Maharashtra Political Crisis : "आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार, सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:12 PM2022-06-29T16:12:43+5:302022-06-29T16:24:53+5:30

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Share Sanjay Shirsat Video : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे.

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Share Sanjay Shirsat Video And Tweet Over Political Situation | Maharashtra Political Crisis : "आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार, सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास"

Maharashtra Political Crisis : "आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार, सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास"

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलं असून त्यामध्ये "आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार, सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास" असं म्हटलं आहे.

"मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेने आणि शिवसैनिकांनी अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये" असं ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही स्वखुशीने येथे गुवाहाटीला आलो असून लवकरच मुंबईमध्ये येत आहोत असं म्हटलं आहे. यासोबतच मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे असंही ते म्हणाले. संजय शिरसाट यांचाच व्हिडीओ आता एकनाथ शिंदेंनी शेअर केला आहे. 

गुवाहाटीवरुन तीन वाजताच्या सुमारास शिंदे गट गोव्यासाठी रवाना होणार होता. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय आणि अतिशय स्वाभिमानी मंडळी एकनाथशिंदेंच्या निमित्तानं पुढे येतायत. राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजप म्हणून आता आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 

आसाममधील पूरग्रस्तांसाठी 'शिंदे गटाचा' पुढाकार; 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय

आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या (Assam Flood) मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आसाममध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं असून लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे.
 

Web Title: Maharashtra Political Crisis Eknath Shinde Share Sanjay Shirsat Video And Tweet Over Political Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.