सातपूर विभागातील कट्टर जेष्ठ शिवसैनिक गंगाराम सावळे यांनी सकाळी महालक्ष्मी देवी मंदिरात मनोभावे पूजा केली.
04 Jun, 24 : 08:15 AM
नागपूर व रामटेक या दोन्ही मतदारसंघात पोस्टल व होम बॅलेट मतांची मोजणी सुरू झालेली आहे. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे मतमोजणी केंद्रात दाखल झाले आहेत.
04 Jun, 24 : 08:15 AM
यवतमाळ: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ. टपाली मतमोजणीला झाली सुरुवात.
04 Jun, 24 : 08:12 AM
मविआ, महायुती... कोण कुठे आघाडीवर?
संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर
पुण्यात मुरळीधर मोहोळ आघाडीवर
नागपुरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर
शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर
04 Jun, 24 : 08:09 AM
बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर
04 Jun, 24 : 08:08 AM
प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंग नाईक- निंबाळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्यात मोठी लढत झाली. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या एका तासात पहिल्या फेरीचा लागणार निकाल लागणार आहे.
04 Jun, 24 : 08:00 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
04 Jun, 24 : 07:59 AM
मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त
मलकापूर रोडवरील शासकीय आयटीआच्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तथा समर्थक मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमायला लागले आहेत.
04 Jun, 24 : 07:58 AM
८ वाजता होणार मतमोजणीस प्रारंभ
१८ व्या लोकसभेसभेसाठी बुलढाण्यात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होत असून ११६ टेबलवर ही मतमोजणी होणार असून २५ फेऱ्यामध्ये निकाल हाती येणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये २१ उमेदवार आपले भाग्य आजमावत असून महायुतीचे प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडकर यांच्या लढत होत आहे. अपक्ष रविकांत तुपकर, संदीप शेळके आणि वंचित बहुजन आघाडीचे वंसत मगर हेही या निवडणुकीत चर्चेत रहाले आहे. दरम्यान सलग तीन वेळा निवडून आलेले प्रतापराव जाधव चौकार मारण्याच्या तयारी ठेवून आहे तर आपल्या राजकीय कारकिर्दीमधील मोठी निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेेडेकर हेही आपल्या विजयाबाबत आश्वस्त आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाही जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे शेतकऱ्यांचाच विजय होईल असा विश्वास आहे.
04 Jun, 24 : 07:46 AM
पाच जागांवर विजय निश्चित - मंगल प्रभात लोढा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेने भरभरून मतदान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारच्या निकालात हे स्पष्ट होणार असून, भाजप ४०० पारचा आकडा गाठेल. महाराष्ट्रातही महायुतीला ४० हून अधिक जागा, तर मुंबईतील पाच जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. कोणीही काहीही दावे केले तरी पुन्हा एकदा मोदी सरकारच देशाचे भवितव्य घडवेल, हे निश्चित - मंगल प्रभात लोढा, मंत्री
04 Jun, 24 : 07:24 AM
राहुल शेवाळे की अनिल देसाई?
भाजप मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पूर्व या तीन जागा लढवत आहे. या तीनही जागा उपनगरांतील आहेत. शिंदेसेना उपनगरातील उत्तर पश्चिम आणि मुंबई शहरातील दक्षिण व दक्षिण मध्य या तीन जागा लढवत आहे. शिवसेनेचा जन्म आणि वाढ जिथे झाली त्या दादर आणि माहीम परिसराचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मतदारसंघात शिदेसेनेचे राहुल शेवाळे आणि उद्धवसेनेचे अनिल देसाई हे चुरशीच्या सामन्यात नशीब आजमावत आहेत.
04 Jun, 24 : 07:22 AM
प्रतिष्ठा पणाला
दक्षिण मुंबईत उद्धवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदेसेनेसोबत असलेल्या आमदार यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. मुंबई उत्तर पश्चिम येथे उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि शिंदेसेनेकडून आमदार रवींद्र वायकर हे एकमेकांविरोधात उभे आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची लढत मुंबई उत्तर येथे कॉंग्रेसचे भूषण पाटील यांच्याशी आहे. उत्तर पूर्व या मतदारसंघात भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांचा सामना उद्धवसेनेचे संजय दिना पाटील यांच्याशी आहे
04 Jun, 24 : 07:21 AM
५३ लाख ७३ हजार ४६० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबईतील सहा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत असले, तरी खरी लढाई 'भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच आहे. मुंबईच्या एकूण ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदारांपैकी ५३ लाख ७३ हजार ४६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
04 Jun, 24 : 07:10 AM
मतदारांची साथ कुणाला?
मराठा आंदोलनाच्या निमित्ताने उद्भवलेली जातीय समीकरणे, मुस्लिम आणि दलित मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याची सर्वत्र असलेली चर्चा, पहिल्या-दुसऱ्या टप्प्यानंतर धार्मिक वळणावर गेलेली निवडणूक या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणाला साथ दिली हे मंगळवारी सकाळपासून कळू लागेल आणि दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल.
04 Jun, 24 : 07:09 AM
भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या रणांगणात उतरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी वातावरण ढवळून काढले. मविआसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. कोणाच्या झंझावाताला यशाची फळे येतात याचा फैसला काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे.