“आमचा मोदी विरोध या देशात, पण कचराकुंडीवर पंतप्रधानांचा फोटो लावण्याच्या कृतीचा निषेध”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:17 PM2022-06-06T18:17:09+5:302022-06-06T18:20:06+5:30

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया.

maharashtra minister jitendra awhad commented nupur sharma statement pm narendra modi photo arab countries | “आमचा मोदी विरोध या देशात, पण कचराकुंडीवर पंतप्रधानांचा फोटो लावण्याच्या कृतीचा निषेध”

“आमचा मोदी विरोध या देशात, पण कचराकुंडीवर पंतप्रधानांचा फोटो लावण्याच्या कृतीचा निषेध”

googlenewsNext

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती दिली. तसंच, या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली. एकीकडे हा वाद सुरू असताना आता अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

“अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आम्ही मोदी आणि भाजपला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही या कृतीचा आम्ही निषेध करतो,” असं आव्हाड म्हणाले. अरब देशांमध्ये कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्यानं भारतात सर्वंत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच अनेकांनी या कृतीचा निषेधही केलाय.

रोहित पवारांचीही प्रतिक्रिया
“राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

Web Title: maharashtra minister jitendra awhad commented nupur sharma statement pm narendra modi photo arab countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.