Devendra Fadnavis : "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:01 PM2022-06-30T18:01:45+5:302022-06-30T18:10:25+5:30
Maharashtra Political Crisis And Devendra Fadnavis : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे.
मुंबई - भाजपा-शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. यानंतर आता भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे भरभरून कौतुक केले आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विटही केलं आहे. "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम असं म्हणतं ट्विट केलं आहे. "पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना… सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना.... देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम…" असं वाघ यांनी म्हटलं आहे.
सत्ता समोर आल्यानंतर
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 30, 2022
मोह सोडायला
संघाचे संस्कार आणि
देवेंद्र फडणविसांचे काळीज लागते...@Dev_Fadnavis
"50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 50 आमदार का वेगळी भूमिका घेतात? याबाबत स्पष्टच सांगितलं आहे.
पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2022
सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना....
देवेंद्र जी तुमच्या त्यागाला सलाम…..🙏@Dev_Fadnavispic.twitter.com/yZ8sr6M3u9
"राज्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहेत. 50 आमदार एकत्र आहोत. जे काही अडीच वर्षांपूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्र्यांना मतदार संघातील समस्या, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. मी अनेकवेळा चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. एकत्र निवडणुका लढवल्या. आमदारांमध्ये जी नाराजी होती. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई... महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते. हे सगळं होत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ म्हणजे आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणात 50 लोक एकत्र आले. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे हा निर्णय घेतला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.