मुंबईसह महाराष्ट्र तहानलेलाच!
By admin | Published: July 13, 2015 01:19 AM2015-07-13T01:19:07+5:302015-07-13T01:19:07+5:30
अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात दडी मारली आहे.
मुंबई : अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात दडी मारली आहे. तर दुसरीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांनी वेग पकडल्याने दिल्लीत जुलै महिन्यात गेल्या पाच वर्षांतल्या रेकॉर्ड ब्रेक पाऊसाची नोंद झाली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नसल्याने येथील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत तुरळक सरी कोसळत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भाला काहीसा दिलासा मिळत असून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु पावसाचे प्रमाणही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.