बंडखोर आमदार आज गुवाहटीवरुन गोव्याला येणार? उद्या होणार फ्लोअर टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:36 PM2022-06-29T16:36:02+5:302022-06-29T16:36:10+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. मात्र, फ्लोअर टेस्टमध्ये पाठिंबा मिळेल, असे उद्धव सरकारचे म्हणणे आहे. यादरम्यान शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घाबरवण्यासाठी, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आज गोव्याला येणार बंडखोर आमदार?
उद्या होणाऱ्या प्लोअर टेस्टसाठी बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. पण, गुवाहाटीचे हवामान झपाट्याने बदलत असल्याचे जाणकारांचे मत आहे. खराब हवामानामुळे उड्डाणांवरही परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत उध्या फ्लोअर टेस्टच्या वेळी मुसळधार पाऊस झाला किंवा फ्लाइटमध्ये अडचण आली तर प्रकरण आणखी बिघडू शकते. त्यामुळेच बंडकोर आमदार आज गोव्याला येणार असल्याची माहिती मिळ आहे. बंडखोरांसाठी गोवा सेफ झोन आहे. तेथून मुंबईला येणे सोपे आहे. शिवाय, गोव्यातील सुरक्षाही चोख असेल, कारण तेथेही भाजपचे प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत.
भाजप आमदार आज मुंबईत येणार
या सर्व राजकीय गदारोळात फ्लोअर टेस्टसाठी भाजपने सर्व आमदारांना आज मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपच्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदार, अपक्ष समर्थक आमदारांना आज संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचून फडणवीस यांची भेट घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.