देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये; केंद्रातील कुंभकर्ण सरकारला केव्हा जाग येणार?; जयंत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:30 PM2021-03-19T14:30:01+5:302021-03-19T14:37:27+5:30

Jayant Patil : जयंत पाटील यांनी World Sleep Day च्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारला विचारले अनेक प्रश्न

maharashtra minister jayant patil slams modi government over petrol diesel price hike no jobs economy twitter world sleep day | देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये; केंद्रातील कुंभकर्ण सरकारला केव्हा जाग येणार?; जयंत पाटलांचा टोला

देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये; केंद्रातील कुंभकर्ण सरकारला केव्हा जाग येणार?; जयंत पाटलांचा टोला

Next
ठळक मुद्देजयंत पाटील यांनी World Sleep Day च्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारला विचारले अनेक प्रश्नअर्थव्यवस्था, पेट्रोस-डिझेल दरवाढीवरून केंद्राला विचारले प्रश्न

देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 'वर्ल्ड स्लीप डे' असं टॅग करत जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला कुंभकर्णाची उपमा देत पाटील यांनी टोला लगावला. 

"शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?," असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. दरम्यान, १९ मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे म्हणून ओळखला जातो. जयंत पाटील यांनीदेखील आपल्या ट्वीटमध्ये वर्ल्ड स्लीप डे असं टॅग केलं आहे.



यापूर्वीही साधला होता निशाणा

यापूर्वी जयंत पाटील यांनी कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. भारतात लस नसली तरी चालेल, पण परदेशात पाठवा असं केंद्राचं धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.

Web Title: maharashtra minister jayant patil slams modi government over petrol diesel price hike no jobs economy twitter world sleep day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.