महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...'हे' २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 05:57 AM2023-05-01T05:57:56+5:302023-05-01T05:58:16+5:30

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे.

Maharashtra may have 58 districts, 22 districts proposed; Know, information about the state | महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...'हे' २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती

महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...'हे' २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती

googlenewsNext

मुंबई - भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. अनेक जिल्हे हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली. मात्र, त्यासाठी २० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन १० जिल्ह्यांची भर पडून आपला महाराष्ट्र ३६ जिल्ह्यांचा झाला आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जिल्ह्यात शेवटच्या गावातून येणाऱ्या नागरिकाला अवघा दिवस खर्ची घालावा लागतो. त्यामुळे २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे.

१० जिल्ह्यांचे बॉम्बे स्टेट 

तेव्हा खान्देश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे १० जिल्हे होते.

१ मे १९६० : द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन झाले. मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरातची निर्मिती.

प्रारंभीचे २६ जिल्हे
ठाणे, कुलाबा (आताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) हे २६ जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.

१९८१ पासून आतापर्यंत झाले हे १० जिल्हे
    या जिल्ह्यातून  हा जिल्हा तयार
    रत्नागिरी  -  सिंधुदुर्ग (१ मे १९८१)
    छ. संभाजीनगर  -  जालना (१ मे १९८१)
    धाराशिव  -  लातूर (१६ ऑगस्ट १९८२)
    चंद्रपूर  -  गडचिरोली (२६ ऑगस्ट १९८२)
    बृहन्मुंबई  -  मुंबई उपनगर (१ ऑक्टो. १९९०)
    अकोला  -  वाशिम (१ जुलै १९९८)
    धुळे  -  नंदुरबार (१ जुलै १९९८)
    परभणी    हिंगोली (१ मे १९९९)
    भंडारा  -  गोंदिया (१ मे १९९९)
    ठाणे  -  पालघर (१ ऑगस्ट २०१४)

आणखी २२ जिल्हे प्रस्तावित((२०१८ मध्ये स्थापन समितीचा प्रस्ताव)

या जिल्ह्यातून हे जिल्हे शक्य

नाशिक - मालेगाव, कळवण

पालघर - जव्हार

ठाणे - मीरा भाईंदर, कल्याण

अहमदनगर -  शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर

पुणे - शिवनेरी

रायगड - महाड

सातारा - माणदेश

रत्नागिरी - मानगड

बीड - अंबेजोगाई

लातूर - उदगीर

नांदेड - किनवट

जळगाव - भुसावळ

बुलडाणा - खामगाव

अमरावती - अचलपूर

यवतमाळ - पुसद

भंडारा - साकोली

चंद्रपूर - चिमूर

गडचिरोली - अहेरी

 

Web Title: Maharashtra may have 58 districts, 22 districts proposed; Know, information about the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.