Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 06:36 PM2018-08-24T18:36:40+5:302018-08-24T18:37:09+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा १०० टक्के वापर होणार : मुख्य निवडणूक आयुक्त रावत
धनगर आरक्षणासाठी आदिवासी विकास आणि संशोधन कार्यालयाची तोडफोड
राणीच्या बागेतील पेंग्विनचे पिल्लू ठरले अल्पायुष्यी, भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू
फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा, विद्यार्थ्यांचा आक्षेप
बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २२ टक्के
नागपुरात फेब्रुवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
वर्ध्यात गांजा विक्रेत्याची हत्या; दोन संशयित ताब्यात
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातलेली सहन करणार नाही : पुणे पोलीस आयुक्त
मुलगी झाल्याचे 'कडक' सेलिब्रेशन : हॉटेल मालकाची सर्व ग्राहकांना पार्टी
महात्मा गांधींच्या विचारांचा शाळांमध्ये होणार जागर