Maharashtra Political Crisis: "निवडणुकीची खुमखुमी असेल तर आधी..."; उद्धव ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 06:31 PM2023-05-12T18:31:03+5:302023-05-12T18:32:01+5:30

"उद्धव ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतो. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले."

Maharashtra Political Crisis CM Eknath Shinde son MP Shrikant Shinde gives open challenge to Uddhav Thackeray MLAs to resign | Maharashtra Political Crisis: "निवडणुकीची खुमखुमी असेल तर आधी..."; उद्धव ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंचे आव्हान

Maharashtra Political Crisis: "निवडणुकीची खुमखुमी असेल तर आधी..."; उद्धव ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंचे आव्हान

googlenewsNext

Shrikant Shinde vs Uddhav Thackeray, Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिकतेच्या गप्पा ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. मात्र नैतिकता शिल्लक असेल तर आणि निवडणूकीची खुमखुमी असेल तर ठाकरे गटातील उरलेल्या, शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी, आधी राजीनामा द्यावा. तुमच्या पाठिशी लोक असतील तर निवडणुकांना सामोरे जा, निवडून या आणि मग नैतिकतेच्या गप्पा मारा, असे थेट आव्हान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिवसेना भाजप महायुती सरकार आणखी भक्कम झाले आहे. मात्र त्यानंतरही विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जाते आहे, असेही यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि ऍड. निहार ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्ला चढविला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन करत खासदार शिंदे यांनी ठाकरे गटाने न्यायालयाकडे केलेल्या आठ पैकी ६ मागण्या फेटाळल्याचीही माहिती यावेळी दिली.

"नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्यांनी २०१९ मध्ये भाजप सोबत निवडणूक लढवली. एकत्रितपणे लोकांच्या समोर गेले, बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडणूक आले. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली. त्यासाठी दुसऱ्यासोबत संसार थाटला. नैतिकता असती तर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले नसते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची निवड वैध ठरवले आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता काही जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा हे मोठे झालेत आहेत," अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली.

"ठाकरे गटाच्या ८ पैकी ६ मागण्या फेटाळल्या"

"उद्धव ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतो. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. निवडणुकी आधी केलेली युती नंतर तोडली ती नैतिकता होती का. ती जनतेसोबत गद्दारी आणि जनमताची प्रतारणा नव्हती का? ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्याच्या आठ पैकी सहा मागण्या फेटाळून लावत त्यांना दणका दिला. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली ते कामकाजात सहभागी होऊ देऊ नका, अशी त्यांची मागणी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती नाकारली. ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात असा निर्णय न्यायालयाने दिला. अध्यक्षाने चौकशी करून निर्णय घेण्याचे कोर्टाने सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करण्याचे काम, नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम, नागरिकांची सहानभूती मिळवण्यासाठी खोटे बोलण्याचे काम केले जाते आहे. खोटी माहिती पसरवली जाते आहे," असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.

"सध्या जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जाते आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शपथविधीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली. विधानसभा अध्यक्षाची निवड नियमानुसार झाली आहे. त्यामुळे ते आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेतील, असे न्यायालयाने आपल्या निकालात जाहीर केले. एकनाथ शिंदेंना हटवून मला पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवा अशी मागणी ठाकरेंनी केली होती. एकीकडे नैतिकतेच्या गप्पा मारता दुसरीकडे न्यायालयाकडे पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा अशी मागणी करायची. नैतिकतेच्या नावावर नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. कोर्टाने मात्र यांना राजीनाम्याची आठवण करून देत यांची मागणी फेटाळली. अपात्रतेबाबत सर्व निर्णय विधानसभा उपाध्यक्षांना घेण्याचा अधिकार देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यांची ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली," असा न्यायालयीन निर्णयांचा पाढाच श्रीकांत शिंदे यांनी वाचला.

"ठाकरे गटाकडे उरलेले आमदार, खासदार शिवसेनेत येणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवून संभ्रम पसरवला जातो आहे. ठाकरे गट जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. निकालाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सरकार पडणार म्हणून सातत्याने खोट पसरवलं जाते आहे. आपल्या बाजूने सहानभूती मिळावी यासाठी हे खोटे बोलण्याची वेळ ही त्यांच्यावर आली आहे," असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

"आधी ठाकरे गटाच्या आमदारांनी राजीनामा द्यावा"

"नैतिकतेवर बोलण्याआधी शिवसेना, भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून येणाऱ्यांनी आधी राजीनामा द्या. लोक जर खरचं तुमच्या बाजुने उभे असतील तर निवडणुकांना सामोरे जा. निवडून या मग नैतिकतेवर बोला. ज्यांना निवडणुकांची हौस आहे, खुमखुमी आहे, त्यांनी राजीनामा द्यावा.  शिवसेना भाजपला ४६ टक्के मते मिळाली होती. खरचं नैतिकता असेल तर आधी राजीनामा द्या. उद्याच राजीनामा द्या. निवडणुकांना सामोरे जा. लोक कुणाच्या बाजूला उभे आहेत ते तुम्हाला कळेल," असे खुले आव्हान त्यांनी दिले.

यावेळी उदय सामंत यांनीही ठाकरे गटावर हल्ला चढवला. "कालपासून नैतिकतेचे धडे ज्यांना नैतिकता नाही ते देत आहेत. दुटप्पीपणा गेले काही महिने बघितला आहे. बारसूबाबत दुटप्पीपणा समोर आला. मुख्यमंत्री व्हायचं नाही अशा नैतिकतेच्या गप्पा मारायच्या आणि पुन्हा पदावर बसवा असे सांगत राहायचे. शिवसैनिक मुख्यमंत्री बनवणार म्हणाले आणि स्वतः झाले. त्यांच्या गटातील आमदार, खासदार आपल्यासोबत रहावेत यासाठी यासाठी खोटं बोललं जात आहे. संजय राऊत म्हणतात तीन महिन्यात पुन्हा न्यायालय निकाल देईल, असे खोटं पसरवलत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे," असेही उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी आमदार संजय शिरसाठही उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Political Crisis CM Eknath Shinde son MP Shrikant Shinde gives open challenge to Uddhav Thackeray MLAs to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.