Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 28 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 06:08 PM2019-02-28T18:08:20+5:302019-02-28T18:09:32+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
'पॅनिकची परिस्थिती नाही, पण राज्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची'; विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं
महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडा बाजार ठाण्यात सुरु होणार
कोल्हापूरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे
खुशखबर ! 10 हजार शिक्षकांची मेगा भरती निघाली, मुख्यमंत्र्यांकडून जाहिरात लाँच
युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कुणी राजकीय फायदा घेऊ नये; राज ठाकरेंचा मोदी सरकारला टोला
पोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल; मुंबई पोलीस आयुक्त पदी संजय बर्वे
''वेळ कधी सांगून येत नाही'' पुण्यातली पाटी साेशल मिडीयावर हाेतेय व्हायरल
सातवी शिकलेल्या आईने दिली उभारी; मुलगी झाली थेट उपजिल्हाधिकारी
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गातील कामाची एस. के. गुप्ता यांनी दिली माहिती
दारू विक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही