वैद्यकीय कचरा गोळा करण्यात महाराष्ट्र एक नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:05 AM2018-04-07T04:05:54+5:302018-04-07T04:05:54+5:30
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या छोट्या दवाखान्यांपासून ते मोठमोठ्या रुग्णालयांतून दररोज ७१ हजार ५११ किलोग्रॅम कचरा जमा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
- कुलदीप घायवट
मुंबई - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या छोट्या दवाखान्यांपासून ते मोठमोठ्या रुग्णालयांतून दररोज ७१ हजार ५११ किलोग्रॅम कचरा जमा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. राज्यापाठोपाठ कर्नाटकातून ६६ हजार ४६८ किलोग्रॅम, तामिळनाडू ४० हजार ५५२ किलोग्रॅ२२२२२म आणि केरळ ३७ हजार ७७३ किलोग्रॅम कचरा दरदिवशी जमा करण्यात येत असून, देशात एकूण ५ लाख १९ हजार किलोग्रॅम कचरा जमा करण्यात येत आहे, असे केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या अहवालानुसार, बेड असलेल्या एकूण रुग्णालयांची संख्या २० हजार २२५ असून संपूर्ण राज्यात एकूण बेडची संख्या २ लाख ५१ हजार ९४८ आहे. नॉन बेड रुग्णालयांची संख्या ३२ हजार ४७९ असून यामध्ये रक्तपेढी, अॅक्युपंक्चर यांचा समावेश आहे. बेड असलेल्या रुग्णालयामधून दररोज ५७ हजार ७७२ किलोग्रॅम कचरा गोळा केला जातो. नॉन बेड रुग्णालयामधून दररोज १३ हजार ६६७ किलोग्रॅम कचरा गोळा केला जातो.
नागरी वस्तीमधून व इतर ठिकाणांहून ७० किलोग्रॅम कचरा गोळा करण्यात येतो. राज्यामध्ये मुंबईमधून दरदिवशी १७ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येत आहे. राज्यात मुंबई अव्वल क्रमांकावर आहे. मुंबईपाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागत असून पुण्यात दरदिवशी ११ हजार किलोग्रॅम, नाशिकमध्ये ८ हजार किलोग्रॅम, औरंगाबाद ५ हजार ५५२ किलोग्रॅम, नागपूरमधून ५ हजार ५४८ किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा केला जातो.
वैद्यकीय कचरा म्हणजे काय?
वैद्यकीय कचरा म्हणजे संसर्गजन्य साहित्य किंवा संसर्गजन्य पदार्थ असलेला कोणताही कचरा. यामध्ये आरोग्यविषयक सुविधा पोहोचविणारे चिकित्सक कार्यालय, रुग्णालये, दंत रुग्णालये, प्रगोगशाळा, वैद्यकीय संशोधन सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाने यामधून तयार होणाऱ्या कचºयाला वैद्यकीय कचरा म्हणतात. वैद्यकीय कचºयात सुई, इंजेक्शन, सलाइन बाटल्या, आॅपरेशन केलेले ग्लोव्हज्, औषधांच्या बाटल्या, प्रयोगशाळेतील बाटल्या, रसायन, रेझर, धागे यांचा समावेश आहे.
रुग्णालयातील कचºयाचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. धोकादायक वैद्यकीय कचरा जाळण्यात येतो. प्लॅस्टिक कचºयाचा भुगा करून पुनर्वापर करण्यात येतो. सुई, इंजेक्शन इत्यादी वस्तू १ हजार २०० अंश सेल्सिअस तापमानावर तापवून निर्जंतुकीकरण करण्यात येते.
कचºयावर पुनर्प्रक्रिया, निर्जंतुकीकरण केले जात असून, संबंधित वस्तूचा पुनर्वापर करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेला वैद्यकीय कचरा जाळण्यात येत आहे.
राज्यातील वैद्यकीय कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे राज्यातील कचºयाचे योग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीेचे आहे. यंदाच्या वर्षात बारकोडिंगची पद्धत करण्यात आली आहे. बारकोडनुसार वैद्यकीय कचºयाचा वापर आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात येईल.
- डॉ. ए.आर. सुपाते, प्रधान वैज्ञानिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ
रुग्णालयातील कर्मचारीवर्ग, सफाई कामगारवर्ग यांना कचºयाच्या वर्गीकरणाचे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे पालन करून कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण केल्यावर कचरा कमी होऊ शकतो.
- चेतन सावंत, कनिष्ठ साहाय्यक वैज्ञानिक,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ