Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 07:01 PM2019-03-06T19:01:49+5:302019-03-06T19:02:20+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे उद्या भेटणार; जागांचा तिढा सुटणार?
ईशान्य मुंबईतून मी निवडणूक लढावी असे शिवसेनेला वाटते,मात्र भाजपला नाही - रामदास आठवले
मनसेच्या कामाचं श्रेय लाटण्याचा शिवसेनेकडून केविलवाणा प्रयत्न - नितीन सरदेसाई
आंबेडकर- ओवेसी युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सापडला ‘गणराज्य संघ’चा उतारा
धक्कादायक ! शेतकरी आत्महत्येचं प्रमाण 91 टक्क्यांनी वाढलं, 43 % पीडित कुटुंबीय मदतीविनाच
सोलापूर विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात सहकारमंत्री सुभाष देशमुखांविरोधात घोषणाबाजी
धनगर व धनगड एकच आहेत का याबाबत अद्यापही शासन अनभिज्ञ ?
Maratha Reservation : काकासाहेब शिंदेंच्या भावाला नोकरी दिली, पण पगार महिन्याला 2 हजार
बेबी पाटणकर ड्रग्ज प्रकरण : तो अमली पदार्थ म्यॅव म्यॅव ड्रग नसून अजिनोमोटोच
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला विद्यार्थ्याकडे सापडले हिंदीत लिहिलेले प्रेमपत्र