Shivsena vs Eknath Shinde Live: भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत: सुधीर मुनगंटीवार
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:28 AM2022-06-27T07:28:11+5:302022-06-27T19:38:09+5:30
Maharashtra Political Crisis, Shivsena vs Eknath Shinde Live: महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
Maharashtra Political Crisis, Shivsena vs Eknath Shinde Live: महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
Shivsena vs Eknath Shinde Live Updates:
LIVE
07:27 PM
भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे: सुधीर मुनगंटीवार
07:27 PM
सुप्रीम कोर्टाच्या निर्णायाचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक झाली: सुधीर मुनगंटीवार
07:27 PM
अविश्वास प्रस्ताव आणण्याची सध्या गरज वाटत नाही: सुधीर मुनगंटीवार
07:26 PM
एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुधीर मुनगंटीवार
06:42 PM
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाही, तर आपल्याच लोकांनी दगा दिला: आदित्य ठाकरे
06:38 PM
तुम्ही शिवसैनिक फुटीरतावाद्यांच्या बाजूने आहात की बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत; आदित्य ठाकरेंचा सवाल
06:37 PM
महाराष्ट्र कधी झुकणार नाही: आदित्य ठाकरे
06:37 PM
दुसऱ्या राज्यात जाऊन बंड का केले, आदित्य ठाकरेंचा सवाल
06:35 PM
माझा आवाज गुवाहाटीपर्यंत पोहोचतोय; आदित्य ठाकरेंचा टोला
06:32 PM
मातोश्रीवर कुणीही आरोप करू नयेत: दीपक केसरकर
06:29 PM
भाजपसोबत जायचे की नाही, ते एकनाथ शिंदे ठरवतील: दीपक केसरकर
06:28 PM
शरद पवार यांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री असते: दीपक केसरकर
06:26 PM
मुंबईत कधी यायचं ते एकनाथ शिंदे ठरवतील: दीपक केसरकर
06:26 PM
उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून युतीचे सरकार स्थापन करण्याची विनंती केली आहे. अन्यथा आमचा लढा सुरूच राहील: दीपक केसरकर
06:22 PM
उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे: दीपक केसरकर
06:22 PM
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडावी: दीपक केसरकर
06:18 PM
शिवसेनेत अवघे १० ते १२ आमदार उरलेत: दीपक केसरकर
06:18 PM
जनमताच्या कौलाप्रमाणे शिवसेना-भाजपचे सरकार यायला हवे: दीपक केसरकर
06:18 PM
उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीतील सल्लागार अधिक महत्त्वाचे आणि जवळचे वाटतात: दीपक केसरकर
06:16 PM
उद्धव ठाकरे यांनी मविआमधून बाहेर पडावे: दीपक केसरकर
06:16 PM
शिवसेना जी भूमिका घेतेय, त्यात त्यांचेच नुकसान जास्त आहे: दीपक केसरकर
06:16 PM
एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आणि यापुढेही तेच राहतील: दीपक केसरकर
06:16 PM
आमच्याकडे मेजोरिटी आहे, आम्हीच खरी शिवसेना आहोत: दीपक केसरकर
06:14 PM
अजून आम्ही शिवसेनेतच आहोत: दीपक केसरकर
06:14 PM
आम्ही लवकरच महाराष्ट्रात येणार: दीपक केसरकर
06:14 PM
आम्ही एकनाथ शिंदेंसोबत, ते जो काही निर्णय तो आम्हाला मान्य: दीपक केसरकर
05:58 PM
संजय राऊत ईडी चौकशीला उपस्थित राहणार नाहीत? सूत्रांची माहिती
05:28 PM
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू
05:15 PM
राऊत हल्ली जे काही बोलतात, त्यावरून राऊतांच्या बाबतीत आता हे जगजाहीर आहे की ते काहीही म्हणू शकतात: चंद्रकांत पाटील
05:15 PM
ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स विभाग या सर्व स्वायत्त संस्था आहेत: चंद्रकांत पाटील
05:15 PM
संजय राऊत काय म्हणतात याचा काही संबंध नाही: चंद्रकांत पाटील
05:14 PM
संजय राऊतांना नोटीस येणे अपेक्षित होते: चंद्रकांत पाटील
04:58 PM
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर
04:53 PM
गुवाहाटीत एकनाथ शिंदे गटाची महत्त्वाची बैठक सुरू; अविश्वास ठराव आणण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती
04:32 PM
एकनाथ शिंदे गट राज्यपालांकडे जाण्याची तयारी सुरू?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिलासानंतर आता एकनाथ शिंदे गट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे जाण्याची शक्यता असून, अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत विनंती करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
03:17 PM
एकनाथ शिंदे गटाला दिलासा
सुप्रीम कोर्टानं सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली. अपत्रातेविरोधातील नोटीसवर उपाध्यक्षांना ११ जुलैपर्य़ंत कोणतीही कारवाई करता येणार नाही. नोटीस बजावण्यात आलेल्या आमदारांना १२ जुलैच्या संध्याकाळपर्यंत आपलं म्हणणं मांडता येणार
03:05 PM
सुप्रीम कोर्टानं अजय चौधरी, नरहरी झिरवाळ, सुनील प्रभूंसह केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबतची नोटीस कोर्टानं बजावली आहे. यानंतरची सुनावणी ११ जुलै रोजी घेतली जाईल असंही जाहीर करण्यात आलं आहे.
02:51 PM
ई-मेलमधून उपाध्यक्षांविरोधात आलेली नोटिस अधिकृत ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उपाध्यक्षांनी नोटीस फेटाळली; ्असा दावा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे वकील राजीव धवन यांनी कोर्टात केला.
02:38 PM
सिंघवी- एका अज्ञात स्त्रोताकडून उपाध्यक्षांविरोधातील ई-मेल आला होता. जो उपाध्यक्षांनी स्पष्टपणे नाकारला.
खंडपीठ- पण ज्या उपाध्यक्षांविरोधात याचिका आली आहे तेच आपल्याविरोधातील याचिका स्वत: फेटाळून लावू शकतात का?
02:29 PM
खंडपीठ- आम्ही खरंच विधान सभेच्या अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत आहोत का?
अभिषेक मनु सिंघवी- आमदारांना नोटीस दिली की नाही, त्यांना किती वेळ दिला याबाबत आपण इथं चर्चा करत आहोत. म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्येच हस्तक्षेप आणण्याचं काम आपण करत आहोत.
02:24 PM
कोर्टाला हस्तक्षेप करण्यास सध्या खूप कमी वाव, आधी उपाध्यक्षांना निर्णय घेऊ द्यात मग कोर्ट अंतरिम आदेश देऊ शकेल- विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी
02:21 PM
उपाध्यक्ष निर्णय घेत नाहीत तोवर कोर्टानं यात हस्तक्षेप करू नये असा युक्तीवाद करताना अभिषेक मनु सिंघवी यांनी राजस्थानच्या २०२० सालच्या प्रकरणाचा दाखला दिला.
02:19 PM
उच्च न्यायालयाचा पर्याय असताना थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे का ठोठावले?; शिवसेनेची बाजू मांडणारे विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांचा कोर्टात सवाल
02:12 PM
कोणतंही अधिवेशन सुरू नसताना आमदारांना नोटीस बजावणं कितपत योग्य?, शिंदे गटाचा कोर्टात युक्तीवाद
02:06 PM
हटविण्याचा प्रस्ताव असताना उपाध्यक्षांकडून आमदारांना कोणतीही नोटीस दिली जाऊ शकत नाही, शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद
02:03 PM
ज्या अध्यक्षांना सभागृहाचा पाठिंबा आहे अशाच अध्यक्षांनाच आमदार अपात्र ठरविण्याचा अधिकार आहे, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद
02:01 PM
बहुमताचा विश्वास आहे, मग उपाध्यक्षांना बहुमत चाचणीची भीती कशासाठी?; शिंदेंच्या वकिलांचा सवाल
01:51 PM
राज्यात आमची प्रेतं परत येतील अशी वक्तव्य काही नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसंच आमदारांच्या कार्यालयावरही हल्ले झाले आहेत. त्यामुळे प्रकणाचं गांभीर्य पाहता हायकोर्टापेक्षा सुप्रीम कोर्टात आल्याचं एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं आहे.
01:48 PM
सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात
एकनाथ शिंदेंकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिकांवर सुनावणीला सुरुवात झाली असून कोर्टानं पहिलाच प्रश्न तुम्ही कायकोर्टात का गेला नाहीत? असा विचारला.
01:28 PM
मान कापली तरी गुवाहटीला जाणार नाही- संजय राऊत
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavispic.twitter.com/jA1QcvzP7a
01:23 PM
मुख्यमंत्र्यांकडून बंडखोर मंत्र्यांच्या कामाचं फेरवाटप
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
12:58 PM
आनंद आश्रम बाहेर शिंदे समर्थक एकवटले
VIDEO: ठाण्यातील आनंद दिघे यांच्या 'आनंद आश्रम'बाहेर शिंदे समर्थकांची गर्दी वाढली (व्हिडिओ- विशाल हळदे) pic.twitter.com/ut1q4FHkop
— Lokmat (@lokmat) June 27, 2022
12:01 PM
शिंदे गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला, याचिकेत नमूद
शिंदे गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे असं नमूद केलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच शिवसेना नेत्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. यासाठी संजय राऊत यांनी कालच्या भाषणात करण्यात आलेल्या विधानाचा दाखला देण्यात आला आहे.
11:33 AM
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेचा सावंतवाडीत मोर्चा, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती कडेकोट पोलीस बंदोबस्त मोर्चा केसरकर यांच्या निवासस्थाना समोरून जाणार असल्याने पोलीस धाकधूक वाढली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडून आहेत.जिल्हयातील पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले आहेत.
11:32 AM
मंत्री उदय सामंत यांचे आता होणारे फेसबुक लाईव्ह रद्द करण्यात आले असून फेसबुक लाईव्हची सुधारित वेळ नंतर कळवण्यात येणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
11:31 AM
ठाण्यात आनंद दिघे यांच्या आश्रमाबाहेर पोलीस बंदोबस्त
VIDEO: ठाण्याच्या टेम्बी नाका येथील आनंद दिघे यांच्या आश्रमा बाहेर पोलिस बंदोबस्त (व्हिडिओ- विशाल हळदे) pic.twitter.com/Z4qInsdiz4
— Lokmat (@lokmat) June 27, 2022
10:50 AM
मंत्री उदय सामंत थोड्याच वेळात संवाद साधणार
शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सकाळी ११ वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
10:49 AM
शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीत पोहोचणार?
शिवसेनेचे आणखी दोन आमदार शिंदे गटामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यातील एक मुंबईतील असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
10:09 AM
मनसे काय ते 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतात- संजय राऊत
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी बंडखोर आमदार मनसे काय ते एमआयएम, समाजवादी आणि इतर पक्षातही विलीन होऊ शकतात असं म्हटलं. आमदारकी वाचवण्यासाठी ते कोणत्याही पक्षात विलीन होऊ शकतात. अनेक पर्याय त्यांच्यासमोर आहेत, असंही राऊत म्हणाले.
10:05 AM
शिंदे गटाची भूमिका महाराष्ट्राला पटणार नाही- संजय राऊत
शिंदे गटाची भूमिका महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. शिवसेनेनं हिंदुत्वाची प्रतारणा केली असं एक उदाहरण फक्त दाखवा. सत्य परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या आणि तुमच्या डोळ्यासमोरच्या खिडक्या उघडा, असं संजय राऊत म्हणाले.
10:03 AM
राज्यातही झाडी, डोंगार, हाटील आहे...इथं या- संजय राऊत
"राज्यातही झाडी, डोंगार, हाटील सारंकाही आहे. तिथं बसण्यापेक्षा महाराष्ट्रात परत या. तुमचा समाजाशी संपर्क तुटला आहे. परत येण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मतं ईडी नव्हे, तर जनता देणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.
09:11 AM
संजय राऊतांचा ट्विटमधून गुलाबराव पाटील यांना टोला
बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका.
आपण यांना ओळखता ना?
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/8yb33kHFOc
07:44 AM
शिंदेंकडून हरिष साळवे, तर 'मविआ'कडून कपिल सिब्बल
शिंदे यांच्याकडून विधिज्ञ हरिष साळवे बाजू मांडणार आहेत. तर विधिज्ञ कपिल सिब्बल कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.
07:41 AM
सकाळी साडे दहावाजता सुनावणी
एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे.
07:31 AM
महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक बंड आता सर्वोच्च न्यायालयात
राज्यातील सत्तापेच आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी अपेक्षित आहे.