Maharashtra Political Crisis: "इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही"; मनसेचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:22 PM2022-06-28T13:22:33+5:302022-06-28T13:35:56+5:30
Maharashtra Political Crisis MNS Gajanan Kale And Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला हादरा बसला. त्यात शिवसेना भवन ज्या मतदारसंघात आहेत त्यातील आमदार सदा सरवणकर हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिवसैनिक संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावर राष्ट्रवादी हा पक्ष सरकारमध्ये अग्रगण्य आहे. हा पक्ष आपली कामे करत नाही हे वाटल्यामुळेच शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असं सदा सरवणकर यांनी भाष्य केले आहे. मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला? याबाबत आता सदा सरवणकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
"१९७९ पासून मी शिवसेनेत गटप्रमुख शाखाप्रमुख, विभाग प्रमुख पदावर सक्रीय आहेत. मी आजतागायत मतदारसंघ बांधला, एकनिष्ठ राहिलो आदेश बांदेकरासारखा उपरा येऊन उभा राहणार असेल तर काय करायला हवं होते? मनोहर जोशींनी तुझी तिकीट कापली, त्यांचे घर जाळ असा आदेश संजय राऊतांनी दिले. मला अडकवण्याचं काम राऊतांनी केले. अशावेळी मी काय करायला हवं होतं. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, कुणी समजवण्याचं आणि सांगण्याची गरज नाही. हे सगळे उपरे आहेत. मी विनासंरक्षण मतदारसंघात फिरून दाखवेन" असं सदा सरवणकर यांनी म्हटलं. यावरून आता मनसेने ठाकरे सरकारला आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
"इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही" असं म्हणत मनसेना हल्लाबोल केला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश संजय राऊत यांनी दिले होते असं आमदार सरवणकर यांनी म्हटलं आहे. इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही" असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच अहो पण आता राहिलय कोण? असं म्हणत एक व्यंगचित्रही शेअर केलं आहे.
अहो पण आता राहीलय कोण ? 😅 pic.twitter.com/6BJvgcKJMd
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 28, 2022
सामनात यांनी अग्रलेख लिहायचे आणि आम्ही संरक्षणासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरायचो. आम्ही विठ्ठलाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या तक्रारी अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊतांकडे मांडल्या पण एकाही नेत्यांमध्ये धाडस नव्हते मंत्र्यांना फोन करून जाब विचारायची. संजय राऊत शिवसेना संपवतायेत हे जगजाहीर आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष संजय राऊतांवर आहे. उपरे शिवसैनिक स्वार्थासाठी आंदोलन करतायेत. संजय राऊतांनी कुठली आंदोलने केली. २००२ मध्ये आले. सामना ऑफिस माझ्या नेतृत्वाखाली उभी राहिली. संजय राऊतांनी माझ्याबद्दल बोलू नका. संजय राऊत एकातरी आंदोलनात सहभागी झालेत का? असा सवाल सदा सरवणकर यांनी संजय राऊतांना विचारला.