Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:06 PM2019-02-21T18:06:28+5:302019-02-21T18:06:58+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना
वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र
माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल
- पश्चिम विदर्भात जलसंकट गडद : ५२ तालुक्यांतील भूजलपातळीत २० फुटांपर्यंत घट
पांढरकवडा येथील मोदींच्या सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
मनसेच्या नितीन नांदगावकरांना पोलिसांची तडीपारीची नोटीस, समर्थनार्थ मनसे कार्यकर्ते रस्त्यावर
- पैशासाठी जिल्हा बँकेत चकरा मारून गमावला जीव; संतप्त नातेवाईकांनी बँकेसमोर ठेवला मृतदेह
- अखेर 'त्या' 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ४६ व्या वर्षात पदार्पण
- ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे निधन