Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 07:02 PM2018-10-31T19:02:09+5:302018-10-31T19:02:47+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
मोठी बातमी! सरकारकडून दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यात परिस्थिती गंभीर
पुन्हा घोंगावणार मराठा वादळ, 26 नोव्हेंबरला विधिमंडळावर धडकणार मराठा संवाद यात्रा
कोकण रेल्वेचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार, नवे वेळापत्रक होणार लागू
न्यायालयांना राजकारण्यांविषयी आकस आहे का, रामराजे निंबाळकर यांचा प्रश्न
पुण्यात भरदिवसा युवकावर गाेळीबार ; कारण अस्पष्ट
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या
धक्कादायक! गडचिरोलीतील बालरुग्णालयात सहा महिन्यांत १०० बालमृत्यू
म्हाडाच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याला एसीबीने केले अटक
दहशतवादी अबु जिंदालला शिक्षेपर्यंत पोहचविणाऱ्या एटीएसला १० लाखांचे बक्षीस
नक्षलवाद्यांचे हल्ले वैफल्यग्रस्ततेतून : बिपिन रावत