बहुमत गमावल्यावर पदाचा त्याग करावाच लागतो, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 10:44 PM2022-06-29T22:44:34+5:302022-06-29T22:45:23+5:30
“हारी बाजी को जितना जिसे आता है, वो देवेंद्र कहलाता है,” भाजप नेत्याचं ट्वीट.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा तसंच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपकडूनही आता प्रतिक्रिया येऊ लागल्या असून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ‘हारी बाजी को जितना जिसे आता हे वो देवेंद्र कहलाता है’ असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली.
हारी बाजी को जितना जिसे आता है, वो देवेंद्र ही दोस्तों कहलाता है... पुन्हा येणार, येणारच… असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत. मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतोय म्हणजे? बहुमत गमावल्यावर तो करावाच लागतो, असं म्हणत टीकेचा बाण सोडला.
मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय म्हणजे???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
बहुमत गमावल्यावर करावाच लागतो...
हारी बाजी को जितना
जीसे आता है
वो देवेंद्र ही दोस्तों
कहलाता है...
पुन्हा येणार, येणारच...@Dev_Fadnavispic.twitter.com/Mdfzm1xzBk— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
सरकार कोसळलं…
मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मोठं केले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्याने पुण्य मिळत असेल ते त्यांना मिळू द्या. हा आनंद कुणीही हिरावून घेऊ नये. मला मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा अजिबात नव्हती. मला खुर्चीला चिटकून बसायचं नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय, त्याचसोबत विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हदरम्यान केली.