Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:40 AM2022-06-30T08:40:13+5:302022-06-30T08:40:59+5:30

Jayant Patil : बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Maharashtra Political Crisis: Sharad Pawar did not know that Uddhav Thackeray would resign - Jayant Patil | Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

Next

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे राजीनामा देणार, याची बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनाही माहिती नव्हती. याआधी त्यांनीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊ नका सल्ला दिला होता. राज्याच्या विकासासाठी  शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केले होते. अडीच वर्षात विकासासाठी काम केले. लोकांच्या हितासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. बंडखोर आमदारांचे पाठबळ नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. हे यापुढेही जनतेच्या लक्षात कायम राहील. तसेच, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिला. पुढच्या काळात सर्व एकत्र बसून भूमिका ठरवण्यात येईल. शिवसेनेचे काही फुटीर आमदार अजितदादा आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत. पण, त्यांच्या मतदार संघात माहविकास आघाडी सरकारमुळे कोट्यवधी रुपये देण्याचे काम झाले. शिवसेना आमदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणत निधी मिळाला. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा, म्हणून अजितदादा, राष्ट्रवादीला दोष दिला आहे. तसेच,  १२ हजार कोटी रुपये निधी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: Maharashtra Political Crisis: Sharad Pawar did not know that Uddhav Thackeray would resign - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.