चिंताजनक ! राज्यात चोवीस तासांत ६७,४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५६८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:38 PM2021-04-21T21:38:00+5:302021-04-21T21:42:19+5:30
Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं होतेय मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. तरीही सातत्यानं नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या वर असल्याचंच दिसून येत आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर तब्बल ५६८ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी कोरोनाबाधितांची संख्या कमी अद्यापही कमी झालेली नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ५४ हजार ९८५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८१.१५ टक्क्यांवर आला आहे.
Maharashtra reports 67,468 new #COVID19 cases, 568 fatalities and 54,985 discharges in the last 24 hours; case tally at 40,27,827 and active cases at 6,95,747 pic.twitter.com/TeEidCM5Q0
— ANI (@ANI) April 21, 2021
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 21, 2021
21-Apr; 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 7,684
Discharged Pts. (24 hrs) - 6,790
Total Recovered Pts. - 5,03,053
Overall Recovery Rate - 84%
Total Active Pts. - 84,743
Doubling Rate - 48 Days
Growth Rate (14 Apr-20 Apr) - 1.42%#NaToCorona
मुंबईत काहीसा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत होती. परंतु आता मुंबईत थोडाफार दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७६८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ६७९० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईत सध्या ८४ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्क्यांवर आला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही ४८ दिवस इतका झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली.