Maharashtra Political Crisis : "रामदास कदमांचा शिवसेना वाढवण्यास सिंहाचा वाटा"; योगश कदमांचं थेट गुवाहाटीवरुन स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:46 PM2022-06-28T18:46:41+5:302022-06-28T18:47:55+5:30
मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे, अस यापूर्वी रामदास कदम म्हणाले होते.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ दिली आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार शिवसेनेनं भाजपसोबत युती करण्याची मागणी करत आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चर्चेचं आवाहन केलं आहे. परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी आपण एकनाथ शिंदेंसोबत का आलो याची माहिती दिली आहे.
“वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची मोहीम हाती घेतली आहे. याला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. रामदास भाईंचा शिवसेना वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे,” असं योगेश कदम यांनी सांगितलं. माझ्या दापोली मतदारसंघातील मला माझ्याच शिवसेना पालकमंत्री गळचेपी करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडलेल्या आमदाराला निधी देत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे यांना जिल्हा नियोजनमधून निधी देत होते. यासाठी मी हा निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
रामदास कदमांचा शिवसेना वाढवण्यास सिंहाचा वाटा; योगश कदमांचं थेट गुवाहाटीवरुन स्पष्टीकरण#ramdaskadam#ShivsenaMLA#EknathShindepic.twitter.com/aJA0u8tvns
— Lokmat (@lokmat) June 28, 2022
यापूर्वी काय म्हणाले होते रामदास कदम?
"मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे,” असं रामदास कदम म्हणाले होते.