Maharashtra Political Crisis : बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:25 PM2022-06-27T16:25:04+5:302022-06-27T16:25:47+5:30

सर्वोच्च न्यायालयानंही १६ आमदारांना तुर्तास दिलासा दिला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

Maharashtra Political Crisis aditya thackeray speaks on rebel mla shiv sena sanjay raut ed notice | Maharashtra Political Crisis : बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान

Maharashtra Political Crisis : बंडखोरांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, आदित्य ठाकरेंचं आव्हान

Next

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याचं दिसून आले. आता या सर्व आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसैनिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानंही १६ आमदारांना तुर्तास दिलासा दिला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

“सर्वात मोठी परीक्षा हिच आहे की जे बंडखोर आहेत, ते पळून गेलेत. ते स्वत:सा बंडखोर म्हणत आहेत. जर त्यांना बंडखोरी करायचीच होती, तर त्यांनी ती इथे करायची होती. त्यांनी राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरे गेले असते,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि बहुमत चाचणीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.



बंडखोर आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं. राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. तसंत संजय राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे राजकारण नाही, ही आता सर्कस बनली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

Web Title: Maharashtra Political Crisis aditya thackeray speaks on rebel mla shiv sena sanjay raut ed notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.