Maharashtra Political Crisis : "ईडी लागली म्हणून भाजपा हवी"; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 04:11 PM2022-06-30T16:11:57+5:302022-06-30T16:25:58+5:30

Maharashtra Political Crisis Shivsena Kishori Pednekar : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Maharashtra Political Crisis Shivsena Kishori Pednekar Slams Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis : "ईडी लागली म्हणून भाजपा हवी"; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल

Maharashtra Political Crisis : "ईडी लागली म्हणून भाजपा हवी"; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल

Next

मुंबई - महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. आता राज्यपाल विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करू शकतात. भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. फडणवीस आणि शिंदे गटात मंत्रिपदांचा फॉर्म्युला कसा असेल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. याच दरम्यान आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"ईडी लागली म्हणून भाजपा हवी, चांगलं चाललेलं घर तुम्ही मोडून काढलं" असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना खडेबोल सुनावले आहेत. "आम्ही शिवसैनिक आहोत असं ते म्हणतात. पण सत्तेसाठी तुम्ही हे केलंत, उद्धवजींसोबत जनता आहे. बाळासाहेबांचा विचार हा पुढे जात राहील. त्यासाठी असे बंड गरजेचे होते का?, कारणं देऊ नका, जे झालं ते महाराष्ट्र बघत आहे. मुंबई महापालिका अडचणीत असली तरी अडचणींवर मात करून पुढे जायचे असते" असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 

"संजय राऊत बरोबर म्हणतात, तुम्ही स्वत: मुख्यमंत्री बनवून दाखवा. चांगले चाललेले घर आता तुम्ही मोडून काढले, ईडी लागली म्हणून भाजपा हवी, भाजपासोबत असताना तुमच्या यात कुरबुरी होत्या. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने कारभार हाताळला त्यासाठी जनता त्यांना कायम लक्षात ठेवेल" असं देखील पेडणेकर यांनी सांगितलं. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सुरू झालेला सत्ता संघर्ष आता नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनावर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. राजभवनात आज संध्याकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होणार आहे.
 

Web Title: Maharashtra Political Crisis Shivsena Kishori Pednekar Slams Eknath Shinde Revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.