Maharashtra Political Crisis: "रश्मी वहिनींना एकच गोष्ट स्पष्ट सांगितली की...", बंडखोर आमदार दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संभाषण सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 02:29 PM2022-06-28T14:29:29+5:302022-06-28T14:30:20+5:30

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोन आला आला होता याचा खुलासा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis I told Rashmi Vahini only one thing mansi dalvi wife of rebel MLA mahendra Dalvi told the whole conversation with rashmi thackeray | Maharashtra Political Crisis: "रश्मी वहिनींना एकच गोष्ट स्पष्ट सांगितली की...", बंडखोर आमदार दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संभाषण सांगितलं...

Maharashtra Political Crisis: "रश्मी वहिनींना एकच गोष्ट स्पष्ट सांगितली की...", बंडखोर आमदार दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संभाषण सांगितलं...

googlenewsNext

मुंबई

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोन आला आला होता याचा खुलासा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची समजूत काढून आमदारांना परत आणण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत. रश्मी ठाकरे यांनी स्वत:हून आमदारांच्या पत्नींना फोन करुन आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर कुटुंब म्हणून एकत्र होतो. यापुढेही राहू असं आवाहन करत आहेत. यावर अलिबागचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी रश्मी ठाकरेंसोबत फोनवर झालेला संपूर्ण संवाद सांगितला. तसंच आमदार महेंद्र दळवींची भूमिका काय आहे ते देखील रश्मी वहिनींना सांगितल्याचं मानसी दळवी म्हणाल्या. 

BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

"होय रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. रायगड क्षेत्रात आमदारांवर होत असलेल्या अन्यायाची मी माहिती त्यांना दिली. कारण आमच्या घरात बैठकी होत असताना मीही चर्चा ऐकायचे. तेव्हा आमदार आपल्या मतदार संघात काम करता येत नसल्याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त करत होते. याची माहिती रश्मी वहिनींना दिली. तुम्ही बंड का केलं असं त्यांनी मला विचारलं. त्यावर मी त्यांना तुमच्या म्हणण्यानुसार ही बंडखोरी आहे. पण एका आमदाराची पत्नी म्हणून मी सांगेन की त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. त्यांचं मी आणि माझं कुटुंब पूर्णपणे समर्थन करतो", असं रश्मी ठाकरे यांना सांगितल्याचं मानसी दळवी म्हणाल्या. 

निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

तसंच तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात का? असाही प्रश्न रश्मी ठाकरे यांनी विचारल्याचं मानसी दळवी म्हणाल्या. "आम्ही कालही कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहोत आणि भविष्यातही शिवसैनिक राहणार. आमचं म्हणणं मातोश्रीवर ऐकण्यात आलं नाही. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले. आम्हाला आमदार निधी मिळवून दिला. त्यामुळे लोकांची कामं करता आली. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्या पाठिशी आहोत", असं रश्मी ठाकरे यांना सांगितल्याचं मानसी दळवी यांनी सांगितलं. 

Web Title: Maharashtra Political Crisis I told Rashmi Vahini only one thing mansi dalvi wife of rebel MLA mahendra Dalvi told the whole conversation with rashmi thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.