Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:00 PM2018-10-27T18:00:38+5:302018-10-27T18:01:10+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले
१५ वर्षात कामे केली असती तर दुष्काळ हटला असता : सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला
कोल्हापूर : देशातील घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्यात : अजित पवार यांची बोचरी टीका
राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान
उरकून घ्या, लवकर बँकिंग व्यवहार; बँका सलग पाच दिवस राहणार बंद!
२३ व्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाच्या सुधीर बर्गे यांना अटक
जळगावात सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवास उत्साहात प्रारंभ
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित
नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाचे टेंडर सापडले संशयाच्या भोवऱ्यात