Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 30 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 06:38 PM2018-10-30T18:38:46+5:302018-10-30T18:39:13+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये
फडणवीसांना रामाचा अवतार जाहीर करा; म्हणजे राज्यात रामराज्य अवतरेल! विखे-पाटलांची टीका
औरंगाबादेत शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर चाकू हल्ला
स्वतःच्या अायुष्यात अंधःकार असललेले दुसऱ्यांचं घर करतायेत प्रकाशमान
छत्तीसगड-तेलंगणातील निवडणूक; सीमावर्ती भागात पोलीस सतर्क
१२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी
‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट; महाराष्ट्राच्या पहिल्या सेंद्रिय गावाने केली घोषणा
अमरावती जिल्ह्यातील वाघोबा मध्यप्रदेशच्या जंगलात शिरले
चालकाला मारहाण करून प्रवाशांनीच पळविली कार
बीडमध्ये जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले