'अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी', शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:23 PM2022-06-30T18:23:34+5:302022-06-30T18:31:32+5:30

Maharashtra Political Crisis: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे.

Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Sharad Pawar's best wishes to newly appointed CM Eknath Shinde | 'अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी', शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा...

'अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी', शरद पवारांच्या एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा...

googlenewsNext

Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. ''एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे,'' असे शरद पवार म्हणाले.

जयंत पाटलांच्या शुभेच्छा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील एकनाथ शिंदे यांना शुभेच्य़ा दिल्या. ''एकनाथरावजी शिंदे यांचे माझ्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन ! महाराष्ट्र हे एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी यांनी राज्याला अजून नव्या उंचीवर न्यावे, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो,'' असे जयंत पाटील म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदेंना शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष आज संपला. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. तसेच, भाजप शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देईल आणि अपक्षांसह भाजपचे लोकही सत्तेत सहभागी होतील, असे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे, स्वतः फडणवीस सत्तेत मंत्रिमंडळात नसतील. दरम्यान, आता सायंकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Sharad Pawar's best wishes to newly appointed CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.