'तिसरी घंटा झाली, नाटक सुरू..' मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर केदार शिंदेची-हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:14 PM2022-06-29T23:14:19+5:302022-06-29T23:14:41+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई- आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मराठी चित्रपट दिग्दर्शक-निर्माता केदार शिंदे आणि अभिनेता हेमंत ढोमे यांची पोस्ट चर्चेत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा आज अखेर शेवट झाला. बंडखोरांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले होते. उद्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते, पण आजच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावर कलाविश्वातून प्रतिक्रिया येत आहेत.
तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला... नाटक सुरू.. performance तोच!!
— Kedar Shinde (@mekedarshinde) June 29, 2022
काय म्हणाला केदार आणि हेमंत?
चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजच्या घडामोडीनंतर ट्विट केले की, 'तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला... नाटक सुरू.. performance तोच!!' तर, दुसरीकडे अभिनेता हेमंत ढोमे यानेही ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 'Thank you उद्धव ठाकरे.
तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता… कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार!' असे ढोमे म्हणाला.
Thank you @OfficeofUT !!!
तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता… कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार! #thankyou#UddhavThackarey#CM— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 29, 2022
भाजपा उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपाच्या गोटाच आनंद साजरा केला जात आहे. ताज हॉटेलवर सर्व आमदार जमले असून उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची माहिती मिळत आहे. उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत. यानंतर भाजपा सत्तास्थापनेच्या हालचाली करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.