Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 04 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:53 PM2018-10-04T17:53:22+5:302018-10-04T17:53:44+5:30
जाणून घ्या, महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं?
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
खुशखबर...महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांची कपात
... म्हणून महाराष्ट्राने डिझेलचे भाव कमी केले नाहीत
इंधन दरवाढीतून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला - मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
आधीच राज्य गहाण असताना पुन्हा कसे गहाण टाकणार - अशोक चव्हाण
पावसाळा संपणार, राज्यातून चार ते पाच दिवसांत पाऊस माघारी फिरणार
औरंगाबादेत पुन्हा तलवारीचा साठा जप्त, सहा अटकेत
मंत्र्यांना फटके हाणल्याशिवाय शेतक-यांना न्याय मिळणार नाही!- राजू शेट्टी
प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या
वेश्याव्यवसायातून परदेशी महिलेची सुटका