मूर्तीच नाही, तर दगडाचा खांबही पितोय पाणी! कारण जाणून व्हाल अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 04:52 PM2022-03-06T16:52:59+5:302022-03-06T16:54:22+5:30
काल अनेक ठिकाणी नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. यानंतर अनेक ठिकाणी मंदिरांसमोर नंदीला दूथ, पाणी पाजण्यासाठी लांबच लांब रांगाही लागलेल्या बघायला मिळाल्या.
नंदीची मूर्ती पाणी आणि दूध पितानाचे बरेच व्हिडिओ काल महाराष्ट्रासह अनेक ठिकाणांवरून व्हायरल झाले. यासंदर्भात विविध प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. काहींनी याला श्रद्धेचे नाव दिले, तर काहींनी ही अंधश्रद्धा असल्याचेही म्हटले आहे. मात्र, तज्ज्ञ मंडळी यामागे शास्त्रीय कार असल्याचे सांगत आहेत. तर जाणून घेऊयात तज्ज्ञ काय सांगतात.
लोकांनी नंदीला पाजलं पाणी आणि दूध -
काल अनेक ठिकाणी नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. यानंतर अनेक ठिकाणी मंदिरांसमोर नंदीला दूथ, पाणी पाजण्यासाठी लांबच लांब रांगाही लागलेल्या बघायला मिळाल्या. एवढेच नाही, तर एका ठिकाणी एका व्यक्तीने चक्क दगडाच्या खांबालाही दूध पाजले. त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंदीची दूध पिण्याची अफा महाराष्ट्रातील अनेक शहरांत पसरली होती.
औरंगाबाद - महादेवाचा नंदी दूध पिता अशी अफवा, वडदगाव बजाजनगर येथील व्हिडीओ pic.twitter.com/Yu11jMqkkS
— Lokmat (@lokmat) March 5, 2022
उन्हाळ्यात असे होणे सामान्य गोष्ट -
तज्ज्ञांच्या मते उन्हाळा अथवा गर्मीच्या दिवसांत मूर्तींचे पाणी अथवा दूध पिणे हा चमत्कार नाही, तर सामान्य गोष्ट आहे. यामागे वैज्ञानिक कारण आहे. जाणकारांच्या मते, उन्हाळ्यात दगडांमध्ये व्हॅक्यूम पोर्च तयार होतो. यामुळे मूर्ती पानी पीत आहेत. तसेच गर्मीच्या दिवसांत असे होणे, एक सामान्य गोष्ट आहे.