Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:54 AM2022-06-30T11:54:42+5:302022-06-30T12:05:03+5:30

Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 

Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena and Uddhav Thackeray | Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" 

Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" 

googlenewsNext

मुंबई - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. आता राज्यपाल विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करू शकतात. भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 

महाराष्ट्रात नवीन सरकार येणार...असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार" असं म्हटलं आहे. यासोबतच "महाराष्ट्रात नवीन सरकार येणार... पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल...... मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल" असं देखील किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या यांनी य़ाआधी देखील उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे घाबरतात हे मला कळत नाही. आमदार आले की ते आम्हाला मतदान करतील असं सकाळ संध्याकाळ त्यांचा भोंगा आवाहन करत असतो. फ्लोअर टेस्ट होऊन जाऊदे एकदा. आता का घाबरताय. कारण ठाकरेंच्या पोटात पाप आहे. काल पर्यंत ओरडणारे ठाकरे कुटुंबीय गप्प का?,” असा सवालही सोमय्या यांनी केला होता. राज्यपालांनी बहुमत घ्या सांगितलं, संपूर्ण शिवसेनेचा ठाकरेंवर अविश्वास आहे हे सांगा असंही ते म्हणाले होते. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आज गोव्यात एकनाथ शिंदे गटाची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
 

Web Title: Maharashtra Political Crisis BJP Kirit Somaiya Slams Shivsena and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.