शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 11:23 AM2021-10-02T11:23:51+5:302021-10-02T11:27:38+5:30

Jitendra Awhad-Sharad Pawar : एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला.

maharashtra ncp minister jitendra awhad said how he came close to sharad pawar politics | शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

googlenewsNext
ठळक मुद्देएकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला.

राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील जवळीक सर्वांच्याच परिचयाची आहे. परंतु एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला. लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आव्हाड यांनी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपल्या लहानपणापासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केला. यावेळी बोलताना आव्हाड यांनी १९८८ मध्ये सुरेश कलमाडींनी आपल्याला पहिल्यांदा शरद पवार यांच्याकडे नेलं होतं असं सांगितलं.

"सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेलं. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्ष मी हे केलं. आधी त्यांचं लक्ष नसायचं. पण जसं जसं त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरूवात केली," असं आव्हाड म्हणाले.

"एकदा त्यांनी मला घरी जाण्यासाठी गाडी आहे का असंही विचारलं. त्यानंतर तो किस्सा मी घरी आईला जाऊन सांगितला. तो एक वेगळा काळ आणि माझं पॅशन होतं. एकदा त्यांना मी पुण्याला भेटलो. ते विमानानं मुंबईला येऊन रात्री इस्रायलला जाणार होते. नशीबानं दुसऱ्या विमानातून सुरेश कलमाडी आले. त्यांच्या पीएनं मला विमानानं मुंबईला जा असं म्हटलं. त्यानंतर घरी आलो लगेच तयार होऊन पुन्हा शरद पवारांना सोडायला विमानतळावर गेलो. त्यावेळी त्यांनीही मला विचारलं एवढ्यात कसा आलास अशी विचारणा केली," असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. 

Web Title: maharashtra ncp minister jitendra awhad said how he came close to sharad pawar politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.