Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:58 PM2019-02-03T17:58:45+5:302019-02-03T17:59:08+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य; गिरीश महाजनांचा दावा
अॅमेझॉनच्या धर्तीवर पिंगळाई नदीवर रिचार्ज बंधारा; देशात पहिलाच प्रयोग
जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? गडकरींचा अप्रत्यक्ष टोला
मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे : एकनाथ खडसे यांचा सवाल
पंधरा दिवसांत ३२०० कोटींची एफआरपी जमा : साखर आयुक्तालय
अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस; पुरावे द्या, अन्यथा लेखी माफी मागा
लोकपाल आंदोलनाचा राजकीय लाभ घेणारी भाजपा अण्णांनाच विसरली! - राधाकृष्ण विखे पाटील
अण्णांच्या जीवाशी खेळू नका!; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
भाजपाच्या काही खासदारांचे तिकीट कापणार? लोकसभेसाठी नवे चेहरे देण्याचा विचार सुरू
पश्चिम रेल्वेवरील काम विक्रमी वेळेत पूर्ण, पहिली एक्स्प्रेस लोअर परळहून रवाना