Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 04 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 06:56 PM2018-11-04T18:56:41+5:302018-11-04T18:57:23+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
जितेंद्र आव्हाड पुन्हा ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंसोबत केली तासभर चर्चा
वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा - आदित्य ठाकरे
पुण्यात टाेळक्यांचा धुडगूस ; अाठ चारचाकी एका रिक्षाची ताेडफाेड
जळगाव जिल्ह्यात लोकसहभागातून 1551 जि.प. शाळा ‘डिजिटल’
लसीकरणामुळे 10 विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर, एकीचा मृत्यू
नोटीसनंतरही अवैध बांधकामे न हटविणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल
नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम
दुष्काळाच्या चटक्याने गरिबाची भाकरी करपली
सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण सांधेरोपण, शस्त्रक्रियेनंतर तत्काळ चालू लागले रुग्ण
दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे होणार बंद, महाराष्ट्रातील ५५ केंद्रांचा समावेश