Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:12 PM2023-05-10T19:12:13+5:302023-05-11T22:31:32+5:30

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज गुरुवारी निकाल येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ ...

maharashtra political crisis news eknath shinde vs uddhav thackeray supreme court verdict today live updates | Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले

Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले

googlenewsNext

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज गुरुवारी निकाल येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ पासून याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे.

देशातील अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. सरकार आणि विरोधक दोघांची धाकधूक वाढली असून, निकाल आमच्याच बाजूने येईल, असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. जाणून घ्या, लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

10:30 PM

विरोधकांचे थोबडे काळे झाले आहे: भरत गोगावले

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांचे थोबडे काळे झालेले आहे. त्यांना जे काय अपेक्षित होतं ते घडलेलं नाही त्यामुळे ते नाराज राहणार आहेत. आम्हाला अडचण येणार नाही हे आम्ही आधीच सांगितले होते. आम्ही समाधानी आहोत आनंदीत आहोत. जे रोज सकाळी उठून चर्चा करायचे सरकार पडेल त्यांची तोंड बंद झालेली आहे, अशी टीका शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केली. 

09:19 PM

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करावी: ओमराजे निंबाळकर

राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे ओढले. कोश्यारींवर राष्ट्रपतीनी कारवाई करावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

09:08 PM

कलानगर मातोश्री परिसरात शिंदे गटाकडून जल्लोष

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कलानगर मातोश्री परिसरात शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ढोल ताषाच्या गजरात शिवसेनेच्या शाखेबाहेर फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. याशिवाय, अनिल परब यांच्या घरासमोर शिंदे गटाकडून जल्लोष.

07:50 PM

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परत मुख्यमंत्री बनले असते: जितेंद्र आव्हाड

व्हीप बजावणे आणि निलंबनाचा अधिकार पक्षाला आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्यात आली. संरक्षण करणे म्हणजेच पाठिंबा काढणे होत नाही. पदापेक्षा आपली नैतिकता मोठी आहे. हीच नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा राजकारणाच्या दृष्ठिने पहिला तर चुकीचा आहे पण नैतिकता पाहिली तर योग्य आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

07:47 PM

सरकारला कोणताही धोका राहिलेला नाही: अनिल बोंडे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. अगोदर राजीनामा द्याल तर कुणीही वाचवू शकत नाही. सरकारला कोणताही धोका राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दिली.

07:13 PM

नवीन व्हिप नियुक्तीची प्रक्रिया आजपासून सुरू: राहुल शेवाळे

व्हिप म्हणून कुणाला नियुक्त करायचे हे राजकीय पक्ष ठरवेल, त्याप्रमाणे आम्ही नवीन व्हिपची नियुक्ती प्रक्रिया सुरू करू असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

06:22 PM

उद्धव ठाकरेंनी आधी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा: चित्रा वाघ

05:50 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अनेकांचा पालापाचोळा झाला: नारायण राणे

उद्धव ठाकरे यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. ठाकरे यांनी नैतिकतेचा बोजवारा उडवला. संख्याबळ नसल्याने ठाकरे यांनी राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अनेकांचा पालापाचोळा झाला, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

05:50 PM

शिंदे सरकार अनैतिक, त्यांनी राजीनामा द्यावा: आदित्य ठाकरे

४० गद्दारांचा येत्या दोन-तीन महिन्यांचा खेळ उरला आहे. विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही. नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा देऊन त्यांनी निवडणुकांना सामोरे जावे, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी दिले.

05:45 PM

ठाकरे गटाच्या आमदारांची उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता मातोश्री येथे ही बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

05:45 PM

आम्हला विश्वास होता निकाल आमच्या बाजूने लागेल, न्याय मिळेल: भावना गवळी

सरकार स्थिर होते, स्थिर राहिले. मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावर शंका घेण्याचे काम नाही. निर्णय आमच्या बाजूने लागण्याने विस्तार करावा लागेल. आम्हला विश्वास होता निकाल आमच्या बाजूने लागेल, न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली. 

05:44 PM

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार: संजय शिरसाट

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. हे सरकार कायदेशीर हे सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेची भाषा करु नये, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. 

05:01 PM

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सेना भवनाबाहेर जल्लोष

सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी सेना भवनाबाहेर जल्लोष केला. शिवसैनिकांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याने फटाके फोडल्याचे म्हटले जात आहे.

04:59 PM

ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला: गिरीश महाजन

हे सरकर बेकायदा आहे असा आरोप होत होता, ते सर्व मुद्दे खोडलेले आहेत. याचा मोठा दिलासा शिंदे-फडणवीस सरकारला आहे. हे सरकार नियमानुसार बनले असे सिद्ध झाले. ते कशावरही फटाके फेडतील, त्यांना काय? बेगाने शादीमे अब्दूल्ला दिवाना असे त्यांचे चालले आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली.

04:57 PM

राज्यात शिंदे फडणवीस सरकार राहील हे स्पष्ट: गुलाबराव पाटील

या निकालावरून शिंदे फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. न्यायालयाचा निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार राहील हे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. 

04:56 PM

सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेणार: राहुल नार्वेकर

राजकीय पक्ष नेमका कुणाचा हा निर्णय आधी घ्यायचाय. सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेणार. मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन निर्णय घेऊ. नेमका किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. 

04:54 PM

लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु: राहुल नार्वेकरांनी केले स्पष्ट

प्रतोद म्हणून कुणाची निवड योग्य हे न्यायालयाने सांगितलेले नाही. राजकीय पक्ष व्हिप नेमेल असे न्यायालयाने सांगितले आहे. लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.  

04:35 PM

सिंधुदुर्गात शिवसैनिकांकडून जल्लोष

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सिंधुदुर्गातही जल्लोष करण्यात आला असून वेंगुर्ल्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत हा आनंद साजरा केला.यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.

04:34 PM

कल्याणकर समर्थकांनी केली फटाक्यांची आतिषबाजी

आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिल्यानंतर नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे नाव १६ आमदारांत होते. कल्याणकर समर्थकांना निकालाची मोठी उत्सकूता होती. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कल्याणकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
 

04:33 PM

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नागपुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.

04:16 PM

सत्तासंघर्षाच्या निकालावर अजित पवारांचे मौन!

मी निकाल बघितलेला नाही. जो पर्यंत व्यवस्थित निर्णय बघत नाही तो पर्यंत बोलणार नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे.

04:14 PM

काही निर्णय अजून व्हायचे आहेत; शरद पवार यांचे सूचक विधान

नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असे वाटत नाही.  ज्यांच्या नावावर निवडून येतात त्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. काही निर्णय अजून व्हायचे आहेत. अध्यक्षांना नियमांच्या चौकटीत राहून काम करावे लागते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 
 

04:12 PM

ठाकरेंच्या राजीनाम्यावर आत्ता चर्चा करण्यात अर्थ नाही: शरद पवार

सत्तेचा गैरवापर सातत्याने सुरू आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यावर आत्ता चर्चा करण्यात अर्थ नाही.  राज्यपालांची नियुक्ती चुकीची केली जाते याचे कोश्यारी उदाहण आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

03:56 PM

नैतिकता पाळली असतील तर शिवसेना-भाजपचं सरकार असतं

उद्धव ठाकरेंचा राजीनामाच या सरकारला कायम ठेवण्यास कारणीभूत ठरल्याचे अधोरेखित झाले आहे. यावरुन, आता शिंदे आणि ठाकरे आमने-सामने आले आहेत. शिंदे-फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी, नैतिकतेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे मी नेहमी सांगतो. आम्ही जे सरकार स्थापन केले ते कायद्याच्या चौकटीत बसून केले. त्यावर, आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच, नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागणाऱ्या उद्धव ठाकरेंवरही पलटवार केला. 

02:25 PM

उद्धव ठाकरेंनी नैतिकतेवर बोलू नये - फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिला आहे, क्या निकालामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांनी युतीतून निवडणुका लढवल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

12:37 PM

राजीनाम्याच्या निर्णयामुळे शिंदेंना दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा शिवसेना ठाकरे गटासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हाच राजीनाम्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला असून सरकार वाचले आहे.

12:17 PM

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला धक्का

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या विरोधात पहिली तीन निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामध्ये, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगवले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच, सरकारवर संशय घेण्याचं राज्यपालांचं कारण नव्हतं, त्यामुळे राज्यपालांच्या बहुमत चाचणीचा निर्णय गैर असं कोर्टाने म्हटलं आहे.

11:42 AM

पुढील काही मिनिटांत निकाल होणार जाहीर

सर्वोच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, पुढील काहि मिनिटांतच सत्तासंघर्षाचा निकाल जनतेसमोर येणार आहे.

10:42 AM

निकाल येईपर्यंत वाट पाहुयात - फडणवीस

योग्य निकाल येईल, अशी अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत आपण पाहिलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, त्यामुळे कुठलंही भाकीत करणं योग्य नाही. मात्र, आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना, आपण वाट पाहुया, असेही म्हटले. 
 

09:20 AM

विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता - अजित पवार

'निकाल काहीही लागला तरी माझं स्वत:चं मत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. पण, कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला स्वत:ला वाटतं. मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की ही विधिमंडळातील बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही”, असं अजित पवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना म्हटलं. 

09:09 AM

या १६ आमदारांचे भवितव्य ठरणार

• एकनाथ शिंदे, कोपरी (ठाणे) तानाजी सावंत, परंडा- अब्दुल सत्तार, सिल्लोड • संदिपान भुमरे, पैठण यामिनी जाधव, भायखळा मुंबई भरत गोगावले, महाड संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगर प्रकाश सुर्वे, मागाठाणे बालाजी किणीकर, अंबरनाथ लता सोनवणे, चोपडा बालाजी कल्याणकर, नांदेड • अनिल बाबर, खानापूर संजय रायमूलकर, मेहकर महेश शिंदे, कोरेगाव- रमेश बोरनारे, वैजापूर • चिमणराव पाटील, संडोल,
 

08:52 AM

नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, कार्यालयाने दिली माहिती

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. दरम्यान, ते नाशिकमधील दिंडोरी येथील त्यांच्या गावी असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

08:51 AM

नरहरी झिरवळ नॉ

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. दरम्यान, ते नाशिकमधील दिंडोरी येथील त्यांच्या गावी असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

07:45 AM

पोलिसांना सतर्कतेच्या सूचना, गृहविभाग अलर्ट

गृह विभागाकडून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून सर्वच पोलीस स्टेशनला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर शहरातही पोलिसांना गृह विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्याचेही सांगण्यात आले आहे. 

11:41 PM

हे ऐतिहासिक निकाल असतील: राहुल शेवाळे

दोन निकालांची घोषणा होणार आहे. हे ऐतिहासिक निकाल असतील. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा शेवट होईल. महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आम्ही केलेल्या सर्व गोष्टी घटनेला धरून आहेत. घटनाबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही. महाविकास आघाडीचे हेच नेते कोर्टाच्या विरोधात यापूर्वी बोलले आहेत. सर्वोच्च घोटाळा , दिलासा घोटाळा असे वक्तव्य केले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो पर्यंत येत नाही तो पर्यंत बोलणे योग्य नाहीत, असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. 

10:40 PM

माझा न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर विश्वास: यामिनी जाधव

माझा न्यायव्यवस्थेवर व बाबासाहेबांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. एकाच क्षेत्रातील डॉक्टरांचे वेगवेगळे विचार असू शकतात तसे अनेक जण तर्क देत आहेत, असे यामिनी जाधव यांनी म्हटले आहे.
 

10:39 PM

निकालाआधी दिल्लीत राहुल शेवाळे यांची वकिलांसोबत बैठक

खासदार राहुल शेवाळे यांची वकिलांसोबत बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे. महेश शेठमलानी, नीरज किशन कौल यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी राहुल शेवाळे यांच्यासोबत निहार ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

09:43 PM

निकाल आमच्याच बाजूने लागेल यावर विश्वास: कृपाल तुमाने

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल यावर आमचा विश्वास आहे. १६ आमदारांचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा आणि सुप्रीम कोर्टाला देखील आहे. आम्ही सगळ्या बाबी कोर्टासमोर मांडल्या आहेत. सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच आम्ही काम केलं आहे. त्यामुळे आमच्याच बाजूने निर्णय येईल याची खात्री आहे, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. 

09:03 PM

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचन करणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचन करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

08:31 PM

PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल

मोदींना मुख्यमंत्री म्हणून शिंदे की अजून कोण हवे? याचा निकाल लागणार आहे.दोन शक्यता आहेत. एक तर एकनाथ शिंदे यांना कायम ठेवण्यात येईल. पक्षांतराबद्दलचा निकाल अध्यक्षांकडे सोपला जाईल. त्यामुळे शिंदे स्थिर राहतील. दुसरी शक्यता पक्षांतर बंदी कायद्याचे उलंघन केल्यामुळे शिंदे यांना निलंबित करण्यात येईल. त्यामुळे उद्या राजकीय निर्णय येणार. पाच न्यायधिशांचे वेगळे मत असू शकते. १६ आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उलंघन केले आहे. तर कायद्यानुसार हे आमदार निलंबित होतील, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराच चव्हाण यांनी म्हटले आहे. 

08:23 PM

आता स्वप्न बघण्यापलीकडे काही राहिलेले नाही: गिरीश महाजन

संजय राऊत यांनी स्वप्न पाहत राहावी. स्वप्न बघायला पैसे लागत नाही. स्वप्नाशिवाय दुसरे काय बघणार. शिवसेनेकडे काहीच राहिलेले नाही. निकाल आम्हाला अपेक्षित आहे तोच लागेल व मेरिटवर लागेल. आत्तापर्यंतचे सर्व निकाल मेरिटवरच लागलेले आहेत. त्यांच्याकडे आता फक्त स्वप्न बघण्यापलीकडे काही राहिलेले नाही. त्यांनी आता निकालाची वाट बघावी, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

08:09 PM

सत्याचा विजय होतो: सुधीर मुनगंटीवार

कशाचा सत्तासंघर्ष?,सत्तासंघर्ष असता तर आम्ही इथे दिसलो असतो का? कोर्टाला असे अपात्र करता येत नाही,म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही. सत्याचा विजय होतो. काही लोकं हवा पसरवतात, मायावी विचार मांडतात आणि गैरसमज निर्माण करतात. काहीही सत्तासंघर्ष नाही आम्ही जनतेच्या विकासासाठी काम करतो व करत राहणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

07:57 PM

दूध का दूध व पाणी का पाणी होईल: चंद्रकांत पाटील

१०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागणार. राजकीय अभ्यासकांच्या मते अध्यक्षांकडे निकाल येईल. दूध का दूध व पाणी का पाणी होईल. सरकार शिंदे साहेबांचेच असेल. शिंदे सरकारच्या विकास कामांमुळे यापुढे देखील जोमाने काम करता येईल. कायदेशीर दृष्टीने बघितले तर ही खरी लढाई अध्यक्षांच्या कोर्टातली आहे. सुनावणी होण्याआधीच हे कोर्टात गेले आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यामुळे या निकालात खूप काही हवा राहिलेली नाही. घटनापीठाचा निर्णय हा आमच्या बाजूने येईल, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

07:55 PM

निकाल आमच्या बाजूनेच येईल: गुलाबराव पाटील

निकालाची कोणालाच धाकधूक नाही. निकाल आमच्या बाजूनेच येईल. या देशाच्या लोकशाहीत सर्वोच्च मान कोर्टाला आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

07:53 PM

निकाल आमच्या बाजूने लागेल कारण आमची बाजू सत्याची आहे: संदिपान भुमरे

सत्तासंघर्षाची चर्चा देशभर सुरू आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल कारण आमची सत्याची बाजू आहे. आम्ही उठाव केला यात काही गैर नाही त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल, आम्हाला धाकधूक लागलेली नाही. आमची काही चूक नाही त्यामुळे धाकधूक लागण्याचे काही कारण नाही, असे संदिपान भुमरे यांनी म्हटले आहे. 

07:51 PM

सरकार स्थिर, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत: देवेंद्र फडणवीस

सरकार स्थिर आहे, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. २०२४ च्या च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

07:49 PM

आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास, १६ आमदार अपात्र ठरतील: नाना पटोले

आर्टिकल १० प्रमाणे निर्णय झाल्यास १६ आमदार अपात्र ठरतील. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे आता पुन्हा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे येईल असे मला वाटत नाही. त्यामुळे हे आमदार अपात्रच होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 
 

07:45 PM

पाच सदस्यीय घटनापीठाकडून सत्तासंघर्षाचा फैसला

07:41 PM

माझ्यामते कोणालाही बहुमत मिळत नाही: उल्हास बापट

गेल्या १० वर्षांपासून मी जे अंदाज व्यक्त केले ते बरोबर आले आहेत. दोन तृतियांश  लोक बाहेर पडले तर ते एकाचवेळी बाहेर पडायला हवे. १६ जे बाहेर पडले ते दोन तृतियांश होत नाहीत. घटनेशी विसंगत गोष्ट, यामुळे घटनेमुळे ते अपात्र ठरायला हवेत. माझ्यामते कोणालाही बहुमत मिळत नाही. सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. महाराष्ट्राची जनता ठरवेल ठाकरे बरोबर की शिंदे की फडणवीस. अंतिम अधिकार जनतेकडे असेल, असे उल्हास बापट म्हणाले. 

07:35 PM

राज्यपालांच्या कृतीबद्दल प्रामुख्याने निर्णय दिला जाईल: उज्ज्वल निकम

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय प्रत्यक्ष घेणार नाही, असे मला वाटते. विधानसभा अध्यक्षांची निवडही तत्कालीन सरकार कोसळल्यानंतर झाली आहे. त्यानंतरच अनेक घडामोडी घडल्या. या सर्व घटना एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यपालांच्या कृतीबद्दल प्रामुख्याने निर्णय दिला जाईल. तसेच हा निर्णय १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दलही असेल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

07:30 PM

राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला, सोबत वकीलही

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल लागण्याची दाट शक्यता असल्यामुळे राहुल शेवाळे दिल्लीला निघाले आहेत. त्यांच्यासोबत वकीलही असल्याचे सांगितले जात आहे.

07:28 PM

आम्ही आशावादी आहोत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आम्ही आशावादी आहोत. आमची केस मजबूत आहे. योग्य निकाल येईल याची आम्हाला अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत थांबलं पाहिजे. त्यावर कोणतेही अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालायाच्या निकालाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. त्यावर कोणतेही अंदाज बांधणं योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

07:26 PM

येणारा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असणार नाही: नरहरी झिरवळ

सभागृह सार्वभौम आहे, ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तोच निर्णय दिला होता. येणारा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतला तरी कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल किंवा तो माझ्याकडे आला तरीदेखील 16 आमदार अपात्र ठरतील, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.

07:24 PM

निकाल आमच्या बाजूने लागेल: अनिल देसाई

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल. हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटले आहे. 

07:22 PM

इतके महिने थांबलो, आता आणखी काही तास थांबा सगळे चित्र स्पष्ट होईल: आदित्य ठाकरे

कसलीही धाकधूक नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री अनैतिक आणि असंवैधानिक आहेत. इतके महिने थांबलो, आता आणखी काही तास थांबा सगळे चित्र स्पष्ट होईल, असे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले.

07:21 PM

या देशाच्या भविष्याचा निर्णय: संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

आमदार अपात्र ठरतील, सरकार पडेल, सरकार येईल, सरकार जाईल, राजकारणात या गोष्टी सुरूच राहतात. मात्र, या देशाच्या भविष्याचा निर्णय होईल. न्यायव्यवस्था विकली गेली आहे. हे चित्र या देशात असू नये. यासाठी उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

07:18 PM

राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत

Web Title: maharashtra political crisis news eknath shinde vs uddhav thackeray supreme court verdict today live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.