मुंबईसह महाराष्ट्र गारठला!

By admin | Published: January 13, 2017 04:30 AM2017-01-13T04:30:06+5:302017-01-13T04:30:06+5:30

गेल्या चार दिवसांपासून उत्तरोत्तर थंडीचा कडाका वाढल्याने महाराष्ट्र अक्षरक्ष: गारठला आहे

Maharashtra with Maharashtra guarala! | मुंबईसह महाराष्ट्र गारठला!

मुंबईसह महाराष्ट्र गारठला!

Next

मुंबई/पुणे : गेल्या चार दिवसांपासून उत्तरोत्तर थंडीचा कडाका वाढल्याने महाराष्ट्र अक्षरक्ष: गारठला आहे. घाम काढणाऱ्या मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांतील पारा कमालीचा घसरला असून विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. मुंबईचे किमान तापमान ११.६ अंश नोंदविण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी ते १४ ते १६ अंशाच्या घरात होते. पुण्यातही या हंगामातील निचांकी ७़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानही लक्षणीय घटले आहे. मराठवाड्यालाही हुडहुडी भरली असून खान्देश, नगर, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन थंडावले आहे. महाबळेश्वरचा पारा ११ अंशावर असताना धुळ्यात ४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात यापूर्वी १९९१ साली जानेवारीतच २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. (प्रतिनिधी)

प्रमुख शहरातील किमान तापमान
: पुणे ७़४, अहमदनगर ६़८, जळगाव ७,कोल्हापूर १४़१, महाबळेश्वर ११़८, मालेगाव ७़़, नाशिक ६, सांगली ११़५, सातारा ९़५, सोलापूर १०़६, मुंबई ११़६, अलिबाग १५़, रत्नागिरी १५़५, पणजी १८़८, डहाणु १३़३, भिरा १२, उस्मानाबाद ७़९, औरंगाबाद ८़२, परभणी ५, नांदेड १०, बीड ९, अकोला ८़, अमरावती ८़४, बुलडाणा ८़८, ब्रम्हपुरी १०़९, चंद्रपूर ११़२, गोंदिया ८़५, नागपूर८़६, वाशिम ९, वर्धा ९़८, यवतमाळ ८़४़ (अंश सेल्सिअसमध्ये)

उत्तर भारताला हुडहुडी
नवी दिल्ली : दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, काश्मीर, राजस्थान आदी राज्यांमध्ये तापमान घसरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी तापमान २ अंशापर्यंत खाली आले होते, तर हरयाणाच्या नारनौलमध्ये रात्रीचे तापमान उणे ०.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेले.

Web Title: Maharashtra with Maharashtra guarala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.