Corona Virus : कोरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात 44 हजारहून अधिक नवे करोना बाधित; अशी आहे मुंबईची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:42 PM2022-01-09T20:42:59+5:302022-01-09T20:43:16+5:30

महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे...

Maharashtra Mumbai Corona Virus updates; 44,388 new corona infected found in Maharashtra and 19474 in Mumbai | Corona Virus : कोरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात 44 हजारहून अधिक नवे करोना बाधित; अशी आहे मुंबईची स्थिती

Corona Virus : कोरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात 44 हजारहून अधिक नवे करोना बाधित; अशी आहे मुंबईची स्थिती

Next

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात काल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. तर आज रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, एकट्या मुंबईत 19,474 कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या चोवीस तासांतील आहे. याशिवाय मुंबईत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. (Maharashtra Mumbai Corona Virus Case updates) 

राज्यात 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण -
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यादरम्यान 15 हजार 351 जण ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 202259 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

राजधानी मुंबईत शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळून आले. मुंबईत शनिवारी 20 हजार 318 नवे कोरोना बाधित आढळून आले होते. तर शुक्रवारी 20 हजार 971 कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले होते.

मुंबईत जानेवारी महिन्यात आतापर्यंत समोर आलेले रुग्ण असे... -
01 जानेवारी- 6347
02 जानेवारी- 8063
03 जानेवारी- 8082
04 जानेवारी- 10860
05 जानेवारी- 15166 
06 जानेवारी- 20181
07  जानेवारी- 20971 
08 जानेवारी- 20318 

ओमायक्रॉन संक्रमणाचाही ग्राफ वाढला -
महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे. अशी आहे जिल्हावार संख्या -
- सांगली - 57
- मुंबई - 40
- पुणे एमसी - 22
- नागपूर - 21
- पीसीएमसी - 15
- ठाणे एमसी - 12
- कोल्हापूर - 8 
- अमरावती - 6
- उस्मानाबाद - 5
- बुलढाणा आणि अकोला - 4 
- गोंदिया - 3
- नंदुरबार, सतारा आणि गडचिरोली प्रत्येकी - 2 
- औरंगाबाद, लातूर, जालना आणि मीरा भयंदर प्रत्येकी - 1 

कोरोना वाढला तर धार्मिक स्थळंही होणार बंद -
"गर्दी वाढली आणि नियमांचं पालन होताना दिसलं नाही तर मद्यविक्रीचीही दुकानं बंद केली जातील. यासोबत धार्मिक स्थळं देखील बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल", असं राजेश टोपे म्हणाले. राज्यात सध्या ऑक्सिजनची मागणी साडेचारशे मेट्रिक टनच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे सध्यातरी निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नसल्याचंही टोपे म्हणाले. परिस्थितीत बदल होईल तसे निर्णय घेण्यात येतील. कारण कोरोना रुग्णसंख्या वाढली तर महामारीला नियंत्रित करणं खूप कठीण होऊन बसेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

राज्यात नवी नियमावली अशी -
- राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी आणि रात्री 11 ते सकाळी  संचारबंदी 
- शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद 
- स्विमिंग पूल पूर्णपणे बंद
- लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत
- खासगी कार्यालयात 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी
- 2 डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार
- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू 
- लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी 
- नवीन आदेशानुसार, ब्युटी पार्लर आणि जिमला 50 टक्के क्षमतेने परवानगी असणार आहे.
 

Web Title: Maharashtra Mumbai Corona Virus updates; 44,388 new corona infected found in Maharashtra and 19474 in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.